Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा.. इतकं कोण लक्षात
अमा..
इतकं कोण लक्षात ठेवतं सिरीयली मधे...!!
ती त्या जावेने लपविलेली असते की काहीतरी ना ? पण काही काही संवाद-प्रसंग मात्र जमून आलेले आहेत...
उदा.. परवाच्या एपिसोड मधे निलीमा विचारते.. "मग..अरुंधती...कसं काय वाटतं एव्हढं मोठं घर स्वतःच्या नावावर झालेलं...? एकदम भारि वाटत असेल ना....? असतात अशा कुजक्या बायका..... अगदी घाव घालून वरुन मी साधंच विचारलय असा आव आणणार्या....
असतात अशा कुजक्या बायका.....
असतात अशा कुजक्या बायका..... अगदी घाव घालून वरुन मी साधंच विचारलय असा आव आणणार्या....>> हो हो अगदी. लग्नाच्या प्रसंगाची आठवण काढून काढून दृ श्ट लागली म्हणून हळ हळते खोटे खोटे. किती हादडते शिरा पोहे असलंच. जास्तीचे दूध घातलेली कॉफी. इन जनरल हावरट आहे ती जाव.
आता अर्धा आठवडा अरुच्या वाढदिवसाच्या तयारीत, तिच्या पासून काहीतरी लपवण्यात जाईल. मग एकात अनिरुद्ध अरु भांडण. मी तुम्हाला नोटीस देते वगिअरे. ते इशा यश गौरी वगैरे कोंडून ठेवले पाहिजेत . फार कटकट करतात.
ते इशा यश गौरी वगैरे कोंडून
ते इशा यश गौरी वगैरे कोंडून ठेवले पाहिजेत ...
अगदी!
मोठी मोठी मुलं दिसतात आणि भांडतात मात्र दहा बारा वर्षाच्या मुलांसारखी! इरीटेटीग !
मुळात सासूचा आतून विरोध आहे अरुला...तिनेच सांगितले निलीमा ला घराबद्दल...सगळं रिअॅलिस्टीक दाखवितात मात्र.......
सगळं रिअॅलिस्टीक दाखवितात
सगळं रिअॅलिस्टीक दाखवितात मात्र >>> मराठी मालिका रिऍलिस्टिक ?
हे लोकं "बाबा कुठे काय करतात' किंवा 'माझ्या बायकोचा दुसरा/तिसरा नवरा' अश्या मालिका का नाही काढत ?
अरुंधती ऐवजी अरुण नावाचे बाबा असतात आणि आई अनिताचे संजय या बाबांच्या मित्राबरोबर बारा वर्षांपासून लफडे चालू असते. बाकी स्टोरी आणि पात्रे तीच राहतील. जिवलगा ह्या मालिकेचा अपवाद सोडला तर बाकी साऱ्या मालिकांत एक बाब्या आणि त्याचे विबास हाच फॉर्मुला दिसतो.
आता ती सिद्धार्थ चांदेकरची भूतवाली मालिका आहे त्यात एक मोठा हिरो , मेलेली बायको आणि त्याची एक बॉर्डरलाईन ऑब्सेसिव्ह फ्यानगर्ल यांची गोष्ट आहे. हेच बदलून एक मोठी नटी, मेलेल्या नवऱ्याचे भुत आणि तिचा ऑब्सेसिव्ह फ्यानबॉय अशी स्टोरी असती तर सगळे संस्कृतीरक्षक तुटून पडले असते निर्मात्यांवर. शष्प रिऍलिस्टिक असतात या मालिका
मी त्या अर्थाने नाही म्हणत
बाकी सगळा उजेड आहे ते मलाही माहितीच आहे!!
मग ठीक आहे
मग ठीक आहे
हल्ली मराठी स्टार वर नवीन
हल्ली मराठी स्टार वर नवीन सिरिअल्स येतात व काही दिवसाने त्या हिंदी स्टार वर दिसतात.
आई कुठे काय करते - अनुपमा ,
मुलगी झाली हो - ________ (नाव आठवत नाही पण कालच प्रोमो पाहिला)
सिद्धार्थ चांदेकरची भूतवाली मालिका आहे ती मात्र यापूर्वी हिंदीत होऊन गेलीय.
सिद्धार्थ चांदेकरची भूतवाली
सिद्धार्थ चांदेकरची भूतवाली मालिका आहे ती मात्र यापूर्वी हिंदीत होऊन गेलीय.
