खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मृणाली , तुम्ही दिलेल्या लाल चटणी मध्ये उडीद डाळ आणि हरबरा डाळ सम प्रमाणात घ्यायची का ?>>>>>>>>>

दोन्ही अंदाजे छोटा अर्धा चमचा..जसे मोहरी, जीरे घेतो फोडणीत तितकेच.

भगोरा कचोरी नवीन आहे माझ्या साठी.. छान दिसतेय
>>

हो
धागा टाका याचा नवीन पाकृचा>> प्लीज डिटेल कृती देऊ शकाल का?करून बघायला आवडेल..

पावभाजी यम्मी ....
उपवास स्पेशल मेदुवडे आणि साबुदाणे वडे ...
IMG_1709.jpg

बाकी, उपासाच्या दिवशी सकाळी सकाळी पोटभर नाष्टा करणारी मला मी एकटीच वाटायची, आहेत अजून काही जण माझ्या सारखे बघून बरे वाटले Wink

थँक यु सर्वांना ..
उपासाचे मेदूवडे कसे केलेत चिमु, रेसिपी सांगा >> वरई चा भात करून घेतला .. त्यात उकडलेला बटाटा , जिरं., मिरची , खोबरं, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट , मीठ आणि बाइंडिंग साठी थोड वरई चं पीठ टाकून सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि वड्याचा आकार देऊन तेलात तळायचे .. बाहेरून छान कुरकुरीत होतात ..
आणि ह्याच वडयांवर, छान आंबट गोड दही टाकले , आणि चिंच गुळ खजुराची चटणी, कोथिंबीर आलं मिरची ची हिरवी चटणी टाकून वरून मस्त कोथिंबीर भुरभुरली कि उपवासाचे दही वडे तयार .... !!

चिमु, भगरीचे वडे केलेत , छान!
पण तुम्ही भगरीचा उल्लेख केला अन मला भगरीचा उपमा आठवला.
भगरीचा उपमा मस्त शेंगदाण्याच्या आमटीत कालवून खायची मजाच निराळी

कझुमी ताट मस्तच..

पोहे छान वाटताएत.. लसूण कसा लागतो पोह्यात?पोहे भिजवलेले आहेत का?

फोडणीचे पोहे करताना पोहे आपण जसे आपण भिजवतो तसेच भीजवायचे.
पूर्व तयारी चार पाच पाकळ्या स्लाईस करून घेणे, तेल गरम करून मोहरी जिरे तडकले कि लसूण पाकळ्या फ्राय करायचे, फ्राय झाले कि गॅस बंद करायचा.
भिजवलेल्या पोह्यात, मीठ, मिरची, थोडे शेंगदाणायचे कूट, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, कडवलेले तेल एकत्र मिक्स करायचे

Pages