आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज अरुंधतीला माहीत पडलं आणि ती पुर्ण एपिसोडभर बेशुद्ध होती, सर्व तीच्या अवतीभोवती जमले होते इतकंच

तो प्रोमो खोटा होता हे बघून चीडच आली. प्रोमो मध्ये दाखवलं तसं घडलं असतं तर अरु म्हणाली असती मला भास झाला (ते ती अजूनही म्हणू शकतेच) आणि अनिरुद्ध काहीतरी खोटी गोष्ट बनवून मोकळा झाला असता.
आज एवढा गोंधळ घातला पण कोणी त्या अरुच्या तोंडावर पाणीही मारले नाही (बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या तोंडावर पाणी मारतात ना नक्की) किंवा बराच वेळ काही हालचालही केली नाही. अनिरुद्धला काही तिला उभं करता येत नव्हतं, असं मागून पकडून कसं कोणाला उभं करता येईल, माठ आहे का अनिरुद्ध.
संजनाने बरं झालं आज दाराची कडी गुपचूप काढली ते, नाहीतर मालिका कधी पुढे सरकलीच नसती. मोठा मुलगा बिचारा एकेकाला समजावून खोलीच्या बाहेर काढत होता, किती ते लोक घरात. अरुला वेड लागेल की हा धक्का पचवून ती उभी राहील, काहीही झालं तरी दोन महिने आरामात जातील गोष्ट पुढे सरकायला.

आली शुद्धीवर, अनिरुद्धला इतक दूरवर ढकलल तिने, टेबलावर जाऊन आपटला. Lol

पिंगा डांसमधे संजना जास्त आवडली मला. छान दिसली. >>>>>>>> ++++++ ११११११११ छान नाचली सुद्दा. मधुराणीला तेवढ नाचता नाही आल वजनामुळे.

ते नवर्याच अफेअर बघून बेशुद्ध पडणे ' अवन्तिका' मध्ये पाहिल होत आधी.

श्रीमोयीचा remake आहे बहुतेक ही सीरियल. आणि अनुपमा याची हिंदी आवृत्ती आहे. >>>>>>> हो श्रीमोयीचाच रिमेक आहे. ' अनुपमा' मध्ये सुधान्शु पाण्डे अनिरुद्ध झालाय. एकेकाळचा हॉट हॅण्डसम मॉडेल. तसा मिलिन्द गवळी सुद्दा हॅण्डसम आहे म्हणा. Wink

अरुची आई म्हणजे मनोरम वागळे ची मुलगी आहे का. कुठेतरी बघितलंय पण नेहमीप्रमाणे कुठे ते आठवत नाही. >>>>>> ती झीमच्या 'साहेब, बिवी आणि मी' मध्ये गिरिश ओकची बायको झाली होती.

अरुची आई म्हणजे मनोरम वागळे ची मुलगी आहे का. कुठेतरी बघितलंय पण नेहमीप्रमाणे कुठे ते आठवत नाही. >>>>>> होय, त्या मनोरमा वागळेंची मुलगी, मेधा जांबोटकर आहेत. स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' ह्या मालिकेत भाभीमाँ ही भूमीका करत असत (आता आहेत का माहीत नाही, गेल्या अनेक वर्षात ती मालिका बघितली नाही). शिवाय वरती लिहील्याप्रमाणे त्या झी मराठीवरील 'साहेब बिवी आणि मी' ह्या मालिकेत गिरीश ओकांच्या पत्नीच्या भूमीकेत होत्या. सोबत भरत जाधव व नीलम शिर्के होते.

तसेच 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'ये रिश्ते है प्यारके' व 'अनुपमा' ह्या स्टार प्लसवरील मालिकांची व 'आई कुठे काय करते' ह्या स्टार प्रवाहवरील मालिकेची निर्मीती राजन शाही ह्यांनी केली आहे.

स्टार प्रवाह नवीन सुरू होणार्या मालिकांचे प्रोमो सध्या सुरू असलेल्या प्रत्येक मालिकेच्या प्रत्येक ब्रेकमध्ये दाखवून दाखवून हैराण करतात. तसेच सुरू असलेल्या मालिकेतील विशेष प्रोमोही मूळ भाग प्रक्षेपीत झाल्यावरही दाखवत असतात. कित्येकदा प्रोमोवर दाखवल्याप्रमाणे मालिकेत घडतच नाही, वेगळेच नवीन सुरू होते, तरीही तिकडे तोचतो प्रोमो दाखवणे सुरूच असते. ह्यावरून वाहिनीत काम करणारे, वाहिनी प्रमुख व निर्माते स्वतःच्याच वाहिनीवरच्या मालिका बघतात की नाही अशी शंका येते.

