बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे! साठीच्या वरचे लोक काय खाणार साबु खिचडी आणि दही अणि वेफर्स !! हल्ली सगळे अवेअर असतात आणि हेल्थ काँशस! >>अफाट गैरसमज आहे हा तुमचा . आमच्या इथे फराळाचे पदार्थ देणाऱ्या हॉटेल मध्ये जे ना व्यवस्थित चापत असतात खिचडी आणि सा वडे .

ममो + १ माझ्या घरातले पाचही ज्ये ना आवडीने खातात सा खि / सा वडे
पण बाहेरुन येणार्‍यांसाठी सा खि पेक्षा सा वडे करावेत. चांगलं वाटतं.

बिसी बेळे भात, पापड, कोथिंबीर वडी / सुरळीच्या वड्या/ पाटवड्या असं काहीतरी एक .
सशलच्या रेसिपीने मेथी पुलाव करु शकता. मूदी पाडून वाढायच्या - देखण्या दिसतात. बरोबर खमंग काकडी. डीज्जेच्या रेसिपीने आंब्याचा शिरा- याच्या पण मूदी पाड्ल्या की भारी दिसतात.
लालूच्या रेसिपीने आव्हाकाडो चे ठेपले पण मस्त होतात - फार मंडळी नसली तर जमू शकेल बरोबर दही, तिळाची चटणी

https://www.maayboli.com/node/45285 - ठेपले
https://www.maayboli.com/node/2598 - मेथी पुलाब

मला २० लोकांकरता अप्पे करायचे आहेत..आधी ४ -५ जणांसाठी करताना १वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेत होते.

२० लोकांकरता करायचे आहे.. तर किती डाळ तांदूळ घेऊ?

मला २० लोकांकरता अप्पे करायचे आहेत..आधी ४ -५ जणांसाठी करताना १वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेत होते.

२० लोकांकरता करायचे आहे.. तर किती डाळ तांदूळ घेऊ? >>> हा गणिताचा प्रश्न 'बेत काय करावा' मध्ये कसा आला?

साठ वर्षाचे म्हणजे अगदीच म्हातारे असलेले आणि बोरिंग खाणारे अस का अ‍ॅझुम केल जातय. साठीची लोक आजकाल अगदी टिपटॉप मस्त रहातात. किंबहुना साठी म्हणजे नवी चाळीशी म्हणतात आजकाल.
पावभाजी, जिरा राईस, शिरा, मॅगो लस्सी/कॉफी
फुलके/पुरी + मटारची उसळ + गुलाबजाम + सुरळीची वडी (ऑर्डर केलेली)
मिसळ +पाव , लाडु , चहा+बिस्कीटे
फुग्याचे थालीपीठ + दही , शेंगदाण्याची पातळ हिरवी चटणी, मसाले भात.
मटार घालून उपमा + बुंदीचा लाडु/फ्रुट सॅलड , साबु वडा/बटाटे वडा.
यातल बरचं विकत आणता येईल. किंबहुना तेच केलेलं बर कारण ६० लोक खुप आहेत. किंवा तुम्ही वन डिश म्हटल आहे त्यामुळ फक्त पहिला पदार्थ करून ठेवता येईल.बाकीचे विकत आणता येतील.

इथे ठाण्यात प्रशांत कॉर्नर सारखी छान दुकाने आहेत. तिथे आधी ऑर्डर दिली तर पार टिशू, चमच्या सक ट आपल्याला हव्या त्या नाश्त्याच्या रेडिमेड बॉक्सेस पॅक करून देतात. सर्व पदार्थ जरा जास्त हाय कॅलरी असतात पण कधी कधी चालते. शिवाय सुन बाईला जास्त मेहनत नको. प्लस एखादी ज्युस बॉक्स म्हणजे झालेच.

दोन कपल, एक ज्येना आणि तीन तीन वर्शांची मुले यासाठी हा बेत कसा आहे?
पाटवड्यांची कांदा खोबरे वाटुन भाजी
पनीर भुर्जी (एक तिखट आणि मुलांसाठी साधी वेगळी)
कोशिंबीर
आमटी भात करावा की पुलाव यात ठरत नाहीये.
उन्हाळा असल्यामुळे मँगो आईस्क्रिम

पनीर भुर्जी (एक तिखट आणि मुलांसाठी साधी वेगळी)>>> २ न करता मध्यम तिखट आणि पुलाव ही माझी पसंती.मुलांसाठी वरण भात असू दे.

