व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी टेलिफोन कंपन्या फोन नंबर्सचा डेटा विकायचे. नंतर त्यांचे कर्मचारी स्वस्तात विकू लागले. आता ईमेल पण मिळतात. एका मित्राने त्याचे गाणे व्हायरल करण्यासाठी रेट विचारले. ते परवडत नसल्याने मग 5000 रुपये देऊन ईमेल घेतले. त्या सर्वांना लिंक दिली.

शेवटी या बाबतीत काय करायच याचा निर्णय ज्याचा त्यानी साधक बाधक विचार करुन आपला आपणच घ्यायचा आहे.

असे म्हणून माझे दोन पैसे:

१. सिग्नल ही कंपनी ब्रायन अ‍ॅक्ट्न ने चालु केलेली आहे. हा तोच ब्रायन अ‍ॅक्ट्न आहे ज्याने व्हॉटसप चालू करुन फेसबुकला बिलियन्स ऑफ डॉल्रर्सला विकली होती. नुसती विकली नव्हती तर अशा विकण्याचे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात जसे की विकणार्याला सगळे पैसे एकदम मिळत नाहीत तर काही वर्षे नविन कंपनीत काढायला लागतात. तशी ती त्याने काढून झाल्यावर मगच फेसबुक सोडून नविन कंपनी चालु केली. मग त्याला एकदम प्रायवसी बद्दल जागरुकता निर्माण झाली. आता यात त्याचा व्हेस्टेड ईंटरेस्ट नाही हे कशावरुन? पुन्हा तो हीच कंपनी दुसर्या कुणाला किंवा फेसबुकलाच परत विकणार नाही याची ग्यारंटी कोण देतय का?
त्याला फेसबुकला व्हॉटसप विकताना हे कळल नसेल का की ही कंपनी प्रॉफिटेबल करायचा फेसबुकचा आज ना उद्या मार्ग म्हणजे अ‍ॅडवर्टाईजमेंट असणार आहे? तरीही त्या वेळेला त्यानी ती कंपनी फेसबुकला विकलीच ना?

२. तुम्ही म्हणाल की फेसबुक विकुन त्याच्याकडे रग्गड पैसे आल्यामुळे त्याला आता बाहेरील पैशांची कंपनी चालवायला गरज नाही. यावर मला अस म्हणायच आहे की तुम्हाला फेसबुक स्केल वर कंपनी चालवायला किती पैसे खर्च करायला लागतात याची कल्पना नाही. प्रत्येकाचा डेटा सुरक्षित ठेवण, तो पटकन दाखवण, त्याचे रिलायबल बॅकाप्स ठेवण या सर्व गोष्टींसाठी प्रचंड पैसे खर्च होतात. नुसत एक एक डेटा सेंटर तयार करुन चालु ठेवण यात पुन्हा बिलियन्स आणि बिलियन्स ऑफ डॉल्रर्स खर्च होतात. त्याच्या पुढे त्याचे स्वतःचे रग्गड पैसे स्वतःसाठी जरी खुप असले (आणि कदाचित त्याच्या पन्नास पिढ्यांसाठी ही खुप असले) तरी फेसबुक सारख्या स्केल वर कंपनी चालवायला २-३ वर्षे ही पुरेसे नाहीत. आता तुम्ही म्हणाल की मग तो बाहेरुन ईन्व्हेस्ट्मेंट घेउ शकेल. तर त्याचे उत्तर असे आहे की अशी ईन्व्हेस्ट्मेंट करणारे काही फुकट करत नसतात. त्यांना १०० एक पट प्रॉफिट हवा असतो. मग परत ते अ‍ॅडवर्टाईज करायला सुरु करणार. दुसरा एक मार्ग म्हणजे युजर्स कडुन पैसे घेणे. पण हे तितकस सोप नाही. नक्की कुणाकडुन आणि कसे कसे पैसे घेणार? तुम्ही स्वतः दरमहा ४००-५०० किंवा कितीही पैसे द्यायला तयार होणार का? भले तुम्ही कराल, पण तुमचे सगळे मित्र मैत्रिणि नातेवाईक करतील का? आणि नाही केले तर मग अशा मेसेंजर चा काय फायदा ज्याच्यावर तुमच्या ओळखीचे लोकच नाहीत? शिवाय काही काही लोक खुप ज्यास्त वापरणार आणि काही काही लोक खुप कमी. मग युजर टीअर्स करुन पैसे चार्ज करणार का? वर परत पैसे घेत आहेत म्हणल्यावर लोक सपोर्ट मागणार की फोन किंवा ईमेल्स लगेच उत्तर द्या काहीही ईश्यु आला की. जेव्हा जेव्हा तुम्ही अशा कामांसाठी लोक ठेवता तेव्हा त्यांचे पगार ईत्यादी द्यायला परत तुमचे मंथली चार्जेस वाढणार. जर त्यांनी कंपनी पब्लिक नेली तर पुन्हा त्यांना फेसबुक सारखेच सातत्यानी शेअर होल्डर्सला नफा दाखवायला लागेल किंवा शेअर्स पड्तील. म्हणजे त्या मार्गावरही अ‍ॅडवर्टाईज आलेच.

