व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेशभाऊ Lol वर यात सॅस कुठे आलं, अ‍ॅडबेस्ड रेव्हेन्यू कुठे सुरु झाले ते पण लिहा. मजेदार लिहिलंय. पण हे असंच चालतं.
मग पुढे 'कूल' दिसायला ते या स्कूटरच्या ओडोमिटर डिजिटल करतात. बरोबर जीपीएस नकाशे दाखवण्यासाठी सुरुवातीला बारकी टीएफटी स्क्रीन जोडली जाते. मग टेक्नॉलॉजी पुढे सरकते तशी स्क्रीन अपग्रेड होते. त्याला फोन जोडून कॉल घेता येतो. मग स्कूटर थांबली असताना त्या स्क्रीनवर तुम्ही ज्या एरियात सध्या आहात त्या एरियाच्या जाहिराती दाखवल्या जातात. जशा जवळ पेट्रोल पंप कुठे आहे, जेवणाच्या जागा कुठे आहेत, मुक्कामाच्या जागा कुठे आहेत इ. इ.
साधारण यावेळेला या कंपनीचे व्हॅल्युएशन झपाट्याने वाढते. कारण डॉलरा डॉलरा... मग आयपीओची स्वप्ने प्रत्यक्षात येण्याचे दिवस येतात. टेन एक्स, हन्ड्रेड एक्स Wink
याने चालवणार्‍याला ही मदत होत असते तोवर सगळं आलबेल असतं.
मग व्हॉईस कंट्रोल कमांड अ‍ॅड होतात. आधी व्हॉईस प्रोसेसिंग लोकली/ मिनिमल सुरू होतं. मग ओके गूगल, हे अलेक्सा इंटिग्रेट केलं आणि रॉ सर्चेस आम्हाला दिले तरच आम्ही मदत करू वर गूगल अडून बसतं. त्या बरोबर ही माहिती कोणत्या युजर कडून येते आहे हे ही आम्हाला समजलं पाहिजे अशी तिरपाकडी कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि प्रायव्हसीचा खेळखंडोबा होतो.

ओपन सोर्स म्हणजे काय?

समजा बजाज स्कुटर्स बनवते. पण त्यांचे डिझाईन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सिक्रेट आहेत. >>> ओपन सोर्स वेगळं आणि स्कूटर वेगळी.
कारण त्यांना त्यातुन नफा कमवायचा आहे. >>> स्कूटर नफा कमवायलाच बनवतात. स्कूटर फुकट देऊन कुणी डेटा विकून नफा कमवत नाही.
तुम्हाला आत्ताशी समजलं. की स्कूटरच विका. स्कूटर फुकट देऊन चौकाचौकात अडवून पैसे काढू नका.

आता काही ईंजिनियर्स तिथली नोकरी सोडतात. >>> का बरं ? स्कूटर बनवण्याचा कारखाना टाकणे म्हणजे वडापावची गाडी टाकणे किंवा ग्यारेज मधे गुगलचं ऑफीस चालू करण्यासारखं आहे का ? स्कूटर बनवायला जो कारखाना उभारावा लागतो त्याचा सेट अप माहीत करून घ्या.

स्वतःच्या मेहनीतीने आणि पॅशन ने एक स्वतःची स्कुटर डिझाईन करतात. ती बनवतात. >>> कुठले डिजाईन करतात ? इंजिनीयरींग मधे दोन प्रकारचे डिजाईन असते ? तुम्हाला प्रॉडक्ट डिजाईन म्हणायचे आहे का ? तो एक स्पेशलाईज्ड व्यवसाय आहे. कंपनीतले इंजिनीयर नाहीत करत ते. जरा माहिती काढून मलाही सांगा.

त्याचे डिझाईन एका पुस्तकात घालतात. >>> डिजाईन पुस्तकात काशाला घालतील ? पुस्तकच असतं मशीन डिजाईनचं. एकदा छापलेल्ञा पुस्तकार डिजाईन घालता येत नाही.

पुर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसही लिहितात. आणि ते पुस्तक अप्पा बळवंत चौकात विकायला ठेवतात. >> वेडेच आहात. प्रोसेस लिहून अप्पा बळवंत चौकात विकायला ? तुम्ही तुमचं ऑफीस आणि अप्पा बळवंत चौक या पलिकडे जग पाहीलेलं नाही का ? बाबांना सांगा एकदा संभाजी उद्यानात घेऊन जायला.

आता व्यत्यय नावाचा नविन पॅशनेट ईंजिनियर जो की नुकताच ग्रॅज्युएट झालेला आहे आणि बजाज मध्ये लागलेला आहे >> पॅशनेट इंजिनियरींग नावाची कोणतीही शाखा ऑटोमोबाईल मधे नाही. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप मधून डिग्री घेतली असेल तार आपण ढीस.

तो त्याच्या सुपरव्हायजर कडे जाऊन म्हणतो की आपण स्कुटरच ईंजिन ४ ऐवजी ६ स्ट्रोक्स च करु >> ६ स्ट्रोक्स इंजिन सध्या दुस-या युनिवर्स मधे आहेत. तुमचं सॉफ्टवेअर तिकडे पोहोचलं की आणा ते. त्याच्यावर आपण सहा चाकी गाड्या पळवू.

त्याने गाडेचे मायलेज १०० ऐवजी २०० होइल. >> स्ट्रोक वाढले की मायलेज वाढतो हा शोध तर अफलातून आहे. मी काय म्हणतो तुम्ही इंजिनीयरींगचा सिलॅबस नव्याने लिहून काढा. मज्जा येईला.

त्याच्या सुपरव्हायजरला ही रिस्क पसंत नाही आणि घ्यायची तयारीही नाही. >>> थांबा. त्याने नोकरी सोडली होती ना ? मग त्याने स्वतःच्या कारखान्यात सुपरवायझर का ठेवला आपल्या डोक्यावर ?

तो त्याला तुला जे काम सांगितलय ते कर सांगतो. आता व्यत्यय हे फ्रस्ट्रेशन त्याच्या रुममेट बरोबर शेअर करतो. >>> एक तर त्याने स्वतःच्या कंपनीत सुपरवायजर ठेवला. वर त्याने सांगितलेलं काम करायला फ्रस्ट्रेशन का आलं ? तुम्ही झोपेत आहात का ? स्वप्न पडतंय का ?

त्याचा रूममेट त्याला अप्पा बळवंत चौकातले नविन पुस्तक सांगतो "स्कुटर बनवा घरच्या घरी".>>> परत तेच. बरं घरी बनते. ती पण सहा स्ट्रोक आणि दुप्पट मायलेज देते. >> तुम्ही हॉलिवूड फिल्मची स्टोरी का नाही लिहीत ? सिरीयसली लिहा. आपोआप मोस्ट हिलेरीयस होईल ती.

