बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त बेत ममो! मी पण तिमिच्या पुऱ्यांना मत देणार होते कारण साबुदाणा वडे गरम गरमच छान लागतात पुऱ्यांचे तसे नाही.

थॅंक्यु मंजू जि ...
मंजू वरणभात आणि पोळ्या थोड्या करून ठेवल्या होत्या इतकंच. कोणाला पुऱ्या नको झालं किंवा कोणाला शेवटी दही भात वरण भात खावा वाटलं तर म्हणून

लहान पाहुणे येणार असतील तर उपयोगी पडेल म्हणून लिहून ठेवतेय. परवा एक जोडपं व दोन मुली (२.५-३ वर्षाच्या) लंचसाठी होते.
बेत असा: जिरा राईस, दाल फ्राय, साधं वरण, मश्रुम मसाला, बटाट्याची भाजी, पोळ्या, शेवयांची खीर, कोथिंबीर वडी

मुलींसाठी म्हणून बटाट्याची भाजी फिकी केली होती व जिरा राईससाठी बासमती न वापरता आंबेमोहोर वापरला. (बाळगोपाळांना जास्त मोकळा किंवा फडफडीत भात आवडत नाही असा मला अनुभव होता म्हणून)
मुली व्यवस्थित जेवल्या (त्यांच्या आईने त्यांना कमी तिखट पूर्ण जेवण जेवायची सवय लावली आहे हा मेन फॅक्टर.)

हो मंजुताई:स्मित:
सगळं संपलं..अंदाज एकदम बरोबर आला..सगळ्यांना आवडलं..

मागे एकदा राखी पौर्णिमेला नारळी भात,रगडा पॅटीस आणि कोथिंबीर वडी असा सोपा सुटसुटीत बेत ठेवला होता..खूप आवडला सगळ्यांना आणि पोट भरिचे पण झाले..

यावेळी राखी पौर्णिमेला केलेला बेत असा होता-
पुरी, बटाट्याची सुकी भाजी, बासुंदी. मटार- गाजर- sweet corn चे दाणे घालून केलेला tri colour पुलाव, शेंगदाणे- खोबरं- कोथिंबीर घालून केलेली ओली चटणी. वहिनी ने खव्याचे पेढे केले घरीच. तर तो पेढा.
नंतर साठी तांबूल केला होता. एकंदरीत चांगला जमला होता बेत.

माझा राखी चा यावेळी केलेला मेनु :

नारळीभात
फ्लॉवर-मटार-बटाटा-गाजर कुर्मा
टोमॅटो सार
अळु वडी
पुदीना कोथिंबीर खोबरं चटणी
काकडी-डाळींब घालुन दह्यातली कोशिंबीर
मसालेभात
पोळ्या

मसालेभात केला नसता तरी चाललं असतं असं नंतर वाटलं...त्याऐवजी साधा भात किंवा थोडा मऊसुत जीराभात पण चालुन गेला असता.
पुढच्या वेळी लक्षात राहील आता..

माझा राखी चा यावेळी केलेला मेनु :
मसालेभात , मठ्ठा, तळलेले पापड, भेंडी फ्राय, काळ्या वाटाण्याची उसळ, पोळी-घरी केलेले.
मोतीचूर लाडू, कचोरी (मागवलेले)
उकडीचे मोदक (नणंद नी आणलेले)

जमेल तितके आणि तेवढेच करायचे या तत्वा वर आधारीत Wink

सगळ्या डाएट वाल्या मैत्रिणींची भिशी आहे.......काय बेत करावा? १० जणी आहेत.
सॅलड -सूप-सँडविचेस.....?
यात काय व्हेरिएशन्स करता येतील?

मखाना रोस्ट , मटकी मुग उकडून त्यामध्ये कांदा टोमैटो लिंबू पिंक salt घालुन डिश करु शकता.

आंबट गोड - त्या काय खातात ते त्यांनाच विचारलं तर? डायट वाल्यांबाबत शक्यतो रिस्क घेऊ नये खरंच.

काही लोकं ब्रेड अजिबात खत नाहीत मग सँडविच कशा खाणार? बरेच प्रकार असतात खरे

सगळ्या डाएट वाल्या मैत्रिणींची भिशी आहे.......काय बेत करावा? १० जणी आहेत.
जिरं टाकुन उकळलेले, सुंठ पावडर टाकुन उकळलेले, पुदीना, तुळशीची पानं टाकुन उकळलेले पाणी असे चार प्रकारचे वेगळे पेये त्यांना छानश्या काचेच्या ग्लासात सर्व करा.
प्रत्यके ग्लासाला वर कडेवर मीठ, मिरची पावडर, चाट पावडर,हिरवी मिरची वाटुन ती पेस्ट अस लावुन द्या. भिशी पार्टीची पार्टी आणी डाएटचा डाएट.

