व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हाट्सअप्प चे 2 बिलियन युसर्स आहेत, काही लाख सिग्नल कडे गेल्याने त्यांना जास्त फरक पडत नाही...

डिसक्लेमरः मी व्हॉट्सॅप किंवा सिग्नल या दोघांपैकी कुठले वापरा ते सांगत नाहीये आधीपासुनच. ते प्रत्येकाने आपल आपण ठरवायच. टेलीग्राम मात्र नक्कीच वापरु नका. तेच जर वापरायच असेल तर सरळ वीचॅट का नाही वापरत? दोन्ही स्टेट स्पॉन्सरड आहेत.

------

ओपन सोर्स बद्दलः

१९९७ मध्ये जेव्हा "The Cathedral and the Bazaar" हा निबंध लिहिला गेला होता तेव्हाच जग आणि आत्ताच जग यात जमिन आस्मानाचा फरक आहे. तेव्हा एकही डीसेंट ओपन सोर्स ऑपरेटींग सिस्ट्म नव्हती. लिनक्स बेअरली रांगत होती. लोक विम आणि ईमॅक्स मध्येच भांडत होते. त्यावेळी ओपन सोर्स ही एक क्रांतीकारी फिलॉसॉफी होती. Eric S. Raymond आणि Richard Matthew Stallman या लोकांना असा भाबडा आशावाद होता की जर तुम्ही सगळ्या लोकांना ओपन सोर्स बद्दल सांगितल आणि सगळे सॉफ्टवेअर्स ओपन सोर्स असतील तर प्रत्येक जण ते डाऊनलोड करुन आपल्याला पाहीजे तसे बदल करुन (कस्ट्माईझ) वापरतील. यात त्यांची किंवा त्यांच्या फॉलोअर्स ची (यात एकेकाळी मी पण होतो आणि Richard Matthew Stallman ला प्रत्येक्ष भेटलो आहे) काहीही चुकी नव्हती. तो काळच वेगळा होता. क्लाऊड कंप्युटींग आणि वेब २.० यांचा उदय पण झालेला नव्हता. लोक स्वतःचे वेब सर्वर्स, मेल सर्वस स्वतःच होस्ट करायचे. त्यावेळेला धड कंप्युटींग साठी जी ईसेंशियल टूल्स असतात (कंपायलर, एडिटर, ऑपरेटिंग सिस्ट्म्स ई ई) ती पण नसायची. नुसत लिनक्स कर्नल कंपाईल करण लयी भारी समजल जायच.

आता जवळ जवळ पंचवीस वर्षांनी या सगळ्यासाठी भरपुर टुल्स उपलब्ध आहेत. जग झपाट्यानी बदलल आहे. ओपन सोर्स बद्दलः ईंडस्ट्री प्रॅक्टीशनर्सला नाविन्य असे काहीच उरलेल नाही. कारण सगळ्यांनी कमीत कमी एक किंवा दोन ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स स्वतः लिहिलेली असतात. सगळ्या टॉपच्या कंपनीज मध्ये बरेच प्रोजेक्ट्स ओपन सोर्स केले जातात. बहुतांश वेळेला ओपन सोर्स बद्दल अप्रुप किंवा त्याची महती गाणे हे नुकतेच ग्रॅजुएट झालेले विद्यार्थी यांच्यातच दिसुन येते (म्हणुनच माझा गैरसमज झाला की ओपन सोर्स चे गुणगान गाणारे हे नविन अनअनुभवी विद्यार्थी आहेत). ईट हॅज बिकम ऑलमोस्ट टेकन फॉर ग्रांटेड. असो, ईतकी वर्षे अनुभव घेतल्यावरही ओपन सोर्स चे अप्रुप असणे माझ्यासाठी तरी नविनच आहे.

