Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो नाहीतर काय. सात
हो नाहीतर काय. सात आठ माणसांसाठी केवढा स्वयंपाक करावा लागेल आणि हे बसतात छोटीशी कढई घेऊन. कॉफी आणि चहा वरच दिवस काढत असतील.
हे बसतात छोटीशी कढई घेऊन.>>>
हे बसतात छोटीशी कढई घेऊन.>>> अरूंधती प्रत्येकासाठी वेगळा नाष्टा करते( तरीही नेहमी पोहेच दिसतात) तसे २-३ छोट्या कढईत २-३ प्रकारच्या भाज्या करत असेल.
हो नेहेमी पोहेच असतात. भाज्या
हो नेहेमी पोहेच असतात. भाज्या आणि नाश्ता करत असेल वेगवेगळ्या प्रकारचा पण आग्रह तर असा करतात जसा अक्खा गाव जेवायला आला तरी ह्यांना काही स्वयंपाक कमी पडणार नाही. मागे अरुंधतीने भाकऱ्याही किती कमी केल्या होत्या.
मधल्या मध्ये ईशाची मजा.
संजना बदला घेण्यासाठी ईशाचा वाढदिवस साजरा करणार पण पैसे तर संजनाचेच खर्च होणार ना. हा कसला बदला
ईशाच्या गूडबूक मधे जायला हे
ईशाच्या गूडबूक मधे जायला हे प्रयत्न. पण ते पैशाचे गणित काही जूळून येत नाही.
ॲानलाईन शिकवण्या सुरू केल्यावर लगेच अरू विमलचा पगार देते. मग लगेच दिवाळी बोनस, घरच्यांना भेटवस्तू देते.
काल परवा घर नाही म्हणून अनिरूद्ध गाडी झोपला होता. ४ दिवस हॅाटेल मधे आरामात राहू शकला असता.
कालच संजना पैशावरून भांडली नी आज गुपचुप पार्टीचे पेमेंट करून मोकळी...... यांच्याकडे नक्की पैसा आहे का नाही ते कळत नाही. असेल म्हणावा तर त्यावरून भांडण दाखवतात आणि नसेल म्हणावा तर ही उधळपट्टी.
अरे वा असे चालू आहे काय. मी
अरे वा असे चालू आहे काय. मी पळवत पळवत पाहिले ते दोन एपिसोड. लग्नातच कळते अरुंधतीला. तेव्हा तिचे शालू शेला मस्त आहे. हैद्राबादी
सातलड्या सारखे कोल्हापुरी साजाचे केले आहे गळ्यातले ते लैच भारी आहे. झुबे कानातले व इतर दागिने पण फर्स्ट क्लास. आता पळवत पुढे बघते. ती भोचक जाउ पण एकदम इरिटे टिंग म्हणजे मस्त काम करत आहे. त्या नौवारी नेसलेल्या मैत्रीणीचे दागिने पण भारी आहेत. साड्या मस्त सर्वांच्या.
आता एकदम मेजर क्राय सिस अनफोल्ड होण्याचे म्युज्जिक मारले आहे. महिन्या महिन्याचा लीप घेउन बघितले पाहिजे. सर्व पात्रे आधि रिअॅक्षन शॉट देउन मग पुढे अॅक्षन घेतात.
अमा.. तुम्ही खुपच मागे आहात
अमा..
तुम्ही खुपच मागे आहात..... या पळवत पळवत आमच्या सोबत!
लग्नात खरंच कपडे व दागिने छान होते..पण आम्ही ... आता हिला कळेल मग कळेल... या टेंशन मधे होतो म्हणून नीट लक्ष दिले नाही!
चंपा म्हणते ते खरंच आहे..... एव्हढेसे पिवळेधमक पोहे ताटलीत पसरुन देतात..खूप दिसायला!
आणि कमी स्वयंपाकाचे जास्त वर्णन करतात................ !
मागे एकदा शेपूची भाजी केली
मागे एकदा शेपूची भाजी केली होती अरुने.. पण साधी हिरवी भाजी पण नाही दाखवली ताटात.
