ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.
नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.
एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.
पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.
तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?
योगेश२९, चुझ युअर बॅटल्स इतकच
योगेश२९, चुझ युअर बॅटल्स इतकच सांगेन. >>+११ you are making some valid points. Please keep contributing. For me, data going to Facebook is main concern. Of all the biggies I have zero trust in Facebook. I know data privacy is a luxury that most people can't afford. But in this case, since I have a choice (signal/telegram), I am going to exercise it.
<< आणि हो टेलिग्राम हा नक्किच
<< आणि हो टेलिग्राम हा नक्किच चांगला पर्याय नाही. >>
चूक.
स्वगत: मला आता प्रायव्हसी या विषयावर एक लेख (किंवा लेखमाला) लिहावी लागणार बहुदा.
आता प्रायव्हसी या विषयावर एक
आता प्रायव्हसी या विषयावर एक लेख >>> अगदी बरोबर. हा मुद्दा आहे.
>> For me, data going to
.
म्हाळसा धन्यवाद.
म्हाळसा धन्यवाद.
मुद्दा पोहोचला यात समाधान आहे.
माफ करा मध्यंतरी हायपर झाले. सॉरी.
आपण आपले सारे फ्रेण्ड फॅमिली
आपण आपले सारे फ्रेण्ड फॅमिली कलीग्ज असा गोतावळा घेऊन व्हॉटसपवर बस्तान मांडले असताना सगळे जण एकसाथ कसे ठरवून उठायचे आणि सिग्नलला जाऊन बसायचे?
आणि तिथेही हिच चोरी झाली तर पुन्हा कोण दरवेळी नवीन जागी दुकान मांडणार?
त्यातही चोरून चोरून काय चोरणार आणि त्याने आपल्याला काय नुकसान पोहोचवणार याबाबत स्पष्टता नाही.
बाय द वे टेलिग्रॅम त्यांचा
बाय द वे टेलिग्रॅम त्यांचा स्वतःचाच अॅड प्लॅट्फॉर्म तयार करत आहेत. म्हणजे पुन्हा तेच ईश्युज!
ऋन्मेष. बरोबर.
ऋन्मेष. बरोबर.
हे ऑलरेडी लिहीलेय. पण इथे मधेच उडी घेऊन ओक्साबोक्षी प्रतिसादत सुटतात लोक.
आज फेसबुकवर एक गंमतीशीर पोस्ट बघितली
सिग्नलला अकाउंट बनवलेय चार दिवस झाले. येताय तिकडे की डिलीट करून मीच पुन्हा येऊ ?
खूप हसले या पोस्टला.
सिग्नल निर्धोक आहे. टेलिग्रॅमला व्हॉट्सअॅप पेक्षा कमी धोका आहे. (संदर्भ आधीच्या पोस्टी)
पण टेलिग्रॅम रूळतंय. आम्हाला व्हिडीओ सेशन्सच्या वेळी टेलिग्रॅमच वापरावं लागतं. तिकडेच मेसेजेस येतात.
चुका घडलेल्या आहेत. जाणुन
चुका घडलेल्या आहेत. जाणुन बुजुन नव्हेत>> पैसे कमवायला जाणुन बुजुनच केलेल्या आहेत. आपोआप झालेल्या नाहीत. इट्स ए चॉईस.
आपल्याला इथे बसुन दोषारोप करणे सोपे असते पण शेवटी त्यांनाही बिझनेस करायचा आहे. >> करू नका बिझनेस! पिरिएड. वॉल स्ट्रीटला दाखवायला एथिक्स पायदळी तुडवुन करावा लागत असेल तर शटर बंद करा नाहीतर मग बॅकलॅशला तयार रहा.
त्यांनी भर्पुर सुधारणा केलेल्या अहेत.>> इंटेंशन्स स्वच्छ आहेत असं आजही वाटत नाही.
एखादा कुतर्क करत असेल तर
एखादा कुतर्क करत असेल तर त्याच्याशी वादविवाद करू नये. आणि कुतर्क्याला साथ देणा-यांशीही वाद घालू नये.
मी युट्यूबचे उदाहरण दिले होते. उदाहरणे, रूपक, दृष्टान्त हे कसे घ्यायचे आणि त्यातून काय बोध घ्यायचा याचे तारतम्य सुटले की लोक तुकडे पाडत उत्तरे देतात. हा प्रकार डोक्यात जाणारा असतो. या प्रतिसादाच्या आधी सात आठ प्रतिसादात माझे सगळे सांगून झाले आहे. इन टोटॅलिटी बघायला हवं.
