'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by जिज्ञासा on 28 November, 2020 - 22:54

वटवृक्ष आणि ब्लॅककॅट एकाच सभ्य भाषेत लिहीतात असं वाटणं म्हणजे लता मंगेशकर आणि इला अरुण एकाच सुरात गातात म्हणण्याइतकं मजेशीर आहे.

>>>वटवृक्ष तुम्ही आणि ब्लॅककॅट एकाच सभ्य भाषेत लिहीता त्यामुळे तुम्ही ब्लॅककॅट यांच्या भाषेवर आक्षेप घेणे मजेशीर आहे.

अगदी...

'मला आजही लक्षात आहे लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तिचे संपूर्ण कुटुंबीय, ओल्ड फॅशन लोकं होते. मी त्यांचा आदर करतो पण त्यावेळी त्या ओल्ड फॅशन रिसेप्शनमध्ये सगळे जण बसले होते' असे शाहरुख म्हणाला.

पुढे तो म्हणाला मी जवळपास १.१५ला तेथे पोहोचलो. रिसेप्शनला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये, मी एक मुस्लीम मुलगा आहे. त्यामुळे लग्नानंतर गौरीचे नाव बदलणार का? आता गौरी मुस्लीम धर्म स्वीकारणार का? अशा चर्चा सुरु असल्याचे माझ्या कानावर आले.

'मी सर्वांचे बोलणे ऐकत होतो. मी त्यावर प्रतिक्रिया देत म्हणालो, गौरी बुरखा परिधान कर आणि चला आता नमाज पठण करुया. त्यानंतर मी पुढे म्हणाले की आता ती दररोज बुरखा घालून घराच्या बाहेर पडणार आणि आम्ही तिचे नाव आयशा ठेवणार आहोत. ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले' असे शाहरुख मजेशीर अंदाजात सर्वांसमोर बोलला होता.

पण शाहरुखने हे मस्करीमध्ये म्हटले असल्याचे कळाल्यानंतर सर्वांना हसू आले होते असे शाहरुखने म्हटले होते.

शाहरुखने गौरीला १९८४ मध्ये एका पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं.तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा आणि गौरी १४ वर्षांची होती.

त्यानंतर अनेकदा त्याने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर अखेर त्याने तिचा फोन नंबर मिळवला आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फार काळ लागला नाही.

२५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. २६ ऑगस्ट १९९१ रोजी त्यांचं कोर्टात लग्न झालं. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचं नाव आयशा ठेवण्यात आलं होतं.

https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2340596/shah-rukh-...

वटवृक्ष तुम्ही आणि ब्लॅककॅट एकाच सभ्य भाषेत लिहीता त्यामुळे तुम्ही ब्लॅककॅट यांच्या भाषेवर आक्षेप घेणे मजेशीर आहे. >>>>>>>
Happy
वेल्डिंग वाल्याचा गॉगल बाजूला काढून
मी कधी कोणत्या धर्मा तील मेसेंजर , शांती दुतांची नावे लिहून टिंगल टवाळी केली ते सांगा !
किंवा ब्लॅक कॅट ने केलेल्या हिंदू देवतांच्या टिंगल टवाळी ला तुमचे समर्थन आहे असे जाहीर तरी करा .
ताकाला जावून भांडे लपवून तुमचा काही फायदा होणार नाही !
माझ्या कडून सकस लिखाण झाले नाही , मला मान्य आहे .
माझी आणि ब्लॅक कॅट ची सभ्य भाषा म्हणता , वर पुन्हा ब्लॅक कॅट चे कौतुक करता , अशाने तुमच्या अती उच्च विचारांची उंची कमी होत नाही का ?
पण हिंदू देवतांची केलेली टिंगल कडे दुर्लक्ष करून तुम्हीच तुमची पात्रता कमी करून घेतली . या पूर्वी तुमचे लिखाण वाचताना त्यातील तुमचे कष्ट असतील असे वाटायचं , पण तो सगळा भुस्सा निघाला.
असो !

कॉमी - विस्तृत माहिती साठी वाचा -

https://www.organiser.org/Encyc/2020/11/27/Love-Jihad-Loving-for-religio...