चंपा बहुतेक तुमचे अरुने ऐकले
चंपा बहुतेक तुमचे अरुने ऐकले असेल म्हणून ती विमल ला म्हणाली असेल .. की किती कमी कोथिंबीर घातली आहेस पोह्यात..
किती ते बारिक लक्ष माबोकरान्च
किती ते बारिक लक्ष माबोकरान्च!
ईशाला माहिती असते ना घरचे
ईशाला माहिती असते ना घरचे तिच्या वाढदिवसाची तयारी करताहेत ते. किती तो स्वार्थीपणा. तिला आधीपासून संजनाच आवडत असते नाहीतरी.
मिलिंद गवळी फारच बारीक झाला आहे. थोडे गाल वर आले तर चांगला दिसेल.
अरुंधती म्हणजे मधुराणी प्रत्यक्षातही गाणे शिकते आणि क्राफ्ट वगैरे पण करते. तिचा व्हिडीओ बघितला यूट्यूबवर.
अनघा कामावर कधी जाते. बघावं तेव्हा बागेत किंवा अरुंधतीबरोबर असते. विशाखाला एकदा सह्याद्री वाहिनीवर पाहिलं.
मधुराणी गोखले आणि तिची बहिण
मधुराणी गोखले आणि तिची बहिण दोघी गायिका आहेत. बहीण झी सारेगमप मध्ये होती. तेव्हा मधुराणी आणि तिचा नवरा इ tv वर लग्न जुळवायचा prgm करत होते. मी बघायचे तो. तेव्हा एकदा दोघे सारेगमप मध्ये ऑडीयन्स म्हणून आलेले.
मिलिंद गवळी अगदीच हाडकुळा वाटतो, त्याने आणि production house ने हाडकुळा दिसणे म्हणजे यंग दिसणे असा समज करून घेतलेला दिसतोय.
त्याला सध्या ब्रेड बटर आहे ना
त्याला सध्या ब्रेड बटर आहे ना फक्त. घरचं जेवण मिळत नाहीये म्हणून असेल.
सध्या नाही आधीपासूनच तसा
सध्या नाही आधीपासूनच तसा वाटतो. मी प्रोमोज बघते channel fb वर. जयदीप गौरी मालिका बघायचे तेव्हा tv वर बघायचे प्रोमोज. सध्या तिथे बोअर कथानक आहे म्हणून ती सिरीयल बघत नाहीये.
रुपाली भोसले मस्त दिसते ,
रुपाली भोसले मस्त दिसते , वॉर्डरोब छान आहे तिचा, दिवाळीतली साडी आणि ऑक्सीडाइज कोल्हापुरी साज छान दिसत होते. तिचा एक ब्ल्यु व्हाइट कॉम्बो ड्रेस पण मस्त आहे.
किती ते बारिक लक्ष माबोकरान्च
किती ते बारिक लक्ष माबोकरान्च!

रुपाली भोसलेच्या बिगबॉसमध्ये
रुपाली भोसलेच्या बिगबॉसमध्ये तयार झालेल्या इमेजचा या भुमिकेला थोडाफार फायदा झालेला असू शकतो!
काम चांगलेच करतेय ती!
प्राजक्ता मलाहि तिचा
प्राजक्ता मलाहि तिचा ऑक्सिडाईस सेट फार आवडला आणि तिची ग्रे विथ यल्लो साडी पण.. हेअर कट पण मस्त आहे..
अहो भरत हिंदी आणि मराठी
अहो भरत हिंदी आणि मराठी मालिका मध्ये सध्या नवीन फॅशन काय आहे..हेच बघण्यात येते.. मी तर तेच बघते.. आणि स्टोरी वैगैरे मला वाचायला जास्त आवडते..
सध्या देविका गायब झालिये.
सध्या देविका गायब झालिये. अनिरुद्धची चांगलीच पंचाइत झालिये. घरच नाहिये आता.
सध्या देविका गायब झालिये.
