व्हॉटसपवाले डाटा चोरून काय करणार नक्की? आणि आपले त्यात नुकसान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2021 - 03:27

ज्याच्या फोनमध्ये व्हॉटसप नाही असा मायबोलीवर अपवादानेच एखादा असावा. माझ्या आईवडीलांच्या, सासू सासरयांच्याच नाही तर त्याही आधीच्या पिढीत जे अजून पृथ्वीतलावर शाबूत आहेत आणि फोन बाळगतात त्यांच्याकडेही व्हॉटसप आहे.

नुकतेच व्हॉटसपवर एक मेसेज आला की आमच्या अमुकतमुक अटी मान्य करा. मी डोळे झाकून ॲग्री करून मोकळा झालो.
नंतर समजले की व्हॉटसप आपला फोनमधील सारा डेटा चोरायची परमिशन त्यात मागत होती आणि आपण ती आंधळेपणाने दिली.
आता लोकं म्हणत आहेत की ती परमिशन देणे कंपलसरी आहे अन्यथा व्हॉटसप बंद होईल.
मग आता लोकं दुसरा पर्याय सुचवत आहेत. पण आता नवीन ॲपवर पुन्हा सारे मित्र जोडायचे अवघडच आहे. मित्र आणि फॅमिलीच नाही तर या लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम निमित्त ऑफिसचेही टीमनुसार, सेक्शननुसार आणि ओवरऑल असे ऑफिशिअल ग्रूप तयार झालेत.

एकूणात व्हॉटसपचा त्याग करत नवा पर्याय शोधणे हे तितके सोपे नाही.

पण मला एक समजत नाहीये की हे व्हॉटसप आता काय नवीन परमिशन मागत आहे जी आधी त्यांना नव्हती. तसेही आपले कॉन्टेक्ट आणि फोटो ॲक्सेस करायची परवानगी आपण कित्येक ॲपना देतोच.

तसेच जे काही चोरणार ते फोनमधूनच चोरणार. मग ते काय असे चोरणार ज्यात ते आपल्याला थेट नुकसान पोहोचवू शकतात?
कि फक्त आपली प्रायव्हसी जपणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण गमावणार आहोत ईतकेच नुकसान आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रु कॉलर मी अजिबात डालो केले नाही आणि माझा नंबरही तिथे नाही. सगळ्यात जास्त चोर तर ट्रु कॉलरवर बसलेत.

रेकॉर्डेड मेसेज राती ८ ला पण येतात. कॉलतुराणां न भयं न लज्जा.. Happy

पुन्हा लँडलाईनच्या जमान्यात जाऊयात. अ‍ॅप्स साठी वेगळं गॅझेट असावं ज्यात फोन नसावा.
मी मध्यंतरी वर्षभर फोन न वापरण्याचं चॅलेंज घ्यायचा विचार केला होता. पण आता ओटीपी शिवाय बँक सुद्धा काम करत नाही.
यावर तोडगा निघाला तर ( मग ते चॅलेंज असो नसो) फोन बंद करून बघणार आहे.

केकू, छानच. मला प्रश्न पडला की शंभर ठिकाणी OTP लागतो तिथे मोबाईल नसेल तर पर्यायी व्यवस्था काय असते? तुम्ही ही समस्या कशी सोडवली? की मोबाईल आहे, पण तो तुम्ही फोन अथवा महत्त्वाचे संदेश याखेरीज वापरत नाही?

हपा
मला वर्षातून एकदाच मोबाईल लागतो. आय टी रिटर्न्स भरताना.
तसा मी आधार साठी नाझ्या भावाचा नंबर दिला आहे,
दुर्दैवाने आधार आय टी ह्यातून आता मेल्यावरच सुटका. मी अजून पर्यंत मतदान केले नाही, केव्हा केव्हा भीती वाटते की वेळ आलीच तर मी भारताचा नागरिक आहे हे कसे सिद्ध करणार?
जवळचे म्हणतात की तुला प्रायव्हसीचा पारनाईड झाला आहे.
ह्यामुळे बऱ्यापैकी माणूस घाणा झालो आहे.

मी ट्रूकॉलर ची पेड व्हर्जन वापरतो आणि त्यात स्पॅम ब्लॉकिंग फीचर आहे. ते चालू केल्यापासून स्पॅम कॉल्स बंद झालेत. तरीही एखादा त्यातून सुटतोच. मग तो स्वतः ब्लॉक करायचा.

