आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, आता अनन्या पिक्चरमधे येणार आहे. ती पण नव्हती आवडत फार, शिरा ताणून बोलायची. पण दोन हिरो होते ते आवडायचे म्हणून बघायचे सुरुवातीला. रोहित टिळक आणि हर्षद अतकरी (का अटकरी) .

तुलना केली तर ही मराठी सिरियल बरीच जमीनीवर म्हंजे थोडीतरी वास्तवाच्या आसपास वाटते. अरुंधती सोबर वाटते. आणि घरातले इतर सदस्यही.

अनुपमा विचित्र वाटते. मुळात रुपालीचा अभिनयच भडक वाटतो. ती मोनिशा म्ह़णूनच बरी वाटायची. आणि जुन्या संजीवनीमधे पण होती ती बहुतेक निगेटिव्ह रोलमधे.

अनुपमा स्टार प्लस वर आहे.. सेम सेम तो आई कुठे काय करते.. आपली अरुंधती हिंदीतली अनुपमा . चा रोल रुपाली गांगुली करतेय.. साराभाई मधली मनीषा.

आई कुठे काय करते मधली संजना बदलली आहे.. तो रोल आता रुपाली भोसले करतेयमराठी बिग बॉस मधली....

18 सप्टेंबरला अरुंधतीला अनिरुद्ध व संजनाच्या विबासं बद्दल कळणार आहे असा प्रोमो दाखवत आहेत. आजच्या भागापासून लग्नाला सुरुवात झाली आहे. संजना आणि अनिरुद्धचे लग्न होऊ शकले नाही.

आज सगळ्यांनी छान नऊवारी नेसल्या होत्या. पेशव्यांच्या मालिकेतून आल्यासारख्या दिसत होत्या सगळ्या. अर्चना पाटकर मला जास्त छान वाटली वयाच्या मानाने. संजनाला वरच्या ओठावर जन्म खूण असल्यासारखे काहीतरी आहे किंवा लहानपणी काही जखम झाली असेल.

छान सेट्स लावले आहेत व drapery पण मस्त. सारखं आपलं आता अरुंधती ला kalel मग कळेल असे वाटत राहते.....! काही कळत नाही...या प्रोमो मधे ही बहुतेक तसेच होईल....

दोन महिने अरुंधतीला कळेल हेच प्रोमोज. अजुनही समजलं नाही का. प्रोमोजमधे कायम उल्लू बनवतात प्रेक्षकांना.

सध्या मी ह्याच channel वरची सुख म्हणजे नक्की काय असते हि एकमेव सिरीयल बघतेय. मला गौरी जयदीप आवडतात पण गौरी एकदम रडूबाई.

हेच बघताना, आईचे प्रोमोज बघितले जातात. त्याआधी एबीपी माझावर पण बघितलेले.

तो मंदार जाधव, गुरुदेव दत्त होता आधी. त्याआधी हिंदी सिरियल्समधे काम करायचा असं youtube वर बघितलं. त्याचा भाऊ मेघन जाधव पण हिंदीमधे काम करतो असं तिथेच समजलं.

कधीतरी पाहाते ही मालिका. त्याच त्या (सत्यवान्)सावित्री च्या वरताण नायिका, त्यांचा बिन्डोकपणा, ऑमचं घर/ आम्च्या परंपरा, संतांच्या वर वागण्यातला अव्यवहरी चांगुल्पणा, नवर्‍यांचे उंडारणे, विबासं, अधून्मधून सारखे घरगुती कार्यक्रम , काही म्हणून नवीन कल्पना नाही. या मालिकेतही तीच तर्‍हा. पूर्वी कधीतरी डेलीसोप मधे काम न करण्याचा निर्णय घेतला होता ना मधुराणी ने , शिवाय कवितांचं पान चे काही भाग अप्रतिम आहेत. नाट्यपंढरी पण चांगला उपक्रम. बहुधा व्यवसाय म्हणून हे क्शेत्र निवडल्यावर डोक गहाण टाकून इमाने इतबारे सोंग वठवणे अविभाज्य असावे.

अनिरुद्ध सारखा अरुला तुझ्यात उणीव आहे असं का म्हणत असतो. तीही बावळट म्हणते हो आहे उणीव. सांगायचं ना त्याला एक दिवस घर सांभाळ म्हणून. घर सांभाळते म्हणजे नोकरासारखी सगळ्यांची कामे करते अरुंधती. त्यादिवशी अनिरुद्ध बोलला पण तिला की त्यांची कामं होतात म्हणून ते तुझ्याशी गोड बोलतात. ह्या सगळ्यामुळे अरुंधती फार डोक्यात जाते. तिची मैत्रीण मस्त आहे, रोकठोक आणि प्रांजळ. अरुची आई म्हणजे मनोरम वागळे ची मुलगी आहे का. कुठेतरी बघितलंय पण नेहमीप्रमाणे कुठे ते आठवत नाही.