३. फेसबुक सारखी कंपनी गेल्या काही वर्षांपासुन प्रचंड स्क्रुटीनी खाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्या त्या एरीयात मुलभुत संशोधन केलेल्या संशोधकांची फौजच म्हणतात येईल अशी आहे. शिवाय कंपनी पब्लिक असल्यामुळे त्यांना हे सर्व ओपनली दाखवायला लागत. याशिवाय फेसबुकच्या आतमध्येही तुम्ही उठसुठ कुणाचाही डेटा पाहु शकत नाही. तो सगळा एनक्रिप्ट केलेला असतो. तुम्ही काय काय अ‍ॅक्सेस केले याचे सातत्यानी ऑडिट होत असते. यात जर कुणी सापडला तर नुसते काढुन टाकत नाहीत तर लॉ एनफोर्स्मेंट ला तक्रार केली जाते. याशिवाय तुमच्या ओळखिच्याच काय पण ईनडायरेक्टली ओळखिच्या लोकांच्या लोकांचा डेटा अ‍ॅक्सेस करायची परवानगी अजिबातच नाही. हे सर्व सिग्नल सारख्या प्रायव्हेट कंपनीत आहे का? का त्यांचे दावे आपण केवळ ऐकुन खरे आहेत म्हणुन विश्वास ठेवायचा? टेलिग्राम ची तर बातच सोडा कारण त्यांचे के जी बी सारख्या गुप्तचर विभागाबरोबर लागेबांधे आहेत असे ऐकुन आहे.

४. ईलॉन भाउंबरोबर प्रचंड आदर आहे आणि विदाऊट अ डाउट त्याचे सुरु असलेले काम जग बदलणारे आहे. पण त्याला बरेचदा त्याला कळत नसलेल्या बाबतीत उठाठेव करायची खोड आहे आणि वेळोवेळी याबद्दल त्याला ईतरांनी याबाबतीत कॉल ऑऊटही केलेले आहे. आपण केवळ कुणीतरी फेमस व्यक्ती काहीतरी म्हणतो म्हणून ऐकायचे कधी थांबवणार? उद्या समजा कळल की त्यानी सिग्नल मध्ये ईन्व्हेस्ट्मेंट केली आहे किंवा तो आणि ब्रायन अ‍ॅक्ट्न फ्रेंड्स आहेत किंवा त्याची आणि फेसबुकची दुष्मनी आहे तर? शेवटी कितीही फेमस असला तरीही तो एक माणुसच आहे ना? कधी थांबवणार हे व्यक्तीपुजेचे स्तोम?

हे सगळ सांगुन मला हे नाही म्हणायच की व्हॉटसपच वापरा किंवा नका वापरु. तुम्हाला जे योग्य वाटते ते वापरा. पण डोळसपणे सर्व गोष्टींचा विचार करुन मग निर्णय घ्या.

मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत काही मतभेद असतील तर ते ऐकायला निश्चितच आवडेल.