पण नुसते ओपन सोर्स आहे म्हणुन कमी बग्ज हे खुपच आश्चर्यकारक विधान आहे. कारण की ईतके ओपन सोर्स प्रोजेक्ट आहेत की त्यांची क्वालीटी युज्वली कमी असते. एस्पेशली ते स्केल वर टेस्ट केले गेले नसतील तर. तुम्ही एखादी कंपनी ओपन सोर्स प्रोजेक्ट्स वापरुन काढल्याने तुमच आयुष्य खुप सुखकारक होते हा गैरसमज आहे. एखाद्या सेवा पुरवठादार कंपनीचे अ‍ॅट स्केल चॅलेंजेस खुप खुप वेगळे असतात. एस्पेशली जर ती कंपनी ब्रेकनेक स्पीड ला चालत असेल आणि मायक्रो सर्विसेस वगैरे वापरत असेल तर.

------

सिग्नल ला बिलियन्स ऑफ डॉलर्स च्या क्लाऊड सुविधा लागतील का नाही?

वर कुणीतरी २०१८ ची अत्यंत जुनी माहीती देऊन असे क्लेम केले आहे की त्यावेळी सिग्नल ला हाफ मिलियन डॉलर्स लागत होते तर आता फ्यु मिलियन्स मध्ये काम होईल. आणि क्लाऊड असल्यामुळे स्केलेबिलिटीच काम अत्यंत सोपे होईल. दोन्ही क्लेम्स चुकीचे आहेत.

केवळ चारच दिवसांपुर्वी ब्रायन अ‍ॅक्टन म्हणालाय हे:
“If Signal gets to a billion users, that’s a billion donors. All we have to do is get you so excited about Signal that you want to give us a dollar or 50 rupees. The idea is that we want to earn that donation. The only way to earn that donation is building an innovative and delightful product. That’s a better relationship in my opinion,”

(फ्रोमः https://techcrunch.com/2021/01/12/signal-brian-acton-talks-about-explodi...)

म्हणजेच त्याला सिग्नल चालवण्यासाठी एक बिलियन डॉलर्सची गरज आहे. आता ही गरज रीकरींग असणार आहे हे त्याने शिताफीने गुल्दस्तात ठेवलेले आहे.

दुसरी गोष्ट, केवळ क्लाऊड मध्ये गेले म्हणजे एका बटनासरशी कसेही स्केल करता येते. केवळ काही दश-मिलियन नविन युजर्स मुळे सिग्नल गेले चोवीस तास ऑउटेज मध्ये आहे. हा बघा जवळ जवळ गेले २६ तास असलेला त्यांचा स्क्रीन्शॉटः
Screen Shot 2021-01-16 at 2.52.04 PM.png

------

मायबोली प्रशासन, तुम्ही जाहीराती सुरु करुन प्रॉफिट कमावत आहात. चांगली गोष्ट आहे. पण त्याच बरोबर तुम्ही युजर डेटा बद्दल काय पॉलिसीज आहेत आणि एखाद्याला जर त्याचा डेटा आणि अकांऊंट डिलिट करायचे असेल तर कसे करायचे याचीही सुविधा दिली पाहीजे. तुमचे रेजिस्ट्रेशन मॅसेच्युसेट्स मध्ये झालेले आहे. त्या राज्याच्या प्रायवसी लॉज प्रमाणे युजर्स ला त्यांचा डेटा उडवण्याचे पुर्ण स्वातंत्र आहे. मी तुम्हाला वांरवार विनंनी करुन्ही तुम्ही काहीही उत्तर दिले नाहीत. परंतु जेव्हा उपाशी बोका यांनी तुमच्या जाहीराती दाबण्याबद्दल लिहिले तेव्हा तुम्ही त्यांचा प्रतिसाद ताबडतोब उडवला होता.

@रात्रीचा आत्मा तुम्ही डोक्यावर पडलेले आहात का?

इथे विषय चालला आहे सिग्नल आणि व्हॉट्सॅपचा. सिग्नल ओपन सोर्स आहे. म्हणुन ओपन सोर्स बद्दल बोलत आहे. इथे ब्लॉकचेन कुठुन आली?
तुम्ही असाल कोलंबिया किंवा फोलंबिया मधुन सन्मानित किंवा आय आय एम मधुन डिग्री घेतली असेल किंवा लोकसत्ता तुम्हाला लय भारी म्हणत असेल. मला त्याच्याशी काय घेण देण?

