'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"इंदिरा गांधी को ठोका था, अब मोदी को भी ठोक देंगे" अशी भाषा शेतकरी वापरतात काय ? आणि या कथित किसान मोर्चाला कॉंग्रेसने पाठींबा दिलाय. किसान मोर्चाच्या नावाखाली खालिस्तानी व हिरवे दहशतवादी दिल्लीत यायचा हट्ट का करत आहेत, हे आता उघड झालेय.

मोदी शा त्या हिंदूना नागरिक करून भारतात आणणार आहेत >>>>>>>>
त्यांनी आ नु नये म्हणून पप्पू चे तुमच्या सारखे चेले सार्वजनिक संपत्ती जाळतात त्याच काय ?

अहो, मोदी status विवाहित लावूदे नाहीतर अविवाहित..with respect to his wife's rights what should law do? Please tell.

तुम्ही म्हणाल ती condition आपण सनाका मधे include karu. हाकानाका.

शीख आणि मुस्लिम मधला फरक कळतो की आम्हाला पण सरदार पगडी घालून फिरणारे, मुलाखती देणारे, public property distroy करणारे - शीख नसणारे , सरदारांना बदनाम करत फिरताहेत.
बातम्या वाचा ..

डेटा डेटा करत फिरणारे बातम्या वाचत नाहीत किती मुलीचं किडनॅपिंग झालं/ बळजबरीने धर्मांतर झालं ..नुसताच थयथयाट....सेक्युलर = अ-हिंदू अशा गृहीतकावर सगळा डोलारा.

कुणी कुठे पब्लिक प्रॉपर्टी बाद केली म्हणे

बिचारे शेतकरी आंदोलन करताहेत तर करू देत
त्यांचे निवेदन देऊन जातील परत
इतके काय घाबरायचे म्हणे

आंदोलन कर्ते 4 दिवस करतात अन जातात

>>>अशा हजारो केस झाल्या असतील पाकिस्तान मध्ये !
तरी लोकांना लव जिहाद चे निकष तपासण्याची गरज पडते !

कोणतीही माहिती नसताना कोणत्याही फसलेल्या हिंदू मुस्लिम लग्नाकडे बोट दाखवून (टीना दाबी) लव जिहाद म्हणल्यावर तसेच होणार.
तुम्हाला नक्की निकष माहित असतील तर सांगा. इतक्यांदा विचारून सांगता येत नाहीत याचा काय अर्थ काढावा ? निकष विचारणे म्हणजे हिंदू मुलींवर मुस्लिम तरुणांकडून अत्याचार होतच नाहीत असा दावा नव्हे.

त्यांच्या लव्ह जिहादात गौरी खान , करीना खानही येतात

आणि जातधर्म बघून करिषमाचे काय झाले , ते विचारायचे नाही

तुम्हाला नक्की निकष माहित असतील तर सांगा. >>>>>>>
आता
वर दिलेल्या तुमच्या आवडत्या इंडियन एक्स्प्रेस च्या बातमी कडे तुम्ही कोणत्या फ्रेम मधून बघता ? जरा कळू द्या आम्हाला पण .
लव जिहाद ?
जबरदस्तीने धर्मांतर ?
अजुन एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त ?

जबरदस्तीने धर्मांतर. (जो कायमच कायद्याने गुन्हा राहिलेला आहे, किडनॅप करणे, जबरदस्तीने लग्न करणे ईईई.)

तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सगळे कायदे आहेतच ( लव्ह जिहाद के सेस साठी) तर अजून एक तत्सम कायदा आला तर काय प्रॉब्लेम आहे? Happy

म्हणजे तुमचा कायद्याला विरोध नाहीये तर

कायद्याला विरोध किंवा समर्थन करण्यापूर्वी माहिती घ्यावी. ती मी जाणकारांना मागत आहे.
आणखी एक तत्सम कायद्यामधून नक्की काय होणार आहे ? कायदा लव जिहाद वर , म्हणजे नक्की काय गोष्टीवर आळा घालणार आहे ? निकिता तोमरचे नाव लव जिहाद मध्ये बऱ्याचदा ऐकू आले आहे. तिच्यासोबत जे दानवी कृत्य केले ते कायमच बेकायदेशीर नव्हते काय ? मग कायदा म्हणजे नवीन कागदाचा तुकडा पारित करून काय परिणाम साधला जाणार आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न.