तीनही मुले अजिबात तिखट खात नाहीत. त्यामुळे मिडीयम चालणार नाही. नाहितर वेगळेच करावे लागेल मुलांसाठी काहीतरी. वरण भात केला तर म अग मोठ्यांसाठी आमटी करता येइल.

पाटवड्यांची भाजी व पनीर ऑड वाटते.
मुलांसाठी भेंडी वगैरे करा फिक्की,
पाटवड्या, कांदा टोमॅटॉ, काकडी, लिंबू चकत्या , भेंडी, पोळ्या, तळलेले पापड कुरडया, ठेचा, मुगाची खिचडी व दही / वरण भात
आईसक्रीम

मुलांसाठी भेंडी वगैरे करा फिक्की,
पाटवड्या, कांदा टोमॅटॉ, काकडी, लिंबू चकत्या , पोळ्या, तळलेले पापड कुरडया, ठेचा, मुगाची खिचडी व दही / वरण भात
आईसक्रीम>> अगदी हेच मनात आले होते. पनीर ऑड वाट्ते आहे. फिकी भेंडीची भाजी, वरण भात, पोळी काकडी किंवा गाजराची कोशिंबीर /
किंवा आलू पालक पराठे. मुले चिकन नगेट खात असतील तर एक फ्रोझन पाकीट हाताशी ठेवा. वरण भात व नगेट्स असे मी दोन मुलांना खायला घातले आहे. ती पाटवड्या भाजी ची रेसीपी द्या मात्र . स्टार ऑफ द मील तीच असेल. मी कधीच केलेली नाही. शिकून घेइन.

फुग्याच् थालिपीठ म्हणजे काय>> आमच्याकडे ही रेसिपी :
ज्वारी, गहू, बेसन, तांदूळ पीठ सम प्रमाणात (कमी जास्त चालतं) घेऊन त्यात तिखट, मीठ अन ओवा घालून कणीक भिजवा.. छोटे गोळे करून पुरीच्या आकाराचे थालीपीठ करा अन गरम तेलात तळून घ्या.. कणकेत पालेभाजी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता.. (ह्याला पुणे मुंबईत तिखट मीठ पुर्या म्हणतात Wink )

फुग्याचे थालीपीठ म्हणजे फुगलेले धपाटे. तळुन केलेले धपाटे. थालीपीठाच्या पीठाचेच. फुग्याचे धपाटे म्हणायला हवे होते बहुदा मी. पण भाजणीचे.
फक्त धपाटे /थालीपीठ म्हटले कि ते तव्यातले. पण मग ते वांग्याचे, सोलाण्याचे,काकडीचे ,प्लेन,कोथिंबीर्/कांदा असु शकते. इथे आल्यावर सासुबाईंनी टोमॅटो, झुकीनीचे पण केलेले.

चनस म्हणताहेत ते बिन भाजणीचे फुग्याचे थालीपीठ. Happy
भाजणीचे वडे म्हणजे फुगलेले थालीपीठ/धपाटे पण याची भाजणी वेगळी म्हणुन वडे.
सॉरी फॉर कन्फ्युजन

Happy अमा....
पाटवड्या विदर्भ- खान्देश ची खासियत आहे. बेसनात तिखट मीठ हळद घालून घटट्ट कणकेप्रमाणे मळून घ्यायचे व तेलाचा हात लावून पोळी लाटून मग शंकरपाळे कापून घायचे.
नंतर आले -लसूण- सुके खोबरे- गरम मसाला यांचा तर्रीदार रस्सा करुन त्यात हे सोडायचे व उकळू द्यायचे. किंचीत कोरडे बेसन पण रस्स्याला लावू शकतो घट्टपणा साठी!
पाटवड्या असताना जनरली बाकी मेनू गावराण पाहीजे..जसे की कांदा, भाकरी/फुलके , भात-वरण, ठेचा- आंब्याचे लोणचे, पापड, दही/ताक, भेंडी अथवा कार्ल्याची सुकी भाजी...
Happy
patodya_0.jpg

धन्यवाद आंबट गोड. करको देकतुं एक बारी. पुण्याच्या तिखट मिठाच्या पुर्‍या म्हणजे फक्त गव्हाच्या कणकेत तिखट मीठ गोडा मसाला तीळ ओवा जिरे जरा जास्त घालून भिजवून तळायचे. बरे लक्षात आले मुलांना डब्यात देत होते आता मला पण नेता येतील की. यप्पडच आहे मी इतके दिवसात लक्षात आले नाही. ही ही.

मला वाटले झुणक्याच्या जरा जाड सर वड्या थापायच्या व चौकोन कापून त्या कांदा खोबरे रश्शा मध्ये सो डायच्या. बरोबर भात पण भारी लागेल. व एक भाकरी. काम तमाम.

