क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलामी भागीदारी खुप महत्वाची आहे, किमान 50 धावा तरी कराव्यात सलामीच्या फलंदाजांनी, पुन्हा 10-2 अशी परिस्थिती झाली तर 36 allout ची इंनिंग सगळ्यांच्या डोक्यात राहिल

*पुन्हा 10-2 अशी परिस्थिती झाली तर 36 allout ची इंनिंग सगळ्यांच्या डोक्यात राहिल* - डोक्यातून काढून टाका तें. आपलीं पोरं पण तशीं भारी आहेत. परत परत नाहीं होऊं देणार असं !!

साहा यष्टीरक्षणात सर्वात सरस आहे हें मान्य केले तर त्याच्या जागी पंतला फलंदाजी मजबूत करण्यासाठीच घेतला असावा. ती तडजोड करायचीच होती तर साहाच्या जागी राहूल व कोहलीऐवजी पंत किंवा
गिल घेण्याने फलंदाजीला अनुभवाची जोड मिळाली असती., असं वाटलं. फलंदाजीत सहापैकी फक्त दोनच ( रहाणे व पुजारा ) अनुभवी असणं कांहींसं खटकतं.

शॉला डच्च्यू आणि गिल ओपनिंगला, तसेच जडेजा पंतचा समावेश हे सारे अपेक्षेप्रमाणे घडले.
विहारीला आराम देत राहुलला संधी हे मात्र घडले नाही.
अर्थात ते देखील मी यासाठी म्हटले होते की शर्मा आल्यावर त्या आधी राहुलला देखील एक संधी द्यावी असे वाटत होते. अन्यथा विहारीला तडकाफडकी आराम द्यायची तशी गरज नव्हती.

पाच वाजता मॅच सुरू होणार आहे.
मला सहा साडेसहापर्यंत पोरीसोबत मॉर्निंग वॉकला जायचे आहे. आधी प्लान होता की पावणेसहा वाजताच ऊठून ब्रश करून जायचे. पण आता विचार करतोय पाचला ऊठून बॅटींग कोणाची आहे हे चेक करून आपली असेल तर मॅच बघावी आणि ऑस्ट्रेलियाची असेल तर पावणेसहाचा अलार्म लाऊन झोपून जावे. पण साले एकदा उठले आणि ऑस्ट्रेलियाची मैदाने पाहिली की मग बॅटींग असो वा बॉलिंग पुन्हा झोपावेसे वाटत नाही Happy

३८-३
स्मिथला शून्यावर घेतला लेग स्लिपला आश्विनने...
रहाणेला पुर्णवेळ कर्णधार करा कसोटीचा..

आश्विन तिसरी
ऑस्ट्रेलिया १५५-७
आतापर्यंतच्या विकेट पाहिल्या तर लक्षात येईल की फिल्ड प्लेसमेंट कमाल होती आज.

*फिल्ड प्लेसमेंट कमाल होती आज.* - मुख्य म्हणजे फिल्डींगही कमाल होती; अप्रतिम झेल घेतले गेले !
रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळाडू अधिक 'रिलॅक्स ' वाटतात, हें मात्र जाणवतं.

आतापर्यंतच्या विकेट पाहिल्या तर लक्षात येईल की फिल्ड प्लेसमेंट कमाल होती आज.
>>>>>
अखेरच्या विकेटपर्यंत जाणवले हे Happy

फिल्डींगही कमाल होती; अप्रतिम झेल घेतले गेले ! >>> +७८६ सोडलेच नाही वाटते. मी पाहिली तेवढ्या सामन्यात तरी नाही...

ऑस्ट्रेलिया सर्वबाद १९५ !!!

आता शुभमन गिलच्या फलंदाजीची उत्सुकता Happy

पुन्हा आपल्या आघाडीने अपेक्षाभंग केला नाही!!
ह्यावेळी मयांकने अपेक्षापुर्ती केली!

*शेवटी ज्याची भीती होती तेच झालं.* - संदर्भ नाहीं कळला .>>>> आपली पहिली फलंदाजी हवी होती. आता मागच्या सामन्यासारखी तिसऱ्या इनींगला खेळपट्टी खराब होऊन पटापट गडी बाद होतील. फक्त तिसऱ्या इनिंगला खेळपट्टी खराब होईल असं तंत्रज्ञान ऑसीजनी विकसित केलंय.