एखादी स्त्री आपल्या शीलाचे रक्षण करते.
तिला एकदा विचाराना की बाई हे घेऊन कुठे जाणार?
आपल्या देशात प्राय्व्हसीचे महत्व नाही, पण सगळ्या जगात तस नाहीये. पाश्चात्य जगात प्राय्व्हसी हा मूळ अधिकार मानतात. म्हणून तर काही ब्राउझर, सर्च इंजिन्स , मेल सर्विसेस आम्ही तुमच्या प्राय्व्हसीचे रक्षण करतो असे अभिमानाने सांगतात. कां बरे?
आपल्याकडे आपण हुक्की आली कुठेही पिंक टाकतो हो की नाही?
सिंगापूरमध्ये जाऊन थुंका पाहू? आणि विचारा एव्हढी स्वच्छता घेऊन कुठे जाणार?
हे असे आहे म्हणून आपण लोकांच्या व्यंगाची, त्यांचे नाक कसे आहे, वर्ण कसा आहे त्याची यथेच्छ टवाळकी करतो. सरदारजी आणि माद्राश्यांवर जोक करतो. आणि वाचणारे एन्जोय करतात.

उबो
छान, आता वाचतोय,
सगळे भाग वाचले. मी आधीच यातील नव्वद टक्के उपाय केलेले आहेत. पण इथे लिहित नाही कारण लिहून उपयोग नाही.
मी DARK web वर एक लेख लिहिला होता. तेव्हा बराच रिसर्च केला होता.
एक अनुभव
TOR खूप स्लो चालते त्यामुळे यू ट्यूब वर पिक्चर बघताना वैताग येतो. तसेच काही वेळा हा आयपी BLOCK केला आहे असे मेसेजेस येतात. ऐसी वर go DADDY आहे ते आडवे येते.
एव्हढे करून ही लीकेज चा प्रॉब्लेम रहातोच त्यासाठी एक खास सेटिंग कारावे लागते.
असो, आता एव्हढे पुरेसे आहे.

सिंगापूरमध्ये जाऊन थुंका पाहू? आणि विचारा एव्हढी स्वच्छता घेऊन कुठे जाणार?
>>>>>

अहो असे एकदम टोकाचे उदाहरण घेऊ नका. ज्यात ती गोष्ट चूकच आहे.

कोणी दिवसातून दोन वेळा आंघोळ करत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यांना कधी म्हणणार नाही की एवढी स्वच्छता घेऊन कुठे जाणार.
पण कोणी चार वेळा करत असेल तर म्हणू शकतो.

तुमची काही चूक दाखवायला म्हटले नाहीये. पण प्रायव्हसीची किती काळजी घ्यावी याच्या काय मर्यादा हव्यात याचा विचार करत आहे. यात आपण जगण्याचा आनंद तर हरवून बसणार नाही ना हा प्रश्न पडला इतकेच. जसे फोनच न वापरणे यात आपण काही आनंदाला मुकत असू, किंबहुना बरेच जागी गैरसोय होत असेल.. त्या ऐवजी जी किमान रिस्क सारेच उचलतात तेवढी सूट स्वतःला दिल्यास काय हरकत आहे.

तुम्ही फोन वापरत नाही हा विषय काढला म्हणून तुमच्या उदाहरणावर चर्चा झाली. पण हे अश्या बरेच गोष्टींना लागू.

मी तर तुमच्या टोटल विरुद्ध आहे. किंवा दुसरे टोक आहे. मी तर बिलकुल काळजी घेत नाही. ज्याला निष्काळजीपणा म्हणता येईल. म्हणून मी माझ्यासारखे वागा असा सल्ला शत्रूला सुद्धा देणार नाही. पण सुवर्णमध्य आपल्या दोघांच्या वागण्यामध्ये कुठेतरी प्रत्येकाने शोधायला हवा असे वाटते.

बहुतेक नाही होत तसं. मी ट्रू कॉलर बंद करून पुन्हा चालू केलं कारण कमीत कमी कुठला कॉल उचलायचा कि नाही ते तुम्ही ठरवू शकता. तुमचा डेटा विकणारे खूप आहेत. अगदी मोबाईल कंपन्यांच्या गॅलरीत काम करणारे किंवा छोटेमोटे रिचार्ज करणारे देखील तुमचा डेटा विकू शकतात. तुम्ही नोटीस कराल तर बर्‍याचदा काही दिवस कॉल्स येत नाहीत आणि आले की एकाच दिवशी ७-८ येतात. त्या दिवशी समजून जायचं कि तुमचा नंबर नवीन बकर्‍याला विकला गेला आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्ट्मेंट्स मध्ये तो देण्यात आलेला आहे.

उपाशी बोका
वाचतो तुमचे लेख नक्की
कारण गरज, धोके आणि त्यावरचे उपाय सर्वांनाच माहीत हवे..
ती तुम्ही शेअर केली याबद्दल धन्यवाद.
त्यानंतर मग आपण त्यापैकी कुठे आणि किती काळजी घ्यायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.

Pages