खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दुधाळ कॉफी बेस्ट.
साबुदाणा वडे टॉपक्लास.
अन्य डिशेस सुंदर.

शाकशुका बनवा..फार यम्मी असतं.. टोमॅटोचा जास्त वापर असल्याने थोडंसं आंबट लागतं पण ग्रीन शाकशुकासुद्धा बनवू शकता. गुगलवर शोधा.

शाकशुका काय असतं ते युट्युबवर सापडेल का?
व्हीबी कांदा, टॉमटो, मेथी, कांद्याची पात, कोथिंबीर घालून ऑम्लेट/भुर्जी करतो, अजून व्हेरायटी असेल तर हवीय.

Ok

मग फ्राईड एग , सनी साईड अप (जर पिवळा बलक कच्चा खाऊ शकता तर) नुसते उकडलेले, खोबरे टाकून केलेली अंडा कोशिंबीर (पण ही नुसती खाता येत नाही सोबत भाकरी मस्ट) प्रकार आवडते.

इथे एखाद नवीन प्रकार कळला तर ट्राय करता येईल आम्हाला पण

ओके धन्यवाद.
शाकशुका रेसिपीपण मिळाली युट्युबवर.

शाकशुका काय असतं ते युट्युबवर सापडेल का?>>
https://youtu.be/3AC8thsvwW4

माटुंग्याचे सगळे उडुपी गेले तेल लावत..
आजचा नाश्ता >> घी दोसा, नारळाची चटणी आणि
उडुपी स्टाईल भेंSSSSडीचं सांबार (बऱयाच ट्रायल्स नंतर फायनली उडुपी सांबारची ट्रिक कळाली) 7D67C7EC-4D9F-44D3-BF0B-2F8D223311B8.jpeg

सगळे फोटो मस्त आहेत.
उडुपी स्टाईल भेंSSSSडीचं सांबार (बऱयाच ट्रायल्स नंतर फायनली उडुपी सांबारची ट्रिक कळाली>>>काय आहे आम्हालाही सांगा

धागाच टाका.. शालेय जीवनात भावी ऊडपी सासूबाईंनी सांगितलेली सांबर रेसिपी . Happy
कलर आणि टेक्चर बाकी अफाट आलेय डोश्याला..

काय आहे आम्हालाही सांगा
Submitted by sonalisl on 18 December, 2020 - 15:44>> ट्रिक म्हणजे एक इंग्रेडिएंट जो मी कधी सांबार बनवताना टाकला नव्हता.. फोडणीत चमचाभर मेथीचे दाणे Happy

शालेय जीवनात भावी ऊडपी सासूबाईंनी सांगितलेली सांबर रेसिपी>> माझं शालेय जीवन तितकंही रंगीत नव्हतं ओ Happy

फ्रूट केक मस्त झाला आहे.
लावण्या भाकरी भरित मस्त.
मृणली मस्त ताट. पनीर बुरजी आहे का?
डोसे सांबार बघू न भुक लागली.

हो ना.. मस्त आहे पण आज चपाती मिसींग आहे Happy टोमॅटो च्या शेजारी वाटाणा टाकलेले काय आहे नाही कळलं आणि एका वाटीत गाजर का हलवा आहे का?

PSX_20201220_090117.jpg
मऊ लुसलुशीत उत्तपा, सोबत ओलं नारळ आणि कोथिंबीरीची चटणी आणि डोसा भाजी.
अर्थात उत्तप्पा आणि भाजी हे माझं कॉम्बिनेशन आहे.

वा बाजरीची भाकर आणि आमटी, आमटीत भाकर कुस्करून खाण्याची मजाच वेगळी असते.
कच्छी दाबेली सुरेख दिसत आहे.
उत्तपा मध्ये कांदे टाकले नाहीत का. कांद्या मुळे एक प्रकारचा स्वाद येतो अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे ह.
आज नाश्त्याला इडली आणि दोन चटण्या केल्या. एक ओल्या खोबऱ्याची जी कमी तिखट आहे आणि दुसरी लाल मिरच्या भिजवून कोथिंबीर जीरा लसूण टाकून झणझणीत केली आहे ज्या मुळे तोंडाला चव येते.
IMG_20201220_090802.jpg

ॠ, तुमची मुलं गोड्ड मिट्ट आहेत अगदी.

मृ, उपमा गोरा गोरा पान लुसलुशीत मस्त दिसतोय. मी रवा भाजून घालते तर असा गोरापान दिसत नाही. तुम्ही रवा न भाजता घालता का?

उपमा गोरा गोरा पान लुसलुशीत मस्त दिसतोय>>> Lol
थैंक्स !!
मी पण रवा खरपूस भाजते मंद फ्लेमवर पण रव्याचा रंग बदलायच्या आधी काढते.... नीट भाजला नाही तर चवीत खूप फरक पडतो म्हणजे छान नाही लागत. Happy

Pages