बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूताई, हो हे मी पाहिले आहे रील मधे. कधी खाल्ले नाहिये..
पण फक्त काळे चणे कदाचित आमच्यकडे आवडणार नाहीत असे वाटते.. मटकी आणि चणे मिक्स करुन उसळ करुन बघेन. Happy

केळवणाचा बेत सुचवा ना. आई वडील आणि मुलगा असे तिघे येणार आहेत. खूप जास्त झंझट नको आणि ते येण्याच्या आधी करून ठेवण्यासारखं असावं म्हणजे मी जरा फ्री राहील. आणि सध्याच्या वातावरणाला अनुकूल असे पदार्थ सुचवा

- गाजराचा हलवा/शेवयाची खीर
- आदल्या दिवशी भाज्या साफ करून व चिरून ठेवू शकलात तर उंधियो नाहीतर मटारची उसळ
- खीर केली तर गाजराची पचडी
- आवळ्याचे ताजे लोणचे
- फुलके
- मसाला मूगडाळ खिचडी आणि टोमॅटो सार

किंवा नॉर्थला करतात तसे
- शिरा
- कढी पकोडे/राजमा/छोले
- जिरा राईस
- कॉर्न सलाड

- गुळपोळी/ खव्याची पोळी (आदल्या दिवशी करता येतील)
- मूग डाळ खिचडी
- टोमॅटो सार
- वांगे बटाटा भाजी
- फुलके

कुठल्या वेळी (लंच/डिनर/टी टाइम) येणार आहेत?
त्या मुलाला काय आवडतं त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार ठरवा. Happy
माझेमनने सुचवलेले मेनू छान आहेत.

सकाळी आहे की संध्याकाळी?
संध्याकाळी असल्यास
पाव भाजी, गाजर हलवा, पुलाव - पापड
मेथी पराठे, लोणचे, चटणी, बुंदी रायता , बिर्याणी, गुलाब जाम
हॉट अँड सावर सूप, हाका नूडल्स, स्प्रिंग रोल्स, खीर किंवा हॉट कस्टर्ड

कोणाला जेवायला निमंत्रित कारायचे असेल तार पाहुण्यांना कुठली अ‍ॅलर्जी किंवा पथ्य किंवा आवड आहे का विचारलेले बरे असते.
आजाकाल कोणीच ढिगभर गोड, तळलेले खात नाही म्हणून.
थंडीत बराच वाव असतो जड पदार्थांना पण कोणाला आवडतीलच असे हि नाही.
एका मित्राला त्यांच्या स्नेह्यांच्या घरी फक्त बेसन, चणा, पनीर, दह्याचेच पदार्थ होते आणि त्याला दोन्हीची अ‍ॅलर्जी.

सध्या गाजर हलवा , टॉमेटो सूप , पुलाव , उन्धियो , पाव भाजीचा सीझन आहे.
माझे वैयक्तिक मत - कितीही सुचना घ्या, नवर्या मुलाला विचारून मेन्यु ठरवा . त्याला आपल्या सोयीने ऑप्शन्स द्या. संध्याकाळी लोकाना फार जड खायला आवडत नाही . आणि लग्नाची केळवण करून कधी कधी नवरा मुलगा/मुलगी कंटाळलेले असतात .
गेल्याच महिन्यात आम्ही एक केळवण केलेलं - नवर्या मुलीला पूर्ण जेवण , मिसळ पाव , पाव भाजी , चाट आयटम्स असे ३-४ ऑप्शन्स दिले .
तिने सांगितल म्हणून रगडा पॅटीस आणि शेवपुरी बेत नक्की केला . आणि गोडात तिला आजीच्या हातचा शिराच हवा होता .

बेत पूर्ण जेवणाचा नसला तरी केळवण साग्र्संगीतच केलं . रांगोळी , डेकोरेशन , पाट , चांदीच ताट , पेला , ताटाभोवती महिरप
चांदीच्या ताटात रगडा पॅटीस आणि शेवपुरी वाढली Happy .
पुढच्या महिन्यात आणखी एक केळवण करायचं आहे . मुलगी पक्की मासेखाउ आहे . तसाच काहीतरी मेन्यु ठरवू मग.