जरी व्यत्यय ईंजिन बनवण्यात एक्स्पर्ट असला तरी त्याला स्कुटर्च्या बाकी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बद्दल काहीही माहिती नाही. >> असं नाही होत होत. इंजिनीयरला सगळ्या शाखा शिकवतात. अनुभवाने स्पेशलायजेशन येतं इतकंच. ते तुमच्या सॉफ्टवेअर सारखं नसतं काही. गंमतच आहे ना ? उद्या असेंब्ली लाईनचा इंजिनीयर होनिंगला पण बदलून येऊ शकतो. धक्का बसेल तुम्हाला.

तो ते पुस्तक आणतो आणि त्याच्या फावल्या वेळात वाचायला लागतो. वाचता वाचता त्याला कळते की आपण आपली ६ स्ट्रोक्स ची आयडिया या स्कुटर मध्ये ट्राय करु शकतो. >>> अजून सहाच स्ट्रोक > वाढले नाहीत का ?

६-७ महिने झाल्यावर त्याचा रुममेट त्याला वेस्पा तील अजुन दोन ईंजिनियर्स अमितव आणि अंबादानी बरोबर ओळख करुन देतो. अमितव ला स्कुटरच्या बाहेरील डिझाईन बद्दल काहीतरी आयडियाज आहेत कि ज्याने तिचा विंड रेझिस्टन्स कमी होईल. >> परत एकदा प्रॉडक्ट डिजाईन की कुठलं ? प्रॉडक्ट डिजाईन कंपनीचे लोक करत नाहीत. माहिती करून घ्या.

अंबादानी ला अस वाटत की स्कुटरला बैलगाडीची चाक जोडली तर ती मस्त धावेल. >>>> चाकाचे डिजाईन्स फिक्स असतात. डिजाईन करताना एक चार्ट असतो. त्या चार्टद्वारे एकूण गुण द्यायचे असतात. कुठल्या प्रॉडक्टचे डिजाईन करायचे कुठल्या नाही हे त्यावरून ठरते. एखादा शहाणा मनुष्य संपर्कात असेल तर त्याला विचारून घ्या. ऑटोमोबाईल किंवा अशा कोणत्याही लाईनला कंपन्या एकमेकांवर अवलंबून असातात. टायरची कंपनी स्कूटरचे टायर्स बनवते. तर त्या टायरप्रमाणेच व्हील बनवावे लागते. डोन्ट रिइन्व्हेन्ट द व्हील ऐकले का कधी ? नसेल तर पुन्हा एकदा शहाण्या व्यक्तीचा शोध घ्या.

व्यत्ययला अमितव ची आयडिया आवडते. >> व्यत्यय यांचे प्रतिसाद इतके मॅच्युअर्ड आहेत की या फालतू स्टोरीत त्यांचे नाव नको.

तो म्हणतो की चल आपण एकत्र काम करु. त्याला अंबादानी च्या आयडियाज वेडगळ वाटतात कारण की त्याने स्कुटरजरी वेगात धावली तरी बसलेल्या माणसांना शॉक्स बसुन त्यांना कंफर्ट राहणार नाही. म्हणुन ते एकत्र काम करायचे नाही असे ठरवतात. >>> स्कूटर मधे कुठले शॉक बसतात ? वीजेचे का ? अजून कुठलीच स्कूटर एमएसईबी सप्लाय वर पळत नाही. तुम्ही शहाणा माणूस गाठाच.

अंबादानी स्वतःच ते काम करायच ठरवतो. तो ही ते पुस्तक वाचतो. त्याला जी काय अर्धवट माहीती कळते त्या जोरावर तो काहीतरी बनवतो >> त्याने पण २२ वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करून तो ही सुरूवातीला ओपन सोर्सला नावे ठेवत मग शेवटी शेवटी ओपन सोर्सच्या मी विरोधात नाही असे म्हणत असतो का ? Lol

पण ते काही विषेश नस्ते आणि ते काही पुढे जात नाही. म्हणुन मग तो त्या विषयातला "एक्स्पर्ट" बनतो आणि जिकडे तिकडे मी कसा भारी आणि मीच स्कुटर शोधुन काढली वगैरे सांगत फिरतो. जे लोकांना त्यातल काही कळत नाही त्यांना हे ऐकायला खुप भारी वाटत आणि हळुहळु तो सकाळ ईत्यादी वर्तमानपत्रात एक "एक्स्पर्ट" बनतो आणि आपले नॉलेज वाटत फिरतो. >> त्या ताई म्हणतात तसा तुम्हाला खरंच झटका बसला आहे. त्यांनी लोकसत्ता सांगितलं. तुम्ही लोकसत्ता सकाळला विकला पण. साहेब नाराज होतील.

मीन्व्हाईल व्यत्यय आणि अमितव त्यांचे मिळून डिझाईन फायनलाईझ करतात. ते मेहनीतीने पार्ट्स बनवुन ती स्कुटर तयार करतात. त्यांना जितकी वाटली होती तितकी भारी नाही बनत ती. पण काही विशिष्ट कंडिशन्स मध्ये ती स्कुटर बजाज पेक्षा भारी चालते. फॉर एक्झॅम्प्ल अस कळत की पंजाब मधले रांगडे जवान फार जोरात स्कुटर्स चालवतात. आणि त्याना ती खुपच आवडते. आणि पन्नास लोक ती स्कुटर विकत घ्यायची तयारी दाखवतात. >>> नाही हो. पंजाबात मोटरसायकली बनवतात घरच्या घरी. हार्ले डेवीडसन सारख्या गाड्या बनतात तिकडे. तिथे स्कूटर नाही आवडत कुणाला. तुमचे मार्केट अ‍ॅनालिसीस पुअर आहे. कथा लिहीताना लेखक सगळा अभ्यास करत असतो. एका लेखकाने तर विमानाचे मेकॅनिझम पूर्ण दिले होते. तुम्ही जर लिहीले तर मज्जा येईल.
विमानाला चाकं. हाताने हलवायचे पंखे. हवेत धक्कास्टार्ट. लिहाच. माबोवर फेमस व्हाल.

आणि एक गोष्ट म्हणजे सिक्किम मध्ये नविन ट्रॅवल कंपनी निघालिये कि जी टूरिस्ट्ला सिक्किमच्या डोंगरांवर भन्नाट वेगात पळवून सिक्किम दर्शन करवु ईछितात. त्यासाठी त्यांना १००० स्कुटर्स हव्या आहेत. >> असं काही झालं नाही इतक्यात. तुम्हाला हे व्हॉट्स अ‍ॅप वर समजलं का ?

१६-१८ महिन्यांच्या अफाट मेहनतीचा व्यत्यय आणि अमितव यांच्यासाठी द हॅपी एन्ड! >>> काढा मग पिक्चर याच्यावर.