तुमचा प्रश्न - सध्या असणारे कायदेच का नाही वापरत ?

कारण खून/बलात्कार हे धर्म बदलला नाही / काफिरांचा धर्म बदलणं = पुण्यकर्म/ काफिर बायका = सेकशुअल गुलाम ..इ.इ. थोडक्यात आयसिस विचारधारेतून चालू आहेत. आणि धार्मिक ॲगल नं चालू आहेत.

लव्ह जिहाद विरोधातला कायदा हे प्रश्न ॲकनॉलेज करतो. In absence of this or similar act issue is only murder or rape ...which is not the case.

>>>वटवृक्ष तुम्ही आणि ब्लॅककॅट एकाच सभ्य भाषेत लिहीता त्यामुळे तुम्ही ब्लॅककॅट यांच्या भाषेवर आक्षेप घेणे मजेशीर आहे.

अगदी...>>>>>>>
फिर से उसी मोड पे ?

लग्नाचा व र्धमाचा संबंधच काय? लग्न करा र्धम कशाला बदलावा लागतो? कायदेशिर बंदी सगळ्यांसाठी बरी आहे. एका दिवसात र्धम बदलायला तो काय कपडे आहे?

अवधूत - जर समान नागरी कायदा असेल तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. In absence of UCC divorce, alimony, inheritance, child custody etc depend on religion

ब्लॅक कॅट चया लेखनातील धार्मिक शैली बद्दल मिठाच्या गुळण्या आणि लव जिहाद वर मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याची अशी ढोंगी त्यांची वृत्ती त्यांनाच दाखवावी लागेल ना !

लढा द्यायचा तर समान नागरी कायदा यावा या साठी द्या. र्धम हा तुम्ही व देव यात. बाकी सगळे समान कायद्यात यावयास हवे. day-2-day life च्या mundane गोष्टी साठी र्धमाची पुस्तके कशास हवी? बाकी सगळी माणसच ना? मग अलग कायदे कशास

वटवृक्ष - झोपेचं सोंग घेतलेल्यांना तुम्ही नाही हो काही दाखवू शकत. प्रयत्न सुद्धा करू नका. मजा घ्या tantrum ची.

अवधूत - ideally बरोबर आहे..पण सध्या ती स्थिती नाहीये. सध्या हिंदू मॅरेज ॲक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ आणि special marriage act यापैकी एक वापरून लग्न होतात.

आणि चर्चा लग्न/ प्रेम यावर नाही तर धर्मबदलण्यासाठी प्रेम/ लग्न याचा वापर यावर आहे

वटवृक्ष, तुम्ही फार संत्री सोलायला लावता आहात. ब्लॅककॅट दरवेळी हिंदू देवतांबद्दल काही तरी पोस्ट टाकतात आणि तुम्ही त्या सालीवरून दरवेळी कसे सटकता! ब्लॅककॅट gets you every single time! And this is the fun part.
हिंदू देवतांचा अपमान वगैरे काही नसतं. ते देव काही तुमच्या वकिलपत्रावाचून अडलेले नाहीत.
त्यांच्या हिशोबाने घेतील बघून! Why do you care?
आणि जे खरेखुरे प्रश्न आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही care केलं पाहिजे त्या विषयी तुम्ही साधं एक धड उपयोगाचं वाक्य लिहू शकत नाही हा करूण विनोद आहे. त्या जमीनीच्या तीन फूट खाली गाडल्या गेलेल्या मुलींना न्याय मिळेल अशी एकही अभ्यासपूर्ण पोस्ट तुमच्या कडून आलेली पाहीली नाही मी. पण हजारो वर्षांनंतरही ज्याचे नाव आजही लोक तिन्ही त्रिकाळ घेतात अशा रामाच्या नावाचा अपमान (?) झाला की तुम्ही अगदी धावून धावून पोस्ट्स पाडता! कशासाठी? Shriram or any other God doesn't need your help to defend themselves. If you want to really contribute, try putting some good content into your writing.