चांदीच्या ताटात रगडा पॅटीस आणि शेवपुरी वाढली Happy . >>
माझ्याकडे पण एका मैत्रिणीचा तासाभरात लेकीसह पत्रिका द्यायला येतो असा अचानक फोन आला होता. केळवणाला वेळ नाही असं बरेच दिवस घोकत होती... ५ वाजता येणार होती. तिला पाणिपुरी आवडते हे पक्कं माहिती होतं.... त्यावेळे झटपट शिरा आणि पाणिपुरी चा बेत केला.. पुदीना घरात होता त्यामुळे तिखट पाणी घरी केलं आणि बाकी पुर्‍या, रगडा, शेव वगैरे झोमॅटो ने मागवलं...
चांदिच्या ताटात महिरप वगैरे लावुन पाणीपुरीचं केळवण केलं होतं ;-).. नवरी खुश.. अजुन आठवण काढते..

केळवणाला मूगडाळ खिचडी वगैरे कोण करतं? >>
बाकी मुगाची खिचडी केळवणाला करतात बरंका..
माझ्या स्वत: च्या लग्नाच्या वेळी साग्रसंगीत केळवणं खाउन मी कंटाळले होते.. तेव्हा एका हक्काच्या मावशीला कढी, खिचडी.. सांगितली होती.. तिनं कढी, खिचडी, शिरा आणि मिक्स भजी असा मस्त मेनु केला होता.. बाकीच्या केळवणांपेक्षा मला ते केळवण अजुनही छान लक्षात आहे...

नवर्‍या मुलाला नक्की विचारुन करा पदार्थ असं सुचवेन मी पण...

अजून कोणाला काही सुचत असेल तर जरूर सांगा.>>>
गाजर हलवा/मुग डाळ हलवा +इड्ली-चटणी-सान्बार+ पुलाव/मसालेभात +कोथिबिर वड्या.
सगळ तुला आधी करुन ठेवता येइल..इडल्या पाहुणे आले की लावता येतिल.

सगळ्यांचे खूप धन्यवाद, आणि नवरा मुलगा नाही मुंज मुलगा आहे. मुंजीचे केळवण करायचे आहे. मी गजर हलवा, मसाले भात, टोमॅटो सार, मटर पनीर ची भाजी, फुलके, अळू वडी/कोथिंबीर वडी/सुरणाचे काप असा बेत करायचे ठरवते आहे.

सगळ्यांचे खूप धन्यवाद, आणि नवरा मुलगा नाही मुंज मुलगा आहे. मुंजीचे केळवण करायचे आहे. मी गजर हलवा, मसाले भात, टोमॅटो सार, मटर पनीर ची भाजी, फुलके, अळू वडी/कोथिंबीर वडी/सुरणाचे काप असा बेत करायचे ठरवते आहे.

मूगडाळ खिचडी केळवणाला केलीत तर त्याला मसालेभात, पुलाव, बेसिबेली बाथ, काराबाथ, चित्रान्न, पुलीहोरा, खिचू वगैरे केलंय सांगा. शेवटी खिचडी आणि तूप वाढलंत तरी वचने किं दरिद्रता?
केळवणाला मूगडाळ खिचडी खाल्ली हे एकदम मिडलक्लास वाटतं. Lol मला खायला प्रचंड आवडते. Lol

सान्वी मस्त बेत
स्मिता, स्वस्ती! माझ्या लग्नात पण अमेरिकेत गेल्यावर इथल्यासारख खायला मिळणार नाही म्हणून एका जवळच्या नातलगानी पाणी पुरी, दाबेली आणी तवा पुलाव असा बेत केला होता.पाणी पुरीचा रगडा आणी तिखट पाणी आम्ही नेहमी जायचो त्या पाणी पुरी वाल्याकडुन आणल होत.

Pages