मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिक्चर मधे प्रिया अरूण आहे म्हणजे लक्ष्याशी तिचेच जमते का नंतर?>>

नाही ना Happy जोड्यांच्या बाबतीतही हा सिनेमा unique आहे Happy इतकी permutations-combinations आहेत!! साधारण लक्ष्या-प्रिया, कुलदीप-अलका या तशा रुळलेल्या जोड्या. पण सुरवातीला वर्षाला कुलदीप लग्नाची मागणी घालायला येतो तेव्हा कुलदीप - वर्षा ही जोडी जुळणार काय असं वाटायला लागतं. पण तेवढ्यात कुलदीपची गुंडागिरी आणि इतर प्रताप वर्षाला कळतात त्यामुळे त्या लग्नाची बोलणी फिसकटतात. मग लक्ष्या - अलका या जोडीचा डान्स दाखवून प्रेक्षकांना अजून धक्का बसतो. मग प्रियाची एंट्री पण तिचं लक्ष्याऐवजी अविनाशशी सूत जुळलेलं दाखवलंय Happy शेवटी एकतरी जोडी प्रेक्षकांच्या सवयीची असावी असा साक्षात्कार डायरेक्टरला होतो मग कुलदीप-अलका ही जोडी बळेच जुळवली जाते. आणि मग शेवटी उरलेले एकटे लोक एकत्र यावेत म्हणून लक्ष्या-वर्षा Lol

चिकू, Lol मी मराठी सिनेमाच्या वाटेस जात नाही ( अपवाद आहेत) आणि बेर्डे कपलच्या सिनेमाच्या तर नाहीच नाही. मी लक्ष्मीकांतचा पाहिलेला एकमेव पुर्ण सिनेमा - एक होता विदूषक.

चीकू Lol
ट्रिपल धक्का आहे म्हणजे:
- अलका कुबल मॉडर्न ड्रेस मधे आणि डान्स करते
- या डान्सचे सादरीकरण वरती लिहीले आहे तसे
- या कथेत मधेच ही जोडी कोठून आली हा तिसरा

प्रिया अरूण आहे पण लक्ष्याबरोबर नाही म्हणजे साधारण नमक हराम सारखे. अमिताभ आहे. रेखा आहे. पण एकत्र नाहीत. सारखे ऑड वाटते बघताना Happy

फारएण्ड .... हे तर क्युपिडांचे दुःस्वप्न Lol

 -अलका कुबल मॉडर्न ड्रेस मधे आणि डान्स करते.
हे दोन तीव्र सेपरेट धक्के आहेत. भूकंप व आफ्टरशॉक !
एका सिनेमात तिच्या रूपाची इतकी स्तुती केली होती की माझी फारच चिडचिड झाली. आधीच एडजस्ट करताहोत तर ... Don't push my limits !
----------

काल एका आलटून पालटून नावाच्या मराठी सिनेमात बारश्याचं गाणं पाहिलयं. अशोक सराफ , प्रशांत दामले , अजिंक्य देव , किशोरी शहाणे , निशिगंधा वाड यात पुरूषांनी बायांचे कपडे घातले होते. अशोक सराफ आफ्रिकन डिझाइन चा भयान झगा घालून , लाली लावून नाचत होता. अजिंक्य देव पंजाबी ड्रेस मध्ये .... एवढी सगळी "बाईमाणसं" पाहिल्याने पुढे फेफरे आल्याने काही लक्षात नाही.

नंतर तरतरी आल्यावर पाहिले तर बाळ किडनँप झाले होते. तर चंदू पारखी विचारत होता , बाळ वरच्या खोलीत तर गेले नाही ना ? बारा दिवसाचे बाळ हं..... पुढे लाइट जाऊन आम्ही कशी जोडी बदलली स्पष्टीकरण+ पत्रिका वगैरे झुठ + बाळ सापडणे + वर्षभर चुकीच्या जोडीशी संसार कथा....
आनंदी आनंद गडे.
समाप्त !

