मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलका कुबल मॉडर्न ड्रेस मधे आणि डान्स करते.
हे दोन तीव्र सेपरेट धक्के आहेत. भूकंप व आफ्टरशॉक !
एका सिनेमात तिच्या रूपाची इतकी स्तुती केली होती की माझी फारच चिडचिड झाली. आधीच एडजस्ट करताहोत तर ... Don't push my limits !>>>
याच सिनेमात याच गाण्याच्या आधी ते गुंड तिला कॉलेजक्वीन म्हणतात Lol

तिचा सुवासिनीची ही सत्वपरिक्षा अशा भयानक नावाचा चित्रपट आहे त्यात तिचा फोटो तिचे भावी सासरे आपल्या मुलाला दाखवतात आणि त्यांच्या तोंडी 'फोटो बघ मग कळेल तुला काय चीज आहे ती, लाखात मुलगी आहे लाखात!' अशा अर्थाचे संवाद आहेत Happy

मॉडर्न ड्रेस आणि डान्स अलका कुबलना अजिबात जमत नाही तरी त्यांच्या सुरवातीच्या चित्रपटात भारतीय पारंपारिक वेशभूषेत त्या चांगल्या दिसायच्या हेमावैम Happy

अलका कुबलचे माहेरची साडी टाईप चित्रपट मला अजिबात आवडत नाहीत, पण वेडिंगचा शिनेमा नावाच्या अलीकडच्या चित्रपटात त्यांनी नायकाच्या आईचं मस्त केलंय काम. (हा पहिला सुखद धक्का आणि चित्रपट संपताना मुक्ता बर्वेचा बॉयफ्रेंड म्हणून स्वप्नील जोशी न येता श्रेयस तळपदे आला हा दुसरा सुटकेचा निःश्वास Wink )

तो एक हळद रुसली कुंकू हसल असा एक अश्विनी भावे चा कैच्याकै पिक्चर होता त्यात एक झाडू झेलण्याचा शॉट आहे. तो शॉट महान आहे केवळ महान

तो एक हळद रुसली कुंकू हसल असा एक अश्विनी भावे चा कैच्याकै पिक्चर होता >>>
आठवतो तो..खरच भयाण चित्रपट होता. आधी नावही इतकं विचित्र होतं त्या सिनेमाचं. सिनेमा बघितल्यावर नावाचा significance (?) कळला. सतीश पुळेकर आणि विजय कदम होते ना तिच्याबरोबर?

वेडिंग चा सिनेमा पण चांगला होता पिक्चर.
अलका कुबल ची एक मुलाखत काही वर्षांपूर्वी वाचली होती,त्यात ती माहेरची साडी टाईप रोल्स पेक्षा अगदी विरुद्ध डॅशिंग प्रत्यक्षात आहे असं म्हटलं होतं.म्हणजे त्याकाळी एकटी लॉंग ड्राईव्ह, शिव्या घालणे, कार चे व्हील बदलणे इत्यादी.
पण तरीहि पिक्चर मध्ये माहेरची साडी नंतर डोक्यावर इतके आघात झाल्यावर अलका कुबल ना मॉडर्न कपड्यात पाहणे शक्य नाही Happy

माहेरची साडी टाईप रोल्स पेक्षा अगदी विरुद्ध डॅशिंग प्रत्यक्षात आहे असं म्हटलं होतं.>> ओह!
हळद रुसली कुंकू हसलं मधे अश्विनी भावे दोन वेळा पदरात काही ना काही झेलते. आधी ओलांडायचं माप (ते बहुतेक मोठी जाऊ लाथाडते) तेही आतल्या धान्यासहित.. आणि दुसऱ्यांदा हा झाडू Happy

अवघाची संसारमधे पाच बहिणी असतात. हा वेगळा दिसतोय>>>

बरोबर, ती कथा वेगळी आहे. रा गो ला जयश्रीशी लग्न करायचे असते पण तिच्या मोठ्या बहिणी उजवल्याशिवाय ते शक्य नसते.

हळदी कुंकू नावाचा अशक्य पीळ चित्रपट थेटरात जाऊन पाहिलेला. रंजना, रवींद्र महाजनी व उषा नाईक पीळ पीळ पिळून काढतात ....