सध्या देविका गायब झालिये. अनिरुद्धची चांगलीच पंचाइत झालिये. घरच नाहिये आता. >>>>>>> हो ना. आधी तो अरुची अक्कल काढायचा, आता सन्जनाची अक्कल काढतोय.
हो ना. आधी तो अरुची अक्कल
हो ना. आधी तो अरुची अक्कल काढायचा, आता सन्जनाची अक्कल काढतोय.>> सारख मी माझ, माझ घर्,माझा कम्फर्ट्,माझी पोझिशन. इतक्या सेल्फिश माणसाच्या प्रेमात ती सन्जना तरी कशी पडली काय माहिती?!
(आजचे रुपालीचे चान्दबाली इयरिन्ग्स आणि ड्रेस दोन्ही मस्त!)
(आजचे रुपालीचे चान्दबाली
(आजचे रुपालीचे चान्दबाली इयरिन्ग्स आणि ड्रेस दोन्ही मस्त!) >> हो अगदी. तिचा वॉर्डरोब छानच आहे.
अनिरुद्धला फक्त त्याच म्हणणं बरोबर आहे अस वाटत, आणि सगळ्यांनी तसच मान्य कराव अस वाटत. संजनाच बोलण पण बर्याचदा तो ऐकुन घेत नाही.
एक परवाचा तो मॉव्ह रंगाचा
एक परवाचा तो मॉव्ह रंगाचा ड्रेस व कानातले पण सुरेख होते संजनाचे. पण ती किती ओरडून बोलते. मला शेखरचे काम पण आव डते.
शेखर झालेला उत्तम अभिनेता
शेखर झालेला उत्तम अभिनेता आहे, सहज करतो. त्याने कुठल्यातरी सिरीयलमधे जबरी व्हिलन केलेला. आठवलं नाव 'गंध फुलांचा गेला सांगून'.
दूर्दर्शन वर एका मुलाखतीत
दूर्दर्शन वर एका मुलाखतीत मिलिन्द गवळी छान दिसत होता. ५०/५२ वयाचा असेल. अजुनही चांग्लाच दिस्तो पण बारिक झालाय खूपच . अभिनय चांग्ला आहे पण संवादफेक सफाइदार वाटत नाही. ( महेता असा उच्चार कर्तो तेव्हा फारच जाणवत ) .
आज पहिल्या भागा पासुन सुरुवात
आज पहिल्या भागा पासुन सुरुवात केलेली आहे. अरुंधती फार सुरेख दिसते. पण सासू पेन फुल आहे. अरु ला ताब्यात ठेवायचे लक्ष्य आहे ते अगदी कळून येते. जुनी संजना जास्त चांगली अॅक्ट्रेस आहे. नवी दिसायला एकदम फटाका आहे. पण मानबा पेक्षा ओव्हर ऑल ही मालिका फारच सुपिरीअर आहे. बघायला मजा येते.
जुनी संजना जास्त चांगली अ
जुनी संजना जास्त चांगली अॅक्ट्रेस आहे. >>हो,छानच आहे दिपाली पानसरे. तिचा wardrobe आणि accessories पण मस्त होत्या.
अमा
अमा
सगळ्याच सासवा पेन फुल असतातच की....... त्यात काय नवीन?
नवी संजना मस्तच आहे दिसायला.
नवी संजना मस्तच आहे दिसायला. मेकअप वॉर्डरोब सगळंच छान आहे. अभिनय पण बर्यापैकी करतेय.
यशने आज जरा अतीच केलय. ती
यशने आज जरा अतीच केलय. ती सन्जना तिकडे क्लायण्ट मिटिन्गसाठी आली होती, ह्याने तिकडे तमाशा करायची गरज नव्हती. सगळा दोष तिलाच दिला, वडिलान्ना का नाही?
अरु पण तशीच, 'हे माझ्याशी असे वागले तरीही मला त्यान्ना शिव्याशाप दयाव्याशा वाटत नाही, ते कुठेही असले तरी सुखी राहावेत, त्यान्ची तब्येत ठीक असावी' अस म्हणतेय.
Pages