अस्मिता तो वाजवा रे वाजवा.. त्यात ते 'ही युगा युगांची नाती हळव्या प्रेमाची महती' हे सुंदर गाणं आहे. ह्या गाण्यात दोन कडव्यांच्या मध्ये फिल्रर म्हणून चक्क लाराज थीम आहे (सम व्हेअर माय लव वाली) लोल्स. किती ती चोरी ☺️ नक्की एका ते गाणं.
हा चित्रपट आम्ही चिंचवडच्या जयश्री थेटरात बघितला होता लहानपणी.

वाजवा रे वाजवा का ?
असेलही आमचं टिवी गाइड काही सांगते. एकदा अंगूर सांगत होतं , लावलं तर हिंदी टर्मिनेटर होता.
ऐकते ते गाणं , आठवतयं बरं ... पण बघायची सहनशीलता राहिली नाही हल्ली Proud

चुकून बोर्डे झालं ! धन्यवाद चिनुक्स.

दामले मास्तर आले वाटतं छडी घेऊन.
मला वटते चिनूक्स चा एखाद्या तळघरात कुलभुषण खरबंदाचा "शान" मध्ये असतो तसा असतो तसा अड्डा असावा.
एखाद्या बीबी वर तपशीलाची चूक, व्याकरणाची चूक वगैरे झाली की एखादा लाल दिवा लूकलूकत असाव व मग मास्तर छडी घेऊन निघत असावेत.

Lol बारा दिवसांचे बाळ स्वतःच फिरत गेले का वरती?

अशोक सराफ , प्रशांत दामले , अजिंक्य देव , किशोरी शहाणे , निशिगंधा वाड यात पुरूषांनी बायांचे कपडे घातले होते. >>> Happy त्या दोघी हिरॉइनी नक्की त्याच होत्या ना? नाहीतर त्यातला एक सचिन निघायचा.

मास्तर एकदम "बघतांय हा" मोड मधे Happy विकु - टोटली.

अस्मिता तो वाजवा रे वाजवा.. त्यात ते 'ही युगा युगांची नाती हळव्या प्रेमाची महती' हे सुंदर गाणं आहे<< 90 च्या दशकातल्या स्टाइल ने विचार केला तर मस्त विनोदी आहे हा चित्रपट.. अजिंक्य देव, किशोरी शहाणे,प्रशांत दामले,निशीगंधा वाड अशा जोड्या आहेत.. ते अदलाबदल करुन लग्न करतात कारण त्यांचे वडिल (अशोक सराफ ,सतिश कौशिक)एके काळाचे मित्र आता शत्रू असतात..आणि अशी अदलाबदल करुन लग्न करणार नाहीत आपल्या मुली म्हणुन अशी मुलींचे वडिल कौशिक साब शक्कल लढवतात... पुढे एकत्र येण्या साठी कशी धडपड करतात.. पाईप वरुन उतरताना प्रशांत दामले पडतोच काय.. अजिंक्य आणि किशोरी घरी आई वडिल नसताना एकत्र भेटतात आणि पाय तूटलेला प्रशांत बाहेर पहारा देत असतो तेव्हा वडिल आल्यावर आपली चोरी पकडू नये आणि आतल्या भावाला सावध करण्या साठी केलेले अभिनय आणि ते गोंन्द्या आला रे...गोन्द्या आला रे...भारीच होत.. Lol

वाजवा रे वाजवा थिएटर मधे पाहिलेला आठवतोय. तेव्हाचे ही सगळी नावंच बस असायची. पिक्चर कसाही असू दे आवडायचा. फारशा काही अपेक्षा नसायच्याच. Happy

मला पण आवडला होता वाजवा रे वाजवा
आणि काहीतरी डब्यात चिठ्ठी वगैरे प्रकार पण होता
यात सतीश शाहा अशोक सराफ चं खूप भारी काम आहे
बाकी लोकांसाठी पाहिला नाही तर या दोघांसाठी नक्की बघा.
तो मराठी पिक्चर कोणता ज्यात अशोक सराफ सेक्रेटरी च्या सारख्या पडणाऱ्या पदरावर फेव्हीकोल ओतून तो खांद्याला चिकटवून टाकतो?धमाल पिक्चर होता एकदम.नाव कळलं तर शोधते.

