पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकातले शंकरपाळे ना? ते असेच जाड, खुसखुशीत असतात. माझ्या एका मैत्रिणीच्या घरचे खूप वेळा खाल्लेत. आवडायचे मला. (ती पंजाबी होती आणि शक्करपाले म्हणायची. ते जालन्यात स्थायिक होते. )

आम्ही केलेल्या इडली अतिशय टेस्टी होतात, नुसती सुद्धा खाऊ शकता. पण फ्लॅट होतात. इडली फ्लफी होण्यासाठी काय सुचवाल? आम्ही वापरतो ते प्रमाण - (३:2)
उकडीचे तांदुळ 2 वाटी + इंद्रायणी तांदुळ 1 वाटी यातच उडीद डाळ 2 वाटी असं एकत्र 8-9 तास भिजवुन मग ग्राइंड करते. बॅटर रात्रभर ठेवुन दुसऱ्या दिवशी सकाळी इडली.

डोसे पण जाळीदार होतात पण साऊथ इंडियन्स करतात तसे मऊ आणि खुप जाळीदार होण्यासाठी टिप्स हव्या आहेत. हे बनवताना प्रमाण (3:3) - 3 वाटी तांदूळ (प्रत्येकी 1 वाटी उकडीचे, आंबेमोहोर आणि इंद्रायणी) + 2 वाटी उडीद डाळ + 1 वाटी हरभरा डाळ + 1 चमचा मेथी दाणे हे रात्रभर भिजवुन सकाळी बॅटर बनवताना त्यात मूठभर पोहे घालते. ही नेटवर वाचलेली टीप आहे. मग तासभर ठेऊन डोसे बनवते. डोसा बॅटर फरमेंट करत नाही.

इडलीचे पीठ वाटताना घट्ट हवे. पीठ आंबल्यावर थोडेसे पातळ होते, त्यामुळे जास्त पाणी न घालता वाटावे. वाटताना उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटली जायला हवी. इडलिपात्रात पीठ घालताना ते अजिबात पळीवाढे नको.
घालताना चमच्याला सोडायला तयार नसलेले पीठ हवे. जरा जरी पातळ झाले तरी इडली फ्लॅट होते. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे इडलीपात्रात पाणी उकळत असताना इडली भांडे ठेवा. इडल्या घालून मग इडलीपात्र गॅसवर ठेवले तरीही फ्लॅट होतील.

मीरा, डाळ तांदुळ वाटल्या नंतर ते पीठ एकाच दिशेने चांगले फेटुन घ्यावे, मग फर्मेंट करावे. इडली करायच्या आधी सुद्धा तेल, मीठ घालुन परत फेटावे याने त्या फुगतात. वर साधनाने लिहील्याप्रमाणे इडलीपात्रातले पाणी उकळलेले असावे.

इडली साठी प्रमाण (3:1) घ्या. 3वाटी तांदूळ 1वाटी उडिद डाळ.

1/4वाटी हरभरा/मूग डाळ(ही फक्त पिवळसर रंग येण्यासाठी लागते डोसा बनण्यासाठी)
इडलीच्या पीठात गरज नाही.

डोसे- उकडा राईस 3 वाटी , व्होल उडद एक वाटी+मेथी दाणे..चार-पाच तास वेगवेगळे भिजवावे..मग एकत्र करून ग्राईंड करू शकता.. ग्राईंड करताना थोडासा शिजवलेला भात टाकावा.. चव, रंग आणि जाळी छान येते..मी इडली/डोश्याला ओव्हरनाईट फरमेन्टेशन करत नाही.. रात्री दहा -अकरा वाजता फ्रिजमध्ये.. दुसर्या दिवशी सकाळी डोसे...
IMG_20201213_110701.JPG
असे बनतात....
तसेच इकडे तामिळनाडू आणि सासरी आंध्रामधे हरभरा डाळ,मुग डाळ घालत नाहीत... आणि आंबेमोहोर, इंद्रायणी सुवासिक तांदूळ पण घालत नाहीत..

डोश्याला आम्ही उडीद रात्रभर भिजवुन सकाळी वाटून 2 तास ठेवतो आणि 10 मिनिट आणि सम प्रमाणात रवा घालून डोसे टाकतो
मस्त कुरकुरीत होतात.