युट्यूब ५० रूपये घेते म्हणजे युट्यूब आणि व्हॉटसअॅपची तुलना करता असे स्वतःचे ठार आकलन करून समोरच्याशी वाद घालणे हे टेंपर हलवायला पुरेसे असते. आपले आकलन कमी आहे हा समोरच्याचा दोष कसा काय ? कुणी तुलना केली अशी ?
मूद्दा नफा कमावण्यासाठी आला, खर्च येतो हा आहे ना ?
मग पेड सर्व्हिस द्या आम्ही घेऊ .
आणि ही चर्चा का चालू आहे इथे ? ऋन्मेषने धागा का काढला ?
हे सगळं रामायण घडून गेल्यानंतर कोण च्चोरी करतंय हा प्रश्न विचारणे म्हणजे आपल्यासोबत दुस-याचाही वेळ घालवणे आहे.
म्हणजे लोक विनाकारणच चर्चा करताहेत. उडवा तर मग धागा.
प्रत्येक एक्स्प्लोसिव ग्रोथ
.
योगेश,
योगेश,
तुम्ही छान माहिती देत आहात. लिहीत राहा.ट्रोल्सकडे दुर्लक्ष करा.
ओह. नवीन पाहून मला वाटले
ओह. नवीन पाहून मला वाटले सेन्सीबल आयडी असेल कुणी.
येतीलच म्हणा. तोपर्यंत चालू द्या.
योगेश, चांगले मुद्दे मांडलेत.
योगेश, चांगले मुद्दे मांडलेत. वादाकडे दुर्लक्ष करा.
मी व्हाटसप आत्तातरी घाईत सोडणार नाही. गरज वाटत नाही.
>>अर्थात तरीही हा प्रश्न
>>अर्थात तरीही हा प्रश्न राहतोच की मग सेवा पुरवण्यासाठी पैसे कुठुन आणणार?<<
गुड क्वेश्चन. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्चं अंडरपिनिंग कॉज आणि कार्य सच्चं असेल तर देणग्या मिळतात. शिवाय ते स्पर्धेत टिकुन हि रहातात. सिग्नल या कसोटिला उतरली तर पैशाचा प्रश्न निकालात निघतो. देणग्यां व्यतिरिक्त रॉयल्टि (टेक नो-हौ) हि सुद्धा एक स्टेडि रेवेन्यु स्ट्रीम असु शकते. खर्च म्हणाल तर, हल्ली कोणिहि स्वतःचे डेटा सेंटर्स बाळगत नाहित. क्लाउड कांप्युटिंग लागेल तशी, तेव्हढि, तेंव्हा स्केलेबिलिटि (अप, डाउन; इन, आउट) पुरवते. सिग्नल सारख्या कंपनीचा कॅपेक्स नगण्य, आणि आपेक्स मिलियन डॉलर्स मधे असावा; बिलियन नाहि. तेव्हढा ज्युस मिळवणे, इज नॉट ए बिग डील. हॅविंग सेड धिस, सिग्नल मे नॉट बि मेकिंग मनी राइट नाउ, इवन बुकिंग लॉसेस अॅज वि स्पीक; बट इफ दे सक्सीड इन डिलिवरिंग व्हॉट इज प्रॉमिस्ड, व्हॉट्सअॅप वुड बी ऑन ए सुसाय्डल पाथ. पण ती वेळ बहुतेक येणार नाहि. बघुया, घोडामैदान जवळ आहे...
>>स्वगत: मला आता प्रायव्हसी या विषयावर एक लेख (किंवा लेखमाला) लिहावी लागणार बहुदा.<<
लिहा. इट सीम्स व्हेरी फ्यु केअर अबौट प्रायवसी, अँड पोटेंशियल इंपॅक्ट ड्यु टु लॅक ऑफ इट. एक चांगलं प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहिलंत तर डोक्यात कदाचित प्रकाश पडेल...
स्वगत: मला आता प्रायव्हसी या
स्वगत: मला आता प्रायव्हसी या विषयावर एक लेख (किंवा लेखमाला) लिहावी लागणार बहुदा.>>प्लिज लिहा!
योगेश चान्गल लिहतय.
मी ही माहिती आधी दिलेली आहे.
मी ही माहिती आधी दिलेली आहे. पण तिच्यासाठी सोर्स दिलेला नव्हता.
इथे सिग्नलची माहिती आहे.
https://gadgets.ndtv.com/social-networking/features/signal-faq-what-is-s...