>>>> फुलाला सुगंध मातीचा तर फ्रेम टू फ्रेम कॉपी केलीय दिया और बाती ची (अस बायको म्हणत होती)
आजकाल मालिकेत कोणाला काही
आजकाल मालिकेत कोणाला काही आठवायला लागलं किंवा कोणी विचारात पडलं की दहा पंधरा मिनिटाची निश्चिती असते, मागचं सगळं परत दाखवतात. वाढदिवसाच्या दिवशी अरु अनिरुद्धला कधी सुनावणार ते जाहिरात करून सांगताहेत म्हणजे मधले काही दिवस नाही बघितलं तरी चालेल. सवयीने बघितलं जातं हा भाग वेगळा. अभि आणि अनघाला कपल डान्स करताना बघणं म्हणजे शिक्षा आहे प्रेक्षकांना. मागे तर अशी तारीख जाहीर करून त्या तारखेच्याही नंतर घडली होती ती घटना.
अरुच्या भावाची बायको का गायब आहे. त्याचं आणि देविकाचं लग्न नको लावायला. सुधीरसाठी अनघा चांगली होती.
:-)चंपा...कुठल्या कुठे विचार.
:-)चंपा...कुठल्या कुठे विचार......!!!
त्या अरुच्या भावाचं अणि देविकाचं लग्न कसं शक्य आहे?
ती देविका बाकी स्वभावाने चांगली असली तरी जरा जास्त 'हेप' आहे ..आणि केस हॉरिबल आहेत!
अभि आणि अनघाचा कपल डान्स.....
अभि आणि यश बाकी सख्खे भाऊ शोभतात दिसण्यात......
त्याचं आणि देविकाचं लग्न नको
त्याचं आणि देविकाचं लग्न नको लावायला. सुधीरसाठी अनघा चांगली होती.
दिल धडकने दो नावाच्या हिंदी चित्रपटात एक प्रसंग दाखवला आहे. कृज वर फिरायला निघालेल्या कुटुंबामध्ये मध्यम वयीन बायकांची टोळी असते. ती टोळी दिवसभर आसपासच्या स्त्री-पुरुषांच्या जोड्या जुळवत असतात. ह्या वर वैतागून प्रियांका चोप्रा त्यांना म्हणते "तुम लोगोंको और कोई काम नाही है क्या? Get a job" . ह्यावर त्या टोळी मधली एक अक्का म्हणते "इस उमर मे हमे कौन job देगा"
का काय माहीत पण ह्या धाग्यावर आल्यावर मला तो प्रसंग आठवतो
अनघा ला हिरवा ड्रेस व मेक अप
अनघा ला हिरवा ड्रेस व मेक अप ग्लॅम लुक आजिबातच शोभत नाही. हिरवे लोंबते कानातले व केसांच्या पिळ्या आणि हिरवी टिकली!!!! कोण
लावले आजक्काल रंगीत टिकली!!! मॅची मॅची. देविका अंगावर येते. सर्व पात्रे पाच सेकंदानंतर रिअॅक्षन शॉट देतात.
अरू चे ४४ कि काय दिव्यांनी ओवा ळायचा प्रसंग धन्यच होता. आता मध्यम वर्गात ह्याची फॅशन येइल. सासू मूग गिळून बघत बसलेली.
यश जरा जास्तच आहे आता
यश जरा जास्तच आहे आता डोक्यात जायला लागलाय. घरचे मोकळीक देतात तर जरा अतीच गौरी गौरी करणं सुरू झालंय. काही काम,करीयर असतं का नाही आयुष्यात आधी? आणि अनघा आणि अभि जोडी? बिग नो नो वाटतं ते. ती मोठी दिसते त्याच्याहून.
कालचा भागच आवडला नाही. आईच्या वाढदिवसाच्या नावाखाली as usual बाकीचेच मजा मारताय आणि किचनमधे नेहमी प्रमाणे विमल आणि आई
किचनमधे नेहमी प्रमाणे विमल
किचनमधे नेहमी प्रमाणे विमल आणि आई>>>तिला सांगितले होते कि आज किचनमधे जायचे नाही. पण तिला आरामच करायचा नाही तर बाकीचे तरी काय करणार.
अरू चे ४४ कि काय दिव्यांनी ओवा ळायचा प्रसंग धन्यच होता. आता मध्यम वर्गात ह्याची फॅशन येइल. >>> आली आहे. २५,५०,६०,७५ दिव्यांनी ओवाळल्याचे(लोकांच्या फोटोत) पाहिले आहे.