मलाही साधारण कॉमी यांच्यासारखेच प्रश्न आहेत. मी जितके वाचले आहे त्यावरून लव्ह जिहाद नावाचा प्रकार खरा आहे. गैरमुस्लिम मुलींशी लग्ने करून त्यांचे धर्मांतर करायला लावायचे हा प्रमुख हेतू व त्याकरता अनेक युवकांना सपोर्ट करायचा - पैसे वगैरे देउन असा दुसरा.

सज्ञान, सुशिक्षित मुलामुलींनी बर्‍यापैकी विचार वगैरे करून आंतरधर्मीय लग्ने केलेली उदाहरणे - शाहरूख व गौरी सारखी- ही लव्ह जिहाद नाहीत. टीना डाबीचेही उदाहरण त्यातले नाही.

पण कायदा नक्की यातील कोणती गोष्ट अ‍ॅड्रेस करणार ते माहीत नाही. एकतर मुलींना फसवणे हा जनरल गुन्हा धरून त्यातून लव्ह जिहाद वेगळे कसे शोधणार हा प्रश्न आहे.

एक मात्र महत्त्वाचे आहे - इथे सर्व मुस्लिमांना दोष देण्याचे कारण नाही. असंख्य कॉमन मुस्लिम लोकांचा यात काही संबंध नाही. पण ही गोष्ट जेव्हा स्वतःला लिबरल समजणारे लोक साफ नाकारून "अंडर द कार्पेट" टाकतात तेव्हा ती पोकळी कर्मठ लोक भरून काढतात. आणि मग सामान्य लोकही त्यांच्यामागे जातात. मी इथे स्वघोषित हट्टी लिबरल म्हणत आहे. खरे लिबरल वेगळे. त्यांचा इथे संबंध नाही. ते इथे फारसे नाहीत. या स्व. ह. लिबरलांचा इन्स्टिंक्ट एखादी बातमी मुस्लिमांबद्दल दोषाचे किंचित बोट दाखवणारी जरी असेल तर ती साफ नाकारण्याकडे तरी असतो, किंवा ती जनरलाइज करून डायल्यूट करण्याकडे तरी. मात्र इतर अनेक जातीय आरोपांच्या बाबतीत हा इन्स्टिंक्ट अचानक गायब होतो.

वटवृक्ष, तुम्ही फार संत्री सोलायला लावता आहात. ब्लॅककॅट दरवेळी हिंदू देवतांबद्दल काही तरी पोस्ट टाकतात आणि तुम्ही त्या सालीवरून दरवेळी कसे सटकता! ब्लॅककॅट gets you every single time! And this is the fun part.

+100

या काही लोकांना ब्लॅककॅट आणि डीजे ज्याप्रकारे नाचवतात ते गंमतीशीर आणि काहीसं tragic पण आहे. इग्नोअर करणं इतकं कठीण असतं का? पण मग वाटलं की या सर्वांनाच असं बोलण्यात मज्जा येत असेल तर चालू देत.

आणि हो, ब्लॅककॅट इथे जे करतात तेच संजय राऊत, सुप्रिया सुळे वगैरे मंडळी राजकारणात करतात.जसं आज सुळेंनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि सगळे भक्त त्यावर प्रतिक्रिया देणं आपली जबाबदारी असल्याच्या थाटात लिहीत सुटले. अरे मुद्दाम ठरवून स्टेटमेंट दिलेलं आहे हे कळत कसं नाही!

> मी जितके वाचले आहे त्यावरून लव्ह जिहाद नावाचा प्रकार खरा आहे.
एखादी खोटी गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट केली की साक्षेपी लोकांनाही खरी वाटू लागते याचे उत्तम उदहरण.
(जसे छपाक मधल्या व्हीलन चे नाव बदलणे, शाहीन बाग च्या लोकांना पाच पाचशे देणे, जेएनयू मध्ये टुकडे टुकडे घोषणा, युरोपीअन चर्च ने भारतीयांना ख्रिस्चन करयाला साडेसात लाख कोटी बजेट ठेवले आहे ई ई)
अशा प्रकारची कोणतीही गोष्ट आस्तित्वात नाही हे वेळोवेळीच्या तपासातून सिद्ध झालेले आहे.
लव्ह जिहाद ही फक्त हिंदु उच्चवर्णीय अंकल आंटी टाईप लोकांची फँटसी आहे.
(कमी शिकलेल्या गोर्‍या लोकांना नोकर्‍या का मिळत नाहीत याचे खरे कारण सांगण्यापेक्षा मेक्सिकन, भारतीय हे लोक नोकर्‍या चोरतात हे सांगणे जसे काही लोकांना सोयीचे आहे तसेच हे)