राईट? >>>> हे स्वगत आहे का ?

खरा प्रॉब्लेम आता सुरु होतो. सिक्किम मध्ये जागोजागी पेट्रोल पंप्स नाहीयेत. म्हणुन त्यांना स्कुटरची टाकी २० लिटर आइवजी ५० लिटर हवी आहे. पण टाकी ५० लिटर केली तर वेग भन्नाट राहील का याची व्यत्यय आणि अमितव यांना पुर्ण कल्पना नाही. याशिवाय महत्वच म्हणजे त्या कंपनीला एका वर्षात सगळी डिलिवरी हवी आहे. आता व्यत्यय आणि अमितव यांनी स्कुटर बनवली तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवड मधुन कुठुन तरी पार्ट्स बन्वुन घेतले. पण एका वर्षात जर १००० स्कुटर्स बनवायच्या असतील तर त्यांना पुर्ण एको सिस्टिम लागेल जी की त्यांना हवे ते पार्ट्स हव्या त्या वेळात सप्लाय करेल. बजाज कडे तशी सिस्टिम ऑलरेडी आहे (हा आहे स्केल प्रॉब्लेम). >>> हे तुम्हाला आधीच सांगितले होते की नाही ? हे दोघे पण तोच विचार करतील.

मग आता व्यत्यय आणि अमितव "रेडहॅट" ही कंपनी काढतात. >>> ही खरी पोटदुखी. इथून मळमळ सुरू होते. लगे रहो.

कंपनी सुरु झाली ओरिजिनल ओपन सोर्स "स्कुटर बनवा घरच्या घरी" प्रोजेक्ट वरुनच! पण एक कंपनी असल्यामुळे ते त्याला पुर्ण वेळ देऊ शकतात. याशिवाय ते जाऊन व्हिसिज कडून फंडिग घेतात आणि बजाज सारखी एको सिस्टिम तयार करायचा प्रयत्न करतात. आता लोक एका कंपनीशी डील करत असल्यांमुळे विश्वासहर्ता वाढते. ते वेळच्या वेळी डिलीवरी करु शकतील असा लोकांचा विश्वास वाढतो. म्हणुन अजुन ऑर्ड्र्स येतात. पण त्यांना कळत की सिक्किम मधली ऑर्डर पुरी करण्यासाठी जे डिझाईन केलय त्यानी पंजाब मधील ऑर्ड्र्स चा वेग कमी होईल. >> कंपन्यांमधे बॅच प्रॉडक्शन नावाचा प्रकार असतो. आधी माहिती घेत जा हो. असा फजितवाडा होत नाही. एक बॅच या ऑर्डरची, एक त्या. आणि एक ऑर्डर चालू असताना दुसरी स्विकारली जात नाही.
पुन्हा एकदा. डिजाईन करताना डिजाईन रिव्ह्यू होतो. मग डिजाईन व्हॅलिडेशन होतं. ट्रायल्स होतात. मग युजर ट्रायल होते. यात कुठेही प्रॉब्लेम आला तरी पुन्हा पहिल्या स्टेजला जायचे असते. आता इंजिनीयरींगला हे शिकवतात की हाय अल्टिट्यूडला ऑक्सिजन आणि प्रेशर कमी असतं. त्याचे हॅण्डबुक्स असतात रेडीमेड. त्यात हाय अल्टीट्युडचे पॅरामीटर्स दिलेले असतात .
डिजाईन करताना ती कोणत्या अल्टीट्युडसाठी डिजाईन करायची याचे क्रायटेरीयाज निश्चित असतात. प्लेन अल्टिट्युडला सी लेव्हल कंडीशन म्हणतात. हे डिजाईन सिक्कीम मधे वापरायचा वेडगळपणा कुणी करणार नाही.
मीच शहाणा वालाच कुणी तरी असे स्वप्न बघू शकतो किंवा व्हॉट्स अ‍ॅप युनिव्हर्सिटीजचा इंजिनीयर तरी.

म्हणुन आता ते दोन वेगवेगळे डिझाईन्स तयार करतात. >> वर दिलेय ते वाचा. ते आधीच करतील. २२ वर्षे त्यांनी निबंध वाचले नसतील तर.

याशिवाय त्यांना कळत की दोन्हि डिझाईन्स मध्ये आरसा जो आहे त्याला खूप प्रॉब्लेम आहे आणि तो चालणार नाही. >> आरसा एकच चालतो दोन्हीकडे.
मग ते कल्पकता दाखवुन नविन आरसा तयार करतात. >>> चूक. आरसा डिजाईन केला जात नाही. चार्टप्रमाणे तो तयार मिळतो. आरसा बनवायला वेगळा प्लाण्ट कुठून आणणार ? इकॉनॉमिक्स आहे की नाही काही ? ते काय सॉफ्टवेअर वाटलं का ?

याच बरोबर ते ओरिजिनल पुस्तकाच्या लेखकांना त्यांच्या आरशाच्य आयडिया आणि डिजाईन बद्दल सांगतात. >>> असे लेखक शक्यतो प्राध्यापक असतात. आणि आरसा डिजाईन केला जात नाही हे पुन्हा सांगतोय.

त्या लेखकांना पण ती आयडिया आवडते आणि ते ती त्यांच्या पुस्तकात घालतात. ते पुस्तक अप्पा बळवंत चौकात नविन सुधारित आव्रुती मध्ये विकायला येते. पण त्यात पंजाब आणि सिक्किम साठी केलेले डिझाईन नसते.

हळु हळु वेगवेगळ्या गोष्टींचे खर्च अजुन वाढत जातात म्हणुन व्यत्यय आणि अमितव ला अजुन फंडिग घ्यायला लागत. >> स्टोरी लिहीण्याआधी जरा अभ्यास करा हो. वर वाचा. कशाला खर्च वाढेल ? जरा मेहनत घेऊन उदाहरण द्या नाहीतर नका देऊ.

आता ज्यांच्याकडुन फंडिग घेतले आहे ते पैशासाठी मागे लागतात. >> जर डिजाईन करायचं नाही तर खर्च का वाढेल ? आणि खर्च वाढला नाही तर फंडींग कशाला ? ते घेतलंच नाही तर लोक का मागे लागतील ? शिवाय अशा प्रकारच्या लोन्स मधे वेळ दिलेला असतो. काहींमधे तर बी ई पी पर्यंत लोन रिकव्हरी नसते. बी ई पी माहीत आहे का ?

आता व्यत्यय आणि अमितव यांना कळत की सिक्किम वाल्यांना जी ओरिजिनल प्राईस प्रॉमिस केलेली त्यात विकली तर तर कप्मनी तोट्यात जाईल >>> बेसिक्स मधेच लोचे आहेत. उदाहरण पूर्ण गंडलं आहे. त्यामुळं थांबतो. तुम्हालाच जर पाहीजे असेल तर पुढचे पोस्टमार्टेम करू.