कुणाचे काय व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत, कुणाचा इतिहास काय आणि कोण पुढे काय करेल हे महत्वाचं आहेच. पण सर्वात महत्वाचं आहे ते फेअर बिझनेस.
युट्यूबने ५० रूपये भरलेत तर जाहीराती न दाखवता युट्यूब वापरता येईल असा पर्याय दिला आहे. ज्याला जाहीराती नकोत तो पैसे देईल ना ?
कुठलीही मेसेंजर सर्व्हिस असो, पैसे लागतात तर सरळ ग्राहकाला सांगावे की तुमचा डेटा थर्ड पार्टीला शेअर न करण्यासाठी अमूक एक फीस भरा.
हे अशक्य आहे का ? पण हे लोक असं का करत नसतील ? कारण चोरून आणि अनफेअर बिझनेस द्वारा त्यांना जास्त पैसे मिळतात. कित्येकांना मोबाईल अ‍ॅप्स कुणीतरी बनवतं हेच ठाऊक नसतं. फोनसोबत एसएमएस आणि इतर सुविधा येतात तसंच हे वेगळं घ्यावं लागतं वाटतं असा त्यांचा समज असतो.

> युट्यूबने ५० रूपये भरलेत तर जाहीराती न दाखवता युट्यूब वापरता येईल असा पर्याय दिला आहे. ज्याला जाहीराती नकोत तो पैसे देईल ना ?

माझ्यामते मी हा मुद्दा क्लियर केलेला आहे. युट्यूब आणि मेसेंजर सर्व्हिस या दोन्ही भिन्न स्वरुपाचे अ‍ॅप्स आणि तसेच त्यांचे युसेज पॅट्र्न्स वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत.

> कुठलीही मेसेंजर सर्व्हिस असो, पैसे लागतात तर सरळ ग्राहकाला सांगावे की तुमचा डेटा थर्ड पार्टीला शेअर न करण्यासाठी अमूक एक फीस भरा.

माझ्या माहीतीनुसार अ‍ॅडवर्टाईज करण्यासाठी तुमचा डायरेक्ट डेटा शेअर होत नाही. अ‍ॅडवर्टाईजर्स अ‍ॅडवर्टाईज्मेंट कंपनीला सांगतात की मला ही अ‍ॅडवर्टाईज अशा व्यक्तीला दाखवायची आहे की जी पुरुष आहे, वय ३०-४० आहे, भारतातील आहे, आणि ज्याला ट्रॅवल मध्ये ईटरेस्ट आहे. मग त्या अ‍ॅडवर्टाईज्मेंट कंपनीचे ए आय चे सॉफ्ट्वेअर ऑटोमॅटिकली शोधुन काढते की अशा व्यक्ती कोण आहे (जसे की बेस्ड ऑन कॉनवर्सेशन विथ फ्रेंड्स). आणि त्या व्यक्तीला ती अ‍ॅडवर्टाईज दाखवते. यात या व्यक्तीचा डेटा, त्या अ‍ॅडवर्टाईज्मेंट कंपनी च्या बाहेर कसा जातो?
तुम्हाला या बाबतीत अधिक माहीती असल्यास प्रकाश टाकावा ही विनंती.

> पण सर्वात महत्वाचं आहे ते फेअर बिझनेस.
> कारण चोरून आणि अनफेअर बिझनेस द्वारा त्यांना जास्त पैसे मिळतात.
हे चुकीचे आहे अस नाही वाटत? नक्की कोण आणि काय चोरत आहेत हे स्प्ष्ट कराल का?
आणि जर प्रश्न डेटा बाब्तीत असेल तर मग गुगल सारख्या कंपनी बरोबर तुम्ही तुमचे ईमेल्स आणि सर्च हिस्टरी तरी का शेअर करता?
तिथेही असाच आग्रह का नाही धरत?

>>पुन्हा तो हीच कंपनी दुसर्या कुणाला किंवा फेसबुकलाच परत विकणार नाही याची ग्यारंटी कोण देतय का?.<<
सिग्नल चे मालक सिग्नल फाउंडॅशन आहेत. जी एक नॉट फॉर प्रॉफिट (५०१सी३) संस्था आहे. अशा संस्था इक्विटि बेस्ड नसतात, म्हणजेच विकल्या जाउ शकत नाहित. आणि कंट्रोल ट्रांस्फर करावाच लागला, किंवा दुकान बंद करावंच लागलं तर त्यांचे अ‍ॅसेट्स दुसर्‍या ५०१सी३ संस्थेकडेच शिफ्ट करावे लागतात. थोडक्यात, फँगसारखे दादा लोक सिग्नलला गिळु शकत नाहित...

