व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट्सअ‍ॅप वर एकदाच शेअर केलं होतं. त्यानंतर फेसबुकवर मला जाहीराती येऊ लागल्या.>> म्हणजे व्हाट्सॲप वर आलेल्या डिटेंल्स च्या बेसिसवर तुम्हाला फेसबूक किंवा इतर कुठे हाॅटेल्स चे ॲाप्शन्स दिसू लागले का? पण end to end encryption मुळे असं होणं सध्या तरी शक्य नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट गूगल करतो तेव्हाच फेसबूक वर त्याच्याशी रिलेटेड इन्फोर्मेशन डिस्प्ले होण्याचे चान्सेस असतात.

थेट स्पाईस जेटच्या किंवा एअर इंडीयाच्या वेब साईटवर बुक केलं तर गुगल सर्च मधे जाहीराती पाठलाग करत नाहीत. पण थर्ड पार्टी ( बुकमायट्रीप इ) वापरले तर मग गुगल पाठलाग करत राहतं. >>हे शक्य आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.>> ज्या अर्थी आपण सगळे ते ॲप इतक्या वर्षांपासून वापरतोय म्हणजे त्यांच्याकडे तसाही आपला बराच किंवा सगळा डेटा आहेच.. फक्त ते आता लेखी पर्मिशन मागत आहेत म्हणजे पुढे ते तो डेटा त्यांना हवा तसा वापरू शकतील आणि लिगली त्यांना कोणी अडकवू शकणार नाहीत.

Messages are end to end encrypted but data backup is not.

हा फॉरवर्ड मिळालाय.
Debu

What does each of the following messengers apps collect.

Signal
———
None. (The only personal data Signal stores is your phone number)

Telegram
—————
Contact Info
Contacts
User ID

WhatsApp
—————-
Device ID
User ID
Advertising Data
Purchase History
Coarse Location
Phone Number
Email Address
Contacts
Product Interaction
Crash Data
Performance Data
Other Diagnostic Data
Payment Info
Customer Support
Product Interaction
Other User Content

Facebook Messenger
———————————
Purchase History
Other Financial Info
Precise Location
Coarse Location
Physical Address
Email Address
Name
Phone Number
Other User Contact Info
Contacts
Photos or Videos
Gameplay Content
Other User Content
Search History
Browsing History
User ID
Device ID
Product Interaction
Advertising Data
Other Usage Data
Crash Data
Performance Data
Other Diagnostic Data
Other Data Types
Browsing History
Health
Fitness
Payment Info
Photos or Videos
Audio Data
Gameplay Content
Customer Support
Other User Content
Search History
Sensitive Info
iMessage
Email address
Phone number Search history
Device ID

Messenger खूपच धोकादायक वाटत आहे रान भुली ह्यांच्या पोस्ट वरून.
True caller पण धोकादायक ऍप आहे असा माझा अनुभव आहे आणि मत सुद्धा.
जेव्हा लागेल तेव्हाच 5 मिनिट साठी true caller download करतो .
आणि काम झाले की लगेच delete करतो मी

गूगल,व्हॉट्सॲप, यूट्यूब,true caller, फेसबुक .
हे सेवा फुकट देवून काहीच समाजसेवा करत नाहीत.
तर जगातील सर्व लोकांवर लक्ष ठेवतात.
जोडीला
.
Pedometer
विविध गेम्स
गूगल मॅप.
आणि अशी खूप सारी ऍप आहेतच

@ऋन्मेष
तुम्ही netflix वरची 'द सोशल डिलेमा' डॉक्युमेंट्री पाहिली आहे का? नसेल तर पहावी

फक्त समाजसेवा करणारी व्यक्ती अजुन जन्माला यायची आहे. Happy
नीतीतत्त्वे किती गुंडाळुन ठेवलेली चालवुन घ्यायचे ते ज्याच्या त्याच्या आर्थिक आणि मानसिक ऐपतीवर अवलंबुन आहे. टेक कंपन्यांमध्ये नीतीतत्त्वांची चाड/ पारदर्शकता (सध्याचं वर्तन बघता) ठेवणारी चढतीभाजणी माझ्या मनात अशी आहे. फेसबुक (सगळ्यात कमी), अ‍ॅमेझॉन, गूगल, अ‍ॅपल आणि नेटफ्लिक्स - मायक्रोसॉफ्ट.
यात सध्या खिशाला किती परवडतं, मनाला करायला काय आवडतं आणि गरजेचं वाटतं त्यावर तडजोड किती करायची ते ठरवतो.