मधल्या मध्ये माझ्यासारखे मुर्ख लोक असे प्रतिसाद लिहायला एकेक तास घालवतात. >> हे कळले हे ही नसे थोडके.

<< कंपनी सुरु झाली ओरिजिनल ओपन सोर्स "स्कुटर बनवा घरच्या घरी" प्रोजेक्ट वरुनच. >>
कृपया FLOSS बद्दल अधिक अभ्यास करावा. पूर्वी बजाज म्हणत असे की स्कूटर बिघडली की आमच्याकडूनच आणि आम्ही सांगू त्या कंडिशनवरच स्कूटर दुरुस्त करून मिळेल. आणि हो, दुरुस्ती कशी करायची ते तुम्हाला कळले तरी ती माहिती तुम्ही मित्राला देऊ शकत नाही. मग FLOSS ने मॅन्युअलच छापले की तुम्हाला पाहिजे तर स्वतःच स्कूटर दुरुस्त करा. वाटले आणि झेपले तर अभ्यास करून स्वतःची स्कूटर पण बनवू शकता.
१. तुम्हाला पाहिजे तशी स्कूटर वापरा. वाहन म्हणून वापरा किंवा न्हाव्याची खुर्ची म्हणून वापरा. (Many softwares put restrictions how it can be used or cannot be used.)
२. स्कूटर कशी काम करते ते मॅन्युअल वाचून शिकून घ्या.
३. हे मॅन्युअल तुम्ही मित्राला पण देऊ शकता.
४. तुम्ही काही उपयुक्त शिकलात तर तुम्ही मॅन्युअलमध्ये भर घालून ते सुद्धा वाटू शकता.

उबो
स्कूटर वेगळी आणि ओपन सोर्स वेगळं इतकंच सांगा त्यांना. तुम्ही बिटवीन द लाईन्स समजून घ्यायला जाल आणि त्यांना ते नको असेल तर ? त्यांना आडदांडपणा आवडतो.

अहो, त्यांना तर सर्वच माहिती आहे ऑलरेडी. मी प्रतिसाद इतरांसाठी लिहिला आहे की ओपन सोर्स किती उपयुक्त आहे, ते सगळ्यांना कळावे म्हणून.

तुम्ही दिलेल्या उदहरणातून एवढं कळतय की तुम्हाला म्हणायचंय की सगळे एकाच माळेचे मणी आहेत..ह्या किंवा त्या मार्गाने, प्रत्येकाला नफाच कमवायचा आहे..

व्यत्यय आणि अमितव ची "रेडहॅट" कंपनी ड्रायव्हर्सला ट्रेन करतात की जे स्कुटर चे ड्रायव्हर्स असतील ते लोकांना सिक्किम दाखवता दाखवता आसपासच्या हॉटेल्स किंवा कपड्यांच्या दुकानात ही घेऊन जातील आणि त्या बदल्यात १०% कमिशन घेतील.>>>

काही टुरिस्ट असे आहेत की ज्यांना कपड्याची दुकानं बघण्यात इंटरेस्ट नाही..त्यासाठी ते रेडहॅटला टिप ही द्यायला तयार आहेत.. पण काही टुरिस्ट असे आहेत की ज्यांना कपड्याच्या दुकांनांमधे नेल्याने काहीच फरक पडत नाही कारण वस्तू खरेदी करायची की नाही हे ते ठरवणार आहेत आणि रेडहॅटला मिळणाऱ्या १०% कमिशनशी त्यांचं काहीही देणंघेणं नाही.. पण जर का रेडहॅट म्हणते की ह्या दुकानदारांना आता आम्ही तुमचा मुंबईतला पत्ता देणार आहोत, म्हणजे ते तीथेही ह्या गोष्टी विकायला आणतील किंवा कपड्यांच्या दुकाना ऐवजी तुम्ही अजून कोणकोणत्या दुकानात गेलात, तुम्ही किती दिवसाच्या ट्रिपसाठी आला आहात अशी माहिती देणार आहोत, तर ते रेडहॅटला पकडून राहतील का? का अजून कोणती टुरिझम कंपनी शोधातील, की जी सध्या तरी फक्त टुरिझमवरच कॅान्सनट्रेट करणार आहे?

म्हाळसा यांचा प्रतिसाद नेमका आहे.
प्रशासकांना आवाहन. या नोटवर टाळं ठोकावं. माझा आयडी सुद्धा उडवावा.
काम झाले.

>>थॅन्क्स फॉर प्रूविंग माय पॉईंट<<
हाहा. स्वतःच पाठ थोपटुन घेण्यापुर्वि सगळा मेसेज तरी वाचायचा. असो, पॉइंट मी देणगी देतो कि नाहि, हा नसुन माझ्या देणगी शिवाय विकिपिडिया बिझनेस मधे आहे, हा आहे. आता तरी समजलं असेल अशी आशा करतो...

>>लिफ्ट फक्त एकाच देशात चालते<<
अहो लिफ्टचं बिझनेस/ऑपरेटिंग मॉडेल काय आहे, सिग्नलचं काय आहे? सारखी आहेत का? मेसेंजर अ‍ॅप्स सिंपली अ‍ॅक्ट अ‍ॅज ए ब्रोकर टु ट्रांसफर मेसेज फ्रॉम पर्सन ए टु बी. तुमचं काय झालं आहे, तुटपुंज्या माहितीच्या आधारे आडाखे बांधुन चौफेर ठोका-ठोकि. मी बिल्यन डॉलर्सच्या संदर्भात (क्लाउड कंप्युटिंग) नंबर्स द्या म्हटलं तर माझ्यावरंच ढकललंत. ठिक आहे. सिग्नलचे दोन वर्षांपुर्विच्या टॅक्स फाइलिंग नुसार एडब्लुएसचे एक्स्पेंसेस जवळ-जवळ हाफ मिलियन डॉलर होते. यात बरेच अननोन्स आहेत, उदा: एमएयु, आय्डल/पीक कपॅसिटि, ट्रॅफिक इ. तरि हि, रिवर्स कॅलक्युलेशनने हि कपॅसिटी साधारण १ लाख टारगेट रिक्वेस्ट्स पर सेकंद (रफली ८ बिल्यन मेसेजेस पर डे) ची आहे. एक ध्यानात घा, सिग्नल मेसेजेस स्टोर करत नाहि, प्रोसेस करत नाहि, त्यावर अनॅलिटिक्स बिल्ड करत नाहि; म्हणुन इतकि कंप्युटिंग पावर त्यांना सध्या पुरेशी आहे. पुढे कपॅसिटि वाढवावी लागली तरी देखील खर्च बिल्यन डॉलर्स मधे जाणार नाहि. आता हि आकडेमोड पण तुम्हाला समजेल का हि शंका आहेच, पण कदाचित इतर इच्छुकांना समजेल...

