मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.youtube.com/watch?v=afiKLgih8VY
शिरीष कणेकरांची टिंगल करणार्‍या लेखावर उतारा म्हणून जावेद अख्तरचे हे भाषण ऐका. जुन्या व नव्या हिंदी सिनेसंगीतातील फरक!

मोलकरीण, अजुनहि हमखास डोळ्यातुन पाणी काढणारा चित्रपट. गाणी तर अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी. आशाताईंनी काय टीपेचा सूर लावलेला आहे एकवार तरी राम दिसावा या गाण्यात; चित्रीकरण हि अगदि साजेसं, बटुचे भाव अगदि हृदयाला हात घालणारे...

जावेद अख्तरशी त्याच्या प्रत्येक शब्दातल्या काना मात्रा वेलांटीसकट सहमत. हल्लीचे काही चित्रपट मला आवडलेत पण त्यातली गाणी नंतर ऐकली तर ती गाणी आधी कुठे कधी ऐकली होती हे सांगताच येत नाही. मुळात शब्दच बहुतेकवेळा कळलेले नसतात, मग गाणे ओळखणार कसे?

बहुतेक वेळा कणेकर किंवा तत्सम लेखक टिंगलखोर लेख लिहीतात तेव्हां ते एका विशिष्ट कोनातून लॉजीक लावतात. सूर टवाळीचा असल्याने प्रतिसाद देणे म्हणजे टवाळी ओढवून घेणे हे नक्की असल्याने सज्जन लोक गप्प राहतात. अर्धविजारी कंपूचा आवडता फॉर्म आहे हा.

>> निळू फुले हे मराठीतले आजवरचे सर्वोत्कृष्ट सहज अभिनय करणारे कलाकार होते ..

वादच नाही हा अभिनेता म्हणजे. पडद्यावरच्या त्यांच्या नकारात्मक भूमिका करण्याच्या (स्त्रियांवर बलात्कार अत्याचार वगैरे करणारा खलपुरुष) काळातला किस्सा आहे. तशा भूमिका त्यांनी इतक्या प्रमाणात आणि इतक्या सहज आणि हुबेहूब केल्या होत्या कि जनमानसात त्यांची तशीच प्रतिमा बनली होती (आज सुद्धा निळू फुलेंच्या नावावर "बाई वाड्यावर या" मिमी सोशल मीडियामध्ये फिरत असतात). एकदा एक अभिनेत्री शुटींगच्या दरम्यान त्या गावात राहणाऱ्या तिच्या दूरच्या नातेवाईकांना भेटायला म्हणून गेली. बरोबर निळूभाऊ पण होते. तिच्या मागून निळूभाऊनी त्या घरात प्रवेश करताच एक आज्जीबाई आतून बाहेर येत कडाडली, "ह्यो? ह्या मुडद्याला बरोबर घेऊन आलीस व्हय गं? बाहेर हो म्हणावं ह्याला आधी" Biggrin मला आठवतंय साधारणपणे त्याच काळात कोल्हापुरात एकदा बसने प्रवास करत असताना समोरच्या बाकावर दोन लहान शाळकरी मुले बसली होती. त्याला एक दुसऱ्याला सांगत होता, "निळू फुले म्हणजे आमच्या पप्पांचे मित्र आहेत. अनेकदा आमच्या घरी येतात. खऱ्या आयुष्यात ते स्वभावाने इतके चांगले इतके चांगले आहेत म्हणून सांगू...". तेंव्हा माझ्यासाठी निळू फुलेंची ती पहिलीच सकारात्मक ओळख होती. नंतरच्या काळात निळूभाऊंची पडद्यावरची खोटी नकारात्मक ओळख पुसली जाऊन ह्या मुलाने सांगितलेलीच त्यांची ओळख महाराष्ट्रात सर्वदूर पसरली.

>> मुक्ता थोडासाच पाहिलाय. युट्युबवर आहे का ते बघायला हवे.
या वेबसाईटवर मिळाला. पण प्रीमियम कॉपी आहे (२०० रुपये असे काहीतरी दिसत आहे)

https://www.hotstar.com/movies/mukta/1770004272/watch

तसेच Amazon Prime वर पण आहे.

काल रात्री इथल्या प्रतिसादावरून पुढचं पाऊल चित्रपट पहिला, खरंच निळू फुले यांनी अप्रतिम बाप साकारलाय ... सर्वात छान सीन जेव्हा मुलीला भेटायला सासरी जातात आणि तिथे पैशावरून अपमान होतो ... आणि तो राग ,ते फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी ते बाहेर रस्त्यावरील विजेच्या खांबावरील दिवा दगड मारून फोडतात.. अगदी अगदी मस्तच .....!