इशा बाहेर जाऊन पॉश पद्दतीने
इशा बाहेर जाऊन पॉश पद्दतीने वाढदिवस साजरा करते तेव्हा अरुने 'मला हे असले लाड' परवडणार नाही' म्हणून केवढ झापल होत तिला. आता स्वत: मात्र ग्रॅण्ड सेलिब्रेशन करणार आहे वाढदिवसच ते मात्र बर चालत तिला.
आई कुठे काय करते - अनुपमा , >>>>> दोन्ही मालिका मूळ 'श्रीमोयी' नावाच्या बन्गाली मालिकेवरुन घेतली आहे.
आता ती सिद्धार्थ चांदेकरची भूतवाली मालिका आहे त्यात एक मोठा हिरो , मेलेली बायको आणि त्याची एक बॉर्डरलाईन ऑब्सेसिव्ह फ्यानगर्ल यांची गोष्ट आहे. >>>>>>> ती फ्यानगॅर्ल डॉक्टर आहे ह्याचा काल साक्षात्कार झाला प्रोमोमधून . कशी टिनएजर मुलीसारखी वागत होती स्वराजला ( सिद्धार्थ चांदेकर) पहिल्यान्दा बघून.
हेच बदलून एक मोठी नटी, मेलेल्या नवऱ्याचे भुत आणि तिचा ऑब्सेसिव्ह फ्यानबॉय अशी स्टोरी असती तर सगळे संस्कृतीरक्षक तुटून पडले असते निर्मात्यांवर. >>>>>>> आता ह्यात संस्कृतीरक्षकान्नी तुटून पडण्यासारख काय आहे? साधी सरळ हॉरर मालिका होईल ही, फक्त जेण्डर रिवर्स केल इकडे. एका हिन्दी सिरियल मध्ये मेलेल्या बॉयफेण्ड्रच भूत दाखवल होत.
हे लोकं "बाबा कुठे काय करतात' किंवा 'माझ्या बायकोचा दुसरा/तिसरा नवरा' अश्या मालिका का नाही काढत ? >>>>>>>> सन्जनाच सुद्दा विबान्सच आहे की ह्या सिरियल मध्ये.
अभी आणि अनघाची जोडी नाही शोभत
अभी आणि अनघाची जोडी नाही शोभत. देविका अरुच्या भावासाठी चांगली आहे. तो साधा सरळ आणि ती हुशार.
पण जोड्या लावल्याशिवाय मालिका पुढे जाउच शकत नाही का? आई कस नवीन आयुष्य सुरु करते ती गोष्ट एवढिशी दाखवतात, बाकीचेच नखरे जास्त.
>>>> फुलाला सुगंध मातीचा तर
>>>> फुलाला सुगंध मातीचा तर फ्रेम टू फ्रेम कॉपी केलीय दिया और बाती ची (अस बायको म्हणत होती) >> हो
आता मध्यम वर्गात ह्याची फॅशन
आता मध्यम वर्गात ह्याची फॅशन येइल. >>फॅशन? अहो हि प्रथा फार पुर्वीपासुन आहे आपल्याकडे ६१,७५ किवा सहस्त्रचन्द्र दर्शनाला जनरली ओवाळायची प्रथा आहे.
४४ म्हणजे यन्ग आहे की अरु त्यामुळे ते जरा वेगळ वाटल पण तिला दिव्याने ओवाळतानाचा सिन छान वाटला.मालिकेत थोडा अतिरन्जित पणा आहे पण सरधोपट काही दाखवल तर प्रेक्षकाना आवडणारच नाही असा सगळ्याच चॅनेलचा समज आहे.आज अरुच्या आइने छान कान उपटले अनिरुद्धच्या आइचे पण ती पालथाघडा नबर १ आहे.
आपल्याकडे ६१,७५ किवा
आपल्याकडे ६१,७५ किवा सहस्त्रचन्द्र दर्शनाला जनरली ओवाळायची प्रथा आहे.>> अहो ते मला माहीत आहे. पण इथे अरूचे एकतर्फी कौतूक भयंकर लेव्हल ला चालले आहे . प्रत्यक्षात अश्या स्त्रियांना दूर करून नव्या सवतीला राणी बनवून मखरात ठेवतात. प्रॉपर्टी मुलाला डावलून सुनेला द्यायचे तर कोणीही सासरा मनात देखील आणणार नाही. पण हे चित्र बदलावे म्हणूण असे दाखवत असतील.