आता इडली-
तामिळनाडू मधे बहुतांश उकडा तांदूळ + व्होल उडिद याची इडली करतात.. प्रमाण आणि भिजवण्याची प्रोसिजर सेम वर डोश्यासाठी दिलेली...
आंध्र मधे बहुतांश इडली रवा ची इडली करतात.. मी ही इडली रव्याची करते....तीन वाटी इडली रवा +एक वाटी व्होल उडिद वेगवेगळे चार तास भिजवणे..फक्त उडिद ग्राईंड करणे..भिजवलेल्या रव्यातील पाणी काढून टाकणे..बारीक केलेली उडिद रव्यात मिक्स करून हाताने एका साईडने फेटने..सेम ओव्हरनाईट फरमेन्टेशन करत नाही.. झोपायच्या आधी फ्रिजमध्ये, सकाळी इडली.. इडलीपात्रात पाणी उकळून मग इडली दहा मिनिटे वाफवणे.
IMG_20201223_090400.JPG
अशा बनतात Happy

मी ही इडली रव्याची करते....तीन वाटी इडली रवा + व्होल उडिद वेगवेगळे चार तास भिजवणे..फक्त उडिद ग्राईंड करणे..भिजवलेल्या रव्यातील पाणी काढून टाकणे..बारीक केलेली उडिद मिक्स करून हाताने एका साईडने फेटने..सेम ओव्हरनाईट फरमेन्टेशन करत नाही.. झोपायच्या आधी फ्रिजमध्ये सकाळी इडली.. इडलीपात्रात पाणी उकळून मग इडली दहा मिनिटे वाफवणे.>> उडीद डाळ किती?

अनु तु म्हणतेस तसे रात्रभर उडिद डाळ भिजवून पण डोसे करतात..फक्त रव्याऐवजी तांदूळ वापरते मी...
माश (उडिद) के छिले म्हणतात त्याला- एक वाटी उडिद + एक वाटी तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी ग्राईंंड करून लगेच डोसे...याची चव वेगळी लागते.. जास्त हेल्दी आणि पोटभरीचे होतात.

मृणाल, अनु, रश्मी, सियोना, धन्यवाद ! हे सगळं डॉक्युमेंट करून ठेवणार आहे.

साधना ताई, जे करायला हवं सांगितलं ते सगळं करत नाही आणि जे avoid करायचं ते नक्की करते आहे हे लक्षात आलं. छान माहितीपुर्ण पोस्ट आहे.

आज मी तुमच्या सगळ्यांच्या पोस्ट्स पाहुन डोसा साठी डाळ तांदूळ भिजत घालते आहे. उद्या फीडबॅक देते Happy

उकडीचे तांदुळ 2 वाटी + इंद्रायणी तांदुळ 1 वाटी यातच उडीद डाळ 2 वाटी असं एकत्र 8-9 तास भिजवुन मग ग्राइंड करते. >>>> मीरा इथे चुकते आहे असे वाटते. इडली साठी नेहमी तांदूळ आणि डाळ वेगवेगळी भिजत घालावी आणि वाटताना ही वेगवेगळी वाटावी. डाळ अगदी बारीक वाटावी तर तांदूळ थोडेसे रवाळ वाटावे. बाकी साधनाताई ने योग्य माहिती दिलीच आहे. इंद्रायणी तांदूळ घेतल्याने इडली ला चिकटपणा येत नाही का?

आज सकाळी ब्रेकफास्टला इडली सांबार बनवलं होतं. एकेक पोस्ट परत वाचुन आणि सगळ्या टिप्स फॉलो करुन या वेळेच्या इडली टम्म फुगल्या होत्या. एवढ्या फ्लफी तर पहिल्यांदा झाल्या. सगळ्यांची खुप खुप आभारी आहे. Happy

निल्सन, धन्यवाद. पुढच्या वेळेस इंद्रायणी राईस वापरणार नाही. आणि हो यावेळेस डाळ तांदुळ वेगवेगळे भिजवुन वेगळे ग्राइंड केले.

छानच...
आमच्या कडे पण आज इडली होती..

याहू
इडली चं घोडं गंगेत न्हालं.

मीरा... अरे वा, लगेच करूनही पाहिल्या. मलाही फ्लफी इडल्या आवडतात. मी तर नुसत्याच खाते.