------

मायबोली प्रशासन, तुम्ही जाहीराती सुरु करुन प्रॉफिट कमावत आहात. चांगली गोष्ट आहे. पण त्याच बरोबर तुम्ही युजर डेटा बद्दल काय पॉलिसीज आहेत आणि एखाद्याला जर त्याचा डेटा आणि अकांऊंट डिलिट करायचे असेल तर कसे करायचे याचीही सुविधा दिली पाहीजे. तुमचे रेजिस्ट्रेशन मॅसेच्युसेट्स मध्ये झालेले आहे. त्या राज्याच्या प्रायवसी लॉज प्रमाणे युजर्स ला त्यांचा डेटा उडवण्याचे पुर्ण स्वातंत्र आहे. मी तुम्हाला वांरवार विनंनी करुन्ही तुम्ही काहीही उत्तर दिले नाहीत. परंतु जेव्हा उपाशी बोका यांनी तुमच्या जाहीराती दाबण्याबद्दल लिहिले तेव्हा तुम्ही त्यांचा प्रतिसाद ताबडतोब उडवला होता.

मला तुम्ही माझे प्रतिसाद डिलिट करुन माझे सदस्यत्व रद्द करायची सुविधा द्या आणि मी ईकडे परत फिरकणार ही नाही. राहु देत हा प्लॅटफॉर्म "रात्रीचा आत्मा" सारख्या एक्सपर्ट्स साठी.

आज व्हॉटसपतर्फे हे स्टेटस दिसले
आणखी कोणाला आले का?

सॉरी व्हॉटसप.. मी तुझे मला आलेले प्रायव्हेट मेसेज पब्लिक फोरमवर शेअर करतोय

Screenshot_2021-01-17-12-41-44-521_com.whatsapp.jpg

.
Screenshot_2021-01-17-12-41-30-632_com.whatsapp.jpg

.

Screenshot_2021-01-17-12-41-35-655_com.whatsapp.jpg

.

Screenshot_2021-01-17-12-41-39-903_com.whatsapp.jpg

@रात्रीचा आत्मा तु अशीच जर त्याची भक्तीभावाने पुजा केलीस तर एक दिवस तो प्रसन्न होउन तुला त्याच्या आय आय एम च्या डीग्री ची झेरॉक्स काढुन तुला तुझ्या देव्हार्यात पण ठेवायला देईल!

------

मायबोली प्रशासन, तुम्ही जाहीराती सुरु करुन प्रॉफिट कमावत आहात. चांगली गोष्ट आहे. पण त्याच बरोबर तुम्ही युजर डेटा बद्दल काय पॉलिसीज आहेत आणि एखाद्याला जर त्याचा डेटा आणि अकांऊंट डिलिट करायचे असेल तर कसे करायचे याचीही सुविधा दिली पाहीजे. तुमचे रेजिस्ट्रेशन मॅसेच्युसेट्स मध्ये झालेले आहे. त्या राज्याच्या प्रायवसी लॉज प्रमाणे युजर्स ला त्यांचा डेटा उडवण्याचे पुर्ण स्वातंत्र आहे. मी तुम्हाला वांरवार विनंनी करुन्ही तुम्ही काहीही उत्तर दिले नाहीत. परंतु जेव्हा उपाशी बोका यांनी तुमच्या जाहीराती दाबण्याबद्दल लिहिले तेव्हा तुम्ही त्यांचा प्रतिसाद ताबडतोब उडवला होता.

@ऋन्मेष
Whatsapp can't see your shared location.

But can see your accurate location if you give GPS permission and if you don't determines your coarse location with your IP address and can share it with FB. असं नव्या पॉलिसीत लिहिलंय.
पॉलीसी वाचलीस का?