फेसबुक आणि व्हॉट्सअॅप च्या डीलच्या अटी गुगल सर्च मधे दिसतील. त्याचा भंग झाल्याने शेवटच्या टप्प्यावर पाणी सोडून या दोघांनी सिग्नल सुरू केली आहे असे उल्लेख सर्वत्र आहेत. फेसबुकचे म्हणणे आहे की जोपर्यंत हे दोघे फेसबुकशी संबंध ठेवून होते तोपर्यंत आम्ही माहितीचा वापर केलेला नाही. आता आम्ही काहीही करू.
सर्वसामान्यांसाठी या इतिहासाचे महत्व नाही.
१. व्हॉट्स अॅपने पॉलिसी बदलली आणि ती मान्य करणे कस्टमरला बंधनकारक आहे.
२. ती पॉलिसी प्रायव्हसीशी संबंध असल्याने त्यावर चर्चा चालू आहे.
३. ही चर्चा सिग्नल वाल्यांनी घडवून आणली अशी कॉन्स्परन्सी थिअरी मांडण्यात अर्थ नाही.
४. मध्यंतरी डेटा चोरी किंवा गैरवापर याच्याशी मोठ्या चर्चा झाल्याने त्यावर जागरूकता आली आहे. यात जीमेल, गुगल सर्वच आहेत. हे आधी येऊन गेले आहे प्रतिसादात. त्यामुळे यांच्या वापराच्या वेळी का नाही आग्रह धरत असे मुद्दे काढून अमक्याला का दोष देता असे वळण देणे भयंकर चुकीचे आहे. आणि अशा प्रकारच्या लोकांची बाजू प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष घेणेही.
५. मध्यंतरी भारतातल्या आंतरराष्ट्रीय ब्लॉकचेन एक्स्पर्ट गौरव सोमवंशी ( ज्याला भारतातून भारताचा प्रतिनिधी म्हणून बोलावले गेले होते) यांनी लोकसत्ता मधे मालिका लिहीली. त्यांनी फेसबुक तुमचा डेटा कसा चोरतं हे सांगितले. त्याचबरोबर इतर डेटा चोरीची देखील माहिती दिली.
६. मला स्वतःला हे अनुभव आले आहेत.
७. या शिवाय मला फोन येतात. ही डेटा चोरीच असते. ती कंपन्याही करतात आणि त्यांचे एम्लॉयीही करतात. भारतात तर तुम्हाला माझा नंबर कुणी दिला याला उर्मट उत्तरं येतात. हे माझ्या प्रायव्हसीवरचे आक्रमण आहे.
८. सुरूवातीला अवेअरनेस नसल्याने ग्राहक शिकार झाले. हा त्यांचा दोष आहे अशी धारणा ठेवून आक्रमकता दाखवण्यात अर्थ नाही.
९. समाजसेवा, नफा कमावणे हा विषय नाही इथे. विषय ग्राहकाच्या नकळत त्याच्याशी व्यापार करण्याचा आहे. मला माझा डेटा द्यायचा नसेल तर त्याचे पैसे घ्या आणि तुमचे खर्च भागवा. जर मला ती फीस परवडत नसेल आणि प्रायव्हसी बद्दल मला इतकासा कन्सर्न नसेल तर मी नव्या पॉलिसीला ओके म्हणेन. आणि प्रायव्हसी प्रिय असेल तर मी पैसे मोजायला तयार असेन. हा सिंपल फंडा आहे. इथे फाटे फोडण्यात अर्थ नव्हता आणि नाही. ही गोष्ट फेसबुक, सिग्नल आणि गुगललाही लागू होते. पहिल्यापासून सर्वांचे म्हणणे तसेच आहे. कुणी कुठल्याही कंपनीला एकतर्फी दोष देत नाही. त्यामुळे अमक्या कंपन्याला सूट का असा टाहो फोडण्यात अर्थ नाही.
१०. शेवटी, आज सिग्नल सुरक्षित आहे. पण व्हॉट्सअॅप बद्दल तक्रारी असल्याने आधीच टेलिग्रॅमचा वापर चालू झालेला आहे. सिग्नल लोकप्रिय झाले की मी ते वापरीन. त्यांचे हेतू उघड होईपर्यंत अजून कुठले अॅप येईल. पण इतक्या लवकर सिग्नलला आता डेटा चोरता येणार नाही. एव्हढे मोठे वाद झाल्यावर त्यांना ग्राहकांची फसवणूक करणे तितकेसे सोपे राहणार नाही. सिग्नल बनवताना या दोघांनी फेसबुकने डीलच्या अटींचा भंग केल्यामुळे शेवटच्या टप्प्यातल्या केव्हढ्या मोठ्या रकमेवर पाणी सोडले ती गोष्ट विचार करण्यासारखी आहे. पण त्याने मत बनवणे गरजेचे नाही. सिग्नलने उद्या आम्ही डेटा थर्ड पार्टीसाठी वापरायचे ठरवले आहे असे सांगितले की मी त्यांना पैसे घ्या नाहीतर माझे खाते बंद करा असेच म्हणणार.
