बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे प्रतिसाद वाचलेच नाही. पाटवड्याची भाजी मी बेसनाची पोळी लाटुनच केली. माझ्या काही विरघळल्या नाही वड्या Happy
पनीर खरे तर मलाही ऑड वाटत होते पण मुलांसाठी करावे लागणार होते. मुले पाटव्ड्या खाणारी नव्हती. मुलांनी पनीर, चपाती आणि वरण भात आवडीने खाल्ला. भेंडी आमच्याकडे मिळत नाही हो एवढी जास्त प्रमाणात. पण व्हेज बिर्याणी ऐवजी मसालेभात किंवा वरण भातच करायला हवा होता.

पाटवड्यांची आपल्या त्या ह्यांची एकदम फर्मास रेस्पी आहे की इथेच.
इथे आणि इथेही एक रेस्पी आहे. 'इथेही' वाल्यांचीच रेस्पी विपूत गेलेय इथे च्या. Biggrin
आता विपौड्या नका मारू.

कणकेत पालेभाजी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता.. (ह्याला पुणे मुंबईत तिखट मीठ पुर्या म्हणतात Wink )>>>>>>>> सॉरी हां आमच्या पुण्यात नाही म्हणत असल्या पुर्‍यांना तिखटामिठाच्या.. Wink वर अमांनी लिहिलेय त्यालाच आम्ही आपल्या म्हणतो Wink

सॉरी हां आमच्या पुण्यात नाही म्हणत असल्या पुर्‍यांना तिखटामिठाच्या Wink >>> मुंबईत पण नाही हो म्हणत. तिखट, मिठ, जिरं, ओवा, हळद, हिंग एवढंच घालतो आम्ही.

पालक, मेथी, बीट वगैरे घालून केल्या तर रीतसर पालक पुरी, मेथी पुरी, बिटाची पुरी म्हणतो.

पावभाजी बरोबर अजुन काय करता येइल?३० लोकांसाठी करायचा आहे बेत वाढदिवसासाथी. वाढदिवस संध्याकाळी ४ ते ७ असेल बाहेर पार्क मधे. ५.३० ला जेवण. भर उन्हाळा असणार आहे. पावभाजी, केक आणि मँगो लस्सी असा बेत कसा वाटतो? पाव बारब्क्यु वर भाजणार. दुसरा काही बेत असेल तर तो पण सुचवा पावभाजी ऐवजी.

चांगला बेत आहे पेरू, काही बदलू नका. लस्सी आंबट होणार नाही तेवढे फक्त बघा! वर आईस्क्रीम scoop घालून पाहिजे तर!

उन्हाळा आहे तर लस्सीएवजी आईस ड्रिंक चालेल का? बेरी लेमनेड, फ्रूट पंच असं काहीतरी. ग्लास जार मधे भरून ठेवता येईल. नायतर कुलर मधे पॉप्सिकल, लहान आईस्क्रिम कप्स ठेवून नेता येईल. कलिंगड कापून ठेवू शकता.

लहान मुलं असतील तर चिप्स (वेफर्स) नक्कीच ठेवा.
एका मैत्रिणीने अलीकडेच पावभाजी आणि गाजर हलवा असा मेन्यू केला होता. दोन्ही पदार्थ उत्तम झाल्यामुळे अजून काही लागलं नाही. छान बेत झाला.

चांगला बेत आहे पेरू, काही बदलू नका. >>>+११११

ठाणे-मुंबईत रहात असाल तर तर नकोच करू काही बदल. इकडे हल्ली बरेच जण हेच करतायेत , हिट मेनू आहे,. फक्त काहीजण मँगो लस्सी च्या जागी मलाई लस्सी किंवा नुसतेच कोल्ड ड्रिंक ठेवतात

पावभाजी आणि आइसक्रीम/ इतर काहीही गोड असेल तर अजून एक पदार्थ का लागतो? पावभाजी मोठ्या उत्साहानी आणि आवडीनं खातात लोक. अजून केलेले पदार्थ नाही खपत फार. उगाच केलं केलं आणि उरलं असं होतं.

उद्या आमची उशीराने भाऊबीज आहे. बटाट्याचे परोठे, चटणी, काकडीची कोशिंबीर, टोमॅटो सूप, पुलाव, हे सर्व घरी,पालक चीज समोसे(विकतचे) असा मेनू आहे. तर गोड काय करावे? दुधीहलवा,गुलाबजाम आवडतात त्याला. किंवा मग रसमलाई वगैरे.

ठाण्यात नाही ऑस्ट्रेलियात आहे. Happy
पावभाजीच ठेवेन. कॉल्ड्रींक्स असणार आहेत. आईस्क्रिमचे छोटे पॅक इथे मिळत नाहीत. चोकोबार वगैरे नेता येते का बघते. आधी घरी मॅंगो आइस्क्रिम करणार होते पण ते प्रत्येकाला पॅक करुन देताना प्रोब्लेम होईल.
मँगो लस्सी ची रेसिपी आहे का कुठे? नेटवरच्या रेसिपीत जेवढे दही तेवढा मँगो पल्प सांगतात. तो खुपच वाटतो.