अवघाची संसारमधे पाच बहिणी असतात. हा वेगळा दिसतोय>>>

बरोबर, ती कथा वेगळी आहे. रा गो ला जयश्रीशी लग्न करायचे असते पण तिच्या मोठ्या बहिणी उजवल्याशिवाय ते शक्य नसते.>>>>>

गोविंदा चा एक असाच सिनेमा होता ना जोरू का गुलाम ट्विंकल खन्ना बरोबर

जो का गु , अ सं चा हिंदी रिमेक असे वाचले होते. मला तो राजेश खन्नाचा जो का गु वाटलेला, गोविंदाचाही आलेला हे माहीत नव्हते.

वावे +१ वेडींगचा शिनेमा हा बहुतेक अलका कुबलचा पहिला आणि शेवटचा आवडलेला चित्रपट.
कुणी लोणावळा बायपास पाहिलाय का? कसा आहे?

साधना त्या पिक्चर मधे रमेश देव नाहीये, राजा गोसावी आणि शरद तळवळकर आहे. तो भजी खायचा सीन अजूनही आठवतो. खूप लहानपणी बघितलेला tv वर, कॉमेडी मस्त, त्यावेळी प्रचंड एन्जॉय केलेला.

एक कुठला तरी सिनेमा आहे, ज्यात अलका कुबल गाव की छोरी झाली आहे. एकदा नदीवर/विहिरीवर गेली असताना गुंड मागे लागतात तेव्हा ती हातातल्या पाण्याच्या हंड्याने सगळ्या गुंडांना कुबल कुबल कुबलते असा प्रसंग आहे. तिने एकटीने कुणाच्याही मदतीशिवाय फायटिंग करण्याचा तो एकमेवाद्वितीय सीन असावा. मला वाटतं अजूनही स्त्रीप्रधान चित्रपट सोडले, तर इतर ठिकाणी स्त्रीने एकटीने मारामारी केली तर त्याला सेन्सॉरचं सर्टिफिकेट मिळत नाही. ह्या वरच्या चित्रपटात हिरोस्थानी प्रशांत दामले आहेत. कुणाला आठवला तर नाव सांगा.

तो येडा की खुळा मधला अलका कुबलचा भाउ म्हणजे विलास राज. ९०ज मधे नाटकांत काम करत असे. क्षमा राज आणि विलास राज ही दोन्ही नावे लक्षात आहेत तेव्हाची. बहीण भाऊ की नवरा बायको ते माहीत नाही.

५-१० मिनीटे पाहिला यू ट्यूबवर Happy "दीवाणा" गाण्यासकट. त्याकाळात मराठी चित्रपट गाण्यांत हे "दीवाणा" फार बोकाळले होते.

एक कुठला तरी सिनेमा आहे, ज्यात अलका कुबल गाव की छोरी झाली आहे>>>>>>> चार दिवस सासूचे

तसाच, रेखाचा हिंदी सिनेमा आहे, बिवी हो तो ऐसी. फारुख शेख हिरो आहे. सलमान खान तिचा दीर दाखवलाय. त्याचा पहिलाच चित्रपट.

अंजू, बरोबर आहे. चित्रपटाचे नाव आठवत नाही.

रागो शत जोडीने बरेच चित्रपट केलेत. काल यु ट्यूबवर 'सुधारलेल्या बायका' बघितला. तीच ती नेहमीची घिसीपीटी कथा. शिकली-सुधारलेली बायको म्हणजे ती महिला मंडळ करणारी, त्यात भाषणे ठोकणारी व घरातले काहीही काम न करता उर्मटपणे सगळ्यांचा अपमान करणारी. {त्या काळी महिला मंडळ म्हणजे (अती शहाण्या) शिक्षित स्त्रियांची काशी होती बहुतेक, म.मं मध्ये जाणारी स्त्री दाखवली की तिचा पुढचा करियर ग्राफ डोळ्यासमोर लगेच यायचा)

चित्रपटात सुदैव इतकेच की 'सुधारलेल्या' मागे 'काही' हे संख्यावाचक विशेषण लावून सगळ्याच सुधारलेल्या बाया अशा नाहीत ही सारवासारव केली गेली. ते असो, चित्रपट खळखळून हसायचे काही क्षण मात्र निश्चित देतो.

मी वर लिहिलेला 'कधी करीशी लग्न माझे' आधी दहा भागांत तरी अर्धा होणार, आता पूर्ण अपलोड केला गेलाय. लग्नासाठी आसुसलेली व मॉडर्न कपड्यात हिंडणारी जयश्री शहाणी होताच अंगभर नऊवारी नेसून, पाहायला आलेल्या मंडळींना वाकून नमस्कार करणारी व त्यांच्यासमोर खुरमांडी घासुन अंगठ्याने जमीन उकरणारी व कित्ती चांगली मुलगी ठरते....