याचा अर्थ सर्व मुस्लीम सद्गुणाचे पुतळे असतात व सर्व हिंदु मुस्लीम विवाह सुखांत होतात असा नाही. Assholes are there in every religion. एखादी हिंदु मुलगी धर्मांतर करून मुस्लीमाशी निकाह करू इच्छीत असेल तर तिला निकाह/ सिव्हिल मॅरेज/ हिंदू विवाह यातल्या खाचा खोचा जरून समजावून सांगाव्यात पण याउप्पर तिला निकाहाच करायचा असेल तर करू द्यावा.

ब्राह्मण जातीच्या आमच्या शाखेत मुली कमी आहेत. इतर जातीतली सून आणली तरी चालेल, तिला आम्ही तप्त मुद्रा देऊ व Executive MBA सारखा क्रॅश कोर्स देऊन आपली व्रते वैकल्ये शिकवू असे आमचे स्वामीजी म्हणतात. याला शेंडी जिहाद म्हणणार का ?

विकु, एखाद्या गोष्टीत कितपत तथ्य आहे ते बघायचा सोपा मार्ग म्हणजे त्याबाजूइतकेच विरोधी विचारांच्या, अजेंड्यांच्या लोकांची मते, त्यांच्या पेपर मधे, वेबसाइटवर येणार्‍या बातम्या बघायच्या. एकापेक्षा जास्त बाजू पडताळून त्यातून आपले मत बनवायचे. त्यापेक्षा काही वेगळी माहिती समोर आली तर त्याप्रमाणे ते बदलायचे. हे मी कायम करतो. मी माझ्या व्हॉअ‍ॅ ग्रूप्स वर येणारे विचार वाचून सोनिया गांधी, नेहरू वगैरेंबद्दल मते ठरवत नाही. फॉक्स बघून बायडेन, व हफिंग्टन पोस्ट वाचून ट्रम्प बद्दलही नाही Happy त्यामुळे कोणी निव्वळ रेटून बोलत राहण्याने काही होत नाही.

पण हा प्रॉब्लेम खरा आहे इतपत उदाहरणे वाचली आहेत. आणि ती फक्त सनातन्यांच्या सर्कल्स मधून नाही. बाय द वे तुमच्या शेंडी जिहाद च्या उदाहरणातले स्वामीजी बहुधा रीतसर दोघांच्या आईवडिलांची परवानगी घेउन लग्न करा म्हणत असावेत. प्रेमविवाह करा म्हणणारे स्वामीजी अजून मला कोणी भेटले नाहीत Wink

एखादी हिंदु मुलगी धर्मांतर करून मुस्लीमाशी निकाह करू इच्छीत असेल तर तिला निकाह/ सिव्हिल मॅरेज/ हिंदू विवाह यातल्या खाचा खोचा जरून समजावून सांगाव्यात पण याउप्पर तिला निकाहाच करायचा असेल तर करू द्यावा. >>> हे मी कोठे नाकारतोय.

वटवृक्ष, तुम्ही फार संत्री सोलायला लावता आहात. ब्लॅककॅट दरवेळी हिंदू देवतांबद्दल काही तरी पोस्ट टाकतात आणि तुम्ही त्या सालीवरून दरवेळी कसे सटकता! ब्लॅककॅट gets you every single time! And this is the fun part.
>>>>>>>
ओके आता गाडीचा गियर बदलत आहे !