माझ्या एका मैत्रिणीची आई इडल्या करताना थोडे बॅटर घातल्यानंतर त्याच्यावर चमचाभर जाडसर चटणी पसरायची आणि वर परत थोडे बॅटर पसरायची आणि मग इडली वाफवायची. कॉलेजमध्ये वर्गात शेवटच्या बाकावर बसून गुपचूप डब्बा उघडून आम्ही ह्या इडल्या खायचो. वेगळी चटणी लावायची गरज पडत नसे... एकदा वर्ग चालू असताना डब्याचे झाकण खाली फरशीवर पडून टणाटण उड्या मारत चार बेंच ओलांडून गेले होते Happy Happy

थाळीत इडली बॅटर असेच दोन थरात पसरून नंतर चौकोनी कापून इडली सँडविच करता येते. मुलांना डब्ब्यात द्यायला, बाईटसाईज तुकडे त्यांना उचलून खायला सोप्पे. बॅटर मध्ये हळद, बिटचा रस वगैरे घालून रंगीबेरंगी करता येईल जे खायला मुलांनाही आवडेल.

अरे वा,आता मायबोली खाऊगल्ली वर येऊ दे फोटो.

साधना मी पण इडलीपीठ पात्रात टाकले की किसलेले गाजर,किसलेले बीट टाकते मग वाफवते.
रंग पण येतो आणि नावडत्या भाज्या पण पोटात जातात.

Gitsचे ढोकळ्याचे mix आणले होते. त्यानुसार ढोकळा केला पण त्याची पार ढेकळं झाली.
चांगली पाककृती असेल तर कृपया द्या कोणीतरी.

पाणी कमी पडलं/ते मिक्स करून खूप वेळ ठेवून मग वापरलं गेलं का?गिट्स चं पांढरं आहे ना ढोकळा मिक्स?त्याचे नीट होतात ढोकळे.

इडली रव्यासाठी एक प्रश्न. कधी बारीक मिळतो, कधी जाड. सध्या माझ्याकडे बारीक आहे इडली रवा. मग एक वाटी अख्खे उडिद घेतले तर रवा किती घ्यायचा?

ढोकळा रेसीपी
1 वाटी बेसन पिठ अर्धा वाटी ताक घालुन भिजवायचे त्यात चवीनुसार आले मिर्ची पेस्ट हिन्ग चिमुट्भर हळद मिठ साखर अणि 1.5 चमचा रवा 2 चमचे तेल घालुन अर्धा एक तास भिजत ठेवायचे. जर मिश्रण घट झाले असेल तर थोडे पाणी घालू शकतो. नंतर 1 तासाने कुकर मध्ये थोडे पानी घालायचे आणी कुकर ची शिटी काढायची कुकर मध्ये खाली एक छोटी जाळी किंवा प्लेट ठेवायची अणि कुकर गरम करत ठेवायचा. दुसरी कडे मिश्रणात एक छोटा चमचा सोडा घालुन चांगले फेटायाचे आणी परत अर्धा लिंबू चा रस घालुन फेटायचे आणी एक थाळी किंवा भांडे तेलाने ग्रीस करुन फसफसलेले मिश्रण त्यात टाकायचे एकदा tap करायचे आणी पटकन कुकर मध्ये ठेवायचे. आणी म मीडियम फ्लेम वर 10 मीन आणी लो फ्लेम वर 15 मीन स्टीम करायचा. लिंबू चा रस टाकल्या नंतर बाकी सगळे फास्ट करावे लागते. जर वेळ केला तर म ढोकळा फुगत नाही.
सोड्या एवजी इनो वापरतात मी नाही ट्राई केलाय कधी.
ढोकळा गार झाला की त्यावर मोहरी कडीपत्ता मिरची ची फोडणी ओतायची आणी वरुन कोथिम्बीर खोबरे घालायचे.
ताक नसेल तर दही पाणी घालुन वापरले तरी चालेल.

सोनाली, पटेल कडे किंवा अपना बझार मधे हे मिक्स मिळाले तर ट्राय कर. फार मस्त होतो ढोकळा. पाकिटावर लिहिलेय त्या सूचना वाचून करायचे. khaman.jpg

इडली रव्यासाठी एक प्रश्न. कधी बारीक मिळतो, कधी जाड. सध्या माझ्याकडे बारीक आहे इडली रवा. मग एक वाटी अख्खे उडिद घेतले तर रवा किती घ्यायचा?>>>>>>>>

3वाटी इडली रवा आणि एक वाटी उडिद घ्या.

Pages