>>निदान माझिलाच तरी उदाहरण देऊ नका.<<
वर मी रॉयल्टिचा उल्लेख केला होता, तोहि डोक्यावरुन गेला बहुतेक. गुगल डिफॉल्ट सर्च एंजिन ठेवण्याकरता फायरफॉक्सला ~४०० मिल्यन डॉलर्स देते, दर वर्षाला. सिग्नल कॅन डु (ऑर ऑलरेडी डुइंग) समथिंग सिमिलर; लायसेंसिंग देर कॉम प्रोटॉकॉल, एन्क्रिप्शन टेक्नालजी एटसेट्रा. राहिता राहिला प्रश्न एफटिइंचा. टेक कंपन्या, एस्पेशियली नॉट-फॉर-प्रॉफिट यांनी डेवलपर्सचा हेडकाउंट हाय ठेवण्याची काहिहि गरज नाहि. मागे व्हॉट्सअ‍ॅप सिइओ, यान कुमच म्हणाला होता कि - हि निड्स जस्ट ५० पिपल टु रन व्हॉट्सअ‍ॅप... Wink

तुम्हाला शुभेच्छा!

>>म्हाळसा यांचा प्रतिसाद नेमका आहे.<< +१
प्रायवसी वर गाडी वळवा आता. ओपन सोर्सचे फंडे, फिजिबिलिटी समजवता समजवता खूप खर्च झालेला आहे... Wink

>>म्हाळसा यांचा प्रतिसाद नेमका आहे.<< +१

>>>>>>

म्हाळसा यांचा प्रतिसाद नेमका आहे लिहिणारे,
त्याला +१ करणारे,
आणि खुद्द म्हाळसा

आपल्या तिघांचे एक धागाकर्ता या नात्याने आभार आणि धन्यवाद, ईतक्या पोस्ट आणि ईतक्या घनघोर चर्चेत काय वाचावे हे कळत नव्हते. म्हाळसा यांची पोस्ट वाचली आणि बरेच कळल्यासारखे वाटले Happy

पण तरी मी व्हॉटसप नाही सोडणार कारण मी तिथे तब्बल २०-२२ पोरींशी फ्लर्टींग करतो, आणि मी हे असे सगळे अचानक सोडून सन्यास घेऊ शकत नाही Sad

योगेश २९ यांच्या मते हे गौरव सोमवंशी आंतरराष्ट्रीय तज्ञ तर सोडाच व्हॉट्स अ‍ॅप युनिव्हर्सिटीच्या लायकीचेही नाहीत. आपण हे मत लोकसत्ताला कळवू हं ! त्यांच्या जागी यांची मालिका सुरू करा म्हणून सांगू.
लोकसत्ताने कदाचित असा फालतू बायोडेटा पाहून लेख लिहायला सांगितले असतील. योगेश २९ यांची झळाळती २२ वर्षांची कारकीर्द जर त्यांनी पाहिली तर फिट येऊन पडतील.
सोमवंशी यांचा लेख पण देतो. स्कूटर आणि ओपन सोर्सच्या पुढे काहीच नाही तो. बाकीचे लेख ज्यांना शक्य असेल त्यांनी वाचून बघा. योगेश २९ यांचे माबोवरचे जबरा फॅन फॉलोईंग लोकसत्ताचा खप सुद्धा दुपटीने वाढेल. फक्त पेपरला सहा स्ट्रोक्स लागतील.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माहितीचा मोबदला..
एस्टोनिया या देशात राष्ट्राध्यक्षांच्या भाषणापासून ते सरकारसंबंधी कोणतीही माहिती ब्लॉकचेन व्यासपीठावर साठवली जाते.
गौरव सोमवंशी | December 24, 2020 12:28 am

गौरव सोमवंशी

प्रचलित समाजमाध्यमांच्या कार्यप्रणालीतील केंद्रीकरण टाळणारी, वापरकर्त्यांनाही आर्थिक मोबदला देणारी समाजमाध्यमे ‘ब्लॉकचेन’द्वारे आकारास आली आहेतच; शिवाय या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे कलाक्षेत्र, वृत्तमाध्यमे, निधी संकलन यांतही पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने जगभर प्रयोग होताहेत..

आपल्यापैकी अनेक जण ‘फेसबुक’ हे समाजमाध्यम वापरत असाल. त्यावरील खात्यावर आपण वाचनीय मजकूर लिहितो वा उत्तम छायाचित्र डकवतो, तेव्हा त्यास मित्रयादीतील मंडळींचा प्रतिसाद मिळतो. या प्रक्रियेमुळे जाहिरातदारांना त्यांची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत होते, कारण फेसबुक या माध्यमाचा वापर या प्रक्रियेत वाढलेला आहे. पण या साऱ्यामुळे निर्माण झालेला सर्व महसूल/नफा मात्र फेसबुक या कंपनीकडेच जातो. मजकूर, छायाचित्र वापरकर्त्यांचे, माहिती वापरकर्त्यांची, हे सगळे उपभोगणारेही वापरकर्तेच; पण मग महसूल/नफ्यामध्ये वापरकर्त्यांचा हिस्सा का नसावा? इतकेच नव्हे, तर वापरकर्त्यांच्या माहितीवर, अगदी खासगी संभाषणांवरदेखील फेसबुकचे हक्क आहेत. हे सगळे शक्य होते कारण फेसबुक एक केंद्रीय संस्था म्हणून काम करते, जिचा उद्देश कोणत्याही कंपनीप्रमाणे फक्त स्वत:साठी नफा कमावणे हा आहे. नव्वदच्या दशकात इंटरनेटचा नुकताच उगम झाला तेव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर वगैरे असे काही येऊ शकते याची कल्पना करणेदेखील शक्य नव्हते, कारण त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान प्रचलित वा प्रगल्भ नव्हते. पण म्हणून ‘ब्लॉकचेन’सारख्या आजच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या भविष्यात पडू शकणाऱ्या पडसादांची कल्पनाच करू नये असेही नाही. मग वितरितता आणि विकेंद्रीकरण या संकल्पनांना अनन्यसाधारण महत्त्व देणारे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समाजमाध्यमांमध्ये कोणते बदल घडवू शकते?