>> ओपन सोर्स बद्दलः ईंडस्ट्री प्रॅक्टीशनर्सला नाविन्य असे काहीच उरलेल नाही. कारण सगळ्यांनी कमीत कमी एक किंवा दोन ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स स्वतः लिहिलेली असतात. सगळ्या टॉपच्या कंपनीज मध्ये बरेच प्रोजेक्ट्स ओपन सोर्स केले जातात.
>> ईट हॅज बिकम ऑलमोस्ट टेकन फॉर ग्रांटेड.

अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की जरा नजर उचलुन बघितलं तर लहान मोठी शेकडो (हजारो?) ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स आपल्या आजुबाजुला दिसतील? कमाल आहे, हा मुद्दा अजुन इथल्या कोणाच्याच लक्षात कसा आला नव्हता?

“If Signal gets to a billion users, that’s a billion donors." या वाक्याचा (आणि उरलेल्या परीच्छेदाचाही) अर्थ "म्हणजेच त्याला सिग्नल चालवण्यासाठी एक बिलियन डॉलर्सची गरज आहे. आता ही गरज रीकरींग असणार आहे हे त्याने शिताफीने गुल्दस्तात ठेवलेले आहे." असा होतो हे समजावण्याबद्दल धन्यवाद. कायेना, मराठी माध्यमातुन शिकल्यामुळे की काय माझी सायबाच्या भाषेवरची पकड वाईच ढीलीच आहे.

रात्रीचा आत्मा, डॉ. अपर्णा लळिंगकर यांचा लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
त्याची लिंक मिळु शकेल का इतर ठिकाणी शेअर करायला?

डॉ. अपर्णा लळींगकर यांच्या लेखाबद्दल धन्यवाद.
मुद्देसूद आणि माहितीपूर्ण लेख.
चोरी म्हणजे काय हे खूप छान आणि उदाहरणासहीत दिले आहे. या सर्व गोष्टी वेळोवेळी बातम्या म्हणून आलेल्या असतात. त्या सर्वांचा लेखात समावेश केला आहे.
(कुणी केली चोरी ? कसली चोरी झाली असे विचारणा-यांनी काळजीपूर्वक डोळ्याखालून घालावा लेख).

>>आज व्हॉटसपतर्फे हे स्टेटस दिसले आणखी कोणाला आले का?<<
ऋन्म्या, त्यात जे काहि लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. व्हॉट्सअ‍ॅप, पर से, त्या गोष्टी करत नाहि. पण फेसबुकने (मदरशिप) त्यांचे तिन्हि प्लॅट्फॉर्म इंटिग्रेट केले (आणि हे इंटिग्रेशन म्हणजे साधा कार्टेशियन प्रॉडक्ट नाहि), कि बाटलीतला राक्षस बाहेर पडतो. खास तुझ्याकरता सिंदबादचं उदाहरण दिलं आहे... Wink