पावभाजी आणि आइसक्रीम/ इतर काहीही गोड असेल तर अजून एक पदार्थ का लागतो? पावभाजी मोठ्या उत्साहानी आणि आवडीनं खातात लोक. अजून केलेले पदार्थ नाही खपत फार. उगाच केलं केलं आणि उरलं असं होतं.

नवीन Submitted by मेधावि on 8 November, 2019 - 08:49 >>>+११११११ मलाही हा प्रश्न नेहमी पडतो.

ठाण्यात नाही ऑस्ट्रेलियात आहे. >> ओके, पण तरी फक्त पावभाजी पुरेसी वाटते

बऱ्याच जणांना पोट भरलं वाटायला 50 ग्रॅम भाताचा स्लॅब गरजेचा वाटत असतो
काही जणांना पावभाजी पावाशी प्रॉब्लेम असतो.
त्यामुळे एक प्लॅन बी.
(अर्थात बनवायला मी नाहीये त्यामुळे उगीच उंटावरून शेळ्या हाकण्यात अर्थ नाही ☺️☺️☺️)

हे जे पावभाजीच्या पावाचे प्रॉब्लेम असणारे युनिव्हर्सल लोक्स असतात ना त्यांना फक्त भाजी खा, फायबर असतं त्यात असं ठणकावून कोणीतरी सांगायला हवे. सगळीकडे भेटतात!

Happy येस. मलाही माहिती आहेत पाव भाजीच्या पावाबद्दल प्रॉब्लेम असणारे लोक!
त्यामुळे थोडा जिरा राईस किंवा पुलाव ठेवावा...नाहीतर फारच कान कोंडल्या सारखं होतं.....त्यांना काही देता आलं नाही तर!

हो ना
वरण भात खातो तसं जीराराईस-पावभाजी/पुलाव पावभाजी/खिचडी पावभाजी खायला हरकत नाही.

ए केक आणि लस्सी आहे ना, ते उपाशी थोडेच राहणार आहेत. कॉमन function मध्ये अश्या enabling nature मुळे प्रॉब्लेम होतो. ज्यांना पावाचा त्रास आहे ,असे बरेच केक मात्र मस्तपैकी खातात. केळी ठेवायची ज्यांना पाव नको त्यांना.

काही जणांना पावभाजी पावाशी प्रॉब्लेम असतो. >> हो ना, हे लक्षातच आले नाही. पाव मैद्यापासुन बनवतात अन मैद्याचा त्रास होतो की बर्याच जणांना शिवाय पथ्यही असते

पावभाजी आणि आइसक्रीम/ इतर काहीही गोड असेल तर अजून एक पदार्थ का लागतो? पावभाजी मोठ्या उत्साहानी आणि आवडीनं खातात लोक. अजून केलेले पदार्थ नाही खपत फार. उगाच केलं केलं आणि उरलं असं होतं. >>> अगदी अगदी.

कोणी पाव खात नसेल तर मी पोळ्या थोड्या मागवते. पण इन जनरल असं होत नाही. बहिण कधी कधी रात्री खात नाही पाव मग पोळी खाते.

ऑर्किड मस्त बेत.

पेरू पावभाजी आणि एखादे गोड पुरेसं वाटतंय मलापण, शुभेच्छा, मस्त होऊदे prgm. Twins चा बड्डे आहे का, असेल तर त्यांना advance मध्ये happy birthday.

पेरू पावभाजी आणि एखादे गोड पुरेसं वाटतंय मलापण, शुभेच्छा, मस्त होऊदे prgm. Twins चा बड्डे आहे का, असेल तर त्यांना advance मध्ये happy birthday........+१.

पावभाजी असेल तर काही खात नाहीत लोकं. लस्सी, मसाला ताक. किंवा कोल्ड्रिंक चालेल. पण ठोस पदार्थ नको. माझ्याकडे एवढे लोकं आले पण कोणीच भात नाही घेतला. तसंच राहिला शिल्लक. आणि जे पथ्य पाळणारे असतात ते एक दिवस खातात.. अर्थात माझ्याकडे केक जिलेबी ही होतं.

काही लोक पा. भा खाऊन झाल्यावर बटरमधे लोळवलेली भाजी दहीबुत्तीत कालवून खाताना पाहील्यावर काळजात कालवाकालव झाली होती.

बर्थडे पार्टीला लहान मुलं असतील तर ती नाही खात कधी कधी पावभाजी. आवडत नसते किंवा स्पायसी वाटते किंवा उगाचच. भाजीची दोन वेरिएशन्स करणं (कमी तिखट आणि नॉर्मल) हा एक पर्याय आहे.
पावभाजीसोबत वर शितलनी लिहिलंय तसं एक अ‍ॅडिशनल स्वीट असेल तर मुलं ते खातात (जिलबी किंवा सुके/पाकातले गुलाबजाम किंवा अंगूर मलई वगैरे). केकही असतोच.

Pages