तो मराठी पिक्चर कोणता ज्यात अशोक सराफ सेक्रेटरी च्या सारख्या पडणाऱ्या पदरावर फेव्हीकोल ओतून तो खांद्याला चिकटवून टाकतो?>>>>>>>>>>> हो आठवतो. Lol गंमत जंमत का?

मी एक गाडी बाकी अनाडी, धडाकेबाज, दे दणादण, थरथराट, झपाटलेला, हमाल दे धमाल, धूम धडाका, गंमत जमत, हे असले सगळे पिक्चर थेटरात बघितले आहेत. आजही बघू शकेन ☺️
मी ज्यांच्याकडे सी एस ची आर्टिकल केली त्या मास्तरांना दादा कोंडकेचे चित्रपट आवडत , हे पूर्वी (साधारण 2000-2005) प्रभातला कायम मॅटिनीला रिरनला लागत, ते पण पाहिलेत 2-3. त्यातला मुका घ्या मुका हा अत्यन्त आचरट पिक्चर आहे पण वेड्यासारखा हसलो होतो जेंव्हा पाहिला तेंव्हा ☺️☺️

Submitted by लंपन on 11 December, 2020 - 23:47

>>>> संपुर्ण पोस्टला मम .. Happy

तो मराठी पिक्चर कोणता ज्यात अशोक सराफ सेक्रेटरी च्या सारख्या पडणाऱ्या पदरावर फेव्हीकोल ओतून तो खांद्याला चिकटवून टाकतो?<<< आणि दूसर्या एका चित्रपटा मध्ये अशोक सराफ स्त्री लंपट बॉस असतो..आनी सगळया फीमेल स्टाफ ला डिक्टेशन ला बोलावून फ्लेर्ट करतो... सविता प्रभुणे आठवते आहे...चित्रपट नाही आठवत... तेव्हा तो सीन बघुन चिड आलेली... अशोक सराफ हा असे दमदार अभिनेते आहेत की जो विनोदी,खलनायकी गरीब,श्रीमंत कुठलही charactor लीलया पेलतात

तो मराठी पिक्चर कोणता ज्यात अशोक सराफ सेक्रेटरी च्या सारख्या पडणाऱ्या पदरावर फेव्हीकोल ओतून तो खांद्याला चिकटवून टाकतो?धमाल पिक्चर होता एकदम >>>
शुभमंगल सावधान (१९९२) नावाचा पिक्चर आहे तो. अशोक वर्षा जोडी आहे. ती सारखी संशय घेत असते त्याच्यावर आणि तिची आई आग लावत असते अजून. रेखा राव पण आहे या पिक्चरात.

तुरू, " कारण त्यांचे वडिल (अशोक सराफ ,सतिश कौशिक) एके काळाचे मित्र आता शत्रू" - सतिश शाह चा ऐवजी सतिश कौशिक झालंय.

अस्मिता तो वाजवा रे वाजवा.. त्यात ते 'ही युगा युगांची नाती हळव्या प्रेमाची महती' हे सुंदर गाणं आहे. ह्या गाण्यात दोन कडव्यांच्या मध्ये फिल्रर म्हणून चक्क लाराज थीम आहे (सम व्हेअर माय लव वाली) लोल्स. किती ती चोरी ☺️ नक्की एका ते गाणं.
हा चित्रपट आम्ही चिंचवडच्या जयश्री थेटरात बघितला होता लहानपणी. >>> नुसत तेच नाही, गाण्याच्या कडव्याची चाल थोडी कैसे कहु बिना तेरे जिन्दगी ये क्या होगी वर बेतलेली वाटते!
आवडतो हा पिक्चर! reminds me of good old simpler times!

८०-९० च्या दशकात आलेले सिनेमे म्हणजे जिंवत टॉर्चर होते.
एक दोन सोडले तर अलका कुबल, वगैरे कंपनी डोक्यात काणारी होती.