डॉ लळिंगकरांचे लेख चांगले आहेत. फक्त एक दोन त्रुटी आहेत.
- त्यांनी म्हंटले आहे की व्हॉट्सॅप ग्रूप चॅट वरचे मेसेजेस एन्क्रिप्ट केलेले नसतात. व्हॉट्सअ‍ॅप च्या पॉलिसीनुसार पर्सनल मेसेजेस आणि ग्रूप मेसेजेस दोन्ही एनक्रिप्ट केलेले असतात. त्यामुळे बहुतांश लोकांना जे मेसेजेस सिक्युअर ठेवायचे आहेत - ते तसेच राहणार आहेत. ते व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुक कोणालाच वाचता येणार नाहीत.
- एका ठिकाणी त्या म्हणतात की "तुम्ही बॅक अप ची परवानगी दिली असेल तर मात्र ते डिलीट करत नाहीत" - हे ही चुकीचे आहे. व्हॉट्सॅप त्यांच्या सर्वर वर फक्त डिलीव्हर न झालेले मेसेजेस ठेवतात. एकदा डिलीव्हर झाले की ते तेथे राहात नाहीत. मग बॅक अप काय आहे? तर ते अ‍ॅपल आयक्लाउड, गूगल ड्राइव्ह वगैरे थर्ड पार्टी स्टोरेज मधे करतात. तेथे तो प्लेन टेक्स्ट मधे असावा. पण तेथे व्हॉट्सॅप ला ते वाचण्याची सोय नाही. आणि मुळात त्यांच्या पॉलिसीनुसार ते हे मेसेजेस वाचणार नाहीत. म्हणजे इथे धोका व्हॉट्सॅप - फेबु ने ते वाचण्यापेक्षा इतरांनी हॅक करण्याचा जास्त आहे - आणि त्या धोक्याचा या पॉलिसी बदलाशी काही संबंध नाही. "व्हॉट्सअ‍ॅप सर्वर वरचा बॅक अप" असा प्रकार मला तरी अजून कोठे दिसला नाही.
- त्यांनी "एण्ड टू एण्ड एनक्रिप्शन" बद्दल जे लिहीले आहे, ते "एनक्रिप्शन" चे जनरल वर्णन आहे. आपण कॉम्प्युटरवरून एखादी बँकेची वेबसाइट वापरतानाही ते लागू होते. "एण्ड टू एण्ड" हे ते एनक्रिप्शन कोठून कोठपर्यंत होते याबद्दल आहे - अ या व्यक्तीने ब या व्यक्तीला जो मेसेज पाठवला, तो अ च्या फोन मधून बाहेर पडताना एनक्रिप्ट होणार व ब च्या फोनवर डिलीव्हर होईपर्यंत तो एनक्रिप्टेड राहणार. म्हणजे या सगळ्या फ्लो मधे जर कोणी हॅक केला तर त्यांना तो डीक्रिप्ट केल्याशिवाय वाचता येणार नाही. एण्ड टू एण्ड ही आता इण्डस्ट्री टर्म झालेली आहे पण अजूनही त्याची एक ठराविक व्याख्या नाही. कॉन्फरन्स कॉल वाल्या 'झूम' कंपनीने त्याची व्याख्या थोडी वेगळी केली होती त्यावरून ५-६ महिन्यांपूर्वी झालेल्या चर्चा लोकांच्या लक्षात असतील.
- त्यांनी एक दोन ठिकाणी डेटा एनक्रिप्टेड असणे व ज्या कंपनीच्या अ‍ॅप मधून तो डेटा तयार होतो/पोस्ट केला जातो त्यांना तो वाचता येणे हे दोन्ही मिक्स केले आहे. या दोन स्वतंत्र बाबी आहेत. डेटा एनक्रिप्ट करण्याचा मुख्य उद्देश हा इतरांना वाचता येउ नये हा असतो. जी कंपनी तो एनक्रिप्ट करते त्यांना (सर्वसामान्यपणे) तो डीक्रिप्ट करता येतो. त्यामुळे त्यांनी वाचायचे ठरवले तर त्यांना तो वाचता येइल. इथे जाहीर पॉलिसी काय आहे ते महत्त्वाचे ठरते.

या सगळ्या बदलात लोकांचा मुख्य प्रश्न व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस हे फेसबुकशी शेअर केले जाणार का हा होता. तसे अजूनही काही दिसत नाही. व्हॉट्सअ‍ॅप वापराबद्दलचा डेटा, फोन नं/कॉण्टॅक्ट्स ई शेअर केले जातील. पण मेसेजेस नाही.

<< व्हॉट्सॅप ला ते वाचण्याची सोय नाही. आणि मुळात त्यांच्या पॉलिसीनुसार ते हे मेसेजेस वाचणार नाहीत >>
मेसेजेस वाचण्याची गरज नाही. मेसेजचा मेटाडेटा पण महत्वाचा असतो आणि प्रायव्हसीसाठी व युजर प्रोफाइल बनवायला तितकाच उपयोगी असतो.

रा.आ. - एकदा फोनवर मेसेज डीलीव्हर झाला की तो डीक्रिप्ट होणार व्हॉट्सअ‍ॅप मधे दिसताना. मग ग्रूप मधले लोक तो कसाही वापरू शकतात - अ‍ॅप अलाउ करेल त्याप्रमाणे. हे आधीही होत होते तसेच असेल पुढेही.

