आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अनघा आवडली पार्टीमध्येही! खादाड जावेची कालची साडी पण छान होती. त्या मानाने अरुन्धती च्या साड्या आवडत नाहीत. पण अभिनय आणि संवाद्फेक मात्र उत्तम!

ह्यातल्या सासूचं तरुणपण बघायचं असेल तर z टॉकीज बघा. वळू नावाचं पात्र आहे, आम्ही दोघं राजा राणी म्हणून चित्रपट आहे.

त्यात त्यांचं नाव वळू आहे Uhoh तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. त्या अनेक चित्रपटात होत्या, आत्मविश्वास सगळ्यात हिट असेल.
अंकिता प्रेम, poisan,पंगा मध्ये होती का.

मी कालच एक सिनेमा पाहिला थोडासा टी व्ही वर . त्यात तीन सुना म्हणजे अर्चना पाट्कर, अल्का कुबल, निवेदिता जोशी, त्यान्चे नवरे म्हणून दिलीप प्रभावळकर,अविनाश खर्शीकर, रमेश भाटकर, सासरे म्हणून सुधीर जोशी, शिवाय अरुणा इराणी, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे इत्के सगळे होते एकाच सिनेमात !!

तो विनोदी चित्रपट आहे. तीन मुलं, तीन सुना, सासरे. अरुणा इराणी शेजारी राहते. चांगला आहे एकदा बघायला.

धन्यवाद भरत. मराठीचेपण नाव सांगा. ८-१० महिन्यात मराठी सिनेमा पाहिला नाहीये. हा आज पाहील मिळाला तर.

Ahh.. thats nice. ..these people should upscale old movies to HD quality like bollywood & tollywood.

अनिरुदला चालताही येत नाही आणि त्याला पहिल्या मजल्यावर घेऊन गेले, घरात लिफ्ट आहे का Proud तसा तो इतका बारीक आहे की अरु किंवा संजनाने एक धक्का दिला तर खाली पडेल. अनिरुद्ध स्वार्थीच आहे अगदी. शेखर मला फार आवडतो, त्याचे संवाद मस्त असतात. फ्रॅकचर बंड्या Rofl
अनुपमा मधला अनिरुद्ध देखणा आहे पण ती अनुपमा अगदीच बंडल वाटते.

येस शेखर कमाल आयटम आहे. मागे पण एकदा 'झुरतो हॉटेलात' असं काहीतरी गाणं म्हणत होता Lol टाईमिंग भारीये त्याचं. काल बर्याच दिवसांनी दिसला.

आता अनिरुद्ध अरुन्धतीला पुन्हा पटवण्याचा प्रयत्न करणार आणि संजनालाही लटकत ठेवणार. त्याशिवाय मालिकेत नवीन काही ट्विस्ट दृष्टीपथात दिसत नाहीये.

फ्रॅक्चर बंड्या Lol
आता अनिरुद्ध अरुन्धतीला पुन्हा पटवण्याचा प्रयत्न करणार आणि संजनालाही लटकत ठेवणार. >> हो. त्याच्या जोडीला त्याची आई आहेच.

ती का करते त्याचं, त्याची आई करेल की, मुलगीपण करेल.> होना. त्याची आई आणि मुलगी नको तेव्हा पुढे-पुढे करत असतात आणि कामाच्या वेळी गायब. त्यातून अरूंधतीला वाईटपणा घेता येत नाही. प्रत्येकाचे करणे आपले कर्तव्य आहे असे तिला वाटते. मग चेहरा पाडून कामे करत बसते.

तो अनिरुद्ध सं ज ना भां ड् णाचा सीन मस्त रंगवला दोन्ही अ‍ॅक्टर नी. त्यानंतर अपघात होतो ते अगदीच नॉर्मल वाटते. आता सासू इन चार्ज झाली!!!

प्रत्येकाचे करणे आपले कर्तव्य आहे असे तिला वाटते. मग चेहरा पाडून कामे करत बसते. > हो. पण तरीही काल च्या भागात सासूला ठामपणे काही गोष्टी सांगते ते आवडले. चांगली आहे मुळातच पण बावळट नाहीये आता असे वाटले. आरडा-ओरडा न करता पण ठामपणा दाखवता येतो हे फार आवडलेय. राधाक्का च्या सिरियल प्रमाणेच चालु आहे कथानक, पण बालिश बटबटीत पणा टाळला आहे. आपण कुठल्या परिस्थितीत आहोत याचे गांभीर्य इथे बायकोने जपले आहे.

आज सासू सुनेचे चांगले खडाजंगी झाले. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू झालेत. एवढं सगळं होऊनही आता आईच चुकीची ठरतेय. मला वाटलं आता सगळं नीट होईल आणि संपतेय की काय पण ये रे माझ्या मागल्या. चांगल्या सिरीयलची माती करायचीच असा रुल आहे का Uhoh