समजा, ‘ब्लॉकचेन’ तंत्रव्यासपीठावर आधारित एक समाजमाध्यम आहे, ज्यात मार्क झुकरबर्ग किंवा फेसबुक असे कोणतेही ‘मालक’ नाहीत. त्यावर वापरकर्ते स्वत:ची डिजिटल ओळख स्वत:हून बनवतील, त्या डिजिटल ओळखीवरून निर्माण झालेली सगळी माहितीदेखील वापरकर्त्यांच्याच मालकीची असेल आणि हे तंत्रव्यासपीठ कोणत्या कार्यप्रणालींवर चालते हेदेखील उघड असेल. तसेच त्यावर वापरकर्त्यांने काही चांगला मजकूर लिहिला आणि त्यास इतरांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर जाहिरातदार थेट त्या वापरकर्त्यांलाच पैसे देतील.

हे सारे वाचायला नवलाईचे वाटत असेल; पण या प्रकारची अनेक ब्लॉकचेनआधारित समाजमाध्यमे आजघडीला कार्यरत आहेत. त्यांविषयी आज जाणून घेऊ या..

(१) स्टीमीट : याचे फेसबुकशी बरेच साम्य आहे. पण यात वापरकर्त्यांकडून जितका जास्त वापर वा सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, त्यानुसार त्यास ‘स्मार्ट मीडिया टोकन’द्वारे मोबदला मिळत जाईल. आजपर्यंत १६२ कोटी रुपयांचा असा मोबदला वापरकर्त्यांना मिळाला आहे. समाजमाध्यमांची व्यापकता पाहता, ही रक्कम आज तुटपुंजी वाटेल, पण सुरुवात म्हणून नक्कीच आशादायी आहे.

(२) सेपियन : वापरकर्ते समाजमाध्यमावर जितका जास्त काळ वावरतील तितका या क्षेत्रातील कंपन्यांचा नफा वाढतो. कारण जाहिरातदार या कंपन्यांना त्याचेच तर पैसे देतात. परंतु वापरकर्त्यांच्या वेळेवर आणि त्यावरून निर्मित होणाऱ्या उत्पन्नावर वापरकर्त्यांचाही हक्क असावा यासाठी ‘सेपियन’ हे ब्लॉकचेनवर आधारित समाजमाध्यम आकारास आले आहे. यात स्वत:ची माहिती जाहिरातदारांना विकावी की नाही हा पूर्णपणे वापरकर्त्यांचा निर्णय असतो.

(३) डीटय़ूब : यूटय़ूबची कार्यप्रणाली ही फेसबुकपेक्षा काही प्रमाणात बरी आहे; कारण यामध्ये विशिष्ट निकष पूर्ण केल्यावर वापरकर्त्यांना त्यांच्या दृक्मुद्रणावर उत्पन्न मिळणे सुरू होते. पण हेसुद्धा पूर्णपणे विकेंद्रित व्हावे यासाठी डीटय़ूब हा पर्याय उपलब्ध झाला आहे.

(४) याशिवाय ‘ऑल.मी’, ‘डायस्पोरा’, ‘माइण्ड्स’, ‘सोशल-एक्स’ आदी समाजमाध्यमे ब्लॉकचेन तंत्रव्यासपीठावर आहेत. त्यांस अधिकाधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कलाक्षेत्र : कलाकारांचा स्वत:च्या कलाकृतीवर पूर्णपणे हक्क असावा, ही शक्यता ब्लॉकचेनमुळे मूर्तरूपात येऊ शकते. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका इमोजेन हीप यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘‘कोणत्याही कलाकृतीसाठी सर्वात आधी परिश्रम करणारे कलाकार असतात आणि मोबदला मिळताना सर्वात शेवटचे व दुर्लक्षित केले गेलेलेदेखील कलाकारच.’’ याच हीप यांनी कलाक्षेत्रात बदल घडवून आणू शकेल असा ब्लॉकचेन प्रयोग सुरू केला आहे. हीप लिहितात : ‘२३ वर्षे संगीत क्षेत्रात काम करून मी अनेक निराशांना सामोरे गेले. मात्र, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा परिचय झाला तेव्हा माझ्या लक्षात आले की, कलावंतांसाठी या क्षेत्रात पारदर्शकता हवी, योग्य मोबदला आणि स्वकलाकृतीवर स्वनियंत्रण मिळायलाच हवे.’ हीप या आता ‘मायसीलिया’ या संस्थेच्या आणि त्याअंतर्गत चालणाऱ्या ‘क्रिएटिव्ह पासपोर्ट’ प्रकल्पाच्या संस्थापिका आहेत. डिजिटल पेण्टिंग, व्हिडीओ गेम, तसेच अन्य कोणत्याही कलाकृतींमध्ये ब्लॉकचेन वापराच्या शक्यता अभ्यासण्यासाठी ‘स्विस आर्ट्स कौन्सिल’तर्फे स्वित्झर्लंडमध्ये सुरू असणाऱ्या प्रकल्पांना भेट देण्याची संधी प्रस्तुत लेखकाला मिळाली होती. यामध्ये ‘नाओ’, ‘एव्हरड्रीमसॉफ्ट’ अशा काही प्रकल्पांच्या संस्थापकांना भेटल्यानंतर, डिजिटल कलाकृतींच्या विश्वात ब्लॉकचेनमार्फत काय काय घडू शकते हे जाणून घेता आले.

अनुदान आढावा : आपण कोणत्याही संस्थेला दिलेल्या अनुदानाचे/देणगीचे पुढे काय झाले, त्या पैशांचा योग्य वापर झाला की नाही, ते खरेच गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचले की नाही, हे सारे पाहता येणे ब्लॉकचेनद्वारे शक्य आहे. यासाठी भारतातच ‘ट्रॅक माय चॅरिटी’ नावाचा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे. नोबेल पारितोषिक जाहीर झालेला ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’, ‘एलिस’, ‘व्हर्ल’, ‘एड-चेन’ असे जगभरातील अनेक उपक्रम ब्लॉकचेनद्वारे कार्यरत आहेत. तसेच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या मध्यस्थ कंपन्यांना बाजूला सारून विक्रेत्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचे काम ‘ओपन-बाजार’तर्फे केले जात आहे. यामध्ये कोणीही मध्यस्थ नसून आर्थिक व्यवहारांची पूर्ण पारदर्शकता प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.

वृत्तमाध्यम : एस्टोनिया या देशात राष्ट्राध्यक्षांच्या भाषणापासून ते सरकारसंबंधी कोणतीही माहिती ब्लॉकचेन व्यासपीठावर साठवली जाते. यात दिलेला माहितीचा मजकूर हा बनावट किंवा बदललेला नाही, याची खात्री देता येते. वृत्तमाध्यमांच्या बाबतीतही हे अवलंबता येईल. ज्यात खोटी माहिती (फेक न्यूज) पसरविणारे किंवा जल्पक (ट्रोल्स) यांच्या डिजिटल ओळखीस कमी गुणांक (रेटिंग) देऊन त्या खात्यास बातमी देण्यापासून रोखता येऊ शकेल. तसेच वारंवार खरी माहिती देणाऱ्या व्यक्तींना मोबदलादेखील देता येईल.