तसेच सुरू असलेल्या मालिकेतील विशेष प्रोमोही मूळ भाग प्रक्षेपीत झाल्यावरही दाखवत असतात >>> पंधरा दिवस एकच प्रोमो असतो कधी कधी, नशीब मुळ भागाच्या आधीही दाखवतात नाहीतर झाल्यावर दाखवायचे त्याचा प्रोमो.

स्टार प्रवाहची खासियत होती वरातीमागून घोड्याची. मागे गोठ च्या वेळी मी त्यांना लिहीलं होतं तुमचे प्रोमोज वरातीमागून घोडे असतात. होऊन झालेल्या भागाचे दोन दिवसानंतर प्रोमोज दाखवायचे ते पुढचे किमान आठवडाभर.

गोठची नायिका नवीन मालिकेत येतेय ऐश्वर्या आणि अविनाश नारकरबरोबर. गोठचा नायक कलरवर आहे सुंदरा मनामध्ये भरलीचा नायक. सुंदरा मनामध्ये भरली चांगली मालिका आहे. हिरवीण छान गुबगुबीत आणि सुंदर आहे. मनवा नाईक निर्माती आहे त्या मालिकेची.
हे सगळं असंच अवांतर :खिक:

गोठच्या समीर परांजपेचं लग्न झालंय की, गोठच्या वेळीच फोटो फिरत होते. गोठ संपल्यावर दोघे एका टीव्ही रेसिपी शो मध्ये आलेले. मध्ये पण सुंदरा मनात भरली वाल्याची बायको कोण फोटो वगैरे बघितलं youtube वर. आता हे नवीन ऐकतेय. अर्थात त्यांचं personal life आपण काय करणार. खरं की अफवा असं मनात आलं म्हणून लिहिलं.

अरे हो आई च्या चर्चेवर फार अवांतर झालं.

मग तो कोणी वेगळा आहे की काय. वरचा प्रतिसाद बदलते. उगाच बिचाऱ्याचं चारित्र्य हनन नको. धन्यवाद अंजू.

गोठची नायिका नवीन मालिकेत येतेय ऐश्वर्या आणि अविनाश नारकरबरोबर. >>>>>>>> ' आनन्दी हे जग सारे' सम्पतेय की काय? कारण गोठची नायिका त्यात ' आनन्दी' च काम करायची. तिचा हिरो यशोमान आपटे होता त्यात. तिच जोडी आहे ऐश्वर्या आणि अविनाश नारकरच्या मालिकेत.

सुंदरा मनामध्ये भरली चांगली मालिका आहे. >>>>>>>> +++++++१११११११११ मी सुद्दा बघतेय. गावरान लहेजा मस्त वाटतो ऐकायला ह्या मालिकेचा.

कोण फोटो वगैरे बघितलं youtube वर. >>>>>>> youtube वरचे बरेचसे व्हिडिओज फेक असतात.

youtube वरचे बरेचसे व्हिडिओज फेक असतात. >>> समीरचे फोटो फेक नसावेत कारण गोठ सुरु असतानाच त्याचा दिवाळसण फोटो त्याच बायकोबरोबर स्वत: star प्रवाह फेसबुकवाल्यांनी दाखवले. समीरच्या लग्नाचे फोटो पण गोठ सुरु असताना त्याने स्वत:च्या फेसबुकवर टाकलेले आणि तेच सेम आत्ता सुंदरा सुरु झाल्यावर youtube वर बघितले. तोच समीर, तिच बायको.

या मालिकेतील एका सिन वर बरेच मीम येत आहेत फेसबुकवर. मराठी मालिकांमध्येसुद्धा सॉफ्ट पॉर्न येतंय कि काय?

स्मरणशक्ती गेलेली नसावी कारण काल तिने परत अनिरुद्धला झिडकारलं. उपचार किती हळू हळू करतात, पटकन दुसऱ्या डॉक्टरला बोलवायचे ना. मोठा मुलगा फारच भोळा असतो, वडीलानी काही सांगितलं तरी विश्वास ठेवतो. संजना आणि तिच्या नवऱ्याचं का पटत नसतं.

