बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिली पनीर, हॉट अँड सावर सुप, स्वीट कॉर्न सुप, बेबी कॉर्न मांचुरिअन, हक्का नुडल्स , गार्लिक नुडल्स,स्प्रिंग रोल, डंपलिंग्ज

आमच्या इथे बेबीकॉर्न प्लस कॅप्सिकम हवे असल्यास मंचुरिअन ग्रेव्ही मध्ये मिलते ते फार भारी लागते. सोबत व्हेज फ्राइड राइस. सोबत स्प्रिंग रोल.

थंडीचे दिवस आहेत तर एक मोठा माठ भरून ( तो के टरर कडे असतो तो नळ व इलेक्ट्रिक हिटिन्ग वाला) क्रीम ऑफ टोमाटो सूप आणि स्वीट कॉर्न व्हेजी सूप. लैच भारी. ज्येना पण घेउ शकतात.

फक्त चायनीज मेन्यू असणार का? सर्वाना चायनीज आवडत असेल तर(च) ठीक आहे.

भारतातील एका पार्टीत एक काउंटर चायनीज, एक काउंटर डोसा- उत्तपा आणि एक काउंटर छोले भटुरे असं ठेवलेलं पाहिलं आहे. अर्थात तेव्हा जास्त लोक होते सो केटरिंग होतं. शिवाय एक काउंटर कुल्फी-फालुदा!

छोले पराठा किंवा फ्लॉवर बटाटा मटार मिक्स भाजी पुरी(नेटिव्ह भाषेत कुर्मा पुरी) हे सेफ बेट वाटतं
चायनीज साठी बऱ्याच लोकांना शंका असतात.हल्ली डायबेटिक्स ना पण बहुतेक डॉ लोक चायनीज अजिबात खाऊ नका सांगतात.प्रेग बायकांना तर 'हे खाऊ नको ते खाऊ नको' म्हणून भरपूर टेरराईझ केलेलं असतं.चायनीज ऐकलं की त्यांच्या डोळ्यासमोर अजिनोमोटो, बर्थ डिफेक्ट दिसायला लागतात.
एक दोन आयटम चायनीज आणि बाकी इंडियन/इतर असे काहीतरी जास्त चांगले चालेल असे वाटते.

भारतातील एका पार्टीत एक काउंटर चायनीज, एक काउंटर डोसा- उत्तपा आणि एक काउंटर छोले भटुरे असं ठेवलेलं पाहिलं आहे. अर्थात तेव्हा जास्त लोक होते सो केटरिंग होतं. शिवाय एक काउंटर कुल्फी-फालुदा!>> हो हे खुपच नॉर्मल आहे त्याशिवाय पान काउंटर, आणि छोले भटुरे बरोबर जिरा राइस व दाल असते. पास्ता काउंटर पण मस्ट आहे काही वेळी. त्यांचा इवेंट व जनरल पाव्हण्यांची प्रोफाइल बघून ठरवले असेल.

हा घरगुतीच कार्यक्रम आहे. आम्ही घरातलेच २० सदस्य आहोत. बहुतेकजण मांसाहारप्रेमी आहेत. पण काही लोकांना शनिवार असल्याने, २-२ प्रकार करण्याऐवजी व्हेजच करायचंय. मग ते जरा चटपटीत हवं. रेग्युलर बिर्याणी , छोले, पनीर ग्रेव्ही पेक्षा वेगळं म्हणून चायनीज करावं असं वाटतंय. ज्येना दोघंच आणि त्यांना चालेल.
शिवाय घरीच बनवायचंय, त्यामुळे जास्त खटपट आणि तळणीचे पदार्थ शक्यतो नको. कारण बनवणाऱ्या दोघींनाही, लहान मुलांना सांभाळत काम करायचंय. शिवाय केक, वेफर्स असणारच.
एक दोन आयटम चायनीज आणि बाकी इंडियन/इतर असे काहीतरी जास्त चांगले चालेल असे वाटते.>>>>>> हे पण पटतंय. चर्चा करून ठरवावे लागेल. कारण मी मुख्य यजमान नाही.
वरील सर्व सूचनांंबद्दल धन्यवाद.

उद्या एक गुज्जू फॅमिली जेवायला येणार आहे.
पावभाजी आणि आईस्क्रीम असा बेत आहे. स्टार्टर सुचवा.

