आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरीने यशशी लग्न करण्याआधी शम्भर वेळा विचार करायला हवा , नाहीतर तिची अवस्था अरुसारखी व्हायची. कस बोलला तिला तो , 'तुला जर सन्जनाशी सम्बध ठेवायचे असतील तर ह्यापुढे तुझा माझ्याशी सम्बध सम्पला म्हणे. कधी कधी त्याचे मुद्दे बरोबर असतात, पण खूप इम्पलसिव वागतो तो.

अरुंधतीची तिन्ही मुले मनाने अगदीच कमकुवत आहेत. ती ईशा घर सोडून गेली होती, अभिषेक दारू पिऊन आला होता आणि आता हा यश सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत आहे.

आज गौरीची आई म्हणजेच संजनाची बहिण अनिरुद्ध च्या कंपनीची CEO म्हणून आलीय बहुतेक अनिरुद्ध ची नोकरी जाणार...

अरुंधतीची तिन्ही मुले मनाने अगदीच कमकुवत आहेत. ती ईशा घर सोडून गेली होती, अभिषेक दारू पिऊन आला होता आणि आता हा यश सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत आहे. >>>>>>>>> पण अभिषेक आणि यश अरुला मदत करतात, तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात ते आवडल.

अप्पा एकच एक पिवळा कुडता घालतात.
अनिरुद्ध फार irritatingly हातवारे करत बोलतो.... उदा..."तुला हे साधं लक्षात येत नाहिये का? " असं वाक्यही तुला... म्हणजे संजना ला हात दाखवून, हे...म्हणजे पंजा खाली फेकत, साधं..म्हणजे अंगठा व तर्जनी जोडून.. वाक्य..म्हणजे चारी बोटं जोडून पंजा अडवा फिरवत.... का..ला प्रश्नार्थक हात हलवत...असे म्हणतो.
इतक्या हात वाऱ्याची गरजच नसते....शिरा ताणून ताणून बोलणं म्हणजे काही 'मुद्राभिनय ' नाही!

ती गौरी झालेली, भेटी लागी जीवा मधे होती बहुतेक. त्यातला हिरो मला आवडायचा आणि समीर धर्माधिकारी होते त्यामुळे ह्या दोघांकडे जास्त लक्ष जायचं, तसंही तिला तिथेही काम कमीच होतं.

मलाही हा प्रश्न पडलेला. संजनाची सक्खी मोठी बहीण तिची बॉस कशी असू शकते. मुळात संजनालाच हे माहित नाही की तिची बहीण कुठल्या कंपनीत आणि काय हुद्द्यावर काम करते. ती बहुतेक अनिरुद्धच्या हातवाऱ्यामध्ये हरवून गेली आहे Proud
अरुंधतीची सासू मला फार चिप वाटते. एवढ्या मोठया घरात ती अनघा राहिली काही दिवस तर काय फरक पडतो. घरी आलेल्या लोकांसमोर काहीही बोलत असते. देविकाला बोल बोल बोलली ही बाई आणि नंतर त्या रिसॉर्टमध्ये पोट फुटेपर्यंत खात होती फुकट आहे म्हणून. कुत्र्याचं शेपूट आणि आपला तो बाब्या या म्हणी तिला व्यवस्थित लागू होतात.
तो यश काय वेड्यासारखा अभि आणि अनघाची जोडी जुळवतोय, काहीच काम नाही त्याला. अशाने किती गैरसमज होतात. ईशा गायब झाली आहे.

गौरी व इशा एकसारख्याच दिसतात व तोंड वाकडे करत बोलतात. संजना परवा म्हणे मला कमावता नवरा हवा आहे ग. एक ट्याने सर्व करायचा कंटाळा आला आहे....!!!! म्हणून दुसरीचा संसार मोडला हौसेने. !!!! ती सासू पण किती ड्रामेबाज आहे. तेलुगु सिरीअल मधील बाई सारखीच दिसते. अत्तमा.

अमा Lol
पण असतात अशा बायका...सुनेने आणलय ना तिला घरी..मग न आवडणार्‍या

अत्तमा भारीच की Lol

अरे Lol त्या सासुबाई यंग होत्या तेव्हा मस्त दिसायच्या एक दोन मराठी सिरीयलीत होत्या, मी कॉलेजात होते तेव्हा. अर्चना पांढरे नावाने असायच्या मग अर्चना पाटकर झाल्या. त्यांचा मुलगा शिवा सिद्धी सिरीयलच्या प्रॉडक्शन टीममधे आहे.

इथे मलाही अजिबात आवडल्या नाहीत त्या.

अरुंधतीची सासू मला फार चिप वाटते. >>>>>> नैतर काय. घरी आलेल्या पाहुण्यान्समोर कसे बोलावे ह्याचे मॅनर्सच नाहीत तिला. ती संजनाची बहीण आली तेव्हाही तेच. तिने दिलेल गिफ्ट सुद्दा तिच्यासमोरच उघडत होती.

एवढ्या मोठया घरात ती अनघा राहिली काही दिवस तर काय फरक पडतो. >>>>>>> अगदी अगदी. पण का माहित मला अनघा फ्रॉड वाटते. अरु जेव्हा पहिल्यान्दा तिला तिच्या घरी भेटायला गेली तेव्हा शन्कास्पद वाटल सगळ.