मेसेजेस वाचण्याची गरज नाही. मेसेजचा मेटाडेटा पण महत्वाचा असतो आणि प्रायव्हसीसाठी व युजर प्रोफाइल बनवायला तितकाच उपयोगी असतो. >>> यस पण बहुतांश लोकांना "मेसेजेस" शेअर केले जाणार का हीच शंका आहे आणि तसे दिसत नाही.

अमित - धन्यवाद. हो तसे प्रत्येक सर्विस चे स्वतःचे एनक्रिप्शन असेलच.

जेव्हा प्रायव्हसी पॉलिसीबद्दल मीडियामध्ये बोलायला सुरुवात झाली तेव्हा मेसेजेस फेसबुकवर शेअर केले जातील असं कुणी बोललं नव्हतं. हा नंतर कुणी पसरवलेला गैरसमज आहे.

आक्षेप हा युजर डेटा शेअर करण्याबद्दलच सुरू झाला.

@रात्रीचा आत्मा ते गौरव सोमवंशी आय आय एम चे आहेत हा काय माझा दोष ? एखाद्या सुंदर मुलीने नाही का, कॉलेजच्या जमान्यात दुस-याच टॅलेण्टेड मुलाला दाद दिल्यावर होतो तसा जळफळाट करून काय फायदा ?

मला त्यांच्यावर जळावे इतकी पण वाईट वेळ नाही आलेली. मला तुझ्या त्या लोकसत्तातील एक्स्पर्टचे नाव पण माहीती नव्हत. तुच सारख सारख त्यांच नाव घेऊन येत आहेस आणि तु सांगितल म्हणुन मला त्यांची जन्मकुंडली कळाली. त्यांच्या डीग्रीज आणि ईतर बायोडेटा तुच दाखवली म्हणुन मला कळाली. तुझ एकंदर म्हणण अस आहे की त्यांच्या कडे इतक्या सार्या डीग्रीज आहेत म्हणुन त्यांच्यावर विश्वास ठेवावा. मी म्हणतोय की कुणी म्हणल याच्यापेक्षा काय म्हणल ते ज्यास्त महत्वाच आहे.

त्यांचा लेख न अभ्यास करता लिहिलेला आहे. सद्ध्या ब्लॉकचेनची नुसती हाईप चालु आहे आणि लोक काय वाट्टेल त्या गोष्टींना ब्लॉकचेन वापरत आहेत. वर राग या गोष्टीचा येतो की सो कॉल्ड एक्स्पर्ट्स लोक काहीही खोलात न जाता, काहीही अभ्यास न करता केवळ हाईप वर भुलुन वाट्टेल ते अर्धवट लेख लिहितात आणि बाकीचे लोक केवळ त्यांनी आय आय एम मधुन डीग्री घेतली आहे म्हणुन विश्वास ठेवतात.

ब्लॉकचेन खुप प्रचंड व्हरायटी असलेला प्रकार आहे. जर ओरिजिनल डीसेंट्रलाईज्ड प्रुफ ऑफ वर्क असलेली ब्लॉकचेन वापरली (जी की बिट्कॉईन मध्ये वापरली जाते), तर त्याच्यावर कुठलेही सोशल नेटवर्क करणे शक्य होणार नाही. कारण की "बाय डिझाईन" ते मुद्दामुन कंप्युटेशनली हळु केलेले असते. आता त्याचे काही काही वेरिअंट्स आहेत जसे की प्रुफ ऑफ स्टेक किंवा सेंट्रलाईज्ड ईत्यादी. प्रत्येकात काही ना काही तरी प्रॉब्लेम्स आहेत. आता त्यांनी दिलेले स्टिमिट हे उदाहरण म्हणा किंवा डी ट्युब हे उदाहरण म्हणा, दोघांनाही खुप प्रॉब्लेम्स आहेत. शिवाय मी जितका शोध घेतला त्याप्रमाणे स्टिमिट हे ए ड्ब्लु एस वर चालते. म्हणजे जी ब्लॉकचेन ची विश्वासर्हता आहे (अ‍ॅज अ डिस्ट्रिब्युटेड लेजर) ती तिथेच संपते. याशिवाय एकदा का हे अ‍ॅप्स स्केल वर गेले की खुप प्रॉब्लेम्स सुरु होतात.