मतदान : आपण सातोशी नाकामोटोच्या खात्यात किती बिटकॉइन आहेत आणि त्या खात्याद्वारे कोणकोणते व्यवहार झाले हे पाहू शकतो, पण नाकामोटो कोण आहे, हे आपणास अद्याप समजलेले नाही. समजा, हीच पारदर्शकता आणि गोपनीयता मतदान प्रक्रियेतही आणता येईल का, या दृष्टीने प्रयोग सुरू आहेत. अमेरिका, ब्राझील, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि एस्टोनिया या देशांमध्ये हे प्रयोग केले जात आहेत, पण अद्याप ते प्राथमिक स्थितीतच आहेत.

निधी संकलन : इटालियन दिग्दर्शिका मिट्झी पैरोन यांच्या पहिल्या सिनेमासाठी सर्व निधी ‘ईथिरियम’ या तंत्रव्यासपीठाद्वारे उभारला गेला होता. त्यांचा ‘ब्रेड’ हा सिनेमा ब्लॉकचेन टोकनधारक निर्माता असलेला जगातील पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमाद्वारे मिळालेल्या नफ्यातील ३० टक्के वाटा हा याच टोकनद्वारे गुंतवणूक करणाऱ्या मंडळींना दिला गेला. हे जसे सिनेमासाठी शक्य झाले, तसेच इतर कोणत्याही प्रकल्पासाठी शक्य होऊ शकते. ज्यात गुंतवणूकदारांनी गडगंज श्रीमंत असण्याची गरज नाही आणि जनसामान्यांनादेखील यथाशक्य गुंतवणूक करून निधी उभारता येईल.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io

( समजा चुकून लेख आवडला तर मला श्रेय द्य).. कारण गुगलवर एका क्लिकवर शोधलाय. नाही आवडला तर ताई जबाबदार असतील.

पण तरी मी व्हॉटसप नाही सोडणार कारण मी तिथे तब्बल २०-२२ पोरींशी फ्लर्टींग करतो, आणि मी हे असे सगळे अचानक सोडून सन्यास घेऊ शकत नाही>> सन्यास घ्यायला कोण सांगतंय.. सिग्नल ला जाऊन फ्लर्ट करा. उद्या बायकोला तुमच्या व्हॅाट्सॲपवरच्या फ्लर्टींगविषयी फेसबूकवरून कळलं तर तुम्हाला नक्कीच सन्यास घ्यावा लागेल Happy

योगेश २९
आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा विनयाने उपयोग करावा. ते ज्ञान अशा पद्धतीने मांडायचे असते. भले सोमवंशींना तुमच्याइतकी माहिती नसेल. आता त्यांची जी प्रोफाईल मी शोधली ती असे सांगते.... अर्थात तुमच्या पुढे किस झाड की पत्तीच असेल म्हणा. त्यात वाद नाही.

Gaurav Somwanshi
CEO & Cofounder at EmerTech Innovations
Mumbai, Maharashtra, India500+ connections

About
Management Professional (IIM Lucknow, 2013) and computer science engineer with diverse set of experience in public sector consulting, and experience of founding an NGO & edu-tech startup. Blockchain consultant and evangelist, implemented first-of-its-kind pilots in Chhattisgarh for multiple domains like data exchange between departments, land records, and health records.

Also, a social activist, and independent researcher in subjects of sociology, history, and technology with two papers published in international journals. Edited and published books. Public speaker, educator, and content creator.

Recognition for work:

- Designated as 'Future Leader' by British Council to present my work and idea at UK Parliament, and University of Cambridge.

- Selected as a Dalai Lama Fellow, 2019, a fellowship which cultivates and supports a global movement of next generation leaders applying universal values to solve global challenges. Leadership training at University of Virginia, USA.

- Recognized as Fellow at Royal Academy of Engineering, UK, 2018. Speaker at 'London Source Summit' on 'Blockchain for Public Good'.

- Member, 'Africa Blockchain Alliance' to collaborate and exchange ideas for implementing Blockchain for public sector

- Awarded 'Youth of the Year 2019', at 'Shahu International Film Festival', at 'National Film Archives of India' in Pune, for overall work.

https://www.loksatta.com/sakhali-che-swatantra-news/bitcoin-article-on-d...

तर योगेशभाऊ
हेच ते लोकसत्ताने ठरवलेले आंतरराष्ट्रीय तज्ञ.
मग तुमचे लेख कधी छापायचे ? प्रोफाईल द्या पाठवून २२ वर्षांची.

सन्यास घ्यायला कोण सांगतंय.. सिग्नल ला जाऊन फ्लर्ट करा.
>>
हे मग ते ते आपले सिग्नलला जाऊन भीक मागा सारखेच होईल.. असो, ते फक्त उदाहरण होते. सांगायचा मुद्दा आह की बना बनाया सेट अप ईकडचा तिकडे कसा ट्रान्सफर होणार ?
तुमच्या आमच्यांनाही हे नकोसे वा त्रासदायक आहे, तर विचार करा कित्येक नव्यानेच स्मार्टफोन आणि व्हॉटसप वापरायला शिकलेले ज्येष्ट नागरीक आहेत ते आता कुठे सिग्नल शोधत फिरणार या वयात..

लिहिण्यासारखे आणि उत्तरे देण्यासारखे बरेच मुद्दे आहेत.

पण स्पेशल आयडी करुन बुलिंग करण्याची सुरुवात झाल्याने मी माबो प्रशासनाला विनंती करतो की माझे सर्व प्रतिसाद डिलिट करुन माझे सदस्यत्व रद्द करावे.

योगेश२९, तुम्ही सुरू केलेल्या चर्चेमुळे व त्यावर इतरांनी दिलेल्या प्रतिसादांमधून बरीच माहिती मिळाली. त्यासाठी धन्यवाद.

योगेश२९, तुम्ही सुरू केलेल्या चर्चेमुळे व त्यावर इतरांनी दिलेल्या प्रतिसादांमधून बरीच माहिती मिळाली. त्यासाठी धन्यवाद.

+१
तुम्ही कृपया लिहित रहा.

>>सांगायचा मुद्दा आह की बना बनाया सेट अप ईकडचा तिकडे कसा ट्रान्सफर होणार ?<<
अरे अशी काय आणि कुठली एव्हढि इस्टेट/ऐवज जमा करुन ठेवली/ला आहेस व्हॉट्सअ‍ॅपवर, केवळ मेसेजेस तर आहेत. तेहि बहुतांशी बिनकामाचे. आमच्या भाषेत "लिफ्ट अँड शिफ्ट" करण्याची हि आवश्यकता नाहि. तु पुढाकार घेउन सिग्नलवर नविन ग्रुप बनवलास कि तुझ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याची लिंक दे. हाकानाका, येणारे येतील...