तसेच, स्वखुशीने होणाऱ्या हिंदू मुस्लिम विवाहावर काय परिणाम होईल? मुलीच्या आईवडिलांना मुलगा पसंद नसेल तर पण मुलीची सहमती असेल तर ह्या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो का ? ह्या गोष्टी माहित असतील, किंवा काही दुवा असेल तर नक्की द्या.

लव्ह जिहाद विरुद्ध कायदा येतो आहे, तर लव्ह जिहादचे निकष विचारणे हे अत्यंत स्वाभाविक नाही का ? समर्थक आणि विरोधकांनी हे निकष सांगू नयेत का ? नसतील तर त्यांच्या समर्थन अथवा विरोधाला किती किंमत द्यावी ?

लव्ह जिहाद तर 16 व्या शतकापासून सुरू असावेत
आज लोकशाहीत अशी जबरदस्ती करणाऱ्या मुसलमानास शिक्षा होईल,

पण बळी पडलेल्या मुलीचे पुनर्वसन कसे करणार , ह्यावर 400 वर्षात उपाय सापडला नाही का ?

धन्यवाद ! हे तरी मान्य केले .
आता kidnaping आणि जबरदस्तीने धर्मांतर ला कोणते निकष असतात ? हे आम्हाला सांगा !
आणि जबरदस्तीने धर्मांतर करणारे लव जिहाद का करू शकत नाही ? हे पण सांगा , म्हणजे लव जिहाद मानणारे इथून पुढे या धाग्यावर एक ही चुकीची प्रतिक्रिया देणार नाहीत.
शिवाय पाकड्या ना कायद्याची भीती नाही म्हणून तेथे सर्रास अशा केस होत आहेत . Kidnaping आणि जबरदस्ती धर्मांतर ची केस कोर्टात गेल्या नंतर पळवून नेलेल्या अल्प वयाच्या मुलीचा ताबा तिच्या वयस्कर नवऱ्याला देण्याचा निर्णय तेथील कोर्टाने दिला , त्या वेळी त्या मुलीची आई टाहो फोडून कोर्टाच्या आवारात च बेशुद्ध पडल्याचा व्हिडिओ मीडियावर पसरला होता .

बरं आम्ही ज्यांना केसेस ना लव जिहाद म्हणतो त्यात kidnaping आणि जबरदस्तीने धर्मांतर च्या केसेस असतात का ?
मध्यम वर्गीय किंवा लोअर क्लास मुस्लिम मुला बरोबर प्रेम विवाह केलेल्या मुलींचे मृतदेह तीन फूट जमिनीखाली का सापडतात हा निव्वळ योगायोग आहे का ? उच्च वर्गीय मुस्लिम लोकांनी हिंदू मुलींची अशी हत्याकांड केलेल्या केस का दिसत नाहीत ?
मग जे पत्रक फिरत होते त्यात सत्यता नसेल कशा वरून ?
@ कॉमी ,
खूप दिवस झाले तुम्ही ' लव जिहाद ' बद्दल सतत निकष विचारत आहात , तर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सविस्तर उत्तराची अपेक्षा आहे .

वटवृक्ष, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही इतके तरी समजले.
तुम्ही सातत्याने वापरत असलेल्या शब्दांचा अर्थ सुद्धा तुम्हाला सांगता येत नाही. Kidnaping चे निकष आयपीसी मध्ये आहेत. हवे असल्यास वाचा.
जबरदस्तीने धर्मांतर- इच्छा नसताना करायला लावलेले धर्मांतर. म्हणजे मारून मुटकून बांधून ठेवून करायला लावलेले.