कुठल्याही डिस्ट्रिब्युटेड अ‍ॅप्लिकेशन मध्ये कॅप थेरम लागु होतो. मग लोक कॉप्म्रमाईज म्हणुन स्ट्रिक्ट कंसिस्टन्सी नसलेले ईव्हेच्युअल कंसिस्टन्सी वगैरे मॉडेल्स वापरतात. पण लो लेटेन्सी आणि कॅप थेरम आणि ब्लॉकचेन आणि स्केल यांची सांगड घालण या घडीला तरी अशक्य आहे. ओरिजिनल ब्लॉकचेनचा चांगला उपयोग म्हणजे नोटरी टाईप अ‍ॅप्लिकेशन्स साठी (ईन अ‍ॅडिशन टु बिटकॉईन पण बिटकॉईन मध्ये देखील डबल स्पेंड प्रीवेंशन खाली ईन अ वे तेच वापरल जात). बाकीच्या गोष्टी या घडीला तरी हाईप आहेत.

राग या गोष्टीचा येतो की ज्या लोकांनी ह्या सगळ्याचा नीट अभ्यास करुन लिहिल पाहीजे -- अ‍ॅट्लीस्ट पेपर मध्ये तरी -- ते लोक काय वाट्टेल ते ठोकुन देतात आणि बाकीचे लोक केवळ त्यांच्या डीग्रीज कडे बघुन विश्वास ठेवतात. परत एकदा कुणी म्हणलय त्यापेक्षा काय म्हणलय ते महत्वाच. आणि काही काही वेळा पीअर रीव्युअड कोन्फरन्स किंवा जर्नल्स मध्ये पब्लिश केलेला माणुस असेल तर गोष्ट वेगळी. पण मला तरी त्यांचा लेख उडत उडत अभ्यास करुन लिहिलेला वाटतो.

असो, मला त्यांच्यावर अ‍ॅटॅक नव्हता करायचा, मला तर त्यांच नावही तुम्ही लोकांनी बायोडेटा लिहिपर्यन्त माहीत नव्हत.

---------

>> “If Signal gets to a billion users, that’s a billion donors." या वाक्याचा (आणि उरलेल्या परीच्छेदाचाही) अर्थ "म्हणजेच त्याला सिग्नल चालवण्यासाठी एक बिलियन डॉलर्सची गरज आहे. आता ही गरज रीकरींग असणार आहे हे त्याने शिताफीने गुल्दस्तात ठेवलेले आहे." असा होतो हे समजावण्याबद्दल धन्यवाद. कायेना, मराठी माध्यमातुन शिकल्यामुळे की काय माझी सायबाच्या भाषेवरची पकड वाईच ढीलीच आहे.

आता तुम्ही लोकच म्हणाला न की सिग्नल ही नॉन प्रॉफिट आणि फक्त ५० लोकांनी चालवलेली संस्था आहे म्हणुन. एनी वे आता भविष्यात बघुच काय काय आणि कस कस होतय.

मी म्हणतोय की कुणी म्हणल याच्यापेक्षा काय म्हणल ते ज्यास्त महत्वाच आहे.
>>
+१११११

सद्ध्या ब्लॉकचेनची नुसती हाईप चालु आहे आणि लोक काय वाट्टेल त्या गोष्टींना ब्लॉकचेन वापरत आहेत. वर राग या गोष्टीचा येतो की सो कॉल्ड एक्स्पर्ट्स लोक काहीही खोलात न जाता, काहीही अभ्यास न करता केवळ हाईप वर भुलुन वाट्टेल ते अर्धवट लेख लिहितात आणि बाकीचे लोक केवळ त्यांनी आय आय एम मधुन डीग्री घेतली आहे म्हणुन विश्वास ठेवतात.
>>
+१११११

Pages