आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या मालिकेतले संवाद चांगले आहेत. कॅरॅक्टर्सही क्लीअर आहेत.
स्टार प्रवाहवरच्या सुख म्हणजे नक्की काय असतं आणि सहकुटुंब सहपरिवार याही दोन मालिका पाहायला नुकतीच सुरुवात केली. या तीनही मालिका झी मराठीच्या मालिकांपेक्षा बर्‍याच चांगल्या वाटल्या. जो मुद्दा असेल तो पटापट पुढे नेतात. झी सारखे दळण दळत नाहीत. याही मालिकेत तो बदफैली नवरा एकाच भागात पुन्हा घराबाहेर पडला.

सुख म्हणजे मध्ये वर्षा उसगावकर सासूच्या भूमिकेत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे जरा वेगळे बॅकग्राउंड आहे. बिझिनेससाठी किचन पॉलिटिक्स आहे. नायिकेला आधी विनोदी ट्रॅक दिला होता.

सहकुटुंब मध्ये सुनील बर्वे आणि नंदिता धुरी मुख्य भूमिकांत आहेत. त्यांचा बेसिक इश्यु तरी जेन्युइन दाखवलाय.

येऊ कशी तशी पाहून शुभांगी गोखलेही पाट्या टाकायला लागल्यात असं म्हणायला लागतंय. स्वैपाक करणे किंवा खिचडी करणे सोडून जेवण बनवणे आणि खिचडी बनवणे असं असतं त्या मालिकेत.

ती फुलराणी ही सोनी मराठी वरची मालिका आठवतेय का? त्यात त्या देशमुखांच्या घरी जो ड्रायव्हर असतो त्याची बायको गुड्डी होती (ती दोघं हिंदी भाषिक असतात) ती ईशा आहे बहुतेक. त्या मालिकेत ती प्रेग्नंट दाखवली होती नंतर.

ती फुलराणी ही सोनी मराठी वरची मालिका आठवतेय का? त्यात त्या देशमुखांच्या घरी जो ड्रायव्हर असतो त्याची बायको गुड्डी होती (ती दोघं हिंदी भाषिक असतात) ती ईशा आहे बहुतेक. त्या मालिकेत ती प्रेग्नंट दाखवली होती नंतर.>>> हो मला आठवते.. हीच ती इशा..

ईशा घरी एकटी घाबरते तो आणि नंतरचा एपिसोड फार छान झाले. जिथे आपण कमी पडलो ते अरुंधतीने स्वीकारले. तेच इथे नवर्‍याची बायको वाली राधिका असती तर बिना शेंडाबुडख्याची अद्वातद्वा बडबड केली असती.

स्टार प्रवाह वरच्या मालिका पाहताना झीच्या मालिकांच्या कथा आणि संवादलेखकांचं कल्पनादारिद्र्य ठळकपणे जाणवतं.

आणखी एक म्हणजे स्टारवरच्या मालिकांतली पात्रं जे बोलायचं ते धडाधड बोलून टाकतात. झी सारखं बोलू की नको म्हणून एपिसोड्स वाया घालवत नाहीत.

झीवाल्यांनी तो फ्युज उडण्याचा प्रसंग आठवडाभर ताणला असता.

ईशाला कोणीतरी चांगल्या दोन तीन ठेऊन द्या एखाद्या भागात माझ्यातर्फे Lol बरं होईल जरा. तिच्यामुळे तमाशे होताय आणि तिला कळतही नाहीये.
ईशा घरी एकटी घाबरते तो आणि नंतरचा एपिसोड फार छान झाले. जिथे आपण कमी पडलो ते अरुंधतीने स्वीकारले >>> हम्म. आणि नंतर म्हणते हिला ऐकलं नाही तर रागाव तेच बरोबर आहे‌.

थे नवर्‍याची बायको वाली राधिका असती तर बिना शेंडाबुडख्याची अद्वातद्वा बडबड केली असती. >+१. स्टोरिलाईन सेम आहे पण! तिकडे पण शनाया कडे मॉन्स्टर रहायला जातो आणि काहीतरी गडबड होते हे दाखवले होते. पण बटबटीतपणा आणि वचावचा बोलणे , बिनडोक बालिशपणा यामुळे सगळे हास्यास्पद झाले होते तिकडे

नवऱ्याची बायकोवाली मालिका विनोदीच आहे असा माझा अजूनही ठाम समज आहे.
ईबाळ डिट्टो बाबांवर गेलंय. आपल्या शिवाय बाकिच्यांनी आनंदी राहूच नये असे तिला वाटते. तिच्यासाठी संजनाच योग्य आहे.