>>>मध्यम वर्गीय किंवा लोअर क्लास मुस्लिम मुला बरोबर प्रेम विवाह केलेल्या मुलींचे मृतदेह तीन फूट जमिनीखाली का सापडतात हा निव्वळ योगायोग आहे का ? उच्च वर्गीय मुस्लिम लोकांनी हिंदू मुलींची अशी हत्याकांड केलेल्या केस का दिसत नाहीत ?

कोणत्याही व्यक्तीचा खून करणे हा गुन्हा आहे ना ? नवीन कायदा यात काय करणार आहे, जे यापूर्वी नव्हते ?

>>>मग जे पत्रक फिरत होते त्यात सत्यता नसेल कशा वरून ?
ते पत्रक सत्य आहे असे गृहीत धरले, तर लव जिहाद म्हणजे fraudulently हिंदू ओळख धारण करून हिंदू मुलींशी मैत्री करून काहींना काही जबरदस्ती करून लग्न करण्यास आणि धर्मांतर करण्यास भाग पाडणे, असा होतो ना ? हा आहे का निकष ? मग टिना दाबी आणि निकिता तोमर मध्ये लव जिहाद कसा ?

>>>बरं आम्ही ज्यांना केसेस ना लव जिहाद म्हणतो त्यात kidnaping आणि जबरदस्तीने धर्मांतर च्या केसेस असतात का ?
इथे दोन उच्चपदस्थ आणि सज्ञान व्यक्तींनी एकमेकांच्या धर्माची पूर्ण माहिती असताना, कोणत्याही धर्मांतरणाशिवाय केलेल्या लग्नाबद्दल लव्ह जिहाद असा संशय व्यक्त करत आहेत. त्याला कोणी विरोधही केला नाही. म्हणूनच तर मी निकष विचारत आहे.

>>>शिवाय पाकड्या ना कायद्याची भीती नाही म्हणून तेथे सर्रास अशा केस होत आहेत . Kidnaping आणि जबरदस्ती धर्मांतर ची केस कोर्टात गेल्या नंतर पळवून नेलेल्या अल्प वयाच्या मुलीचा ताबा तिच्या वयस्कर नवऱ्याला देण्याचा निर्णय तेथील कोर्टाने दिला , त्या वेळी त्या मुलीची आई टाहो फोडून कोर्टाच्या आवारात च बेशुद्ध पडल्याचा व्हिडिओ मीडियावर पसरला होता

हा कायदा पाकिस्तानात पण लागू होणार आहे ही नवीन माहिती समजली. धन्यवाद.

>>>खूप दिवस झाले तुम्ही ' लव जिहाद ' बद्दल सतत निकष विचारत आहात , तर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सविस्तर उत्तराची अपेक्षा आहे .

किती ती whataboutry ? एक प्रश्न विचारला, उत्तर माहित नसले कि सात उपप्रश्न ठोकून द्यायचे, म्हणजे मूळ प्रश्न विसमरणात जाईल.

कॉमी, तुम्ही इतके लॉजिकल प्रश्न विचारू नका! इथे नेहमीचे यशस्वी आयडीज फक्त टाईमपास करायला येतात. फारच थोडे जण प्रश्न समजून घेऊन लिंक देण्याचे कष्ट घेतात. कारण त्यांना खरोखरच या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात रस आहे. सनव, साधनाताई यांना प्रश्न विचारा.
वटवृक्ष, अपर्णा यांनी काहीही ठोस माहिती दिली नाहीये या विषयावर. ब्लॅककॅट यांनी उचकवले की मग हे काहीतरी प्रतिसाद म्हणून खरडतात.
मला ब्लॅककॅट यांच्या या कौशल्याला दाद द्यावीशी वाटते! समोरच्या कडून प्रतिसाद येईल अशी provocative शब्दाने चिमटा काढणारी पोस्ट ते दरवेळी लिहीतात. अर्थात त्यांच्या मोदींच्या वैवाहिक जीवनाविषयीच्या पोस्ट्स वाचून गंमत वाटत नाही. They show a very bad taste. आणि भाजपचे नेते कितीही खालच्या पातळीवर उतरून टीका करत असले तरी हे तुम्ही पातळी सोडायचे समर्थन होऊच शकत नाही.

