Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*अर्थात लो-स्कोअरिंग मॅचेस
*अर्थात लो-स्कोअरिंग मॅचेस थरारक होतात.* - थरकांप उडवणारया पण होऊ शकतात, झालीच !!!
निदान, ऑसीजच्या विकेटस घेवून खेळपट्टीवर थोडा तरी दोष ढकलता आला तर पहावं, इतकीच किमान अपेक्षा !
स्टार्कला एकही विकेट नाहीं ! गरजही नवहती !!
'Edging' clearly edged us out !
पहिल्या कसोटीतील दारूण
पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर भारताला अजून एक धक्का, शमी चा हात fracture, series मधून बाहेर
नविन धागा काढा आता, म्हणजे
नविन धागा काढा आता, म्हणजे जिंकू
पराभवाचा मानसिक धक्का ओसरला
पराभवाचा मानसिक धक्का ओसरला असेल तर पुढच्या टेस्ट ची टींम बरीच इंटरेस्टींग होणार आहे त्याबद्दल बोलू शकतो.
इशान ला घाई न करता आधी न नेल्याचे स्पष्टीकरण पुढच्या इंग्लंड विरुद्धच्या दोन सिरीज साठी त्याला फिट ठेवणे हे होते असे वाचले. हे थोडे विचित्र आहे कारण पहिली सिरीज भारतात असल्यामूळे उमेश, सिराज, सैनी पैकी कोणिही बुम्राह , शमी बरोबर लोड शेअर करू शकले असते. दादा असताना ह्यावेळी एव्हढी ब्लंडर्स झाली आहेत कि आश्चर्य आहे.
गिल नि राहुल ह्यापैकी कोणाला ओअन करायला सांगून बळीचा बकरा बनवणार हे बघूया. साहा ची जागा पंत घेईल.
सिराज कि सैनी : तुम्हाला कोण आवडेल ? का ? सैनीला प्राधान्य दिले जावे असे वाटते. पहिला सामना हरल्यामूळे, कोहली नि शमी च्या अनुपस्थितीत आपण कॅचप करत राहणार हे उघड आहे. ऑसीज विरुद्ध आक्रमकता दाखवायची असेल तर राहाणे सारख्या सुप्त आक्रमक केप्तानाला सैनीसारखा विकेट टेकिंग बॉलर अधिक उपयुक्त ठरेल. (ठाकूर ला अआणून त्याचा विनय कुमार करू नये अशी अपेक्षा आहे)
माझ्या मते संघ असा असावा -
माझ्या मते संघ असा असावा - मयंक, गील, पुजारा, रहाणे, राहुल, पंत, जडेजा, अश्विन, बुमराह, उमेश, सिराज.
शमी नसल्याने बुमराह ला प्रभावीपणे वापरायचे असेल तर आपल्याला 5 गोलंदाज लागतील, आणि विहारी आणि जडेजा च्या फलंदाजीत फारसा फरक पडणार नाही, तसेच पंत आणि जडेजा डावखोरे फलंदाज असल्यामुळे त्यांच्या गोलंदाजांना थोडी line change करावी लागेल. पहिल्या सामन्यात सगळेच right handed होते,
*गिल नि राहुल ह्यापैकी कोणाला
*गिल नि राहुल ह्यापैकी कोणाला ओअन करायला सांगून बळीचा बकरा बनवणार हे बघूया* -
एक वेगळा विचार- अधिक अनुभवी फलंदाज उपलब्ध असूनही ( व सर्व, माझ्यासहीत, इथे व इतरत्र शाॅला सलामीला खेळवणयाबाबत कमालीचे साशंक असूनही ), शाॅलाच पहिल्या कसोटीत सलामीला खेळवणं जर संबंधित जाणकारांना उचित वाटलं असेल, तर त्यानी त्याच्यावरचा हा विश्वास केवळ दोन डांवातील अपयशाने कां डळमळूं द्यायचा? विशेषतः, बहुतेक सर्वच फलंदाजांचीही त्या दोन डांवातील कामगिरी खास वेगळी नव्हती, असं असतानाही शाॅलाच अपवादात्मक कां वागवायचं ? आणि, जर दुसराच कोण ' बळीचा बकरा 'च होणार असेल, तर मग शाॅलाच आणखी एक संधी देणंच सुसंगत होणार नाहीं का ?