शिकलेल्या मुली अतिशहाण्या होतात व संसार वाऱ्यावर सोडून बाहेर भटकतात हा महत्वाचा संदेश मराठी चित्रपटात वारंवार देऊनही मराठी लोकांनी मुलींना शिकवले याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत.

साधना, Lol
काय अभ्यास काय अभ्यास!!>>>> हरचंद, दोन्ही चित्रपट पाहिलेले टीव्हीवर. त्यामुळे लक्षात होते.

तृप्ती नाडकर नाव आहे चांदणे शिंपीत मधल्या अभिनेत्रि चे कदाचित. पण ती नेपाळी मुव्ही मध्ये काम करते. तिला सर्च केले तर तिचा अणि हिचा चेहरा सारखा च वाटला >> हो तिच ती ...

आणि अजून एक चित्रपट होता त्यात निळू फुले वडील आणि सीमा देव आई असते आणि त्यांना ५ मुली असतात ... हुंडा न देता त्यांना लग्न लावायचे असते मुलींचे ..मग वेगवेगळ्या क्लृप्त्या करून ते लग्न लावतात कि काहीतरी ....' कापा केक कापा केक' असं गाणं आहे त्यात .नाव नाही आठवत

आणि अजून एक चित्रपट होता त्यात निळू फुले वडील आणि सीमा देव आई असते आणि त्यांना ५ मुली असतात ... हुंडा न देता त्यांना लग्न लावायचे असते मुलींचे ..मग वेगवेगळ्या क्लृप्त्या करून ते लग्न लावतात कि काहीतरी ....' कापा केक कापा केक' असं गाणं आहे त्यात .नाव नाही आठवत ------------ पोरींची धमाल बापाची कमाल

शिकलेल्या मुली अतिशहाण्या होतात व संसार वाऱ्यावर सोडून बाहेर भटकतात हा महत्वाचा संदेश मराठी चित्रपटात वारंवार देऊनही मराठी लोकांनी मुलींना शिकवले याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत.>> अगदी, अगदी.

जुने ते सोने हाही चित्रपट असाच. त्याच सीमा एकदम मॉडर्न मुलगी असते तर तिचा प्रियकर रमेश देव एकदम कर्मठ जुनाट घरातला. पण सीमाच्या नादाने तो पार्टी, क्लबमधे जातो. तिच्याबरोबर पळून जाऊन रजिस्टर लग्न करतो. पण लग्नाच्या पहिल्या रात्री ती त्याला क्लबमधे पार्टीला घेऊन जाते आणि तिच्या एका मित्राबरोबर डान्स करायला जाते तेव्हा रमेशला मॉडर्न मुली म्हणजे किती भयानक वाईट असा साक्षात्कार होतो आणि तो तिच्याशी कडाक्याने भांडून तिला सोडून आपल्या घरी येतो आणि आपल्या कर्मठ बापाने पसंत केलेल्या शालीन मुलीशी विवाहास बोहल्यावर उभा राहातो. सीमा तिथे धावत येते आणि त्याचे माझ्याशी लग्न झाले आहे तो कायद्याने दुसरे लग्न करू शकत नाही असा आरडाओरडा करते. पण कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही. रमेशही तिला झिडकारुन टाकतो. मग सासरेबुवांच्या पाया पडून ती गयावया करते. ते तिला मॉडर्न कपडे, मॉडर्न चालीरीतीचा त्याग करायला सांगतात. नऊवारी, जुन्या वळणाचे दागिने घालायचे, घराच्या उंबर्‍याबाहेर पडायचे नाही अशा अनेक अटी घालतात आणि त्या मान्य असतील तरच तिचे रमेशबरोबर विधिवत लग्न लावून सून म्हणून स्वीकार करतील असे सांगतात. लगेच सीमाचे परिवर्तन होऊन शेवट गोड होतो (?) Sad

