बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर खाण्या बाबत काय तक्रारी विचार करावा लागेल. खास करून बिशी बॅळी भात (कमी मसाला/तिखट करता येत नसल्यास), पाव भाजी (वाटाणे खुप असतात, वाताचा त्रास), मिसळ.

माझ्याकडे पण राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 25 आबाल वृद्धांचे गेट टुगेदर आहे...
पावभाजी
मेथी ठेपले आणि लोणचे
नारळीभात
शाबुवडा आणि चटणी
सुरळी वडी
असा मेनू ठेवला आहे..

पाव भाजी
गोड भात

बाकी करूच नका

केया , कशाबरोबर , कधि कधि काय काय देणार ??? उगाच सरमिसळ नको व्हायला पदार्थांची .
जर लहानंपासून मोठ्यापर्यन्त वेगवेगळे पदार्थ खाणारे लोक असतील ( लहानांसाठी पावभाजी , उपास असेल तत साबुदाणे वडे) .. असं असेल तर ठीक ).पण बरेच पदार्थ केले तर दोन-तीनच खाल्ले जातात आणि मग उगाचच मेहनत वाया गेल्याच फिलींग येत रहात .

मेनू भरपूर आहे(करायला किती माणसं आहेत?)
यातले नारळीभात किंवा मेथी ठेपले कॅन्सल करून पालक/टोमॅटो सूप ठेवता येईल पातळ पदार्थ म्हणून.
(ओह सॉरी, तू प्रश्न विचारला नाहीयेस हे आता पाहिले. करायला लोकांची मदत/काही पदार्थ बाहेरून मागवणे असेल तर चांगला मेनू आहे)

@ Miaris ,

जेष्ठ लोकांना मिसळ पावभाजी असे पदार्थ फारसे आवडत नाहीत असा वैयक्तीक अनुभव आहे.
काही ऑप्शन

इडली चटणी सांबार ,ओला नारळ करंजी / नारळीभात, ढोकळा / सुरळी वडी / कोथिंबीर वडी
नारळीभात नसेल तर थोडा कमी तिखट मउसर असा मसालेभात

हिरवी मटार उसळ, पोळ्या, टोमॅटो सार, पुलाव , गाजर कोशिंबीर
नारळीभात/ करंजी
ढोकळा / सुरळी वडी / कोथिंबीर वडी

सांजाची पोळी , दुध, तूप
मिनी बटाटे वडे चटणी
मसालेभात, टोमॅटो सार
नारळ करंजी ( राखीपोर्णिमा म्हणुन )

ओह गोड शीरा वाचले नाही. Happy
तसं असेल तर तिसरा मेनु नाही चलणार.

सगळं बाहेरून ऑर्डर केले आहे Happy
ज्ये ना ३ आहेत फक्त .आणि पावभाजी आवडीने खातात...बाकी पब्लिक पण खाण्याचे शौकीन आहेत ...to be on safer side १५ ठेपले मागवले आहेत...सगळच थोड्या quantity मध्ये ऑर्डर केलंय..आणि हेच २५ लोक संध्याकाळी पण आहेत...काही उरलं तरी थोड थोड घेऊन संपवू...जोडीला मस्तानी मागवू
मंजुताई..yes ताक किंवा सोलकढी करू..

हिरवी मटार उसळ, पोळ्या, टोमॅटो सार, पुलाव , गाजर कोशिंबीर
नारळीभात/ करंजी
ढोकळा / सुरळी वडी / कोथिंबीर वडी>> हा बेस्ट मेनू वाटला मला . ( खायला) करतेच उद्या.

@Miaris : नारळीभात उत्तम. माफक गोड केलात तर एकच पदार्थ सणाचा व पोटभरीचा पण होईल. बरोबर तयार अळुवडी किंवा कोथिंबिर वडीचे उंडे आणून घरी शॅलो फ्राय केलंत की विषय संपला.
तो नकोच असेल तर वेज पुलाव आणि टोमॅटो सार.
छोले पुलाव पण चालेल शिरा आहे तर.

देवकी, आंबटगोड, ब्लॅककॅट: मी सकाळी वाफवलेले स्वीटकॉर्न, डाळिंबाचे दाणे, सफरचंद यांचे व्हाईट सॉसमधे सलाड केले.

माझे मन.. Happy
व्हाईट सॉस मधे सॅलड? थंड ना?

नारळी पौर्णिमेला नारळी भाताबरोबर साबुदाणा वडे करावेत की तिखट मिठाच्या पुऱ्या , काय चांगलं लागेल मी confuse आहे ...

तिमी पुर्या आणि दह्यातली कुठलीही चटणी,लोणचं आणि मला खूप आवडते तिमी पुरी साखरआंब्या बरोबर खायला हे तिन्ही ठेवलं तर ताटलीही भरल्यासारखी वाटेल. पोटभरीच होईलच हे तरी मटकीची उसळ जेवणसारखंच होईल आणि करायला सोपं...

गोड भात व तळीव हे एकदम पोट जड प्रकरण होईल. भाताची एक मूद व दोन पराठे परफेक्ट किंवा पोळी ( साधी घडीची व मिश्र भाज्यांची रस्सा भाजी/ फ्लावर बटाटा मटा र रस्सा ओल्या नारळाची चटणी डाळींबाची कोशिंबीर )

Finally menu decided.. Thanks everyone... Paneer parathe, tomato sar, dhokala ,chatani, and narali bhat..

वा वा
योग्य प्लॅनिंग, योग्य मदत मिळून बेत दणका सक्सेसफुल होऊदे.

धन्यवाद सर्वांना।
ना भा, ति मी पुऱ्या , दह्यातली चटणी आणि मंजू म्हणली तशी मटकीची उसळ केली.
कोणाला हवा असल्यास वरण भात आणि साध्या पोळ्या ही होत्याच.
मस्त जेवण झालं.

Pages