तिन्ही मुलं अगदीच चपट्या नाकाची का निवडली आहेत नकळे !
<<
Rofl
संवाद मुग्धा गोडबोलेचे आहेत, गायनॅकोलॉजिस्टचा रोल करते ती (प्राउड गरवारे स्टुडन्ट )
चांगली चालु आहे सिरीज, अरुंधतीचा हळुहळु होत गेलेला बदल, स्वाभिमान , नवर्याकडे अजिबात न जायचा क्लिअर निर्णय आवडला.
बाकीच्या कॅरॅक्टर्सचे संवाद पण त्यांच्या कॅरॅक्टर्सना सुटेबल असेच आहेत !

स्टार प्रवाहवरच्या सुख म्हणजे नक्की काय असतं >>> सध्या हीच बघतेय, जयदीप गौरी जाम आवडतात. मागे महिनाभर बोअर झालेली दिवाळीनंतर तेव्हा बघत नव्हते, हल्ली परत बघतेय.

कटकटी ईशा. काही महिने तरी दाखवायला नको तिला. चांगली थोबडावली पाहिजे त्या संजनाने. त्यापेक्षा शेखर दाखवा जास्त, मस्त बोलतो तो.
रच्याकने, तू तिथे मी मध्ये शेखर होता, अगदी बारीक Proud

ईबाळ डिट्टो बाबांवर गेलंय. आपल्या शिवाय बाकिच्यांनी आनंदी राहूच नये असे तिला वाटते. तिच्यासाठी संजनाच योग्य आहे.>> अगदिच!
सगळे सन्वाद छान आहे मुग्धाने लिहलेले.
सन्जनाचा शर्टड्रेस छान होता , तिचे सगळाच वॉर्डरोब चान्गला आहे, कॅरी पण छान करते.

ईशा अगदीच immature आहे....पण तिचा मला बाबांबरोबर रहायचं आहे..हा मुद्दाही पटतो ...फक्त ती जितकी लहान दाखविली आहे तितकी दिसत नसल्याने झेपत नाही!
ह्या मालिकांमध्ये...खरेतर katha अशी काय असते? एक फक्त परिच्छेद होईल....सगळा भर संवाद लेखक कसे प्रसंग फुलवत नेतो त्यावर असतो!

यश ची मैत्रीण पण छान गाते. अरू पण छान गाते , पण जरा जास्त मंद लयीत गाते. अरू आता इतकी तर्कशुद्ध वागू शकते तर इतके वर्ष हे सर्व कुठे गहाण होत , असाही विचार आला . डॉमिनेटिंग सासू आणि नवर्‍यापुढे चालत नाही हे समजण्यासारख आहे; पण `मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही ' उलट खूश होती हे पटल नाही. बाहेरख्याली पणा नसता तरी नवर्‍याच वागण चूकच होत त्याविरुद्ध फार काही पाउल उचलली नाहीत ( उसासे टाकण्याशिवाय )

काउन्सेलिन्ग वाला भाग मस्त होता. इशा घरी पार्टी करते ते अगदी नॉर्मल आहे. त्यात इतके भडकण्यासारखे काय? पण संजना हे पात्र प्रत्येक बाबतीत भडकतेच. व बोट दाखवू दाखवू उद्मेखु न बोलते. गौरीचा रडका चेहरा बघवत नाही.

काउन्सेलिन्ग वाला भाग मस्त होता >>>>>>>>> हो .

इशा घरी पार्टी करते ते अगदी नॉर्मल आहे. >>>>> पण हे अस दुसर्यान्च्या घरी पार्टी करण बरोबर नाहीये. तो तिचा बॉयफ्रेण्ड काही बरोबर वाटत नाहीये. हि मुलगी फसेल एक दिवस.
संजनाला को-ऑपरेटिव्ह सोसायटी लाऊड म्युजिक लावल म्हणून तक्रार करेल ह्याची भीती वाटते. एरवी हि आणि अनिरुद्द कुत्र्या- मान्जरासारखे भाण्डत असतात रोज तेव्हा हिची सोसायटी झोपलेली असते वाटत. शेखरने दारु पिऊन इथे किती वेळा धिन्गाणा केला असेल ह्याची गणतीच नाही.

संजना ईशाची खोटी तक्रार अरुन्धतीकडे करेल अस वाटतय.