अरुंधती स्वत:ला बावळट (अर्थात आहेच) समजते आणि अनिरुद्धला हुशार हीच तर उणीव आहे तिच्यात

अधून्मधून सारखे घरगुती कार्यक्रम , >>>>>>> हे मात्र आवडत मला. नेहमीच्या रडगाण्यातून निदान टाईमपास तरी होतो.

दोन महिने अरुंधतीला कळेल हेच प्रोमोज. >>>>>> पाहिला तो प्रोमो. नुसत कपाळावर किस देताना ती बघते. त्याने थोडीच विबासं सिद्द होणार आहे.

सुलु, आधी ती रुपालीला म्हणजे संजनाला नवऱ्याच्या गालावरची हळद लाऊन घेताना बघते. तो प्रोमो दाखवायचे, कित्ती दिवस तोच सुरु. नंतर त्याचं काय झालं ते सिरीयल बघणाऱ्यांना माहिती असेल. आता हा तुम्ही उल्लेख केलेला दाखवतायेत, ते बघून ती चक्कर येऊन पडते.

आधीचा प्रोमो बरेच दिवस होता, आता हा प्रोमो आहे.

मागे कोणीतरी मुलगी येऊन त्यांच्या मोठ्या मुलाला सांगते की तुझ्या बाबांचे आणि माझ्या मावशीचे अफेअर सुरु आहे. तो होता बरेच दिवस.

हे असेच चालू राहिले तर सगळ्या जगाला कळलेले असेल पण अरुंधतीला कधीच कळणार नाही.
त्यातून जो कोणी तिला सांगायला जाईल त्याचीच ती शाळा घेईल, विश्वास-प्रेम यावर खूप मोठे भाषण ठोकेल.
मग लोकही तिला सांगायचा नाद सोडून देतील. पण अनिरूद्धशी सतत भांडत राहतील... आणि अरूंधती ‘माझे घर, माझा संसार’ करत आनंदात राहील.

Happy हो ते आधी हळदीच्या प्रोमो च पुढे काय झाले? अरुंधती म्हणतेय की..थांब sanjana
माझ्या हळदीचा रंग तुझ्या गालावर उतरला असं काहीतरी...जे प्रत्यक्षात दाखविले च नाही
पण घरगुती कार्यक्रम मलाही आवडतात...त्या दोघींचा पिंगा डांस मस्त होता....

अरुची आई म्हणजे मनोरम वागळे ची मुलगी आहे का. कुठेतरी बघितलंय पण नेहमीप्रमाणे कुठे ते आठवत नाही.>>>> ये रिश्ता क्या कहलाता है मधे अक्षराची सासू होती. भाभी माँ बहुतेक.
पिंगा डांसमधे संजना जास्त आवडली मला. छान दिसली.

पिंगा डान्स मी नाही बघितला कधी होता ?~~12 सप्टेंबरचा भाग, एपिसोड 132
घर सांभाळते म्हणजे नोकरासारखी सगळ्यांची कामे करते अरुंधती.~~ अगदी अगदी. तिने सतत सर्वांच्या पुढे पुढे करून स्वतःच स्वतःला नोकर बनवून घेतले आहे.( आणि मुलांना,सासूला,नवर्याला लाडावून ठेवलंय.) असे बनून रहाण्यातच तिला धन्यता वाटते. सुरुवातीचे भाग तर खूपच nonsense आहेत.
बावळट तर ती आहेच.संजनाच्या नवर्याने घरी येऊन सांगितले तरी तिने विश्वास ठेवला नाही. अनेकदा त्यांना बेडरूममध्ये बघूनही तिला शंका येत नाही.
आजच्या काळात हे अशक्य आहे म्हणून कथा आहे म्हणून मी सोडून देते पण मधुराणीचा अभिनय चांगला आहे आणि मला यातली पात्रे झीच्या राधिका, गुरुनाथ, शनाया, आसावरी, डबड्या यांच्यापेक्षा बरीच mature आणि sensible वाटतात म्हणून बघते.
श्रीमोयीचा remake आहे बहुतेक ही सीरियल. आणि अनुपमा याची हिंदी आवृत्ती आहे.

Pages