अनिरुद्धला माफ केले तर चुकीचा संदेश जाईल असं भासवून पाणी ओतणे सुरु आहे. अरुंधतीने संजनाला स्पष्ट सांगितले की तिला आता अनिरुद्ध मध्ये काही रस नाही तरी संजनाला असे वाटते की ती अनिरुद्धच्या प्रेमात पडेल हे हास्यास्पद आहे. आता अनिरुद्ध आणि ईशा या दोघांचेही नाशत्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत हाल होतील आणि ईशा परत येईल.
संजना टवका दिसते. उत्तम कपडेपट आणि कानातले. अनघा संक्रांतीपासून छान दिसतेय. काळ्या कपड्यात सगळेच छान दिसत होते कांचन सोडून. कांचन पूजेला छान दिसत होत्या. अप्पाना नवीन कुर्ते दिले आहेत. यश किती असमंजस वागतो गौरीशी, म्हणे काही झालं तरी वडील आहेत, मग काही झालं तरी संजना तिची मावशी नाही का. अनिरुद्धच्या पॅन्ट तोकडया का असतात.
अनुपमाचा एक भाग बघितला लग्नाच्या दिवशी अनुपमाला त्यांच्या अफेर बद्दल कळते. कयू की सास भी कभी बहू थी बघतेय असे वाटत होते. तिथे सगळी पोरं दिसायला सुंदर आणि झकपक आहेत. वयाने मोठीपण वाटतात. संजना तिथे काव्या आहे, ती अगदीच लहान मुलीसारखी दिसते. त्यांच्या प्रकरणाला तिथे आठ वर्ष झाली आहेत तर इथे बारा. अनिरुद्धचे नाव वनराज आहे आणि शेखरचे अनिरुद्ध. वनराज नाव ऐकले की मला हम दिल दे चुके सनम आठवतो. अनुपमा लग्नाच्या दिवशी त्यांच्या खोलीकडे जात असताना मध्येच बहुतेक मोलकरीण येते आणि सांगते की सगळं दूध फाटलंय, मग अनुपमा पनीर बनवायला स्वतः जायला लागते पण देविका सांगते की पनीरचं त्या बघतील Uhoh एकंदर मराठीत मालिका बरीच साधी आणि सुसह्य आहे.

आजचा सासू-सून संवाद चांगला होता
घरंदाज बायका असलं काही करत नाहीत वगैरे सासू च्या बोलण्यावर अरुने बरेच प्रश्न केले

मालिका चांगली सुरू आहे. अगदी रोखठोक.
ईबाळ घर सोडून बाबांकडे गेलंय, स्वत:ची कामे स्वत: करायला लागतील तेव्हा कंटाळून परत घरी येईल.
नवऱ्यापेक्षा सासू जास्त त्रासदायक आहे. तिलाच आधी घटकस्फोट द्यायला हवा. अरू घर सोडायचा विचार करते पण सासरा जाऊ देत नाही.

हो ना,सासरा अरु ला मुलगी म्हणतो,तिच्या बाजूने ठाम पणे उभा ही राहतो,पण बायको ला एकदाच नीट समजावून सांगत नाही,ना ती अरु ला सतत दोष देते तेव्हा थांबवत नाही

सासुचा मेकप तिला अजिबात शोभत नाही, जिथे तिथे स्वतः मिरवुन घेते आणि सुनेला मात्र प्रत्येकवेळेस दोष देत राहते.
आता अनिरुद्ध आणि ईशा या दोघांचेही नाशत्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत हाल होतील आणि ईशा परत येईल>> अगदी अगदी! बर झाल अरुने थाबवल नाही ते. इ बाळ दहावितल वाटत नाही पण अगदी मोठीही नाही वाटत.
अनिरुद्ध ला फार हावभाव दाखवता येत नाही, नुसताच चिडलेला किवा कुत्सित हसणारा चेहरा घेवुन फिरतो.

Happy मला तर इश चांगली दोन लेकरांची आई वाटते...! बिलकुल अल्लड लहान नाही वाटत.
अरुंधती ची सासू headache आहे! फडफड बोलते सारखी....पण मला डायलॉग फार आवडत आहेत....सुंदर आणि समर्पक!
त्या 'काहे दिया परदेस' मधल्या सारखे नाहीत..."माझ्या प्रेमाच्या झाडावर गौरीचा पक्षी येऊन बसलाय ना....!" सारखे.... Happy
तिन्ही मुलं अगदीच चपट्या नाकाची का निवडली आहेत नकळे !
अरुंधती ची अगदी कसोटी आहे...पण पाणी घालून वाढवू नका म्हणा प्लीज..
त्यापेक्षा तिने काय यश मिळवलं कुठे नोकरी करते ते जरा सविस्तर दाखवावं.....

मला पण सर्व संवाद लेखन फार आवडले. अरुंधती आपली बाजू फार व्यवस्थित मांडते आहे दर वेळी. पण घर वाले घनचक्कर आहेत व तिचे इमोशनल ब्लॅक मेल करत आहेत. म्हणजे असा विचार केलातर अरुची परिस्थिती - अरुस्थिती वाइट च आहे.

- नवर्‍याचे वागणे चूक आहे च. पण तो तिला उगीच खोट्या आशा दाख्वतो आहे. त्याच्या बद्दलचे पूर्वी असलेले शारिरिक मानसिक आक र्षण ह्याचे दमन करावे लागते आहे.

- सासू आजिब्बातच समजून घेत नाही व विचित्र अपेक्षा ठेवते. १८५७ मधल्या.

- सास र्‍यांचे धोरण बोटचेपे आहे. बायको चुकते ते तिला खडसावून सांगत नाहीत व सून घर सोडून स्वतःचे जीवन जगू बघते तर तिला मी इमोशनली ब्लॅक मेल करून जाउ देत नाहीत.

- इशा बंडल आहे व मुलग्यांना आता काहीच फरक पडत नाही ते वेगळे झालेच आहेत मनाने. मग ही घरी फक्त स्वयंपाक कराय्ला आहे का? असा प्रश्न पडतो.

- संजना इन्सेकुअर आहे व अनिरुद्धाला खरे तर घरी आरामात राहाय्चे व संजना पण हवी असे पॅकेज हवे आहे. त्यासाठी तो अरू ला दमन करणारच तिचे व्यक्तिमत्व उभरू देत नाही. अवघड आहे खरीतर परिस्थिती. संवाद चांगले आहेत. मान बाच्या कैक पट चांगले आहेत.

Pages