'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी

Submitted by छोटी on 5 September, 2014 - 00:36

'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी....

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4672875175381485119&Se...

सकाळ मधली बातमी आणी त्या वरच्या प्रतीक्रिया...

काय आहे 'लव्ह जिहाद'? खरच अस काही आहे का? असेल तर काय उपाय? ह्या वर थोडी चर्चा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समान नागरी कायदा हा देखील हिंदूंच्या तुष्टीकरणासाठी आणला जाईल. त्यामुळे मुस्लिम समाजाचे काही भले झालेच तर ठीक आहे पण तो दुर्लक्षित मुद्दा आहे.//

बापरे! जर अशी विचारसरणी असेल तर मी उगाचच इतका वेळ तुमच्याशी चर्चा करण्यात घालवला.

समान नागरी कायदा हा देखील हिंदूंच्या तुष्टीकरणासाठी आणला जाईल. त्यामुळे मुस्लिम समाजाचे काही भले झालेच तर ठीक आहे पण तो दुर्लक्षित मुद्दा आहे.
--

समान नागरी कायदा आणि हिंदूचे तुष्टीकरण ??
(कपाळावर हात मारणारी भाऊली)

समान नागरी कायदा हा देखील हिंदूंच्या तुष्टीकरणासाठी आणला जाईल. त्यामुळे मुस्लिम समाजाचे काही भले झालेच तर ठीक आहे पण तो दुर्लक्षित मुद्दा आहे.
--

तुम्हाला 'समान नागरी कायदा' म्हणजे काय, हे माहित आहे का ?
कि काहिही लिहायचे म्हणून लिहिलेय.

समान नागरी कायद्याची मागणी कोण करत आहे? मी तरी मुस्लिम समाजाच्या पक्षाने अथवा कम्युनिस्ट पक्षाने ही मागणी केलेली ऐकली नाही. ही मागणी भाजपाच्या अजेंड्यावर आहे जो एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. मग माझ्या विधानात काय चूक आहे? मला नीट समजावून सांगा. I am serious and interested to hear what you think.

समान नागरी कायदा हा देखील हिंदूंच्या तुष्टीकरणासाठी आणला जाईल.

माझ्या भाच्याच्या online शाळेचा meeting id & password पाठवू का? पहिलीत आहे तो!

जिज्ञासा, तुमचे आत्तापर्यंत चे प्रतीसाद पाहुन वाटले होते की तुम्ही एकाच बाजूने विचार करत नाही. पण आता वाटतेय की तुमच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीयेत. Uhoh

समान नागरी कायद्याची मागणी कोण करत आहे? मी तरी मुस्लिम समाजाच्या पक्षाने अथवा कम्युनिस्ट पक्षाने ही मागणी केलेली ऐकली नाही.>>>>

मुस्लिम करणार नाहीतच, त्यांना संधी मिळाली की ते शरियाचा आग्रह धरतात.

कम्युनिस्ट नेमके काय करतात हा आता प्रश्न आहे. 100 वर्षांपूर्वी तो पक्ष विचारवंतांचा होता बहुतेक. आता स्वतःचे अस्तित्व टिकवण्यापेक्षा वेगळे काही उरले नाहीय त्यांच्याकडे.

जिज्ञासा, तुमचे आत्तापर्यंत चे प्रतीसाद पाहुन वाटले होते की तुम्ही एकाच बाजूने विचार करत नाही. पण आता वाटतेय की तुमच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीयेत.>>>

जिज्ञासा दोन्ही बाजूनेच विचार करतात. त्या उगीच बोलायचे म्हणून बोलत नाहीत.

पण त्यांचे वास्तव्य बहुतेक अमेरिकेत आहे. भारतीय समाजात काय घडतेय याची माहिती त्यांना मीडियावरून मिळत असावी व त्यांच्या घरच्यांकडून. त्या खरेच चांगल्या अर्थाने लिबरल आहेत, त्यांचे घरचेही तसेच असणार. सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांची सुसंस्कृत समाजात जशी मते असायला हवीत तशी त्यांची आहेत. भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे.