आज फक्त आणि फक्त नाच. आणि जावयाची पोपट पंची.
हे सर्व सोडून सून ब्लॅक जीन्स व लेदर जॅकेट घेउन बुलेट वरून भारत दर्शनाला निघून गेली, ब्लॉग लिहीते आहे वगैरे काही दिसत नाही
आपल्याकडे सीरीअल बघणा र्या सासवांना पचनी पडेल एव्ढेच दाख्वतात.
अमा.. त्यांना सगळ्यांचा
अमा..
त्यांना सगळ्यांचा विचार करावा लागतो...... ! अरु सारखा!
प्रत्यक्षात खरेच असे नसते. सासू सासरे कायम मुलाच्याच बाजूने असतात. तिच्या आईने चांगले सुनावले... पण विशेष परिणाम झालेला दिसत नाही सासूबाईंवर ! नणंद छान आहे अरुची...नाजूक, गोड!
अरुचा मेकोवर होणार आहे असा
अरुचा मेकोवर होणार आहे असा व्हिडीओ तूनळीवर आहे. खखो तूनळी जाणे. अनघाचे कानातले अजिबात मॅचिंग नव्हते.
ती बालिश वैभवी डॉक्टर आहे
अचानक मेकोवर फारच फिल्मी
अचानक मेकोवर फारच फिल्मी प्रकार आहे.
त्यापेक्षा हळूहळू होत जाणारे बदल बघायला छान आणि खरे वाटतील.
पण हे चित्र बदलावे म्हणूण असे
पण हे चित्र बदलावे म्हणूण असे दाखवत असतील. >>>>>> आणि अस दाखवल तर काय वाईट आहे त्यात? चान्गल आहे, प्रत्यक्ष आयुष्यात असच घडायला हव.
त्यापेक्षा हळूहळू होत जाणारे बदल बघायला छान आणि खरे वाटतील. >>>>>>> अगदी अगदी. त्या मानबामध्ये तीन का चार वेळा राधिकाचा मेकओवर झाला. शेवटचा मेकओवर केला तो मात्र छान सूट झाला तिला.
ती बालिश वैभवी डॉक्टर आहे >>>>>> हो. सस्पेन्स आधीच क्लीअर आहे ह्या सिरियलचा. ती आत्या, जानूचे बाबा, आणि तो स्वराजचा दाढीवाला भाऊ हे मारेकरी असतील वैदेहीचे.
अरे असा CV छापून दिल्यासारखी
अरे असा CV छापून दिल्यासारखी काय दिसतेय ती डिव्होर्सची नोटीस?
हो ना, अशी असते का घटस्फोटाची
हो ना, अशी असते का घटस्फोटाची नोटीस. ऐतेन
अरु सासूसमोर मुळूमुळू रडत होती आणि वर जाऊन म्हणते माझा काय कमी अपमान झालाय का.
धन्यवाद सुलू.
एरवी अनघा मला आवडते , तिच्या
एरवी अनघा मला आवडते , तिच्या त्या योगा गेटपमधे छानच वाटते, स्माइल पण छान आहे पण अरुच्या बर्थडेला हेअरस्टाइल आणि कानातले अगदिच ओव्हरडन वाटत होत अगदी अवघडलेली वाटली.
अनघाने वाढदिवसाच्या दिवशी ती
अनघाने वाढदिवसाच्या दिवशी ती ओढणी अशी काय घेतली होती. ती ड्रेसची स्टाईल होती की तिने ओढणी तशीच पिनप केली होती.
यु ट्युबवर काही shots बघितले,
यु ट्युबवर काही shots बघितले, अरुंधती div पेपर्स वगैरे देते ते. अरुंधती काम छान करते मात्र, त्याला सुनावण्यात ठामपणा असतो. आकांडतांडव, तमाशा वगैरे करत नाही ती. तरी समोरच्याला चीतपट करते. मधुराणीने उत्तम अभिनय केलाय.
यश आणि अभिची चिडवाचीडवी बघून
यश आणि अभिची चिडवाचीडवी बघून वैताग येतो. यश काही कामधंदा का करत नाही. अरु जावेला जायला सांगते पण मुख्य कारस्थानी तर सासू आहे. ईशा काही ना काही कांड करतच राहते.
हो ना...अरु सासूला का नेहमी
हो ना...अरु सासूला का नेहमी पाठीशी घालते व चांगलं बोलत राहते?
मी असते तर मुळात राहिलेच नसते तिकडे
Pages