जिज्ञासा दोन्ही बाजूनेच विचार करतात. त्या उगीच बोलायचे म्हणून बोलत नाहीत. >> +१

आणि रश्मी - एक मत पटले नाही म्हणून चर्चाच बंद करायची काय Happy>>>>. Happy फारएंड चर्चा बंद नाही केली. वाचायला आता वेळ मिळाला. छान माहिती दिलीस तु.

आज खूप महिन्यांनी घराबाहेर रिक्षातुन फिरायचा योग आला. Proud वै कामाकरता अख्खा दिवस बाहेर गेला. वाचायला आता वेळ मिळाला.

जिज्ञासा, हरकत नाही. पण तुम्ही लिहीत रहा. कारण प्रत्येकाच्या लिहीण्यातुन एक नवीन मुद्दा समजतो. Happy

स्वाती २ यांची मते नेहेमी माईंड रिलॅक्सिंग असतात. एखाद्याचा प्रतीसादातुन आपण देखील असे शांतपणाने लिहायला काय हरकत आहे असे मग नक्कीच वाटते.

सनव आणी साधना , पॉईंटस नेमके असतात तुमचे.

जामोप्यांच्या प्रतीसादामुळे पण बरेच नवीन गोष्टी कळतात. ते थोडक्यात पण बरीच नवीन माहिती लिंक्स द्वारा देत रहातात. चर्चा चालूच राहु दे.

कंगना राणावत ने दिल्ली शेतकरी म्हणून पाकिस्तानी मुस्लिम बाईचा फोटो लावला होता म्हणे , तिचा रेटही लिहिला होता म्हणे

लोकांनी खरे शोधल्यावर लगेच ट्विट मेले म्हणे

https://www.freepressjournal.in/entertainment/bollywood/kangana-slammed-...

कंगनाने खोटारडे व धर्माधर्मात तेढ उत्पन्न करणारे ट्वीट केले ही बातमी कशी होऊ शकेल ?
लता मंगेशकर सुरेल गातात ही बातमी अहे का ?

मग टिना दाबी आणि निकिता तोमर मध्ये लव जिहाद कसा ? >>>>>>>>>
टिना च्या केस ला लव जिहाद केस म्हणून बोंब मारण्यात काहीही अर्थ नाही हे दोन्ही बाजूंच्या लोकांना केंव्हाच समजलंय तरी तुम्ही टिना च्या च केस वर केंद्रित करून शिळी कढी तपावणे चालू ठेवले .
आणि निकिता तोमर या मुली वर त्याचे शुद्ध प्रेम असते तर त्याने गोळी घालून मारले असते का ?
बरं तुम्हाला जबरदस्तीने धर्मांतर बद्दल विचारले होते , पण तुम्ही तिथे ही शाब्दिक कुंथन करून उपस्थित केलेल्या मुद्द्यांना बगल मारली .....
आणि पाकिस्तान मधील त्या घटने बद्दल सांगितले असता संवेदना व्यक्त करणे तर दूर राहिले , पण " हा कायदा पाकिस्तानात पण लागू होणार आहे ही नवीन माहिती समजली. धन्यवाद." अशी बालिश विधाने करणारी व्यक्ती च निकष मागू शकते याची खात्री पटली .

>>>आणि निकिता तोमर या मुली वर त्याचे शुद्ध प्रेम असते तर त्याने गोळी घालून मारले असते का ?

???
कोण म्हणतंय शुद्ध प्रेम होतं ? किंबहुना, त्याचे शुद्ध किंवा otherwise प्रेम होते की नाही ह्याच्याशी मला काडीमात्र देणेघेणे नाही. त्याने हिणकस गुन्हा केला, शिक्षा झाली. मग त्याचे विशुद्ध आणि अलौकिक प्रेम का असेना.