निखिल पण नाचायला जातो ह्याचा संजनाला जास्त त्रास झाला असं असेल कदाचित. संजनाच्या घरच्या मुख्य दरवाजाला लॅच नाही फक्त दोन कड्या आहेत. दरवाजाही अगदी तकलादू वाटतो.
अरुंधती गौरीच्या आजाराबद्दल सगळ्यांना का सांगत सुटली आहे. राजा हरिश्चंद्र बनण्याची तिची हौस फिटेलही पण त्या बिचाऱ्या गौरीला किती ऐकून घ्यावं लागेल. अप्पा आज तिला बरोबर बोलले कांचनला न सांगण्याबद्दल तरी हिचं आपलं तेच. त्या अनघाबद्दलही तिने घरात सगळ्यांना सगळं सांगितलं. स्वतः एव्हडी वर्ष सासूचा जाच सहन करतेय पण सु्नांना ते सहन करावं लागू नये यासाठी काहीच अक्कल हुशारी नाही. वरून सगळ्यांनी एकत्र राहावं हा अट्टाहास.

कुणापासून काह्ही लपवायचं नाही, कध्धी खोटं बोलायचं नाही, घरातील सगळ्यांना सतत एकत्र बांधून ठेव्हायचं, समजुतदार पणाचं सगळं कंत्राट स्वतः घेऊन सगळ्यांच्या सगळ्या चुकांना माफ़ करत रहायचं….प्रत्येक मराठी सिरिअल मध्ये एक पात्र असं असायलाच पाहिजे...नाहीक्का..!

हो ना.. गौरी बद्दल काय सगळ्यांना सांगायचं? नाही झालं मूल तर नाही.........! इतरांचा काय संबंध...?
आणी इशाचा बॉय फ्रेंड जरा बदमाष वाटत होताच
आणी तो दुसरा..........तो आठवतोय का ? अभि आणि अंकिताच्या साखरपुड्यात ह्यानेच तर तमाशा केलेला ना? पुन्हा इशाने त्याच्याशी मैत्री केली? तेच ते कलाकार का घेतात हे?
अमा, उद्मेखून शब्द किती दिवसांनी वाचला.....!!.. म्हणजे.... टोचून ना?
संजना ला ईशा नकोच आहे रहायला तिच्या घरात.... त्यामुळे ती रागराग करणारच.

त्या बिचाऱ्या गौरीला किती ऐकून घ्यावं लागेल. अप्पा आज तिला बरोबर बोलले कांचनला न सांगण्याबद्दल ....> होना. कांचन उठता-बसता अपमान करते, कशीपण बोलते त्याकडे दुर्लक्ष करून आई मनाने खूप चांगल्या असे बोलायला अरूंधतीला जमते. तेच घरात येणाऱ्या नात सुनांना जमेल कश्यावरून? ते त्यांनी का पटवून घ्यायचे?

यश मुलाबाळांची स्वप्नं बघायला थोडा लहान नाही का दिसत? तो गौरीला प्रपोज करतो तेव्हाचे त्याचे संवाद त्याचं जे वय वाटतंय त्यापेक्षा खूप प्रौढ वाटले.

मी वीकेंडला घरी आलो की आठवड्याभरचे भाग पळवुनपळवून पाहतो. बाकी पात्रे अर्थातच पांचट वाटतात शेखर सोडला तर कारण त्याला संवादबी भारी मिळतात. बापाची आणि पोराची हळद-लग्न एकाच मांडवात करू तो प्रसंग भारी होता Lol

काउन्सेलिन्ग वाला भाग मस्त होता >>>>>>>>
अनुपमा मधील कौन्सिलिंग चा भाग मस्त होता १६ फेब ला दाखवला होता पहा 'आकुकाक' पेक्षा छान रंगला होता।
त्यात गौरीची आई कॉऊन्सिलर दाखवली होती व अनुपमा आणि वनराज जेव्हा कॉउंसिलिंग झाल्यावर ऑफिसमधून बाहेर पडतात तेव्हा तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही हे गाणं बॅकग्राऊंड ला प्ले होताना दाखवले आहे आणि वनराज पायऱ्यांवर रडतो तर अनुपमा एका बेंच वर बसून पूर्वीचे दिवस आठवून रडताना दाखवले
'आकुकाक' मध्ये एकदम सपक, सगळं थंड आता तरी मराठीतलं 'सुन्या सुन्या मैफिलीत माज्या' वैग्रे गाणं बॅकग्राऊंडला वाजेल वाटते न वाटते अरु घरी येऊन मोकळी

नाही अजनबी..मला तरी मराठीतलाच भाग जास्ती योग्य वाटला... (मी अनुपमा चा भागही पाहीला आहे! )....
संयत, निग्रही, शांत...अरुंधतीच ठीके..... भडक, बोबडे बोलणार्‍या अनुपमापेक्षा!
सारखं काय रडायचं....? ठरलंय ना एकदा घटस्फोट घ्यायचाय ते....?

Pages