Messages are end to end encrypted but data backup is not. >>> जिज्ञासा कोणता बॅकअप? मेसेजेस चा बॅक अप व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हर वर घेता येतो का? आत्ता चेक केले तेव्हाही तशी काही सोय दिसत नाही.

पब्लिकला मुख्य चिंता मेसेजेस फेसबुक बघेल का याची आहे आणि तसे काही दिसत नाही.

हे तेच ना ज्याद्वारे चॅट एक्स्पोर्ट करून इमेल करता येते किंवा सेव्ह करता येते? ती तर व्हॉट्सअ‍ॅप च्या सर्व्हर वर नसते.

काय ओ ऋ,
त्या एलोन मस्क ची जगातील श्रीमंत व्यक्ति म्हणून निवड काय झाली... आणि त्याच्याबद्दलच्या एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या...
आता तो what's app च्या ऐवजी Signal app वापरतो
मग what's app हे signal app पेक्षा खूपच कमी सिक्युर (Comparision & all) आहे वगैरे वगैरे Biggrin
इतके वर्ष तसच वापरल होत ना ? झुकेरबर्ग भाऊजींनी विकत घेतल , तरीही वापरलच की
म्हणून आता तुम्ही लोकानी what's app च पोस्ट मार्टेम करायला घेतल आहे.
आता उद्या एलोन मस्क अमुक अमुक कंपनीची वस्त्रे-अंतरवस्त्रे वापरतो म्हणून तीच वापरायची असा अट्टाहास करणार आहात का ??

फा+१. माझ्या आकलनानुसार हे फोनवर किंवा गूगल ड्राईव्हवर स्टोअर करता येते. स्टोरेजचा व्हॉट्सअ‍ॅपशी डिरेक्ट संबंध नाही.
गूगल स्टोरेज अ‍ॅक्सेस करायचा इंटरफेस पब्लिक की सर्टिफिकेट सिक्युअर्ड आहे, अ‍ॅक्सेसला लॉगिन पासवर्ड आहेत. स्टोरेज एनक्रिप्टेड आहे. अर्थात त्याची की गुगल की हायरार्की मध्ये स्टोअर्ड आहे आणि वापर मशिन लर्निंग मध्ये नक्की होत असावा. तिसर्‍या व्यक्तीला ती माहिती देणार नाही त्या व्यक्तीला टॅग करुन वापर होणार नाही असं अ‍ॅग्रिमेंट मध्ये असावं. पण गूगल वर स्टोअर न करण्याची सोयही सहज उपलब्ध आहे.

फेसबुकला तुमच्या मेसेजेस मधे अजिबात इंटरेस्ट नाहि. व्हॉट्सअ‍ॅप कडुन तुमचा फोननंबर (आय्डेंटिटि), आणि लोकेशन डेटा आला कि पुढचं काम त्यांचं. तुमची कुंडली त्यांच्याकडे ऑलरेडि आहे...

काल/आज कुठेतरी असं वाचनात आलं फेसबुककडे तुमचा सगळा डेटा (ब्राऊजिंग हिस्टरी,पर्चेस हिस्टरी आणि अजून काय ते) असतो, तुम्ही फेसबुक युजर नसलात तरी.
यातील "फेसबुक युजर नसलात तरी" हा भाग खरा आहे का?
असल्यास फेसबुक हा डेटा गुगल आणि अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे लोकांकडून मिळवते का?

असल्यास फेसबुक हा डेटा गुगल आणि अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे लोकांकडून मिळवते का? >> हो.. सध्या ॲप टू ॲप डेटा शेअरींग करण्यावर बंधन नाहीत त्यामुळे हे शक्य आहे.. पण पुढे जाऊन Apple बहुतेक app to app डेटा शेअरींग बंद करणार आहे असं वाचलंय .. म्हणजे कमीतकमी Apple फोन्सवरून तरी आपण गूगलवर काही सर्च केलं तर फेसबूकवर त्याच्याशी रिलेटेड कोणत्या ॲड्स दिसणार नाहीत

लोकेशन डेटा साठी व्हॉटस अ‍ॅप का ?>> कदाचित त्या इन्फाॅर्मेशनच्या बेसिसवर तुमच्या एरियातील स्टोअर्स किंवा सेल किंवा अजून काही गोष्टी ज्यात तुम्हाला इंटरेस्ट असू शकतो, अशा गोष्टींची जाहिरात फेसबूक करेल.

