आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिरुद्धची IQ भूक भागत नसेल म्हणून त्याला संजना सारख्या मैत्रिणीची गरज भासली असेल. >>> यावरूनही त्या दोघांमधे बोलणे होते. अरूंधती म्हणते त्याला कि नसेल मी इतकी हुशार, बौद्धिक पातळीवर तिच्याशी तुमचं पटत असेल तेही मान्य. पण मग ते तिथपर्यंतच असायला हवे होते, शारीरिक जवळीक कशाला?

मी सिरिअल्स फारश्या सिरीअसली बघत नाही.... पण ही सिरिअल अधुनमधून बघितली जाते.
मला आवडलीय ही सिरिअल... कुठल्याही सर्वसामान्य घरात घडू शकेल अशी कथा.... सगळ्याच कलाकारांचे नॅचरल अभिनय..... आणि अजुनतरी लॉजिकली चालू आहे.... अगदीच अ आणि अ असे काही अजुन तरी बघितल्याचे आठवत नाही.
अनिरुद्धचे बायकोला गृहीत धरणे चुकीचे असले तरी त्याचे संजनाबद्दलचे आकर्षणही समजण्यासारखे आहे.... आणि तरीही बाकी सगळे घर अरुंधतीच्या बाजूने ज्या ठामपणे उभे राहते ते बघून बरे वाटते.
एकूणच बऱ्यापैकी समतोल साधलाय!

अरुंधती ही नायिका किमान 1.5-2 पिढ्या मागे पडलेली आहे.कालसुसंगत अजिबात नाही. हेमावैम. पदवी पूर्ण न करताच लग्न (18 व्या वर्षी), 3-3 मुलं, नंतर शिक्षण पूर्ण केले नाही आणि अर्थार्जन पण नाही. नवर्याच्या आणि सासूच्या इतक्या आज्ञेत(स्वतःच्या विधवा आईला भेटायला पण अपराधीपणे जाणारी) , नवर्यावर आंधळा विश्वास आणि मुलांनाही उलट न बोलणारी मुखदुर्बळ, हे अ आणि अ सोडले तर अभिनय वगैरे चांगला आहे.

>>हे अ आणि अ सोडले तर
यात अ आणि अ वगैरे काही वाटले नाही.... तिची मुले आता लग्नाला आलीयत म्हणजे तशीही ती मागच्या पिढीचीच म्हणायला हवी आणि त्या पिढीतली अशी अनेक चालतीबोलती उदाहरणे आजही दिसतात की!

तिला तिच्या नवऱ्याने आणि सासूने तसं घडवलंय. तिची सासू म्हणते ना, अरुला कधी बोलू नाही दिलं कारण तो म्हणजे अनिरुद्ध तापट असतो आणि चिडचिड करत असतो. पूर्वी लहान वयात यासाठीच लग्न करून देत कारण सासरच्या रीतीभाती किंवा काहीही म्हणा, कळल्या पाहिजेत.

मु‌ळात अ‌नि‌‌रुध्द स्वार्थी आणि आत्मकेंद्रीत दाखवलाय. म्हणून अरू बरोबर वाटते जे बघताना पटतंही. संजना पण तिच्या जागी बरोबर आहे.

जश्या इतर गरजा असतात तशी IQ गरज पण असते. काही बायका मेथी गवार च्या पुढे जात नाहीत.>> IQ गरज भागवण्याचे बरेच मार्ग आहेत की. आणि बाईच कशाला पाहिजे ती भागवायला?

अजिंक्यराव प्रतिसाद प्रचंड पटला. मुळातच अरुंधती रोज सकाळी उठून 5 प्रकारचा नाष्टा बनवते आणि संजना ब्रेड बटर देऊन कामाला जाते ह्या वरून चांगला आणि वाईट कसे ठरवू शकतात? >>>>>>> +++++++१११११११ स्वयमपाक येण्या न येण्यावरुन आणि कपडयान्वरुन डेलिसोपवाले नायिका आणि खलनायिका ठरवतात.

अनिरुद्धची IQ भूक भागत नसेल म्हणून त्याला संजना सारख्या मैत्रिणीची गरज भासली असेल. >>>>>>>> IQ ची भूक फक्त पुरुषान्नाच असते का? एखाद्या विवाहित बाईने फक्त नवर्याचा IQ लो आहे म्हणून तिने तिच्या हुशार कलिगशी विबास ठेवले तर ते तुम्हाला चालेल का?

यावरूनही त्या दोघांमधे बोलणे होते. अरूंधती म्हणते त्याला कि नसेल मी इतकी हुशार, बौद्धिक पातळीवर तिच्याशी तुमचं पटत असेल तेही मान्य. पण मग ते तिथपर्यंतच असायला हवे होते, शारीरिक जवळीक कशाला? >>>>>> एक्झॅकटली!!!