>>>पाकिस्तान मधील त्या घटने बद्दल सांगितले असता संवेदना व्यक्त करणे तर दूर राहिले , पण " हा कायदा पाकिस्तानात पण लागू होणार आहे ही नवीन माहिती समजली. धन्यवाद."

तुमच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकताच नाहीये. संवेदना तुम्हाला सिद्ध करण्याची तर त्याहून कमी आवश्यकता आहे. किंबहुना, शून्यच. पाकिस्तानातल्या हिंदूनवर होणाऱ्या अत्याचाराच्या आधारावर भारतातले कायदे ठरत नाहीत.

>>>अशी बालिश विधाने करणारी व्यक्ती च निकष मागू शकते याची खात्री पटली .
बरं.

>>>बरं तुम्हाला जबरदस्तीने धर्मांतर बद्दल विचारले होते , पण तुम्ही तिथे ही शाब्दिक कुंथन करून उपस्थित केलेल्या मुद्द्यांना बगल मारली .....

शाब्दिक कुंथन ? ब्वर बुवा. तुमच्याशी चिखलातली कुस्ती काय मला खेळायची नाही, तेव्हा तुम्हाला लाल सलाम. कॉमी ओव्हर अँड औट फॉर वटवृक्ष.

इतर कोणाकडे जर कायद्यातील लव जिहादचा निकष याबद्दल माहिती असेल तर प्लिज सांगा.

Happy Happy

फक्त लग्नासाठी/ लग्न करायच्या वेळी केलेलं धर्मांतर.

सुरुवातीला/ कोर्टशिपच्या काळात खोटी ओळख देणे..खोटं नाव/ धर्म सांगणं. जसं कसाब आणि कंपनी .

स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली लग्न झाल्यावर नंतर धर्मांतराकरता दबाव आणणे. न ऐकल्यास दीर/ सासरा/ नव-याच्या मित्रांकडून बलात्कार आणि नंतर खून.

धर्म बदलला की स्पेशल मॅरेज ॲक्ट मुळे असलेलं प्रोटेकशन रद्द होतं. मग दुसरं/ तिसरं/ चौथं लग्न.

लग्न झाल्यावर नव-याच्या संपत्तीत अचानक खूप वाढलं, कारण अशा धर्मांतराकरता खूप पैसा दिला जातो .

जर पुरूष नॉन मुसलमान असेल तरीही हेच , फक्त लग्नाकरता धर्मांतर, किंवा डायरेक्ट खून.

ह्या आणि अशा प्रकारच्या खूप घटना आहेत, डोळे उघडे ठेवून बघत असाल तर .

नेहमीचा प्रेम विवाह/ आईबापाचे विरोध असणारे विवाह आणि ही लग्न यात असणारा फरक म्हणे ही लग्न/ प्रेम हे लग्न/ प्रेमासाठी नसून फक्त धर्मांतराकरता केली जातात.

निकीता तोमरच्या खून्याच्या आईची मुलाखत पाहिलीका?

ती बाई म्हणते की आम्ही करोडपती आहोत, निकीतानं धर्म बदलायला काय हरकत होती? तिनं धर्म बदलायला नकार दिला म्हणून माझ्या मुलानं खून केला. आता तिच्यामुळे माझा मुलगा जेलमध्ये आहे, आणि या सगळ्याला निकीता जबाबदार आहे

कॉमी ओव्हर अँड औट फॉर वटवृक्ष >>>>>
धन्यवाद आणि लक्षात ठेवा बर का नाही तर चुकून माकून पुन्हा गाठ पडायची !
@ जिज्ञासा ,
" मला ब्लॅककॅट यांच्या या कौशल्याला दाद द्यावीशी वाटते! समोरच्या कडून प्रतिसाद येईल अशी provocative शब्दाने चिमटा काढणारी पोस्ट ते दरवेळी लिहीतात. अर्थात त्यांच्या मोदींच्या वैवाहिक जीवनाविषयीच्या पोस्ट्स वाचून गंमत वाटत नाही "

ब्लॅक कॅट यांच्या चीमट्याना मी पण खूप वेळा दाद दिली आहे , पण फक्त ' हिंदू धर्मा ' बाबत त्यांची घसरणारी विकृत जीभ तुम्हाला कशी दिसली नाही ? ना
आम्हाला त्या बद्दल तुमचा आक्षेप कधी नाही दिसला .
थोडक्यात सोवळ्या चा कितीही आव आणला तरी तुमचे छुपे विचार प्रदर्शित झालेच ...