जाऊ तिथे खाऊ मकरंद अनासपुरे यांचा चित्रपट, विहिर चोरीला गेलिये हे न्यायालयात सिध्द करतो. Government system मधल्या पळवाटा आणि लाचखोरी मस्त दाखवली आहे. आजच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे होता.

एक गाव धोबीपछाड का? >>>> गाव नाही ग बयो, डाव. मस्त विनोदी चित्रपट आहे. फुल्ल टू एंजॉय. >>>> लयभारी हाये. आम्ही बघतो अधूनमधून. मुक्ता बर्वे नी खूपच सुंदर अभिनय केलाय. ' ये पळय' हा dialogue लयभारी म्हणते.

जाऊ तिथे खाऊ मकरंद अनासपुरे यांचा चित्रपट, विहिर चोरीला गेलिये हे न्यायालयात सिध्द करतो. Government system मधल्या पळवाटा आणि लाचखोरी मस्त दाखवली आहे. आजच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे होता.

नवीन Submitted by ShitalKrishna on 12 August, 2018 -
>>>>>>
तो चित्रपट "कायद्याचं बोला" आहे ,जाऊ तिथं खाऊ नाही. मकरंद अनासपुरे आणि शर्वरी जमेनिस अस्ं लै ऑफ बॅलन्स पेअरींग होतं त्या सिनेमात.

विहीर चोरीला जाते तो कायद्याचं बोला आहे ? मला असं वाटतंय की भाचा आणि त्याचा मित्र चोरीच्या प्रकरणात अडकतात त्यांना वकील म्हणून मका सोडवतो तो कायद्याचं बोला.

चेकमेट व गैर दोन्ही पाहिलेत, चेकमेट व्यवस्थित बांधून ठेवतो, धक्के बसतात ते खरेच बसतात. क्लायमॅक्स थोडासा ढेपळलाय. >>>> मस्तय चेकमेट , हिंदी चित्रपटाच्या तोडीचा.
आता प्रदर्शित झाला असता तर खूप चालला असता.

तो चित्रपट "कायद्याचं बोला" आहे ,जाऊ तिथं खाऊ नाही. मकरंद अनासपुरे आणि शर्वरी जमेनिस अस्ं लै ऑफ बॅलन्स पेअरींग होतं त्या सिनेमात.>>>> नाही जाऊ तिथे खाऊ मधे विहीर चोरीला जाते.
"कायद्याचं बोला" यात भाच्याला सोदवतो मकरंद.

विहीर चोरीला जाते तो कायद्याचं बोला आहे ? मला असं वाटतंय की भाचा आणि त्याचा मित्र चोरीच्या प्रकरणात अडकतात त्यांना वकील म्हणून मका सोडवतो तो कायद्याचं बोला. >>>> बरोबर

तो चित्रपट "कायद्याचं बोला" आहे ,जाऊ तिथं खाऊ ननाही मकरंद अनासपुरे आणि शर्वरी जमेनिस अस्ं लै ऑफ बॅलन्स पेअरींग होतं त्या सिनेमात.
>>> याला म्हणतात कॉन्फिडेंटली चुकीचे बोलणे Light 1

@अतूलपाटील निळूभाऊंविषयी सहमत...खूप छान आणि सहज अभिनय करायचे. त्यांच्या विषयी ऐकले होते की त्यांच्या घरी कोणी मोलकरीण काम करायला यायची नाही...!!

लहानपणी मी सुद्दा त्यांना टरकून होतो. निळूभाऊ दिसले रे दिसले की थेटरात बायका त्यांच्या नावाने बोटे मोडायच्या. एकदा "हीच खरी दौलत" हा चित्रपट पहायला थेटरात गेलो होतो. त्यात निळूभाऊंचा सज्जन रोल आहे. सुरूवातीला पटतच नव्हते. दर दोन मि. वाटत होते की आता व्हीलनगिरी सुरू करतील पण तसे झाले नाही. हाईट म्हणजे "तोची खरा साधू, तोची खरा संत" हे गाणे सुद्दा निळूभाऊंवर आहे हे पाहिल्यावर सॉलिड धक्का बसला होता...!! गाणे संपता संपता चाकू काढून कोणालातरी भोसकतील असे वाटत होते.