भिशीच्या दिवसाला चीट डे घोषित करा आणि नॉर्मल जेवण करा. वर वाटलंच तर ऋजुता दिवेकरचं एखादे स्पीच लावून ठेवा. हलके घ्यालच.
पण सलाड (सुंदल टाईप), तोफू सलाड, व्हिएत्नामीस राईस पेपर रोल्स, दही डिप विथ भाज्या, वेज क्लिअर सुप, मिळत असेल तर सारडो ब्रेड, आणि कट फ्रुटस असा बेत करू शकता.

Happy जेम्स बाँड!
वॉव ...आभा! मस्त!
त्या सगळ्या वेट लॉस वाल्या आहेत...... अमु परीचा मूग मटकीचा पर्यायही ठीक वाटतो आहे! Happy

सगळ्या डाएट वाल्या मैत्रिणींची भिशी आहे.......काय बेत करावा? १० जणी आहेत. >>
वेलकम ड्रिंक -
जलजीरा / साखर न घालता लिंबू सरबत विथ पुदिना आणि आलं
स्टार्टर / सॅलड -
चना जोर गरम,मूग,कांदा,टोमॅटो, चाट मसाला,कोथिंबीर.
Wheat pasta वापरून कोल्ड पास्ता सॅलड
मटकी माखणे ई घालून भेळ
खाकरा भेळ.
सगळे फ्रुटस विथ चाट मसाला.

मेन कोर्स
मिक्स दाल इडली ,चटणी ,कमी तेल आणि खूप भाज्या घालून सांबार
पनीर,मश्रुम, रंगीत ढबु मिरच्या वापरून स्टर फ्राय केलेल्या भाज्या
पनीर,मश्रुम,फ्लॉवर टिक्का ( दही, एव्हरेस्ट तंदूर मसाला बेसन ई वापरून मॅरीनेट करायचं आणि ग्रील पॅन वर भाजून घ्यायचं )
पालक / लेमन कोरिएंडर / लाल भोपळा सूप ( याची एक मस्त माबो रेसिपी आहे )
गहू चपाती वापरून सगळ्या भाज्या घालून रोटी रॅप/ फ्रॅंकी
ब्राऊन राईस तवा पुलाव ( भाज्या, पनीर, मशरूम ई ई )

डेझर्ट -
बनाना , खजूर व्हेगन आइस्क्रीम ( नेट वर आहे रेसिपी )

वरणफळं, भाजलेले पापड/पापड्या, कवडीदार दही
दलिया खिचडी, कढी गोळे, मसाला पापड, पालक खजूर कोशिंबीर
मुगाचा मसाला डोसा पनीरची भाजी भरून, टो. / पालक सूप
भाज्यांची कटलेटस्/मिनी थालिपिठ्स
मसाला भाकरी बर्गर स्टाईल
ढोकळा, सुरळी वडी, परतलेली अळू वडी
अननस, डाळिंब, पेरू चाट
सफरचंदाचा मिल्क शेक

मस्त मेनू आहेत सगळे खरं पण डाएट आणि स्पेशल डाएट वाल्यांची फार नाटकं असतात बाबा.
:त्रागा मोड ऑन:
रक्षाबंधनाला एक कुटुंब घरी जेवायला आलेलं त्यात एकूण 6 लोकं
नंबर 1 :- पोळी भाजी खात नाही, पावभाजी स्नॅक्स तत्सम काही तरी हवं
नंबर 2 :- कांदा लसूण नसलेले पदार्थ हवेत
नंबर 3 :- पाव नको
नंबर 4 :- डाएट वर आहे त्यामुळे बाहेरचं काही नको
नंबर 5 :- घरातलं तेच तेच खाऊन कंटाळा आलाय आणि आज ज्यांच्याकडे जाऊन आलो त्यांनी पुरण पोळी वगैरे केलेली तसाला मेन्यू नको
नंबर 6 :- नुसता भात नको, पोट भरीचा होत नाही.

अशा 6 मेम्बरच्या 6 डिमांड ऐकून शेवटी आम्ही बटाटे वडा आणि सांबार बनवला, गोडात रसमालाई.आजच एका नातेवाईकांकडून कळालं की ही फॅमिली आमच्या नावाने ओरडत होती की सणाला असलं बनवतात होय जेवायला म्हणून (अवघड जागेचं दुखणं आहे, शिव्या देत वा खात दार वर्षी यांना बोलवावं च लागतं)

:त्रागा मोड ऑफ:

त्यामुळे असलं कोणी रडकं असेल ग्रुप मध्ये तर एवढे कष्ट करून बोंबाबोंब करणार त्यापेक्षा त्यांनाच विचारा काय खाणार.