वरील चित्रपटात दुसरी अजब गोष्ट म्हणजे रमेश जिच्याशी लग्नाला उभा राहातो ती सीमाची मैत्रीणच असते. आधी ती सीमाप्रमाणेच मॉड, क्लबमधे जाणारी असते. सीमा ज्या मित्राबरोबर डान्स करायला जाते तो हिचा प्रियकर असतो. पण तिच्या कर्मठ बापाला याचा पत्ता लागून ते आणि तिचा भाऊ तिला चोप देऊन शालीन बनवतात आणि रमेशबरोबर तिचे लग्न जुळवतात Sad तिचा प्रियकर रमेशला धमकावयाला येतो तर रमेशचा बाप त्याला चोप देतो! सीमाने याच्याशी लग्न केले होते हे जाणून ती मैत्रीण सीमाला याची बातमी देते आणि मग सीमा लग्नाच्या ठिकाणी येते. तिथे ती आपल्या मैत्रीणीवर याच्याशी लग्न करायला तू तयार कशी झालीस म्हणून ओरडते तर ती मैत्रीण 'हे काय चाललय ते माझ्या मर्जीने थोडंच चाललंय? मला काय विचारतेस?' असा हतबल जबाब देते Sad

रमेश, सीमा ही नावे बघून अपेक्षेने चित्रपट बघायला घेतला आणि पूर्ण अपेक्षाभंग झाला Sad

शिकलेल्या मुलींची ऍलर्जी.... Lol

अश्विनी भावेचा शाब्बास सुनबाई पण ह्याच थिमवर आहे. जीन्स व शर्ट घातलेली मुलगी बदचलन पण तीच मुलगी नऊवारीच्या वेष्टनातून आली की एकदम खानदानी होते.

वर्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटाबद्दल खूप वाचलंय... बहुतेक गदिमांची भूमिका हे आकर्षण असावे. थोडासा पाहिला पण इंदुमती पैगणकरला पडद्यावर पाहणे पीळ आहे. इतकी प्रचंड कृत्रिम बाई... पुढे गदिमा व राजा परांजपे जुगलबंदी आहे असे ऐकिवात आहे पण मी तिथवर पोचले नाहीये अजून Happy

फार पुर्वी "कुलस्वामिनी अंबाबाई" म्हणून एक चित्रपट पहाण्याच्या योग आला होता. माझ्या आईला आशा काळे फार आवडायची म्हणून तिच्यासाठी हा चित्रपट बघावा लागला. तसेही माझी आमच्या कोल्हापुरच्या अंबाबाईवर श्रद्द्धा आहे त्यामुळे तो चित्रपट पहायचा होताच. त्यामुळे कोल्हापुरातच हा चित्रपट थेटरात पाहिला.

पण चित्रपट मात्र भयंकर होता. आशा काळे नेहमी प्रमाणे अतिसोशिक दाखवली आहे. चित्रपटात जो येतो तो हिचा छळ करतो. हिच्या डोळ्यात सदैव पाणी. त्यामुळे थेटरमध्ये आलेल्या सर्व बायका रडत होत्या. हिला छळायला म्हणून हिचा नवरा कुलदिप पवार, सासू ललिता पवार आणि हिची नणंद रंजना अशी मंडळी घरात.. असले तीन जण घरी असतील तर प्रत्यक्ष देवीने ही त्या घरात जायला नकार दिला असता. पण ही पडली आशा काळे. त्यामुळे व्यवस्थित सर्वांकडून छळून घेते. थेटरातल्या बायका ललिता पवारला असल्या शिव्या देत होत्या की ती जर आली असती तर मार खाऊनच गेली असती. आशा काळे मात्र सर्वांचे निगूतीने करत असते. त्यातच हिच्या नवर्‍याला (म्हणजे कुलदिप पवारला) काहीतरी होऊन तो लुळा होतो. त्यामुळे तो अजून हिला छळतो आणि ही मात्र त्याला काहीही करून बरे करायचेच निश्चय करते. शेवटी आई अंबाबाईच्या क्रुपेने सगळे व्यवस्थित होऊन दुष्ट मंडळी सुधारतात असे दाखवले आहे.

माझ्या आईला सुद्धा आशा काळे खूप आवडते. त्यामुळे तिचे एकूणएक सिनेमे पहिले आहेत आईबरोबर.

खूप रडकी बाई आहे ती आणि अलका कुबल

जावयाची जात ...पद्मा चव्हाण आणि कुलदीप पवार..असाच एक चित्रपट... शिकलेली मुलगी,पुण्याची मग सर्व पुरुष जात कशी वाईट... लग्न न करण्याचा निश्चय.. गावाकडच्या हीरो सोबत लग्न होत..आणि कस हिच हृदय परिवर्तन होत.. काही गोष्टी चांगल्या आहेत..जस गावाकडची सासू समजून घेते सुनेला..तिला वेळ देते

Pages