खांडवी, किंवा
ते मिक्स वेजचे शाल्लो फ्राय केलेले मुटके असतात न (नाव आठवत नाहीये) ते . म्हणजे जर घरी करणार असाल तर जास्तीचा ताप नाही, सगळ्या भाज्या एकदाच उकडता येतील

नो ब्रेनर ढोकळा/ दीप चे फ्रोझन समोसे/जलेबी फाफडा इन्डिव्हि जुअल सर्विंग. / चोराफळी / खांडवी/ आपली मराठ मोळी कोथिंबीर वडी
बरोबर जमल्यास तवा पुलाव करा.

गुजराती फॅमिलीला गुजराती पदार्थ च खाउ घालायचे का? शक्यतो मी टाळतेच गुजराती पाहुण्यांना गुजराती पदार्थ , पंजाबी पाहुण्यांना पंजाबी पदार्थ. पनीर पकोडे देउ शकता किंवा कांदा भजी.

कोथिंबीरवडी किंवा पनीरला, आले+लसूण ,पुदिना,कोथंबीर,ओली मिरची यांचे वाटण लावून तव्यावर नाममात्र तेल घालून परतलेले क्यूब्ज.

स्टार्टर का द्यायचे पा भा असताना ? पाभा दणकून द्यायची. भजी खाल्ली तर पा भा साठी भूक नाही रहाणार. Happy

फृट चाट नावा चा आंबट गोड तिखट आयटेम करता येइल . बारक्या वाट्यांतून द्यायचा. वेलकम म्हणून गरम क्रीम ऑफ टोमाटो सुप देतायेइल

पाभा + आईसक्रीम असेल तर थोडा तवा पुलाव पण असलेला बरा. किंवा दहीबुत्ती पण पाभा बरोबर हिट जाते.

आता या मेनूत स्टार्टर स्किप करून सूप अ‍ॅड करता येईल (त्यातही टोमॅटो सूप शक्यतो नको कारण पाभात बर्‍यापैकी असतो). अगदी काहीतरी क्रंच हवाच असेल तर चायनीज एखादं सूप + फ्राईड नूडल्स असं काहीतरी जमेल.

मुळात पाभा हिरोगिरी करणार अस्ल्यानं आणि तो हिट प्रकार असल्यानं बाकी कश्याची गरज नाही.

रच्याकने किती आहे पब्लिक?

करोनाकडे काणाडोळा करून लोक एकत्र जमून पंगती उडवू लागलेत हे पाहून/वाचून सद्गदित झालोय..
उगाच आपण मूर्खासारखे पीपीई किट घालून ओपीडीत बसतोय अन ऑपेरेशन आधी गाफा होतेय हे आठवून भंजाळलोय!

जाने कहाँ गये वो दिन...

Proud

धावीला बोर्डात आल्यावर रिपोर्टर आले व्हते , मग आपन बोल्ले हुते , मी पीशीबी ठिउन दात्तर हुनार , लोकांची शेवा करनार , पेप्रात छापून आले हुते

जाने कहाँ गये वो दिन...

पावभाजीआधी स्टार्टर काय द्यायचं हा कठीणच असतो प्रश्न.

आमच्या ग्रुपमध्ये पावभाजीआधी आनंदाने समोसे/समोसे-छोले-चाट/शेवपुरी/दहीपुरी खाणारे लोक आहेत.
गोडखाऊ लोक असतील तर दोन स्वीट्स ठेवता येतील. (म्हणजे नुसतं आईस्क्रीम ऐवजी गुलाबजाम-आईस्क्रीम किंवा गाजरहलवा-आईस्क्रीम). मग स्टार्टर नकोच किंवा लाईट सूप/सॅलड फक्त. Chips n dips हा पण एक लाईट ऑप्शन.

बाकरवडीला +१
पावभाजी मध्ये काही प्रोटीन नाही म्हणून आधी छोले चाट खाणार्‍या गटात मी आहे! Wink

धन्स लोकहो! १ च कुटंब आहे. मोजून 6 लोकं (आम्ही धरून). पहिल्यांदाच घरी बोलावतोय म्हणून काय करावं हा प्रश्न. खरं तर ते आज येणार होते पण आज त्यांचा एकादशीचा उपवास असल्याने उद्या येणार आहेत

मग नूडल्स सूप ( रेडी टू मेक) केलं आणि स्टार्टर म्हणून चकली.
पावभाजी , तवा पुलाव ( नो मसाला पुलाव फक्त भाज्या घालून) आणि आईस्क्रीम सँडविच असा मेनू विचार करतेय.

अमा, आमच्या पासून जवळपास दीड तास अंतरावर इंग्रो आहे त्यामुळे फ्रोजन सामोसे वगैरे आणता येणार नाही इतक्यात. पुढच्या वेळे साठी आणून ठेवेन.