अरुला कायमची रान्धा, वाढा, उष्टी काढा दाखवणार नाही. ती हळूहळू बदलतेय.

IQ ची भूक फक्त पुरुषान्नाच असते का? एखाद्या विवाहित बाईने फक्त नवर्याचा IQ लो आहे म्हणून तिने तिच्या हुशार कलिगशी विबास ठेवले तर ते तुम्हाला चालेल का?
मला न चालायला काय झालं? मला चलेल की. उलट मी म्हणतो त्या नायिकेने त्या संजनाच्या नवऱ्याशी लग्न करावं. इतर मालिकांमध्ये पण अशी संगीत खुर्ची दाखवली आहेच. दोन लूजर्सनी एकत्र येऊन संसार थाटावा हायकाय नायकाय.

तो यश आधी कुठे तरी बघितल्या सारखा वाटतो. तसेच मोठा मुलगा पण. मी जरा मागून सुरू केले आहे. म्हणजे रोज बघायला काहीतरी राहते.
अजून अरुंधतीला कळायचे आहे अफेअर बद्दल तिथ पासून बघते आहे. ती कोन नटी आहे? छान दिसते. साड्या खणाचे ब्लाउज पण सुरेख आहेत. सासूचे पात्र मजेशीर आहेत. कायम सुनेवर कुर घोडी करत असते.

यश zee मराठी च्या पसंत आहे मुलगी मालिके मध्ये होता.
आणी मोठा मुलगा झालाय तो zee मराठी च्या जावई विकत घेणे आहे ज्यात सविता प्रभुणे होती त्या मालिकेत होता.

मी आता ते मंगळसूत्र तुट ते त्या सीन परेन्त आले आहे. अनिरुद्ध संजना शॉपिन्ग करतात प्री मॅरेज असे काय काय चालू आहे. बाँब कधी फुट तो ते बघायचे.

अनि रुद्ध आटोवाला वाट्तो. उगीच लॅप टॉप घेउन बसतो. रुबाबदार आजिबात नाही. नीना गुप्ताची सांस सीरीअल होती ह्याच विषयावर. त्यातला नवरा जाम गोड होता दिसायला. उंच चार्मिन्ग. आर्किटेक्ट. ती मिस्ट्रेस पण जबरी होती. आपली संजना पण छानच आहे.

दोन्ही संजना चांगल्या आहेत. अमा, बरच कॅच अप करायचय तुम्हाला. मध्ये काही एपिसोड्स बोर वाटतील पण परत वेग पकडते मालिका.

आजच्या भागात अनिरुद्धने चांगल खडसावल संजनाला पण ती एवढ ऐकुन घेईल अस वाटल नव्हत.
पुढच्या एपिसोड मध्ये त्या दोघींची टिपिकल स्पर्धा दाखवणारेत.. खर तर कित्ती छान काही दाखवु शकतात.

इशा बारावीत आहे त्यामानाने खूप पोरकट दाखवली आहे

ईशा डो‌क्या्‌‌व‌‌र पडलीये का‌ , सा‌रखं आईला काही‌त‌‌री टेंशन नाहीत‌र गिल्ट देते. एवढी पण लहान नाहीये. साडीत त‌‌र दोन पोरांची आई दिसते Lol दोन्ही मुलांचे काम आ‌वडतंय मात्र.

विजयेंद्र घाडगे का कवंलजीतसिंग होता बहुतेक त्या "सांस" सिरीअलमध्ये

विजयेंद्र घाडगे का कवंलजीतसिंग होता बहुतेक त्या "सांस" सिरीअलमध्ये >>> कवंलजीतसिंग as gautam kapoor

कन्वल जित सिंग खरेच क्युट. ह्या अनिरुद्धला गुट्क्याचा किंवा तंबाखुचा वास येत असेल असे कायम वाटते. काय कपडॅ असतात. हिरवा शर्ट आणी लाल टाय?!!! सर्व्च इन जनरल बी ग्रेड आहेत. पन मजेशीर.

अनिरुद्धला नोकरी जाण्याची भीती असते आणि तरी तो दोन लाख देतो, ईशाचा वाढदिवस साजरा करतो Uhoh ईशा मला वाटायचं आठवी नववीत असेल, फारच बालिश आहे. पोहयामध्ये फारच हळद घालतात आणि शेंगदाणे, कोथिंबीर वगैरे काहीच दिसत नाही त्यात आणि स्वयंपाक केवढासा करतात.

पोहयामध्ये फारच हळद घालतात आणि शेंगदाणे, कोथिंबीर वगैरे काहीच दिसत नाही त्यात आणि स्वयंपाक केवढासा करतात.

Lol Lol Lol

>>पोहयामध्ये फारच हळद घालतात आणि शेंगदाणे, कोथिंबीर वगैरे काहीच दिसत नाही त्यात आणि स्वयंपाक केवढासा करतात.

कुणाचे काय तर कुणाचे काय! Lol

Pages