त्या खरेच चांगल्या अर्थाने लिबरल आहेत, त्यांचे घरचेही तसेच असणार. सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांची सुसंस्कृत समाजात जशी मते असायला हवीत तशी त्यांची आहेत. भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे.>>>>> मी तेच म्हणतेय पण मिडीया आणी टिपीकल लिबरल लोक ( जावेद अख्तर, शोभा डे, कुणाल कामरा , राजदीप सरदेसाई , बरखा दत्त ) जे बोलतात तेच पुढे येतेय आणी सत्य दाबले जातेय. त्यामुळे जिज्ञासा किंवा इथले लोक यांच्या पुढे हा प्रश्न निर्माण होतो की समान नागरी कायद्याने नक्की काय साधणार आहे.

Happy Happy
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही एक चॅरिटेबल संस्था आहे. यांना कु ठ ले ही कायदेशीर/ कायदा करायचे किंवा डावलायचे हक्क कोणी दिले?

यांना धर्माधारित आरक्षण पाहिजे , पण यांच्या शैक्षणिक संस्थांत नेहमीचं आरक्षण लागू होत नाही. ..उदा. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी. पण सरकारी ग्रॅंट मात्र मिळते. पगार सरकार देतं.
समान नागरी कायद्याचा आधी 'धार्मिक अल्पसंख्य' या संज्ञेची व्याख्या बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि हे जे काही % ठरेल ते राज्याच्या लेव्हल ला लागू केलं पाहिजे...उदा. काश्मीर मधे धार्मिक अल्पसंख्याक = शीख हिंदू बौद्ध.

370 काढणं वाइट/ 3 तलाक बंद वाईट/ डिमॉनिटायझेशन वाईट/ CAA वाईट/ NRC वाईट/ राममंदीर वाईट/ लव्ह जिहाद च्या विरोधात कायदा वाईट/ समान नागरी कायदा वाईट Happy Happy
...कारण भाजप नं हे केलं किंवा कदाचित करतील किंवा करायचा प्लॅन आहे . ..हे असं आहे . How logical .
उद्या भाजप म्हटलं की 2 वेळा तरी जेवा सगळे तर काही लोकं मुद्दाम उपाशी राहतील ..;)

नीट आणि सिरीअसली प्रश्न विचारला आहे. माझ्या background चा काही संबंध नाही यात. एका अमेरिकन वा क्रोएशियन माणसाने प्रश्न विचारला आहे असे समजून उत्तर दिलेत तरी चालेल.
समान नागरी कायदा आणल्याने कोणाचा फायदा तोटा होईल हा मुद्दा नाहीये. If the Muslim community benefits, the benefits will be incidental. पण हा मुद्दा ज्या पक्षाच्या अजेंड्यावर आहे तो पक्ष जर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे तर मग सनाका हा हिंदूंना खुश करण्यासाठी आणला जाईल हे विधान का चूक आहे? की या कायद्यामुळे हिंदूंना काही नुकसान होणार आहे? मला खरंच माहीत नाही.
माझ्या भाच्याच्या online शाळेचा meeting id & password पाठवू का? पहिलीत आहे तो!>>विक्षिप्त मुलगा, त्याने काय होईल? मी पहिलीत असताना समान नागरी कायदा अभ्यासक्रमात नव्हता. जर तुमच्या भाच्याच्या शाळेत पहिलीत समान नागरी कायदा शिकवत असतील तर मला सांगा. I will get in touch with the school independently. You may be breaking the rules by sharing ID and password with me and I don't want you to do that.