योगेश२९, छान माहिती देत आहात.

हे लिही पर्यंत राज यांनीही चांगली माहिती दिली.

मी सध्या काय करावे (WA सोडावे का, दुसरी कडे कुठर शिफ्ट व्हावे) या द्विधा मनःस्थितीत आहे. मी मायबोली आणि WA सोडुन दुसरे कुठलेच सोशल मीडिया वापरत नाही.

इथल्या चर्चेतून निर्णय घेण्यास मदत होईल अशी आशा आहे.

तिथेही असाच आग्रह का नाही धरत? >>> हा काय प्रकार आहे ? माझं मत मांडलं मी. तुम्ही भांडायला येताय.
कुणातर्फे ? ती भाजपची मंडळी मग तुम्ही कोर्टात का जात नाही असे हास्यास्पद बोलत राहतात.
मी ग्राहक आहे. मला या कंपन्यांनी बोलावं. तुम्ही त्यांचे वकील आहात का ?

> कारण चोरून आणि अनफेअर बिझनेस द्वारा त्यांना जास्त पैसे मिळतात.
हे चुकीचे आहे अस नाही वाटत? नक्की कोण आणि काय चोरत आहेत हे स्प्ष्ट कराल का?
आणि जर प्रश्न डेटा बाब्तीत असेल तर मग गुगल सारख्या कंपनी बरोबर तुम्ही तुमचे ईमेल्स आणि सर्च हिस्टरी तरी का शेअर करता? >>> हे कोर्ट आहे का ? तुम्ही कोर्टात जज्ज आहात काय ?
जी गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी महत्वाच्या लोकांनी मांडलेली आहे ती तुम्हाला अजिबातच ठाऊक नाही का ? इथे लोक उगीचच म्हणून मतं मांडत आहेत का ?
प्रत्येक गोष्टीत पुरावे मागताना तारतम्य बाळगावं. मी तुम्हाला पुरावे देऊ लागत नाही. असले अभिनिवेश तुमच्याकडेच ठेवा.
प्रतिसाद नीट वाचत जा. मी म्हटलेय की मला या क्षेत्रातली काडीचीही माहिती नाही. मला ग्राहक म्हणून सुरक्षितता हवी. तुमचे आकलन नीट करा आधी.

मी जीमेल वापरते कि कोणते हे तुम्हाला कुणी सांगितले ?
मी काय करते यावर तुम्ही का चर्चा करताय ? चर्चेचा विषय मी आहे का ? जी गोष्ट मी इथे बोललेच नाही त्यावर तुम्ही मला आरोपी बनवताय. काय प्रकार आहे हा ? तुम्हाला तो अधिकार आहे का ?
मी एक चूक करीन नाहीतर दहा. तो माझा विषय आहे. मी जोपर्यंत तुम्हाला ते सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला अधिकार पोहोचत नाही.
विषय काय आहे त्यावर बोला फक्त.
तुम्ही काय करता त्यात मला काडीचाही रस नाही.

Fb, WhatsApp, you tube ह्या आणि अशा अनेक सेवेचे व्यसन आपण लावून घेतलेले आहे.
या सेवा नाही वापरल्या म्हणून जीवन थांबणार नाही.
अनावश्यक आहेत ह्या सर्व सेवा.
खूप लोक ह्या सर्व सेवा ज्या मोबाईल वरून वापरतात त्या मध्ये सिम कार्ड कधीच वापरत नाहीत.
फक्त वायफाय वर च त्यांची सेवा घेतात.

कुणाचे काय व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत, कुणाचा इतिहास काय आणि कोण पुढे काय करेल हे महत्वाचं आहेच. पण सर्वात महत्वाचं आहे ते फेअर बिझनेस.>> पूर्णपणे सहमत.. कदाचित ह्याच कारणामुळे जेव्हा एलाॅन मस्कने सिग्नल वापरा म्हणून सांगितलं तेव्हा बऱ्याच जणांनी ते वापरायला सुरूही केलं.. Elon musk has a vision and lot of people believe in his vision.. but we don’t know what vision WhatsApp has.. पुढे जाऊन ते कोणता डेटा कसा वापरतील कोणास ठाऊक..