यातल्या कुणाबद्दलही सहानुभूती किंवा तिरस्कार हा ग्राहकाचा प्रश्न नाही. तसे स्वरूप चर्चेला देऊ नये.
म्हणजे जीमेल वापरताना का आग्रह धरत नाही वगैरे सारखे प्रश्न. ( हे चुकीचे आहे हे ज्यांच्या गावीही नाही त्यांनी खुशाल दुर्लक्ष करावे आणि आपल्या करायला सांगावे. त्यांच्यासाठी नाहीच हे).
माझ्याकडून लेखनसीमा.
योगेश२९,
योगेश२९,
तुम्ही छान माहिती देत आहात. लिहीत राहा.
स्वगत: मला आता प्रायव्हसी या
स्वगत: मला आता प्रायव्हसी या विषयावर एक लेख (किंवा लेखमाला) लिहावी लागणार बहुदा >>> उबो नक्की लिहा!
स्वगत: मला आता प्रायव्हसी या
ड. पो.
आज signal download केलंय..
आज signal download केलंय..
App मधे Donate to signal अशी लिंकही आहे..त्यात No ads, No trackers, No kidding असं स्पष्ट लिहीलंय..
माझ्या दिवसभरातील सगळ्या ॲक्टिविटीज ट्रॅक करून WhatsApp तो डेटा नक्की कसा वापरणार आहे ह्याबद्दल मला तरी काही क्लॅरिटी नाही म्हणून signal वापरून बघणार आहे.

योगेश कृपया लिहीत राहा.
योगेश कृपया लिहीत राहा. ट्रोल्स कडे दूर करा.
मला एक अति बेसिक प्रश्न पडलाय :-
ज्या हँडसेट वर (मोबाईल नंबर वर) मी व्हाट्सप्प वापरते आहे तो नंबर किंवा हँडसेट मी कोणत्याही प्रकारच्या financial apps साठी वापरात नाहीये तर मला याचा धोका कितपत आहे ? म्हणजे मला जिकडे तिकडे नको असलेले advtmnt येतील हे मान्य आहे पण ते सोडता मला नक्की धोका काय असेल ?
हा प्रश्न माझ्या घरातल्या अनेक जेष्ठ नागरिकांना पडलाय तर त्यांना समजावता येईल असं उत्तर मिळवायला मदत करा प्लिज
आजच मटा ला बातमी वाचली की
आजच मटा ला बातमी वाचली की नाराजीचा सूर पाहून व्हाट्सएप कडून घुमजाव
मेसेज, व्हिडीओ, संवाद या तिन्ही तील कुठलीही माहिती शेअर केली जाणार नाही
मेसेज, व्हिडीओ, संवाद या
मेसेज, व्हिडीओ, संवाद या तिन्ही तील कुठलीही माहिती शेअर केली जाणार नाही >>> यात घुमजाव काहीच नाही. नव्या धोरणात यातील माहिती शेअर करणार असे लिहिलेलेच नाहीय.
इथे बघा नवी प्रायव्हसी पॉलीसी
इश्यू आहे तो इतर वैयक्तिक माहिती शेअर करण्याचा. यासाठी लोक / आम्ही इतर पर्यायाचा विचार करत आहोत.
Ok, धन्यवाद
Ok, धन्यवाद
मी व्हाट्सएप वापरत नाही,पण नवरा सध्या अध्ये-मध्ये त्याच्या व्हाट्सएप ग्रूप वरची चर्चा सांगत असतो,त्यांनेच ही बातमी वाचून दाखवली सकाळी..
त्यात 'कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती इतर कंपन्या ना किंवा फेसबुक ला दिली जाणार नाही' असे लिहिलंय, ते इथे सांगावेसे वाटले
सॉरी
सिग्नल हे एक ओपन सोर्स
सिग्नल हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेयर आहे. ओपन सोर्स प्रॉडक्ट्स, स्वयंसेवकांच्या दानामुळे (श्रम + पैसे) चालतात. कित्येक दशकांच्या कालावधीत शेकडो ओपन सोर्स प्रॉडक्ट्सनी हे मॉडेल यशस्वी होऊ शकते हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे. "If you are not paying for the product, then you are the product" या नियमाला ओपन सोर्स हा सणसणीत अपवाद आहे.