मला वाटले झुणक्याच्या जरा जाड सर वड्या थापायच्या व चौकोन कापून त्या कांदा खोबरे रश्शा मध्ये सो डायच्या>>
माझ्या आजी च्या रेसिपी प्रमाणे (विदर्भ वर्जन) मी करते. कांदा, टोमॅटो ची फोडणी करून लाल मिरची पावडर इ मसाले घालून त्यात पाणी टाकयचं. उकळी आल्यावर बेसन घालायचं. सगळं घट्ट झाल्यावर गॅस बंद करून बेसनाचा गोळा काढून ताटाला तेल लावून त्यावर थापून वड्या पाडायच्या. मग त्या वड्या गरम तेलात तळून घ्याव्या.(या वड्या नुसत्या खायला पण छान लागतात)
कांदा, खोबरं इ. भाजून वाटून. रस्सा भाजी करायची त्यात वड्या सोडायच्या. आवडत असल्यास थोडी घट्ट ग्रेवी ची भाजी पण काढू शकतो वेगळी.

अमा (अश्वीनीमामी), @Shraddha नी सांगितलेली पाटवडींची वैदर्भीय पारंपारीक कृती आहे. सर्वत्र ह्याच पद्धतीने केल्या जातात. क्वचितच आंबटगोडनी लिहीलेल्या पद्धतीनीही करतात, पण त्या फसण्याचीच जास्त शक्यता असते. कारण बेसनपीठात मुळातच चिकटपणा नसतो, त्यामुळे शंकरपाळ्यांसारख्या लाटून रश्यात सोडल्या की त्या अक्षरशः विरघळतात आणि भाजीऐवजी बेसनाचं कालवण तयार होते. नवशिक्यांनी तर ह्या पद्धतीनी मुळीच करू नये. पारंपरीक कृतीत श्रद्धानी लिहील्याप्रमाणे बेसनपीठाला शिजवल्याने चिकटपणा येतो. त्यामुळे त्या रश्यात विरघळत नाहीत (पाटवड्या करतांना किंचित जाडसर बेसनपीठ घ्यावे). विदर्भात (विशेषतः पूर्व भागात) एका विशिष्ट जाती/समुदायाच्या शुभ प्रसंगी पाटवड्यांची भाजी असतेच. पाटवडी ही त्यांची सिग्नेचर डीश मानल्या जाते, किंबहुना त्यांनीच 'सावजी' रेस्टाॅरेंटची सुरुवात केली.

पाटवडी ही त्यांची सिग्नेचर डीश मानल्या जाते, किंबहुना त्यांनीच 'सावजी' रेस्टाॅरेंटची सुरुवात केली.>> अगदी बरोबर. वड्याचं पाणी आणि पाटवडी दोन्ही दोन समाजातल्या प्रसिद्ध डिश आहेत आमच्या पुर्व विदर्भातल्या.

होय, पूर्व विदर्भात गोळा भात/वडा भातापेक्षा वड्यांचे पाणी जास्त प्रसिद्ध आहे. कांदा, टोमॅटो व कोथींबीर बारीक चिरून घ्यावे. जराशी कढीपत्त्याची पाने घ्यावीत. नेहमीप्रमाणे पातेल्यात हिंग, हळद व मोहरीची फोडणी करावी. मोहरी तडतडल्यावर कांदा व कढीपत्ता घालून, कांदा मऊ होईस्तोवर परतावा. आता चमचाभर आलं-लसणीचे वाटण घालून कच्चा वास जाईपर्यंत हलवावे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ व थोडा गोडा/काळा मसाला (आवडत असल्यास) अर्धा मिनिट परता (ह्याने पाण्यावर तेलाचा छान लाल तवंग येतो). आता टोमॅटो टाकून तेल सुटेपर्यंत पुन्हा परतवत रहा. ते नीट शिजले की दोन ग्लास पाणी घालून जरासे हलवून आधण येईस्तोवर थांबा. उकळी आल्यावर एका वड्याचे (तळलेले कोणतेही डाळवडे घ्यावेत) प्रत्येकी चार ते सहा तुकडे (एकूण चार वडे) करून टाका. वडे नरम झाल्यावर (वरून कडकचं हवेत, गरज पडल्यास आणखी पाणी घालू शकता), कोथींबीर घालून गरमागरम भातासोबत वाढा (थोडा चिंचेचा कोळ व गुळही घालू शकता, तथापि वड्याचे पाणी किंचीत झणझणीत व आंबटसर बरे वाटते).

Pages