>> तिथेही असाच आग्रह का नाही धरत? >>> हा काय प्रकार आहे ? माझं मत मांडलं मी. तुम्ही भांडायला येताय.

याला चर्चा करणे असे म्हणतात. तुम्ही मांडलेला तुमचा स्वतःचाच नियम कन्सिटंट आहे की नाही ते मी तुम्हाला आणि इतरांना तपासायला सांगत आहे. नाहीतर एका प्रकारच्या अ‍ॅप वर डेटा जरी वाचवला तरी दुसरीकडे तो चोरला जाईल. म्हणजे असाच प्रकार की सगळ्या खिडक्या लावुन घेतल्या तरी दरवाजे सताड उघडे.

> कुणातर्फे ? ती भाजपची मंडळी मग तुम्ही कोर्टात का जात नाही असे हास्यास्पद बोलत राहतात.
> मी ग्राहक आहे. मला या कंपन्यांनी बोलावं. तुम्ही त्यांचे वकील आहात का ?

तुम्ही उगिचच या चर्चेला नको ते वळण देउ पहात आहात. मी कुणाही तर्फे भांडत नाहीये. ईन फॅक्ट मी माझ्या पोस्ट मध्ये स्प्ष्ट्पणे म्हंट्लय की तुम्हाला पाहिजे ते वापरा आणि समजुन वापरा. आता मलाच शंका येउ लागलिये कि तुम्हाला इतका तावातावनी भांडायला टेलिग्राम किंवा सिग्नल पैसे देतात की काय? :प

>> हे कोर्ट आहे का ? तुम्ही कोर्टात जज्ज आहात काय ?
>> जी गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी महत्वाच्या लोकांनी मांडलेली आहे ती तुम्हाला अजिबातच ठाऊक नाही का ? इथे लोक उगीचच म्हणून मतं मांडत >> आहेत का ?
>> प्रत्येक गोष्टीत पुरावे मागताना तारतम्य बाळगावं. मी तुम्हाला पुरावे देऊ लागत नाही. असले अभिनिवेश तुमच्याकडेच ठेवा.
>> प्रतिसाद नीट वाचत जा. मी म्हटलेय की मला या क्षेत्रातली काडीचीही माहिती नाही. मला ग्राहक म्हणून सुरक्षितता हवी. तुमचे आकलन नीट करा >> आधी.

मी माझ्या पोस्ट मध्ये पुरावा हा शब्द देखील वापरलेला नाहीये. इथे चर्चा चालु आहे आणि त्या अनुषंगाने कुणीही अधिक माहिती घत्ली तर बरेच आहे असे मी म्हणत आहे. माझ्या मते तुमचा आकलन नीट करण्याबाबतचा सल्ला तुम्हीच वापरला तर बरे होइल.

>> मी जीमेल वापरते कि कोणते हे तुम्हाला कुणी सांगितले ?
>> मी काय करते यावर तुम्ही का चर्चा करताय ? चर्चेचा विषय मी आहे का ? जी गोष्ट मी इथे बोललेच नाही त्यावर तुम्ही मला आरोपी बनवताय. काय प्रकार आहे हा ? तुम्हाला तो अधिकार आहे का ?
>> मी एक चूक करीन नाहीतर दहा. तो माझा विषय आहे. मी जोपर्यंत तुम्हाला ते सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला अधिकार पोहोचत नाही.
>> विषय काय आहे त्यावर बोला फक्त.
>> तुम्ही काय करता त्यात मला काडीचाही रस नाही.

चर्चा केवळ तुमच्या आणि माझ्या मध्ये नाही चाललेली, पब्लिक चर्चा आहे ज्यात इतर्ही लोक सामील आहे की ज्यातले बरेचसे जीमेल वापरत असतात. प्रत्येक गोष्ट इतकी पर्स्नली घेण्याईतक नार्सिस्टिक असु नये कुणीही.

असो. इथेच थांबुयात याबाबतीत आणि मुळ मुद्द्यावर लक्ष देउ यात.