*आपली पहिली फलंदाजी हवी होती.* कदाचित , ऑसीज उलट म्हणत असतील ! सुरवातीलाच बोर्डर म्हणाला होता कीं हया विकेटवर इतकी हिरवळ अनपेक्षित आहे. सक्काळीं चेंडूला मिळणारा ' बाऊनस व स्विंग' बघतां, पहिली फलंदाजी आपल्यालाही फार अधिक लाभदायक ठरलीच असती असं नाहीं.
आपल्या संघात दोन अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत . त्यामुळे , विकेट खराब झालीच ( केंव्हां व किती खराब होईल याची खात्री नसतेच ), तरीही ऑसीजना एकतर्फी फायदा होणार नाहीं.
गिल विश्वासपूर्वक व एकाग्रतेने खेळत होता. त्याचे सर्व फटके authentic वाटले , ' शुभमन गिल ईज फ्युचर ' अशी आशा निर्माण करण्याइतपत ! गिलकडून प्रेरणा घेऊन पंत, विहारी पण भरीव कामगिरी करतील अशी आशा आहे. शुभेच्छा.

बॉस! गिल "is a find!"

शुभमन गिल ईज फ्युचर >>>
शुभमन गिल ईज फ्युचर ' अशी आशा निर्माण करण्याइतपत >>> १००%

आज पंत खूपच अनुभवी फलंदाजासारखा खेळला. कमिनसचया एका षटकात 12 धांवा घेवूनही त्याची पुढची ओव्हर निर्धाव व त्यापुढच्या मधे फक्त 2 धांवा! विहारी व पंत दोघेही काळजीपूर्वक खेळत असूनही uneven bounceचे बळी झाले ! बचाव व आक्रमण यांचा सुरेख मिलाफ असलेली रहाणेची आदर्श नाबाद खेळी ! एकंदरीत, आजची आपली फलंदाजी एका अत्युततम गोलंदाजीविरूदध आश्वासक व देखणी होते आहे !

वा! आमच्या गाववाल्या कर्णधाराने शतक करुन डावात सरशी केलीच वर कांगारुना दडपणाखाली आणले! जडेजाची देखिल सुरेख साथ!!
अभिनंदन रहाणे अजिंक्य हो!

मी क्रिकेट जास्त फॉलोव करत नाही, पण आज रहाणेची खेळी बघून मनापासून आनंद झाला.
एक डिजरविंग candidate आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला. रहाणेला जो चान्स मिळायला हवा, तो जास्त कधी मिळाला नाही, आणि मिळाला तरी कायम दुर्दैवाने त्याचं चीज करता आलं नाही.
त्याची देहबोली आणि एकाग्रता बघता, दुसरा द्रविड होण्याचे चान्सेस जास्त होते, बट He is kind of unlucky....
आज त्याला खेळताना बघून आनंद होतोय. मेबी most remembered इनिंग्स असेल त्याची.

अज्ञातवासी, रहाणेला भरपुर वेळा संधी मिळाली आहे आणि त्याने स्वतला सिद्ध पण केले आहे. आणि त्याचे त्याला श्रेय ही मिळाले आहे. कोहली असताना तो उपकर्णधार तर कोहली नसताना कर्णधार आहे. अजून काय पाहिजे? कसोटी टीम मधून त्याला कधी काढलेला माझ्या तरी अठवणीत नाही.

रहाणे अतिशय छान खेळला आज, त्याला T20, ODI आणि टेस्ट सगळ्या प्रकारच्या फॉर्न्स मध्ये पूरेशी संधी मिळाली आहे. सध्या टेस्ट मधेच त्याची जागा फिक्स्ड आहे त्याच्या प्रदर्शनामुळे

रहाणे काल जबरदस्त खेळला. विहारी आणी पंत बरोबरच्या अर्धशतकी आणी जडेजाबरोबरची शतकी भागीदारी विशेष उल्लेखनीय होत्या. किंबहूना दोन्ही संघात आत्तापर्यंत ज्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या कॅचिंग आणी बॅटींग पार्टनरशिप्स. तिसर्या दिवशी भारतानं मोठा लीड घ्यावा.

Pages