संजना आणि तिच्या नवऱ्याचं का पटत नसतं.>> तो संशयी असतो.

अरुंधतीची स्मरणशक्ती गेली नाहीये. ती मंगळसूत्र जाळून टाकणार आहे.

ती मंगळसूत्र जाळून टाकणार आहे.>>>> प्रोमो मध्ये जे दाखवतील तस् एपिसोड मध्ये दाखवले तर परंपरा खंडित नाही का होणार??

मागे मैत्रीण उभी दाखवली आहे,ती थांबवेल बहुदा,जाळण्यापासून

सोनं किती महाग आहे हाच विचार आला काल मनात. असंही तो होम विझलेला आहे आणि प्रोमो प्रमाणे मुळात काही घडतच नाही. अजून चार दिवसांनी अरु अनिरुद्धशी बोलणार असंही दाखवत होते काल. मागे अरुला आज कळणार उद्या कळणार करत किती दिवस घालवले, म्हणजे हे चार दिवस चार आठवडेही असू शकतात. तोपर्यंत अशीच तारीख पुढे पुढे ढकलत राहतील.

किती तो सात्विक संताप! Happy
पण नशिब, अरुची स्मृती शाबूत आहे...तिला सगळे आठवते आहे..
यश आणि त्याचा मोठा भाऊ अगदी सारखे दिसतात.. आडव्या बांध्याचे, बुटके, पसरट चेहर्‍याचे....ईशा पण.

मंगळसूत्र होमात टाकायचा प्रसंग अगदी हास्यास्पद झाला. धावण्याच्या शर्यतीत जसे स्पर्धक रेडी पोसिशन मध्ये उभे राहतात आणि तिसऱ्या शिट्टीला धावत सुटतात तशी देविका उभी होती Lol नंतर अरुला बोलायची संधी न देता तिला गाडीत घालून दुसरीकडे घेऊन गेली आणि तिथेही अरु बोल अरु बोल करत स्वतः च बोलत होती.
अरु आता नवऱ्याला सांगणार की माझं घर आणि माझी माणसं हेच माझं जग पण जर अनिरुद्ध म्हणाला की घटस्फोट दे आणि निघून जा माझ्या घरातून तर. काही भाग आधीच अनिरुद्ध यशला म्हणाला होता की माझ्या घरात माझेच नियम.

जर अनिरुद्ध म्हणाला की घटस्फोट दे आणि निघून जा माझ्या घरातून तर. काही भाग आधीच अनिरुद्ध यशला म्हणाला होता की माझ्या घरात माझेच नियम.>>
मग ती अप्पांना सांगायची धमकी देईल.कारण अप्पांनी एकदा अनिरुद्धला सुनावले होते की हे माझं घर आहे. असं झालं तर त्यालाच घराबाहेर काढतील आणि तो संजनाकडे रहायला जाईल. तिथे संजनाचा नवरा राडा करेल. Lol

हो ना.... अरु ला मध्यरात्री घराबाहेर नेलेलं कुणालाच समजलं नाही? एव्हढी आजारी ना ती? आणि सगळे तर तिच्याच काळजीत होते..इतकी गाढ झोप लागेल का?
आणि रस्त्यावर कशाला न्यायचं तिला एकदम?

सगळ्यांची कामे खोळंबलीत तिच्याशिवाय.....याच अर्थाचे संवाद सगळे तिच्याशी करतात तेव्हा राग येतो.
सकाळी उठल्यापासून ती सगळ्यांचे सगळे करणार, तशी सवय तिनेच लावली आहे म्हणा. पण आता तिला स्वता:ला स्वता:साठी वेळ द्यावा लागेल तेव्हा सगळ्यांच्याच सवयी बदलताना दाखवायला हवे.
नाहीतर सगळं सांभाळून तिने काही वेगळे करायला जाणे म्हणजे सूपर वूमनिया झाला समजावे.

लाडाची मी लेक गं..पहाताय का कुणी? कोण आहे हिरोईन ती? डोळे कसे आहेत तिचे..
दोन साईड ला दोन बुबुळं फिरवते ........
काय स्टोरी आहे? झेंडे ही दिसले तुपारे मधले...

Uhoh

Pages