>> सिग्नल चे मालक सिग्नल फाउंडॅशन आहेत. जी एक नॉट फॉर प्रॉफिट (५०१सी३) संस्था आहे. अशा संस्था इक्विटि बेस्ड नसतात, म्हणजेच विकल्या जाउ शकत नाहित. आणि कंट्रोल ट्रांस्फर करावाच लागला, किंवा दुकान बंद करावंच लागलं तर त्यांचे अ‍ॅसेट्स दुसर्‍या ५०१सी३ संस्थेकडेच शिफ्ट करावे लागतात. थोडक्यात, फँगसारखे दादा लोक सिग्नलला गिळु शकत नाहित...

हा चांगला मुद्दा आहे. मला या बाबतीत ज्यास्त काहीही माहीती नव्हत. याबद्दल जरुर विचार व्हावा.
अर्थात तरीही हा प्रश्न राहतोच की मग सेवा पुरवण्यासाठी पैसे कुठुन आणणार?

>> पूर्णपणे सहमत.. कदाचित ह्याच कारणामुळे जेव्हा एलाॅन मस्कने सिग्नल वापरा म्हणून सांगितलं तेव्हा बऱ्याच जणांनी ते वापरायला सुरूही केलं.. Elon musk has a vision and lot of people believe in his vision.. but we don’t know what vision WhatsApp has.. पुढे जाऊन ते कोणता डेटा कसा वापरतील कोणास ठाऊक..

माझ्या मते मी हे माझ्या पोस्ट मध्ये क्लियर केलेल आहे. एका विषयातील व्हिजन दुसर्या क्षेत्रात ट्रान्स्फर होतेच अस नाहीये.
बिल गेट्स ने सुद्धा ईलॉन ला या बाबतीत पुर्वी कान्पिच्क्या दिलेल्या आहेत.

गुजराती दुकानदार ,व्यापारी दोन मोबाईल ठेवतात.
एक एकदम साधा 1000 ते 1200 रुपयाचा .
आणि त्याच मोबाईल वरून लाखो ,करोड चे व्यवहार करतात.
आणि दुसरा स्मार्ट मोबाईल तो फक्त मनोरंजन करण्यासाठी.

मस्क टेंपरामेंटल आहे आणि वाट्टेल ते बोलतो. (आठवा: पेडो गाय) यात त्याची बरोबरी तात्यांशीच होऊ शकते. मस्क म्हणतोय म्हणून विश्वास ठेवण्यात शून्य अर्थ आहे.

>> तरीही हा प्रश्न राहतोच की मग सेवा पुरवण्यासाठी पैसे कुठुन आणणार?>> Signal runs totally on donations

बिलियन्स ऑफ डोल्रर्स ऑपरेटिंग कॉस्ट असलेले डेटा सेंटर्स निव्वळ डोनेशन्स वर चालतील यावर माझा तरी विश्वास बसत नाही.

>> मस्क टेंपरामेंटल आहे आणि वाट्टेल ते बोलतो. (आठवा: पेडो गाय) यात त्याची बरोबरी तात्यांशीच होऊ शकते. मस्क म्हणतोय म्हणून विश्वास ठेवण्यात शून्य अर्थ आहे.

एक्झॅक्टली एक्झॅक्टली!
मी हेच तर सांगायचा प्रयत्न करतोय. मी लिहिणार पण होतो "त्याची बरोबरी तात्यांशीच होऊ शकते" पण म्हणल भावना दुखावल्या जातील. तरीही मी काहीही विवादास्पद न लिहिताही लोकांनी भावना दुखावुन घेतल्या त्या घेतल्याच.

योगेश २९ तुमच्या आकलनाचा दोष आहे.
माझे सगळे प्रतिसाद वाचून संगती लावायचा प्रयत्न करा जमल्यास. आणि अशा चर्चेत पोलिटिकल स्टान्स घेत नका जाऊ.
ते भाजपवाले करतात ना ? सरकार उत्तरदायी असतं आणि हे मग अमका कुठे होता, तमका अस़ का करत नाही.
त्या पद्धतीने तुम्ही मला उत्तरदायी करताय. मी हा आग्रह का धरत नाही हा प्रश्न अनाठायी आहे.
मी उत्तरदेही नाही. मी पीडीत आहे. तुम्ही मलाच प्रश्न करताय गोदी मीडीयासारखे.
म्हणजे माझा नाईलाज म्हणून मी जीमेल वापरलं म्हणून मी चूक आणि हे चो-या करतात ते बाजूला ठेवायचं का ?