या सिनेमाचं मूळ नाव डेंजर होतं. वाद झाले होते. दादा कोंडके म्हणाले , तुम्हाला वंगाळच अर्थ का दिसतो. माझ्या मनात सुद्धा आला नव्हता हा अर्थ.
>>>>>>>>>>>>>>>.. kaay aahe arth?

पण पूर्वीच्या काळी बाया / छोटी बाळ अशीच लागायची नरबळीला ?
एखादा बुवा का नव्हता चालत नरबळी म्हणून . तिथे सुद्धा पुरुषांनी बायांचेच बळी दिले. Happy

आणि त्यात ती घरी आल्यावर तिची आई अगदी कॅज्युअली रुमाल हरवावा तसे विचारते तुझी चोळी कुठाय म्हणून.
आणि हिपण कॅज्युअली भिवा पिकअप करायला आला होता त्याच्या डोक्याला बांधली सांगते. >>:D

त्या ब्लॉगवर अमुक तमुकाने खूप प्रयत्नाने अमुक भाग digitalise करून टाकलाय वगैरे वाचले तेव्हा कळले यात किती मेहनत आहे. >>> साधना, ब्लॉगची लिंक देणार का? वाचायला नक्कीच आवडेल.

वर लिहीलेय ह-या ना-या झिंदाबाद बद्दल. >>> मस्त सिनेमा होता. त्या काळात भिती वाटायला लावणारा मराठीतला सिनेमा होता. त्यातले 'कशी नखर्‍यात चालतीया गिरणी' गाणं अजूनही आवडतं.

अविनाश नारकर चा "हसरी" नावाचा एक सिनेमा नव्वदच्या दशकात येऊन् गेलेला ,तो ही छान होता.आता निटसा आठवत नाही,यु ट्युबवर बघायला लागेल.

हरणी शीळ वार्याची ऐक ना.. असं गाणं असलेला एक सिनेमा होता ,अविनाश धर्माधिकारीचा. नाव आठवत असेल कुणाला तर सांगा

केतु
चाल लिहून दाखवा ना, कदाचित गुणगुणताना आठवेल.

या सिनेमाचं मूळ नाव डेंजर होतं. वाद झाले होते. दादा कोंडके म्हणाले , तुम्हाला वंगाळच अर्थ का दिसतो. माझ्या मनात सुद्धा आला नव्हता हा अर्थ.
>>
या सिनेमाचं मूळ नाव होतं ' मामाच्या मुलीला मागणं घाला " म्हनजे दादानी तसे अनाउन्स केले होते. पण सेन्सॉर कडे जाताना पळवापळवीच होते. उगीच चर्चा होण्यासाठी दादाना असल्या फुसकुल्या सोडून द्यायची सवय होती. दुसरं ' चोखा म्हणे माझा ( ... सखा पांडुरंग" हे नन्तर म्हणायचं) असाही चित्रपट त्यानी कधी काढला नाही. केवळ चर्चा आणि कॉन्ट्रोवर्सी घडवून आणून प्रदर्शनापूर्वीच हवा करायची.
हिंदीत येताना ' अंधेरी रातमे दिया तेरे हाथमे ' हे नाव त्यानी रजिस्टर केले आणि सिनेमाही काढला पण महाराश्त्रा बाहेर अपीलच झाला नाही. आता पन्नाशीच्या पुढचे बोजड हिरो हिरोइन ( उषाचव्हाण) हिन्दीत कसे चालतील ?
मात्र हे टायटल हजारो रुपये देउन ( त्या काळात )विकत घ्यायला अनेक हिन्दी निर्माते तयार होते पण बेरकी दादानी त्याना दाद दिली नाही. हिन्दीतला त्यांचा कोणताच चित्रपट चालला नाही.... कारण ते अतिशयच बेंगरूळ असत.

पण पूर्वीच्या काळी बाया / छोटी बाळ अशीच लागायची नरबळीला ?>>>>>>>>>>.अरे पण नरबळी आहे तर नारी बळी का द्यायचे???

नर हा बेस क्लास
नारी आणि नरपुरुष हे सब क्लासेस ☺️☺️☺️☺️☺️☺️

केतु
चाल लिहून दाखवा ना, कदाचित गुणगुणताना आठवेल.

नवीन Submitted by डागदार अड्डावाला on 13 August, 2018 - 12:14>>>>>> भजनी ठेक्यावर आहे बघा ते गाणं, स्लिवलेस ब्लाऊजातील हिर्विन व काळा फाट्का शर्टातला अधर्माधिकारी गाण्यात प्रयणराधन करताना दाखवले आहेत. बघा या वर्णनावरुन काय आठवतय काय.!!!

Pages