मुळात शाॅला पहिल्या कसोटीत खेळवलंच नसतं तर वरील विचार उदभवलाच नसता . कारण, त्याच्या तंत्रातील उणीवा आधीच सर्वांनाच जाणवलया होत्या. But, despite this if selectors, captain, coach etc show faith in his capability, it is appropriate that they and Shaw get at least one more opportunity to justify that faith. विशेषतः, 1) शाॅ हा उदयोन्मुख स्पेशालिस्ट ओपनरच आहे व 2) खात्रीचा पर्याय उपलब्ध नाहीं, म्हणून !
जेव्हा एखाद्याची फलंदाजी
जेव्हा एखाद्याची फलंदाजी बघताना असे वाटत असते की हा सध्या धावा काढत नसला तरी कधीही फॉर्मात येऊ शकतो, दुर्दैवाने बाद होतोय, तेव्हा त्याला एक जास्त संधी दयायला हरकत नसते, पण शॉ ची सध्याची फलंदाजी आणि ऑस्ट्रेलिया चीगोलंदाजी बघता त्याला न खेळावणे च योग्य ठरेल, त्याच्यासाठी पण. फलंदाजी चा परिणाम त्याच्या क्षेत्ररक्षणावर पण होतोय तेव्हा त्याला विश्रांती देणेच योग्य ठरेल. त्या दिवशी बुमराह चा डिफेन्स त्याच्यापेक्षा बरा वाटत होता.
अॅडलेड सोडले तर पुढची सर्व
अॅडलेड सोडले तर पुढची सर्व पिचेस सपाट रस्ते असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सैनी किंवा सिराज ज्या कोणाचं पदार्पण होईल, त्याला बळी मिळणार नाहीत असंच वाटतंय. पिच पाहून निर्णय घ्यावा, वाटल्यास जाडेजाला आश्विनच्या जोडीने खेळवावे असं वाटतंय.
*पण शॉ ची सध्याची फलंदाजी आणि
*पण शॉ ची सध्याची फलंदाजी आणि ऑस्ट्रेलिया चीगोलंदाजी बघता त्याला न खेळावणे च योग्य ठरेल, त्याच्यासाठी * - कसोटीपूर्वीच सर्वांचंच व माझंही हेच मत होतं व मीं इथंही तें व्यक्त केलंय. पण असं असूनही जर शाॅला पहिल्या कसोटीत खेळवलं असेल, तर मात्र त्याला आतां वगळण्यापूर्वी हा वेगळा विचार देखील माझ्या मतें महत्वाचा ठरावा.
तेंडल्याच्या पहिल्या ८
तेंडल्याच्या पहिल्या ८ कसोट्यांमध्ये १२ डावांत ३ अर्धशतकं होती. ९वी कसोटी मँचेस्टर शतक. त्यानंतर पुन्हा ६ डावांत एकही अर्धशतक नाही. आणि मग 'ती' १९९२ ऑस्ट्रेलिया टूर. सध्याच्या भारतीय फॅन्सच्या हातात असतं (कदाचित माझ्याही) तर तो इतकं खेळलाच नसता कधी.
पृथ्वी शॉचं एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत. फेब्रुवारीमध्ये त्याने न्यूझीलंडविरूद्ध अर्धशतक केलं होतं. त्याच्याबद्दल जे सारखं बोललं जातंय 'पुढचा तेंडुलकर' वगैरे त्यामुळे आपली प्रतिक्रिया इतकी टोकाची होत असावी का? त्याच्यावर विश्वास टाकून पुढच्या दहा वर्षांसाठी एक सेट ओपनर आपल्याला मिळणार असेल, तर ते स्वीकारार्ह आहे. ह्या मालिकेतली पुढची पिचेस इतकीही कठीण असणार नाहीत असं मला वाटतंय. त्यामुळे त्याला आधी विरोध करूनही मी ठेवावं ह्या मताचा आहे.
पण शॉ ची सध्याची फलंदाजी आणि
पण शॉ ची सध्याची फलंदाजी आणि ऑस्ट्रेलिया चीगोलंदाजी बघता त्याला न खेळावणे च योग्य ठरेल, त्याच्यासाठी पण. >> +१. मी आधीही एक वेळ साहा पण चालेल पण शॉ, राहुल नि गिल ह्यापैकी कोणीही टिकाऊ ओपनर वाटत टिकाऊ असे म्हटले होते. दुर्दैवाने शॉ ने ते खरे ठरवले. शॉ तडाखेबंद खेळतो म्हणून सेहवाग सारखा ईफेक्टीव्ह ठरू शकेल हे पटते पण भारताबाहेर तो कितीसा खेळेल हे त्याच्या शैलीमूळे मला तरी कळत नाहीये .