आधी राज यांनी सांगितल्यानुसार 501(c)(3) नॉन-प्रॉफिट संस्था कोणीही विकत घेउ शकत नाहीत. आपाची फाउंडेशन, मोझिला फाउंडेशन, लिनक्स फाउंडेशन, इक्लिप्स फाउंडेशन, क्लाउड नेटिव्ह कंप्युटिंग फाउंडेशन ही यशस्वी ओपन सोर्स 501(c)(3) नॉन-प्रॉफिट संस्थांची काही उदाहरणे आहेत. अशा अक्षरशः शेकडो संस्था लोकांनी (आणि कंपन्यांनी) दिलेल्या देणग्यांच्या जोरावर समाजसेवा करत आहेत.
ओपन सोर्स डेव्हलपमेंट मॉडेल तांत्रिक दृष्ट्या उच्च दर्जाची प्रॉडक्ट्स का बनवु शकते या साठी एरिक रेमंड यांचा "The Cathedral and the Bazaar" हा निबंध मुळातुन वाचण्यासारखा आहे. "Given enough eyeballs, all bugs are shallow" हे या लेखातलं वाक्य खुप प्रसिद्ध झालं.
धंदेवाईक कंपन्यांची (फेसबुक, गुगल, माय्क्रोसॉफ्ट, अॅमॅझॉन अॅप्पल इ.) मोनोपॉली मोडुन काढण्यासाठी बाजारात उत्तम पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे ओपन सोर्स प्रॉडक्ट्स वापरण्याकडे माझा कल असतो. उदा क्रोम ऐवजी फायरफॉक्स, विंडोज ऐवजी लिनक्स आणि आता व्हॉट्सअॅप ऐवजी सिग्नल. सिग्नलवर माझा कित्येक महीन्यांपासुन डोळा होता. पण सिग्नल वापरणारे इतर कोणी परीचित नसल्यामुळे "जुबां मिली है मगर हमजुबां नही मिलता" अशी अवस्था होती. मस्क सारख्या इंफ्लुएन्सरच्या एका ट्वीटने ही परीस्थिती बदलली आणि "लोहा गरम है मार दो हतौडा" म्हणत मी ही संधी साधली.
अर्थात माझं कारण इतरांना सिग्नल वापरण्यासाठी पुरेसं न वाटणं अगदी शक्य आहे. व्हॉट्सअॅप वापरावं की नाही याचं प्रत्येकाचं वेगळं स्पष्टीकरण असु शकतं. मी माझं मत इथे मांडलं इतकंच.
थोडंसं अवांतरः
थोडंसं अवांतरः
नारायण कुलकर्णी कवठेकर यांची "गढी" नावाची कविता आठवली. त्या कवितेच्या शेवटच्या काही ओळी अशा आहेत...
पण कसेही करुन गढी गेलीच पाहिजे!
लोकांना पटवुन दे
गढी कोसळण्याची आवश्यकता आणि कारणे
अगदी... गढीच्या बुडात लाखमोलाचा खजिना आहे असे सांगितलेस तरी चालेल
गढी जाणे महत्वाचे
व्हॉट्सअॅपमुळे तुमच्या फोनवरच्या आर्थिक माहितीला धोका आहे ही अफवा मला गढीच्या बुडात असलेल्या खजिन्याच्या माहीतीसारखी वाटते.

पण कुठल्याही कारणाने का होईना जर सगळे सिग्नल वापरायला लागले तर त्यांचं स्वागतच आहे
गढीची कविता अगदीच चपखल आहे.
गढीची कविता अगदीच चपखल आहे.

व्हॉअॅला सिग्नल हाच पर्याय झालेला आवडेल आणि क्राउड फंडिंग मधुन यशस्वी झालेलाही आवडेल. फक्त स्केलप करायला जे महाप्रचंड ऑपेक्स लागतील ते सतत मिळत रहातील का अशी शंका वाटते. अर्थात मेसेजिंग सिस्टिम ही काही बँकिंग इ. सारखी कणा नाही. वाजली नाही तर मोडुन खाल्ली करता येते. त्यातुन बर्याच जणांना बरंच काही शिकायला मिळेल. हा एक फायदा ही पुरेसा आहे.
रानभूली काय सतत ढाल तलवार
रानभूली काय सतत ढाल तलवार घेऊन सज्ज असता काय ?
योगेश यांचे मत लॉजिकल आहे.
योगेश यांचे मत लॉजिकल आहे. सहमत.
Pages