छोले भिजत टाकलेले पण ते अजून भिजलेच नाहीत त्यामुळे तो बेत बारगळला.

ती शेजारीण गुज्जू पदार्थ फार सुंदर बनवते आणि मी स्वयंपाकाबाबत फारच लिंबू टिम्बू गटात असल्याने तिला गुज्जू पदार्थ बनवून खायला घालायची हिम्मत नाही.

दही बुत्ती थंडी मुळे नको वाटली.

आरारा, लोकांचं काम फार मोठं आहेत पण तरीही कमेंट आवडली नाही तुमची. आम्ही शेजारी राहणारी 2 कुटुंब मिळून एकत्र जेवणार आहोत यापेक्षा मोठं स्वरूप नाही या गटग चं. अमेरिकेत एका आड भागात राहत तेंव्हा emergency कधीही येऊ शकते, ओळखीचं कोणी असलेलं बरं या उद्देशातून दोन्ही कुटुंब भेटण्याचं ठरवतोय.असो!

पावभाजी बर्याचदा करणं होतंच त्यामुळे ही लिस्ट उपयोगी आहे. थँक्स सगळ्यांना Happy

भाज्यांचे मुटके मुद्दाम नको म्हणलं खूप भाज्या भाज्या होतील. लहान मुलं पळून जातील Proud पण भारी ऑपशन आहे इतर वेळेसाठी.

कोथिंबीर वड्या, खांडवी ला कष्ट खूप आहेत. एकटीच्याने होत नाही आजकाल Sad

कचोरी, बाकरवडी, पापड वगैरे आणून ठेवते इतर वेळेसाठी.

पण आज त्यांचा एकादशीचा उपवास असल्याने उद्या येणार आहेत
नवीन Submitted by रीया >>>>
एकादशीचा दोन्ही वेळचा उपास असतो. गुजराथी आहेत ... त्यामुळे त्यांचे पद्धती / नियम वगैरे असतील तर?
दुपारी येणार असतील तर पूर्ण भाजी-पोळी-वरण-भात-गोड जेवून उपास सोडणार का विचारून घ्यावे का?

सूप, स्टार्टर, सँडविच, पाभा, आईस्क्रीम चालेल की कांदा-लसूण नको, प्रॉपर जेवणच हवे असे काही त्यांचे असेल तर दोन्ही बाजूंची पंचाईत होईल.
नाहीतर मग बोलून दिवस बदला. वेळही मिळेल करायला.

छोले आहेत भिजलेले तर सुंदल करता येईल स्टार्टर म्हणून.
रेसिपी माबोवर आहे. साधी, सोपी आहे.
जास्त चटपटीत करायला गरम मसाला + चाट मसाला / चिंच कोळ किंवा चायनीज आंबट-तिखट सॉस किंवा भेळ चटण्या यापैकी अ‍ॅव्हेलेबल असे काही घालून व्हेरिएशन करता येईल.

तुमची तब्येत / धावपळ लक्षात घेऊन, ज्यात तुमचा हात बसलाय असे किंवा आधी करून पुन्हा गरम करून खाता येतील असे सोयीचे + अपिलींग पदार्थ निवडा.

>> अमेरिकेत एका आड भागात राहत तेंव्हा emergency कधीही येऊ शकते
Sorry but ARR is correct. Enjoy your break and kindly follow local guidelines to celebrate. Emergency can be somewhere else. Good luck.

नॉन मराठी लोक जेवायला असतिल तर त्यांना आपले काळ्या / गोड्या मसाल्यातील भाज्या आवडतात. फक्त थोडा कमी तिखट करावे लहान मुलांसाठी. सुपर मार्केट मधील पदार्थ सगळेच आणतात. साधे पण रुचकर जेवण कोणालाही आवडते.

मुख्य म्हणजे अमेरिकेत राहणारे लोक तिथलेच काही का नाही खात बनवत असा प्रश्न पडतो. तिथे देशी खाण्याचे काय कौतूक? स्टेक बर्गर अ‍ॅपल पाय कोक पिझा भरपूर झालंकी इतरही भरपूर फूड ऑप्शनस आहेत. अजून तरी मल्टी कल्चरल सोसायटी आहे. अनंत फूड व ड्रिंक ऑप्शन आहेत. एखादा साधा पास्ता एक सलाड व एक आइसक्रीम / केक चीज केक पाय बास झाले की. असे म्हणजे मला वाट्ते. उत्साही गृहिणी असतात करून घालणा र्‍या. झिंदाबाद.

Pages