योगेश२९, तुम्ही सुरू केलेल्या चर्चेमुळे व त्यावर इतरांनी दिलेल्या प्रतिसादांमधून बरीच माहिती मिळाली. त्यासाठी धन्यवाद.

+1
योगेश, ट्रोल्सकडे दुर्लक्ष करून लिहीत राहा. Just scroll their messages without reading.

माबो प्रशासनाला विनंती करतो की माझे सर्व प्रतिसाद डिलिट करुन माझे सदस्यत्व रद्द करावे.
>>>>

अहो तुमच्यासारखे अभ्यासू प्रतिसाद देणारे आहेत म्हणून माझ्यासारखे प्रश्नार्थक धागा काढायची हिंमत करणारे माबोवर आहेत Happy

समोरच्याचा हेतू आपल्याशी चर्चा करणे आहे की आपल्याला ट्रोल करणे आहे याचा विचारच का करावा?
ज्या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हाला असे वाटेल की या निमित्ताने आपण अजून छान माहिती शेअर करू शकतोय त्या प्रश्नांची आवर्जून उत्तरे द्या, बाकीचे इग्नोर करा.

अरे अशी काय आणि कुठली एव्हढि इस्टेट/ऐवज जमा करुन ठेवली/ला आहेस व्हॉट्सअ‍ॅपवर,
>>>>>>>

कधीतरी मॅगी ऑमलेट चहा कॉफी बनवून त्याचा फोटो काढून स्टेटसला लावतो. तो शंभरेक जणांनी पाहिला तरच काहीतरी बनवल्याचे समाधान मिळते. उचलली झोळी आणि बसलो सिग्नलला जाऊन असे थोडी ना चालते. ईथे अजून एकही जण असा नाही ज्याने व्हॉटसप त्यागलेय वा मी त्यागणार आहे असे म्हणत आहे. फार तर कोणी दोन्हीकडे अकाऊण्ट काढून बसले असेल.

कधीतरी मॅगी ऑमलेट चहा कॉफी बनवून त्याचा फोटो काढून स्टेटसला लावतो. >>ते फिचर मी पण सतत वापरते.. आवर्जुन हाय हेलो बोलण्यापेक्षा स्टेटसवरचे फोटोज् बघून कमेंट करायला आणि कमेंट वाचायला मलाही आवडतं .. आणि हे फिचर सध्या तरी सिग्नल वर दिसत नाहीए.
पण आधी म्हटल्याप्रमाणे, माझी कोणती इन्फॅार्मेशन व्हाॅट्सॲप कशी वापरणार आहे ह्याबद्दल क्लॅरिटी नाही.. फेसबूक वर माझा वावर फार मर्यादित आहे.. तीथे उगाचच कोणत्याही लिंकवर किंवा विडिओजवर मी क्लिक करायचं टाळते.. पण व्हॅाट्सॲप वर मी बिनधास्त वावरते.. इथून पुढे जर व्हॅाट्सॲप सेंसिटिव डेटा कॅच करून फेसबूकला पास करणार असेल तर सिग्नलला जाऊन बसणार आणि इतरांनाही तीथे आणायचा प्रयत्न करणार Happy

ज्या सर्व लोकांनी मला सपोर्ट केले आणि ज्यांना माझ्या पोस्ट्स वाचुन काहीतरी फायदा झाला त्यांचे अनेक धन्यवाद.

परंतु

>> आपण हे मत लोकसत्ताला कळवू हं !
...
>> मग तुमचे लेख कधी छापायचे ? प्रोफाईल द्या पाठवून २२ वर्षांची.

हे मला गंभीर वाटते. मी अंबादानी यांनी तो लेख ईथे पोस्ट करायच्या आधीच वाचला होता आणि अजुनही तो लेख अंसंबद्ध असल्याचे मत ठाम आहे.
ते का आणि कसे हे आता लिहिण्याची काही वेळ नाही. त्यांच्याकडे आय आय एम मधुन डिग्री आहे की ते कुठल्या कंपनीचे सी ई ओ आहेत याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही. तुम्ही टेक्निकल बाबतींशी माझ्याबरोबर लढा, आय कॅन होल्ड माय ग्राऊंड (अ‍ॅन्ड अ‍ॅड्मिट व्हेन आय अ‍ॅम रॉन्ग). पण ऊगाच बदनामीची भीती दाखवुन किंवा या प्लॅटफॉर्म वर झालेले मतभेद दुसर्या प्लॅट्फॉर्म वर घेउन जायचे याची माझी तयारी नाही आणि ईच्छा शक्ती ही नाही.

आता जरी समजा अंबादानी यांचा आयडी उडाला तरी ते डुख धरुन आज ना उद्या नवीन रुपात येणार, कदाचित आज न उद्या खरोखरच लोकसत्तेला कळवणार. पेपर मध्ये छापुन आलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असे मानणारा अजुनही एक मोठा वर्ग आहे.

हे जे चालु आहे त्याला डॉक्सिंग म्हणतात आणि एस्पेशली अ‍ॅनॉनिमस आय डी मागे लपुन केलेला भेकडपणा आहे. आज या मनुष्याने उगाचच भांडणे लावुन द्यायचा प्रयत्न केला आहे, उद्या तो कुठल्याही थराला जाऊ शकेल.

तर असोच,

मी माबो प्रशासनाला विनंती करतो की माझे सर्व प्रतिसाद डिलिट करुन माझे सदस्यत्व रद्द करावे.

असे सांगून माबो आयडी उडवत नाही की प्रतिसाद काढत नाही. तुम्हाला जायचं तर तो तुमचा प्रश्न. शुभेच्छा.

>> असे सांगून माबो आयडी उडवत नाही की प्रतिसाद काढत नाही. तुम्हाला जायचं तर तो तुमचा प्रश्न. शुभेच्छा.

तुमची माहीती पुर्ण नाही. हा धागा बघा:
https://www.maayboli.com/node/16971

याच्याप्रमाणे हे शक्य आहे आणि हे जोपर्यंत होत नाही तो पर्यंन्त मी रोज एकदा प्रशासनाला हे करण्याबाबतीत विनंती करणार आहे.

doxing बद्दल ट्विटर वर वाचलं होतं. इथेही असे प्रकार होऊ शकतील हे आत्ता तुम्ही लिहिल्यावर लक्षात आलं. भीतीही वाटली.
प्रशासनाने आयडी उडवला तरी प्रतिसाद आता 4 तास झाले असतील तर तसेच राहतील. ते उडत नाहीत.
एनिवेज, तुम्हाला शुभेच्छा.

Pages