पंडित नेहरुंच्या बहिणीलाही करायचं होतं मुस्लीम व्यक्तीशी लग्न पण...

http://dhunt.in/bXGGn?s=a&uu=0xc46df48b2f9278d8&ss=pd
त्या वेळी पंडित आणि जवाहर चे चुकलेच होते , होवून द्यायला हवं होत लग्न

तुमची गाडी म्हणजे गोलमाल , टोटल धमाल मधले हेलिकॉप्टर आहे >>>>
खास तुमच्या साठी एक ना एक दिवस त्यात फ्री राईड असणार !
Lol

‘मी पारशी आहे आणि ते मुस्लीम होते. कॉलेजपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. विशेष विवाह कायद्याअंतर्गत आमचं लग्न झालं. त्यामुळे सध्या धर्म परिवर्तन विधेयकासंबंधी सुरु असलेली चर्चा माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. मला आंतरजातीय विवाहाबद्दलचा माझा अनुभव सांगायचा आहे. आजच्या युगातही एखाद्या स्त्रीला धर्माच्या नावाखाली भेदभाव आणि दु:ख सहन करावं लागतं, ही लज्जास्पद आणि डोळ्यांत अंजन घालणारी गोष्ट आहे’, असं त्यांनी लिहिलं.

लग्नानंतर झालेल्या बदलाबद्दल त्यांनी पुढे लिहिलं, ‘नितीमूल्यांच्या बाबतीत लोकशाहीच्या वातावरणात माझी जडणघडण झाली. विचारांच्या स्वातंत्र्यास प्रोत्साहित केलं गेलं आणि विचार करून केलेली चर्चा मान्य होती. सर्व स्तरांवरील शिक्षणास प्रोत्साहित केलं गेलं. मात्र लग्नानंतर हेच स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाही मूल्यव्यवस्था ही माझ्या पतीच्या कुटुंबासाठी सर्वांत मोठी समस्या होती. त्यांना एक सुशिक्षित, स्वत:ची वेगळी विचारसरणी असलेली, स्वतंत्र स्त्री नको होती. धर्मांतर करण्याला माझा विरोध होता आणि त्यामुळे पती-पत्नी म्हणून आमचं नातं संपुष्टात आलं. धर्मांतर करून त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी झुकण्यास माझा स्वाभिमान नकार देत होता.’

‘धर्मांतराला विरोध केल्याने आमचं नातं संपुष्टात आलं’; दिवंगत वाजिद खानच्या पत्नीचा खुलासा >>>>>

आता तिला स्वतःच्या आणि मुलांच्या हक्का साठी वाजिदच्या कुटुंबीयांसोबत न्यायायलाईन लढा देण्याची वेळ आली आहे .
त्याच बरोबर वाजीद चे कुटंब खूप कट्टर असल्या मुळे ते सतत माझ्या वर धर्मांतर साठी दबाव टाकत होते असे हि तिने सांगितले .
थोडक्यात सर्वात प्रथम स्पेशल म्यारिज ॲक्ट मध्ये सुधारणा करून मुलीला नवऱ्याच्या संपत्ती मध्ये बरोबरीचा हक्क दिला गेला पाहिजे .

हो जर तिने धर्मांतर केलं नाही आणि वाजीद खान तर मेलाय मग आता तिला त्याच्या संपत्तीत काही हक्क नाही शिवाय ते लग्नही valid समजलं जाणार नाही.

>>>थोडक्यात सर्वात प्रथम स्पेशल म्यारिज ॲक्ट मध्ये सुधारणा करून मुलीला नवऱ्याच्या संपत्ती मध्ये बरोबरीचा हक्क दिला गेला पाहिजे .
सहमत.

Proud

मग हिंदू विवाह कायदा आहेच की , त्यात बायकोची सगळी जबाबदारी नवर्याची असते , वाटणी असते

स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे पार्टनर शिप असते ,मग बाईला वाटणी कशाला लागते ? बाईचा पगार बाईलाच , अन नवर्याचाही निंमा , ही समानता ?

स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे पार्टनर शिप असते ,मग बाईला वाटणी कशाला लागते ? बाईचा पगार बाईलाच , अन नवर्याचाही निंमा , ही समानता ?
नवीन Submitted by BLACKCAT on 29 November, 2020 - 10:35
--

Lol

तु पण "वार्डबॉय" कडून सल्ले घेतोस का रे, इथे लिहाण्याआधी. Proud

Pages