काय कायदा येऊ घातलाय हे नेटवर सर्वत्र आहे. तो अभ्यासून त्याच्यापासून हिंदूंना व मुस्लिमाना काय फायदे हे बघता येईल

.https://www.bbc.com/marathi/india-49327477

https://www.sudharak.in/1996/11/1751/

https://www.maayboli.com/node/62200

हा मुद्दा ज्या पक्षाच्या अजेंड्यावर आहे तो पक्ष जर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे तर मग सनाका हा हिंदूंना खुश करण्यासाठी आणला जाईल हे विधान का चूक आहे? की या कायद्यामुळे हिंदूंना काही नुकसान होणार आहे? मला खरंच माहीत नाही.>>>>>

या कायद्यामुळे हिंदू खुश कसे होतील हे कळले नाही. त्यांना खास सवलती, अधिकार, हक्क मिळत असतील तर गोष्ट वेगळी. पण जिथे कायद्यातच 'समान' शब्द आहे, प्रत्येक धर्माचा पर्सनल law बोर्ड बरखास्त करून भारतीय नागरिक म्हणून सर्वांना एकाच कायद्याखाली न्याय दिला जाणार असेल तर त्यात काय चूक आहे? किंवा त्यात हिंदूंचाच फायदा असे काय आहे?

साधना, लिंक्स साठी धन्यवाद! सुधारक मधला लेख बराच मोठा आहे. मी सर्व लिंक्स वेळ मिळाला की नक्की वाचते.
माझा सनाका ला विरोधही नाही आणि समर्थनही नाही कारण मला तो कायदा नेमकं काय मांडतो आहे हे माहीत नाही. पण माझ्या "हिंदू तुष्टीकरण" या शब्दांवरून लोक इतके का धावून आले हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे अजूनही. तुम्ही दिलेल्या लिंक्स मधून मला कदाचित उत्तर मिळेल. बघूया.

समान नागरी कायदा ची मागणी नेहमी हिंदुत्ववादी च करत असतात म्हणून त्यांनी हिंदू तुष्टीकरण असे म्हटले असेल , त्यात खूप आश्चर्य कारक काही नाही

सर्व लिंक्स वाचल्या. अदित्य श्रीपद यांचा लेख आधी वाचलेला होता पण तो पुन्हा वाचावा इतका उत्तम आहे.
बीबीसी आणि सुधारक मध्ये सनाका चा चांगला आढावा घेतला आहे. हे सर्व वाचून मला असे वाटते की सनाका will be a pipeline dream. या कायद्यातील तरतुदी जर नीट असतील तर सर्वच धर्मांतील प्रतिगामी चालीरीतींवर बंदी येईल मग ते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असो वा खाप पंचायत. I also fear that the law might be watered down and lose its significance in the process. जर मोदी सरकारने त्यांच्या या कार्यकाळात हा कायदा पास करून घेतला तर ती एक मोठी अचिव्हमेंट असेल.
जरी कायद्याचे महत्त्व मान्य असले तरी केवळ कायदा आल्याने overnight गोष्टी बदलणार नाहीत. त्यासाठी समस्यांच्या मुळाशी जाऊन काही पिढ्या अविरत समाजसुधारणा घडवून आणाव्या लागतील - मुस्लिम समाजात आणि इतर मागास समाजात. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की हे घडवून आणण्यासाठी जो समाज रोल मॉडेल म्हणून असू शकतो तोच हिंदू समाज अधिकाधिक प्रतिगामी होत चालला आहे Sad
एक पक्ष म्हणून भाजपला मुस्लिम समाजात आपली विश्वासार्हता वाढवायची असेल तर त्यांना पुरोगामीत्व अंगी बाणवायला लागेल. कारण नाहीतर हा कायदा मुस्लिम लोकांना बरबाद करायला आणला आहे हा गैरसमज अजून दृढ होईल. आणि त्यातून असंतोष वाढेल. परंतु भाजपचा आजचा चेहरा फारच प्रतिगामी आहे ज्याला पुरोगामी हिंदू देखील पाठिंबा देऊ इच्छित नाहीत. पुरोगामी विचारांची फुरोगामी किंवा इतर शब्दांत चेष्टा करणाऱ्या भाजपच्या समर्थकांना हा इतका पुरोगामी कायदा पचणार आहे का? आणि जर तसं असेल तर मग त्यांच्याकडून पुरोगामी विचारांची थट्टा का केली जाते?