येडा का खुळा पहायला थेटरात गेलेलो गावच्या मंडळींना विरंगुळा म्हणून. मी झोपले चक्क , बाकीचे फक्त खात व गप्पा मारत होते. दिड तासातच मंडळी वैतागली आणि घरी येवून झोपलो. ३-६ वेळ मध्ये दिड तास फुकट घालवला.
थेटरात फुकटची गर्दी कारण अलका कुबल्व्चा माहेर्॑ची साडी तेव्हाच आलेला....
आलका कुबलचा हा खास पैसे देवून पाहिलेला पहिला वा शेवटचा चित्रपट. दूरदर्शनवर वर कधी पाहिलेच नाही.
लोकांना अल्का कुबल आवडणं माझ्यासाठी कोडं आहे.
त्यात तिचे भयाण ड्रेसिंग सेन्स. येडा का खुळा मधल्या त्या गाण्यात, भयाण ड्रेस, विग अचाट पात्र वाटत होती...

शब्दाविना ... हे गाणं मला खुपच आवडते गाणं पण बघताना तो बोजड प्रशांत दामले आणि कविता लाड अगदी गाण्याला सूट होत नाही.
त्यात मध्येच प्रशांत दामले विनोदी भाव दाखवतोय असे वाटते.
https://youtu.be/SM7kiLAnLJU

वाजवा रे वाजवा मलापण आवडला होता.

अजिंक्य देव आणि किशोरी शहाणे एका खोलीत भांडत असतात आणि प्रशांत दामले खोलीच्या बंद दाराला बाहेरून स्टेथोस्कोप लावून ते भांडण ऐकत असतो. भांडताना चिडून अजिंक्य देव खोलीच्या दाराच्या आतलं हँडल उखडून काढतो आणि त्यामुळे प्रशांत दामलेच्या कानठळ्या बसतात हा सीन याच पिक्चरमधे आहे का? मी खूप हसले होते तो बघून.

लाल टाॅप लाल धोती परीधान करून कमरेला बहुतेक पाॅढरा वीतभर पट्टा लावून नाचणारी सविता प्रभुणे पाहिली होती कोणत्यातरी गाण्यात तेव्हा गाठोड्याला पाय फुटल्यासारखं वाटलं होतं.
अशोक लक्षा सचिन अन डॅमीटनंचवाट लावली मराठी चित्रपटसृष्टीची असं माठं ठाम मत झालं होतं.

मी एक कृष्णधवल चित्रपट पाहिला होता. दोन जोड्या होत्या. राजा गोसावी, जयश्री, चित्रा व रेखा बहिणींपैकी एक व रमेश देव असे अंधुकसे आठवतेय. दोघेही कडके असतात, एकाच खोलीत राहात असतात, भाडे थकवलेले असते. तरी ह्यांना सुंदऱ्या पटतात. एकजण लग्न करून घरी येतो, जिना चढताना नवपरिणीत वधूला सांगत असतो की बघ कसे त्या दुसऱ्याचे सामान फेकून देऊन त्याला घालवतो व खोली आपल्या ताब्यात घेतो. तोच त्याचेच सामान त्याच्या अंगावर वरून तो दुसरा फेकतो. तोही नवपरिणीत वधू घेऊन ह्याच्याआधी पोचलेला असतो. शेवटी मांडवळी होऊन एका खोलीत प्लायवुड पार्टिशन घालून दोघे राहतात. पण गंमत ही होते की पहिल्याच्या बायकोच्या आवडी दुसऱ्याशी जुळतात आणि दुसऱ्याच्या पहिल्याशी... मग आपापल्या जोडीदाराचे मन न मोडता स्वतःचे मन रमवायचा प्रयत्न दोन्ही जोडपी करतात. नाव आठवत नाहीय, पण बघायला खूप आवडेल. ह्या एका कालखंडात खूप दर्जेदार विनोदी चित्रपट येऊन गेले, यु ट्यूबवर सापडत नाहियेत Sad Sad

साधनाताई मला पण थोडेसे आठवते आहे.. एकीला वाचायची आवड असते.. आणि एकीला खाऊ घालायची.. अवघाचि संसार नाव असेल कदाचित..

Pages