वजन कमी करण्याकरता डायेट करणार्‍या असतील तर साधारण १२०० कॅलरी कोटा असेल दिवसाचा. ब्रेकफास्ट / लंच / डिनर आणि एखादे स्नॅक असे गृहित धरले तर जेवणा करता ३००-३५० कॅलरी मधे बसवायला हवे. एवढ्या कमी कॅलरीज मधे पोटभरीचे जेवण असेल तर क्लीयर सूप / सॅलड हे नक्की ठेवा. गोडाचा प्रकार न करता ताजी फळे ठेवा. तळणीचे प्रकार टाळावे लागतील. बरेच लोक डायट म्हणून ड्राय फ्रूट मिठाई / बर्फी असा विचार करतात. दोन सुके अंजीर = ८०-९० कॅलरीज होतात. ३५० कॅलरी कोटामधे ९० जर अंजीरातच संपल्या तर उकडलेल्या भाज्या / कच्चे सॅलड खावे लागेल Happy

अर्धा कप भात = १०० कॅलरीज , एक फुलका किंवा बिन तेलाची पोळी ८०-१०० कॅलरीज

ब्रोकोली बदाम सूप(कॉर्न फ्लोअर न घालता), 2 छोट्या १००टक्के होल व्हिट ब्रेड स्लाईस, ग्रील्ड पनीर(मॅरीनेशन म्हणून लो फॅट दही, ज्वारी पीठ,चिली पावडर, चाट मसाला, जीरा पावडर,मीठ)
गोड म्हणून ताजे कट ऍप्पल.

रिया ची युज केस वाचून हे सगळं पाळून सगळ्यांना खाऊ घालणारा 2000 लाईन्स चा अल्गोरिदम मनात लिहायलाच घेतला थेट.एक ऍप बनवून 200 रु ला विकायचा स्कोप आहे.

दुसर्याकडे जेवायला जायचे म्हणजे सरप्राईज मिळणार , अशी पूर्वीची शिकवण होती
मिळेल ते खायचे>> हीः. हीः ब्लॅककॅट.
आणि घरीही पानात पडेल ते खावं लागायचं. ःस्मित ः
पण खजूर पालक कोशिंबीर इंटरेस्टिंग वाटतेय. मेधावि, कशी करायची?
बाकी मी_अनु ला अनुमोदन. मस्त पर्याय सुचवलेत.

डिमांड करून मग जेवायला जाणार असतील तर अशा लोकांना जीपे करून 200 रु पाठवून द्यावेत व तुला काय हवे ते गीळ म्हणून सांगावे

दुसर्याकडे जेवायला जायचे म्हणजे सरप्राईज मिळणार , अशी पूर्वीची शिकवण होती
मिळेल ते खायचे >> हो ना. मला तर कुठे गेल्यावर मला हा पदार्थ आवडत नाही, मी खाणार नाही असे सांगू शकतो हे सासरी आल्यावर समजले Wink
आईकडे असताना कुठेही गेलो तरी ताटात जे येईल ते संपवायचे हीच शिकवण होती.
या वरून एक मजेदार किस्सा आठवला. एकदा असेच कुणाकडे तरी पाहुणे गेलो होतो तेव्हा त्यांनी बनविलेल्या दोन भाज्यांपैकी एक भाजी माझ्या भावाला आवडत नव्हती. पण त्याचं असं असायचे की जो पदार्थ आवडत नाही तो आधी संपवून टाकायचा आणि नंतर उरलेल्या जेवणावर ताव मारायचा. त्यामुळे त्याने ती भाजी आधी संपवली तर यजमानांना वाटले की त्याला ती जास्त आवडली असेल म्हणून त्यांनी त्याला पुन्हा वाढली. विदर्भातील जेवण वाढण्याच्या आग्रहाबद्दल ज्यांना माहीत आहे ते रिलेट करू शकतील. आपण कितीही मनाई केली तरी ते वाढतातच. तर दोन वेळा असे झाले की भावाने भाजी संपवली की ते वाढायचे. आणि भाऊ पण वेड्यासारखा परत ती भाजी संपवायचा. आमची सगळ्यांची हसू लपवत जेवण्याची तारांबळ उडत होती.

डिमांड करून मग जेवायला जाणार असतील तर अशा लोकांना जीपे करून 200 रु पाठवून द्यावेत व तुला काय हवे ते गीळ म्हणून सांगावे.......१००%.

Pages