पुरोगामी विचारांची फुरोगामी किंवा इतर शब्दांत चेष्टा करणाऱ्या भाजपच्या समर्थकांना हा इतका पुरोगामी कायदा पचणार आहे का? आणि जर तसं असेल तर मग त्यांच्याकडून पुरोगामी विचारांची थट्टा का केली जाते?>>>>> जिज्ञासा, थट्टा केली जात नाही. कारण या लिबरल म्हणवुन घेणार्‍या लोकांच्या विचारांमध्ये समानता नाहीये. एकदा एखाद्याचे कानफाट्या नाव पडले की ते तसेच होते म्हणून बिजेपीच्या चाहत्यांना भक्त म्हणून हिणवले जाते. ही सुरुवात शहाबानो खटल्यापासुन झाली. स्व. राजीव गांधी यांना राजकारणाचा कसलाच अनूभव नव्हता. त्यामुळे एकीकडे त्यांनी शहाबानो खटल्यात धर्मांधांपुढे शरणागती पत्करली आणी दुसरीकडे हिंंदुंची मते जायला नको म्हणून रामजन्मभूमीचे कुलुप उघडुन ठेवले. तेव्हापासुन रेल्वे रुळासारखे जे दोन तट पडले, ते एकत्र होणे अशक्य. दुसरीकडे ज्या अर्णवला बिजेपी भक्त किंवा पोपट म्हणून हिणवले जाते त्यानेच आपल्या मुलाखतीत पाकी मिनीस्टरची हवा काढली होती, जे राजदीप किंवा बरखाला पण आयुष्यात कधी जमणार नाही.

मोदींविरुद्ध बोलले की तो देशद्रोही आणी त्यांच्या बाजूने बोलले की भक्त, चाटु असा प्रवाह इथे तयार होतोय. जर शक्य असेल तर कुलवंत सिंग कोहली ( वरीष्ठ पत्रकार ) यांची जुने लिखाण वाच. साप्ताहीक सकाळ हा पवारांचाच आहे तरी याच्यातच त्यांनी लिहीलेल्या हिंदी लेखाचा अनूवाद मराठीतुन दिला होता. स्व. राजीव गांधी गेले ही बातमी दिल्लीत माहीत देखील नव्हती , त्याच वेळेस माखनलाल फोतेदार आणी अजून तीन काँग्रेसींनी दिल्लीच्या चांदणी चौकात राजीव गांधी अमर रहे अश्या आरोळ्या ठोकल्या होत्या. हे असे लोक पार दिल्लीपासुन गल्लीपर्यंत आहेत. स्वतःचा पुरोगामीपणा सिद्ध करायला कॉम्ग्रेसने मुस्लिमांना पाठिशी घातले तेव्हाच भाजपाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला व बाळासाहेब ठाकरेंनी हवा दिली.

आता कोणीच अभ्यासु नेता न उरल्याने भाजपा काय किंवा कॉम्ग्रेस काय आपली मते लोकांपर्यंत नेऊ शकत नाहीत.

कायच्या काय लिहितात भक्ताडे

शहाबानो केस पासून मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऍक्ट केला व मुस्लिम स्त्रियांना पोटगी देण्याची व्यवस्था केली

रशमी बाईंनी अभ्यास आणि परिपक्वता वाढवावी. प्रश्न काय आणि उत्तर काय देतात?

शहाबानो केस पासून मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऍक्ट केला व मुस्लिम स्त्रियांना पोटगी देण्याची व्यवस्था केली>>>>> Proud सत्य कटु असते. पोटगीचा निर्णय पण झाला होता शहाबानोच्या बाजूने, पण मध्ये माशी कशी शिंकली हे माहीत नाही का? नसेल तर वाचा.

https://en.wikipedia.org/wiki/Mohd._Ahmed_Khan_v._Shah_Bano_Begum

मुस्लिम बायकांना पोटगी मिळते
वकिलाला विचारून बघा

शाखा म्हणजे विकिपीडिया नव्हे

https://www.thehindu.com/news/national/muslim-women-entitled-to-maintena...