भा, सुरूवातीला ही तेंडूलकर कधी 'हा आत्ता जाईल कि मग' असा खेळलेला मला तरी पटकन आठवत नाही.
असामीजी, मीं पुन्हा नम्रपणे
असामीजी, मीं पुन्हा नम्रपणे सांगतो कीं माझंही मत तुम्ही म्हणता तेंच होतं, पण तें शाॅला पहिल्या कसोटीत खेळवण्या पूर्वी. शाॅच्या खेळातील उणीवा संबंधित निवड करणारयानाही जाणवल्या असतीलच पण त्याना त्याचा खेळ जवळून अभ्यासणयाची व त्याच्याशी त्या संदर्भात बोलण्याचीही संधी असते. त्या आधारे जर त्यानी पहिल्या कसोटीत शाॅला खेळवलं, तर तो धोरणात्मक निर्णय होतो - संघाला दीर्घकालीन, भरवशाचा स्पेशालिस्ट सलामीचा फलंदाज मिळवून देण्याचा. आणि असे धोरणात्मक निर्णय राबवताना 'श्रद्धा व सबूरी ' बाळगणं अपरिहार्य आहे. केवळ म्हणूनच मला हा वेगळा विचार मांडावासा वाटलं.
मला आठवतं कीं श्रीलंकेचा अट्टापटटू हा फलंदाजही पहिले दोन हंगाम सतत अपयशी ठरत असूनही त्यांच्या निवडसमितीने स्वत:वरील व त्याच्यावरील विश्वास अढळ ठेवला व तो सार्थही ठरला होता ! शाॅच्या बाबतीतही तो सार्थ ठरेलच अशी गॅरंटी नसली तरी तो तसा ठरावा असा प्रयत्न करणं आतां गरजेचं व हितावह आहे , हा विचार तथ्यहीन समजता येणार नाहीं.
शॉच्या बाबतीतही अगदी आता जाईल
शॉच्या बाबतीतही अगदी आता जाईल की मग असं आहे का ह्याविषयी मी साशंक आहे. अॅडलेडमध्ये कोहली रनआऊट नंतर एकंदरीतच जी पडझड झाली ते पाहता त्याचा एकट्याचा दोष नाही. त्याला मेलबोर्न पिचवर जास्त चांगली मदत मिळेल, असं मला वाटतं.
शॉ ऐवजी मला नेलं असतं तर मी
शॉ ऐवजी मला नेलं असतं तर मी नक्कीच 15-20 धावा काढल्या असत्या आणि तो झेल पण घेतला असता. त्यानिमित्ताने माझी ऑस्ट्रेलिया ट्रिप झाली असती आणि माझ्या दुवा भारतीय संघाला लाभल्या असत्या.
श्रीलंकेचा अट्टापटटू हा
श्रीलंकेचा अट्टापटटू हा फलंदाजही पहिले दोन हंगाम सतत अपयशी ठरत असूनही त्यांच्या निवडसमितीने स्वत:वरील व त्याच्यावरील विश्वास अढळ ठेवला
>> आटापट्टूला सलग चान्सेस मिळाले नव्हते, रादर त्याची स्टोरी फार कमाल आहे:
आटापट्टूनी पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात अंडी घातली, त्याला टीम मधून काढला. मग डोमेस्टिक सर्किटमधे परत जाऊन त्यानी खोर्यानी धावा केल्या. परिणामी २१ महिन्यांनंतर त्याला परत एक चान्स मिळाला.
यावेळीही पहिल्या डावात शून्य अन दुसर्या डावात १ धाव काढली. परत डोमेस्टिक, परत भरपूर रन्स आणि ७ महिन्यांनी तिसरा चान्स.
यावेळीही दोन्ही डावात अंडी.
परत हार्डवर्क, डोमेस्टिक लेव्हलला भरमसाठ रन्स आणि ३ वर्षांनंतर अजून एकदा चान्स मिळाला... अन या खेपेला त्यानी रन्स केल्या...
जरी दुसरी रन घ्यायला त्याला सहा वर्ष लागली, तरी त्या पुढे आटापट्टूनी १६ शतकं (६ द्विशतकं) केली...
जॅकीजी, तपशीलवार माहितीबद्दल
जॅकीजी, तपशीलवार माहितीबद्दल धन्यवाद. मला फक्त त्याचं सुरवातीचं दीर्घ काळ सततचं अपयश व तरीही त्याला संधी देण्याचं धोरण व त्याचा सुखद परिणाम, एवढंच आठवत होतं.