अन्जू, तुम्ही अतिशय माहितगार आहात ह्या इंडस्ट्रिच्या. नेहमी काही ना काही माहिती देतच असता. ही हिची ही ती तिची ती. ती त्या सिरीयलमधे होती तो ह्या सिरीयलमधे होता. तुम्ही सगळ्या चॅनेलवरच्या सगळ्या सिरीयली बघता का? कसं काय जमतं?

सुलू ... Happy
अनघा फ्रॉड? ती तर सपोझेडली अगदी शांत आणि निर्दोष, सालस वाटतेय सध्या.
पण ती अभि पेक्षा किती मोठी असेल ना?
तो हार्ड्ली २४ पेक्षा मोठा असूच शकत नाही..... कारण यांच्याच लग्नाला आत्ता २५ वर्षं झाली.

सस्मित त्यासाठी सिरीयल बघावी लागत नाही. पूर्वी काही वाचलेलं लक्षात राहते. हल्ली तर youtube वर सर्व समजतं. दोन दोन मिनिटं youtube वर व्हिडीओज बघायला वेळ असतो माझ्याकडे Lol

माझ्याकडे फक्त फ्री channels आहेत tv वर दोन महिने. नवऱ्याने hotstar plan घेतलाय, त्यावर ह्या आठवड्यापासून परत सुख म्हणजे नक्की काय असते ही सिरीयल बघायला घेतली आहे. मध्ये महिनाभर फालतू track मुळे बंद ठेवलेली.

अनघा मोठी दिसते पण अभि चोवीसचा नाही वाटत. अनघा अरुला ताई म्हणते तर मला वाटलं त्या दोघीमध्ये जास्त अंतर नसेल. अरु तिची मोठी बहीणच वाटते, सासू वाटणार नाही बिलकुल. अनिरुद्धचाच डबा अभिला वापरणार कारण संजना तर डबा देतच नाही Proud
वकील दाखवला आहे तो होसुमिघमध्ये बेबी आत्याचा नवरा होता.

अनघा फ्रॉड? ती तर सपोझेडली अगदी शांत आणि निर्दोष, सालस वाटतेय सध्या. >>>>>>> सिरियल आहे, काहीही दाखवू शकतात. हल्ली सिरियल्स बघताना एखाद नवीन कॅरेक्टर आल की डाउट येतो की ह्याच्या/हिच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेर असेल, आणि प्रत्येकवेळी तसच निघत. Lol होप सो, अनघा तशी नसावी.

हे मराठी मालिकांचे कास्टिंग करणारे कशाचा पगार घेतात नेमका? ती अभी-अनघाची जोडी निव्वळ भयानक आहे. अनघा कमी अनघाक्का जास्त वाटते. घरी आल्यावर ही मालिका पाहायचा योग येतो काही वेळेस तेव्हा हे पेअर दिसले. ती सिद्दार्थ चांदेकरची भूतवाली मालिका जरा बरी आहे यापेक्षा.

अभी-अनघाची जोडी का जुळवतात सगळे तेच कळत नाही. अरूंधतीची कमाल आहे. अनघाच्या आयुष्यात पुन्हा सूख यावे म्हणते आणि तेव्हाच तिला सून करून घ्यायचे स्वप्न बघते. तिकडे सासूबाई नातसूनेच्या शोधात आहेत. आधीच अरूंधती तिच्या ईच्छेविरूद्ध सून झाली. त्यामुळे ती सतत तिला धाकात ठेवते, कसेही बोलते. मग अनघाला ती तशीच वागवणार.
जाऊ दे म्हणत हिने २५ वर्ष काढली आता नवी सून पण तशीच सहन करत जगेल अशी आशा आहे वाटते तिला.

अंकिता... ती परत आली आहे. अभिला आपल्याकडे परत आणण्यासाठी आता ती अनिरूद्धची मदत घेते आहे.

अच्छा पण तेव्हा लग्न का मोडलं ते.>> तिचे आई बाप दोघांना लंडनला पाठवणार असतात तिथून परीक्षा देउन डिग्री घायची व तिथेच राहायचे फ्लॅट आहे त्यांचा व करीअर करायची असा त्यांचा मुलीसाठी प्लॅन असतो. पण अभ्याला घरचे लोक्स त्यांची मदत घेउ नको इथोनच ती परीक्षादे वगिअरे भरीस घालतात मग ही त्यांच्या घरी येउन सर्वांचा अपमान करते तुम्ही कसे मध्यम वर्गीय आहात छोट्या मानसिकतेचे वगैरे. व तो ब्रेक अप होतो. अभ्या जीव देणार असतो. पण अरू समजूत घालते.

पुढे पँडामिक मुळे अंकिताचे लंडन प्लॅन फेल होतात व ती परत त्याला भेटून लग्नाचा प्लॅन रचते आहे. त्यासाठी अनिरुद्धाची मदत घेते आहे.
तिला अनिरुद्ध अफेअर वगैरे बद्धल माहीत नाही अजून.

ती दीड लाखाची अंगठी अंकिता साठी घेतलेली ती परत मिळते का? अंकिता जेनुइनली हायर क्लास पैसे वाइज आहे. पन हे लोक चा र वर्शे फिरत होते तेव्हा इतके पन बोलणे झाले नाही का?

यश गौरीच्या पदराला धरून अमेरिकेत जाउन रॉक स्टार होणार हे नक्की.

Pages