ही बातमी एप्रिल 2014 ची आहे , मोदी सरकार यायच्या पूर्वीची

स्रीया, पौगंडावस्थेतील मुलं मुली, लहान बालके यांना फसवून त्यांचे शोषण करण्याचे प्रयत्न नेहमीच होत असतात आणि त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे धर्मासाठी प्रेमाचे नाटक करुन केले जाणारे शोषण असे धरले तर मूळ समस्येचा हा एक सबसेट झाला. शोषणाला बळी पडण्याची जी कारणे आहेत त्यावर सातत्याने काम करत रहावे लागते आणि जोडीला कायदे लागतात. सातत्याने काम यात समाज प्रबोधन येते आणि सर्वेलन्स, स्टिंग ऑपरेशन असे सरकारी सुरक्षा यंत्रणांनी केलेले कामही येते. हा जो कायदा आहे त्यामुळे शोषण खरेच थांबणार आहे का? एका राज्यातून पळून दुसर्‍या राज्यात जाणे, तसेच लिव इन करणे वगैरे होवू शकतेच ना? धर्म , लग्न वगैरे खाजगी बाबीत हस्तक्षेप हा रोगापेक्षा उपाय भयंकर नाही का?
एका देशाचे नागरिक म्हणून समान कायदा जसा क्रिमिनल लॉ मधे आहे तसाच पर्सनल लॉ मधे देखील आवश्यक. पर्सनल लॉ म्हणजे हिंदूंचे तुष्टीकरण नाही. सगळ्याच धर्मांत काही ना काही प्रतिगामी चालीरिती आहेत. हिंदू धर्मात जात-प्रांत बदलला की चालीरिती बदलतात. ख्रिश्चन लोकांतही पंथ बदलला की नियम बदलतात. एक माणूस म्हणून डिग्नीटीने जगण्यासाठी काय योग्य -अयोग्य असा विचार करुन सुरक्षेचे कवच म्हणून कायद्याकडे बघायला हवे पण तसे होत नाही. एकेकाळी धर्म ही जगण्याची चौकट आणि त्यानुसार कायदे असे होते. आता जर आपण प्रजासत्ताक ही जगण्याची चौकट स्विकारली आहे तर धर्मावर आधारित कायद्याचा - वेगवेगळ्या पर्सनल लॉजचा हट्ट कशासाठी हे माझ्या समजूतीच्या पलिकडे आहे.

gandhi land.jpg

Proud

रश्मी, माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नाही.
स्वाती ताई, खरं आहे पण तुम्ही साधना यांनी दिलेल्या लिंक पाहिल्यात तर समान कायदा आणणे हे किती अवघड आहे हे लक्षात येईल. त्यासाठी जे प्रबोधन व्हायला हवे, जो विचारांचा मोकळेपणा (लिबरलिझम) हवा तो भाजपमध्ये आहे का? कदाचित संख्याबळाचा फायदा मिळवून संसदेत कायदा पास होईलही पण त्याने वस्तुस्थिती कशी बदलेल?
I find a very strong disconnect between the political agenda and the constitutional thinking process of BJP in this regard. राम मंदिराची उभारणी आणि भाजपची विचारधारा aligned गोष्टी वाटतात पण सनाका च्या बाबतीत भाजपचं काही तरी हुकलंय असं वाटतंय मला. म्हणजे भटजींनी दर्भाच्या काड्या न आणता स्ट्रॉ घेऊन यावे असं काहीसं.
हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर कुठून आला आणि कधी आला हे पाहीलं पाहीजे.

लव्ह जिहाद फक्त स्रीयांपुरता मर्यादित नाही. पुरूष सुद्धा बळी पडतात.

ब-याच गोष्टी केल्या पाहिजेत. पण त्या करण्यासाठी समस्या 'ॲकनॉलेज' करणं ही पहीली पायरी आहे. आणि हा कायदा हे करतो. कायद्यामुळे कदाचित प्रश्न सुटणार नाही पण निदान तो 'ॲकनॉलेज' होईल.
जर 'लिबर्टी' च्या गोड गोंडस नावाखाली ॲकनॉलेजच करायचं नसेल तर दुसरी गोष्ट आहे.

>>>लव्ह जिहाद फक्त स्रीयांपुरता मर्यादित नाही. पुरूष सुद्धा बळी पडतात.

लव जिहादचे निकष काय ?

Pages