आत्तांच आकाश चोप्राचा एक लेख
आत्तांच आकाश चोप्राचा एक लेख वाचला. शाॅच्या खेळातील उणीवा अधोरेखित करूनही तो शाॅला खेळवलं जावं याच मताचा आहे. त्याचं त्याने दिलेलं कारण - त्या उणीवा सुधारत किंवा त्या उणीवांवर मात करतही यशस्वी फलंदाज होण्याची प्रतिभा शाॅकडे आहे, हें त्याच्या कसोटी पातळीवरच्या कांहीं खेळींवरून निर्विवाद स्पष्ट होतं.
मी ही तो लेख वाचला पण त्याचा
मी ही तो लेख वाचला पण त्याचा मतितार्थ तुम्ही काढला तसा मला जाणवला नाही तर त्याला अजून संधी देण्याची गरज आहे ( आत्त्ता, अत्त्ता नसेल तर नंतर) असा मी काढला. त्याचे दोष तो धावा काढताना पण होते हे लक्षात ठेवण्याची गरज आहे असे चोप्राचे म्हणणे पण मुख्य प्रश्न त्याने अनुत्तरीतच ठेवला आहे कि " आत्ताच हे दोष इतके का उघडे पडत आहेत. ऑस्त्रेलिया किंवा किवी दौरा सोडून द्या, आयपील मधेही तो असाच बाद होत होता." मला व्यक्तिशः चोप्रा काही स्पष्टीकरण देईल असे वाटले होते. धोरणात्मक निर्णय समजू शकतो फक्त खेळाडू शून्य आत्मविश्वासाने खेळत असताना खेळाडू बद्दल धोरण मह्त्वाचे कि संघाबद्दलचे (अर्थात त्यातही खेळाडू आलाच) हे ठरवणे जरुरी ठरेल. कळेलच संघाचे एकंदर धोरण कुठल्या दिशेने जातेय ते.
असामीजी, शाॅच्या बाबतीत
असामीजी, शाॅच्या बाबतीत दोन्ही बाजूनी विचार होऊं शकतो व दोन्ही प्रकारे घेतलेला निर्णय चूक/ बरोबर होवूं शकतो. मला फक्त या प्रश्नाला शाॅवर काट मारण्या व्यतिरीक्त दुसरी बाजूही आहे व तीही बरोबर असूं शकते, इतकंच अधोरेखीत करायचं होतं. शेवटीं, आपण म्हणतां तसंच - ' कळेलच संघाचे एकंदर धोरण कुठल्या दिशेने जातेय ते.'
भाऊ मलाही चॉप अँड वॉच
भाऊ मलाही चॉप अँड वॉच स्ट्रॅटेजी फारशी आवडत नाही पण रोहित नि शॉ मधे रोहित ला मी प्रीफरन्स देऊ इच्छीन. जरी तो नि शॉ दोघांच्याही तंत्रात सारख्याच उणिवा आहेत तरी तो जास्त मॅच्युअर वाटतो व त्याला लिमिटेड ओव्हर चा का होईना पण भारताबाहेर ओपन करायचा अनुभव आहे. जेणे करून शॉ ला त्याच्या उणिवा दूर करायला ब्रेक मिळेल . अर्थात रोहित चौथ्या सामन्या पर्यंत नसेल ह्याची मला जाणीव आहे.
मला वाटते शॉ ला ब्रेक देत
मला वाटते शॉ ला ब्रेक देत रोहीत शर्मा येण्याआधी शुभमन गिल आणि राहुल दोघांना आजमवावे.
सोबत विहारीला सुद्धा आराम द्यावा आणि जडेजाला ऑलराऊंडर / पाचवा गोलंदाज म्हणून खेळवावे. फलंदाजीत वाढलेला कमालीचा आत्मविश्वास तसेच कदाचित चौथ्या डावात गोलंदाजी उपयोगी ठरेल. आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा ऊंचावेल ज्याची फार गरज आहे.
तसेच जडेजाला आत घेताना मुख्य फलंदाजाला बसवावे लागत असल्याने साहा ऐवजी पंतचा विचार करू शकतो.