मी तुमच्याशी बोलतेय हा ग्रह का झालाय तुम्हाला ?
जर तुमचा एखादा मुद्दा कोट केला असेलच तर माझी मोठी चूक झाली. तुम्ही एक्स्पर्ट असाल तर फक्त तेव्हढंच बोला. मी काय करते आणि कुठे काय आग्रह धरत नाही हा तुमचा विषय नाही. समजलं ?

>> मी जीमेल वापरते कि कोणते हे तुम्हाला कुणी सांगितले ?
>> म्हणजे माझा नाईलाज म्हणून मी जीमेल वापरलं म्हणून मी चूक आणि हे चो-या करतात ते बाजूला ठेवायचं का ?

@रानभुली मला माफ करा, डोक फिरलेल्या आणि नेटिकेट्स माहीत नसलेल्या लोकांनी दुखवुनच घ्यायच ठरवल तर चर्चा निव्वळ अशक्य आहे.

मी या धाग्यावरुन रजा घेतो. तुम्ही सर्व निर्णय घेउनच टाकलेले आहेत आणि कोणीही लॉजिकली प्रतिवाद केला तर त्याच्यावरच उलटा हल्ला करणार. मग चर्चा कशाला?

छान झालं. आधी नीट बोलायला आणि नीट समजून घ्यायला शिका . तुम्हाला कसलेच एटीकेट्स नाहीत. मी तुमच्यावर कुठलीही वैयक्तिक शेरेबाजी केलेली नाही. विषय काय आणि तुम्ही कुणाला प्रश्न विचारता हे अजून तुम्हाला समजलेले नाही. कारण तुम्हाला हे असे ऑर्ग्युमेंट्स चुकीचे वाटत नाहीत. अशा नाठाळ लोकांशी योग्य ते प्रतिवाद करायला मला जमत नाही. चूक झाली आणि तुमच्या प्रतिसादानंतर मी प्रतिसाद दिला. बसा आता सत्रांदा एडीत करत.

योगेश २९ >> तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? तुम्हाल समजत नाही का ?
गुगल सर्च करा आणि ट्रंपची निवडणूक आणि फेसबुक असा सर्च देऊन वाचत बसा. या जगजाहीर गोष्टी कुणा माठाने मागितल्या म्हणून दर वेळी सर्च देत बसायचं का ?

@ अमितव यु आर अ‍ॅब्सोल्युट्ली राईट!!

मी थोडस सिग्नल बद्दल शोधल्यावर जे सापडल ते म्हणजे ते कुठेही बॅकअप घेत नाहीत. म्हणजे तुम्ही जर नविन डिव्हाईस घेतले तर तुमचा डेटा तुम्हालाच ट्रान्स्फर करावा लागेल. किंवा जर तुमचा फोन हरवला तर डेटा पर्मनंटली लॉस्ट.

आता ईट मेक्स सेन्स. ईफ दॅट इज अ‍ॅक्सेप्टेबल ट्रेड ऑफ फॉर यु, देन वन शुड स्विच टु सिग्नल.

हे नेहेमी आयदर सुरक्षा अथवा कन्विनियंस वर येउन थांबत. यु कान्ट हॅव ईट ऑल.

>> योगेश २९ तुमच्या आकलनाचा दोष आहे.
>> माझे सगळे प्रतिसाद वाचून संगती लावायचा प्रयत्न करा जमल्यास. आणि अशा चर्चेत पोलिटिकल स्टान्स घेत नका जाऊ.
>> ते भाजपवाले करतात ना ? सरकार उत्तरदायी असतं आणि हे मग अमका कुठे होता, तमका अस़ का करत नाही.

सारख सारख भाजपच नाव तुम्ही घेत आहात आणि मला "पोलिटिकल स्टान्स" बद्दल सांगत आहात. मी एक तरी पोलिटिकल शब्द बोललो आहे क?

Pages