प्रश्न बदला !
" मी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माविरुद्ध कधी काय लिहले ? " असा टाका !

अपर्णा, धन्यवाद. निकष काही प्रमाणात तरी स्पष्ट केलात. यातल्या गोष्टींपैकी कोणती गोष्ट नाविन्याने बेकायदेशीर होणार आहे, हे माहीत असेल तरी सांगावं. ते समजून घेणं मला महत्वाचं वाटत.

मी निकिता तोमर च्या गुन्हेगाराच्या आईचा interview पाहिला नाही. पण तुम्ही जे सांगितलं ते ऐकलं आहेच. त्या व्यक्तीच्या आईबाबत तुमची माझी आणि मायबोलीवरच्या सर्वच लोकांची मतं जुळत असावीत असा कयास आहे.

वटवृक्ष तुम्ही आणि ब्लॅककॅट एकाच सभ्य भाषेत लिहीता त्यामुळे तुम्ही ब्लॅककॅट यांच्या भाषेवर आक्षेप घेणे मजेशीर आहे.
एरवी मी राजकारणाचे धागे वाचत नाही कारण वरती कोणताही विषय असला तरी खाली तीच धुळवड चालू असते. इतक्यात इन्शाअल्लाह नावाचे एक छान पुस्तक वाचले त्यामुळे हा धागा उघडला. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि काहींची नाही. तुमच्या कडून मात्र काहीही सकस वाचायला मिळाले नाही. निदान या धाग्यावर तरी

https://www.loksatta.com/manoranjan-news/late-wajid-khan-wife-kamalrukh-...

‘मी पारशी आहे आणि ते मुस्लीम होते. कॉलेजपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. विशेष विवाह कायद्याअंतर्गत आमचं लग्न झालं. त्यामुळे सध्या धर्म परिवर्तन विधेयकासंबंधी सुरु असलेली चर्चा माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. मला आंतरजातीय विवाहाबद्दलचा माझा अनुभव सांगायचा आहे. आजच्या युगातही एखाद्या स्त्रीला धर्माच्या नावाखाली भेदभाव आणि दु:ख सहन करावं लागतं, ही लज्जास्पद आणि डोळ्यांत अंजन घालणारी गोष्ट आहे’, असं त्यांनी लिहिलं.

लग्नानंतर झालेल्या बदलाबद्दल त्यांनी पुढे लिहिलं, ‘नितीमूल्यांच्या बाबतीत लोकशाहीच्या वातावरणात माझी जडणघडण झाली. विचारांच्या स्वातंत्र्यास प्रोत्साहित केलं गेलं आणि विचार करून केलेली चर्चा मान्य होती. सर्व स्तरांवरील शिक्षणास प्रोत्साहित केलं गेलं. मात्र लग्नानंतर हेच स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाही मूल्यव्यवस्था ही माझ्या पतीच्या कुटुंबासाठी सर्वांत मोठी समस्या होती. त्यांना एक सुशिक्षित, स्वत:ची वेगळी विचारसरणी असलेली, स्वतंत्र स्त्री नको होती. धर्मांतर करण्याला माझा विरोध होता आणि त्यामुळे पती-पत्नी म्हणून आमचं नातं संपुष्टात आलं. धर्मांतर करून त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी झुकण्यास माझा स्वाभिमान नकार देत होता.’

‘धर्मांतराला विरोध केल्याने आमचं नातं संपुष्टात आलं’; दिवंगत वाजिद खानच्या पत्नीचा खुलासा

Pages