मला असा संघ बघायला आवडेल,
मयंक अग्रवाल
शुभमन गिल
पुजारा
राहुल
रहाणे
पंत
जडेजा
आश्विन
उमेश यादव
बुमराह
सिराज / सैनी
मला असा संघ बघायला आवडेल,
मला असा संघ बघायला आवडेल,
मयंक अग्रवाल
राहुल
पुजारा
रहाणे
शुभमन गिल
पंत
आश्विन
जडेजा
उमेश यादव
बुमराह
सैनी
जें शाॅच्या बाबतीत तेंच
जें शाॅच्या बाबतीत तेंच विहारीच्या ! त्याला पहिल्या कसोटीत घेतानाच करायचा विचार आतां करून त्याच्यावर अन्याय तर होतोच पण कुणालाही संधी द्याल त्याच्याही मनात शंकेची पाल चुकचुकत रहाते. सलामीला शाॅला बदललाच तर मलां राहूल हा पर्याय योग्य वाटतो. बाकी, शामी ऐवजी सैनी/ सिराज याशिवाय कोणताही बदल आत्ता तरी करूं नये असं मला वाटतं.
( ॲडेलेडची विकेट वैशिष्ट्यपूर्ण होती, सामना पहिलाच व दिवस- रात्र होता, चेंडूही वेगळा होता . तिथल्या सामन्यात घेवून लगेच एखाद्या खेळाडूला डचचू देणं म्हणजे त्याला मुददाम बकरा बनवल्यासारखंही वाटूं शकतं !)
राहुल बाहेर ओपनर म्हणून फ्लॉप
राहुल बाहेर ओपनर म्हणून फ्लॉप आहे. लिमिटेड हा त्याचा प्रांत आहे तिथेही वनडेमध्ये त्याला मागे खेळवला. मग पुन्हा तोच बकरा का निवडा. शुभमन गिल सोबत एकदा जाऊन बघणे चांगले असे मला वाटते. राहुल कदाचित पुनरागमनाच्या आणि आधी फ्लॉप गेलेल्या जागेवर स्वताला प्रूव्ह करायच्या प्रेशरमध्ये खेळेल असे वाटते. तिथे कोरी पाटी असलेला शुभमन गिल याला एक संधी म्हणून बघत आपला ठसा उमटवायला खेळेल. आता मी शॉ पेक्षा काय वाईट करणार ईतका विचार जरी आदल्या रात्री केला तरी मस्त झोप लागेल त्याला
राहुल विकेटकीपर आहे धोनी चा
राहुल विकेटकीपर आहे धोनी चा रिप्लेसमेंट नाही.. उगाच त्याला धोनीच्या जागेवर का खेळवतायत...
आजचा व्ही व्ही एस लक्ष्मणचा
आजचा व्ही व्ही एस लक्ष्मणचा संदेश खूप भावला ! भारताच्या 36 धांवांच्या विक्रमाने व्यथित होवूनही तो सकारात्मक गोष्टींवरच भर देतो - 1- सामन्यात बवहंशी भारताचं वर्चस्व होतं 2- भारताने पूर्वीही दारूण पराभवानंतर जोरदार विजयी मुसंडी मारलीय व 3 - मालिकेचा आत्ताच फक्त 1/4 भागच तर झाला आहे ! Coming from great VVSL, this should inspire the team and lift our spirits also !
1- सामन्यात बवहंशी भारताचं
1- सामन्यात बवहंशी भारताचं वर्चस्व होतं
>>>>
+७८६
त्या दिवशी रात्री मी हेच म्हणालेलो की आता लोकं हे सोयीस्कर विसरतील. पण निदान त्या खेळाडूंनी तरी हे विसरायला नको की पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर लीड घेतला होता. म्हणजे दोन इनिंगच्या सामन्यात आपण एक ईनिंग जिंकलो होतो. तेच पुन्हा घडवायचे आहे. ईतकाच विचार करून मैदानावर ऊतरायचे आहे.
*तेच पुन्हा घडवायचे आहे.
*तेच पुन्हा घडवायचे आहे. ईतकाच विचार करून मैदानावर ऊतरायचे आहे.*-
आमेन !!
भारतीय संघाला शुभेच्छा !
भारतीय संघाला शुभेच्छा !
तुला ' मराठी पाऊल पडते पुढे ' म्हणायचंच असेल तर कृपया ' रहाणे , मराठी लेग बिफोर विकेट ' तरी नको म्हणूं ना !
भारतीय संघ जाहीर
भारतीय संघ जाहीर
1 मयंक
2 गील
3 पुजारा
4 विहारी
5 रहाणे
6 पंत
7 जडेजा
8 अश्विन
9 बुमराह
10 उमेश
11 सिराज
Pages