>>लोकेशन डेटा साठी व्हॉटस अ‍ॅप का ?<<
कारण तो फेसबुकपेक्षा जास्त डीप, डेन्स आणि अ‍ॅक्युरेट आहे. मोबाय्ल डिवाय्स वर व्हॉट्सअ‍ॅपचा स्क्रीनटाइम, ऑन ऑन अ‍ॅवरेज, फेबुपेक्षा जास्त असतो...

फेसबुकला १००% इन्टरेस्ट असेल मेसेजेस मधे. त्याद्वारे त्यांना त्यांचे अ‍ॅड्स व तुमच्या चॉईसचे ग्रूप्स दाखवणे वगैरेही अजून करता येइल. पण व्हॉट्सअ‍ॅपने पूर्वीच याबद्दल कमिटमेण्ट दिलेली आहे - की ते मेसेजेस शेअर करत नाहीत, किंबहुना व्हॉट्सअ‍ॅप ही ते वाचत नाहीत- आणि फेसबुकने अजून तरी त्यापासून फारकत घेतलेली नाही.

ज्या लॉजिकने आपली फेबु पोस्ट ते अ‍ॅनेलाइज करू इच्छितात त्याच लॉजिकने व्हॉअ‍ॅ मेसेजेसही उपयोगाचे आहेत. पण सध्या ते शेअर केले जाणार नाहीत.

फोननंबर व बाकी मेटाडेटाचा उपयोग आहेच. पण मेसेजेसचाही आहे.

व्हाट्सएप GPS लोकेशन शेअर करणार नाही, तर फोन नंबर, सर्व्हिस प्रोव्हाईडर, आणि फोनचा आयपी ऍड्रेस आणि त्यावरून कळणारे लोकेशन शेअर करणार असे आताच वाचनात आले. म्हणजे टॉवर लोकेशन किंवा आयपी ऍड्रेस वरून कळणारे लोकेशन जे शहर/जिल्हा स्तरावर असेल.

ओके मला समजले आत्ता. माझा डाऊट वेगळा होता. जीपीएस असताना व्हॉअ‍ॅ का ?
पण तुमच्या उत्तरांनी डोक्यात प्रकाश पडला. त्यासाठी अ‍ॅप वापरात असायला हवंय. असंच ना ?

त्या इन्फाॅर्मेशनच्या बेसिसवर तुमच्या एरियातील स्टोअर्स किंवा सेल किंवा अजून काही गोष्टी ज्यात तुम्हाला इंटरेस्ट असू शकतो, अशा गोष्टींची जाहिरात फेसबूक करेल. >> फक्त जास्त ( किंवा माझ्या एरिआतील जास्त ) दुकानांच्या जाहिराती दिसतील एवढाच तोटा असेल ह्या नविन पॉलिसीचा तर मला तरी काही ते फार धोकादायक वाटत नाही. कोणी कितीही जाहिरातबाजी केली तरी अनावश्यक गोष्टी किती प्रमाणात घ्याव्यात ह्याचा सारासार विचार मी करू शकते अजूनतरी.

कोणतीही सेवा नफ्यासाठी असणार हे कबूल आहे. फक्त त्यांनी सेवा देण्याआधी स्पष्ट सांगायला हवं. इथे रजिस्ट्रेशनसाठी जो मेन्यू येतो तो वाचायला सोपा नसतो. शेअर मार्केटला रिस्कची जाहीरात करणे बंधनकारक आहे. सिगारेटला पण आहे. तसंच या कंपन्यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल मीडीयातून रिस्कबाबत जाहीराती देणे बंधनकारक करणे अशक्य नाही.
ज्याला या रिस्कसहीत घ्यायचे त्याने ती जरूर घ्यावी. पण सर्व्हिस घेतल्यानंतर लक्षात आले की फसवले गेल्याची भावना होणारच. मला या क्षेत्रातली माहिती नाही. पण एक ग्राहक म्हणून माझी मनःस्थिती इतरांपेक्षा वेगळी नसावी.
व्हॉट्सअ‍ॅप एव्हढे घातक आहे हे समजले की मी टेलिग्रॅम कडे जाणार आणि त्यांनीही जास्त ग्राहक आल्यावर पॉलिसी बदलली आणि कन्सेन्ट हुषारीने घेतले, ते नंतर समजले की सिग्नलकडे जाणार.

या सेवा सहकारी पद्धतीने किंवा सरकारी कंपनीकडून नाहीत का मिळू शकणार ?

Pages