Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सृष्टी
कधी उठणार सगळे? खमंग फराळाचा वास उठायला भाग पाडेलच म्हणा. गरमागरम पाण्याने अंघोळ करा. घरदार पणत्या ने उजळवून टाकूया. चकली, चिवड्यावर ताव मारायचा आहे ना? छळु नका रे असे दिवाळीच्या दिवशी. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा . झटकन उठा अन पटकन आवरा. टळटळीत उन्हात रांगोळी काढणार का ग चिमे? ठणकावून सांगतीये प्रत्येकालाच. डबे , थाळ्या आणते नाहीतर ढमढम ढोल वाजवते आता कानाशी. तळायला घ्यायचे आहेत मला अनारसे लक्ष्मी पूजनासाठी. थकायला होतं मला एकटीला सगळं करून. दर दिवाळीत नेहमीच चं आहे तुम्हा सगळ्यांच. धपाटे घालायला आलेच बरं चिम्या! नविन कपडे हौसेने आणून ठेवलेत ना? पटकन फराळ करून घ्या. फटाके फोडायला पळा बरं बाहेर. बघा बाहेर किती
उत्साही वातावरण आहे. भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान ही झालं सगळ्यांच. मला एकटीलाच काय तो उत्साह. यजमान तरी उठले बाबा एकदाचे. रव्याचे 2 लाडू तुम्हाला जास्ती बरं का. लगोलग बसा पाटावर,सुवासिक तेल लावून देते. वर उटणं ही लावते हं. शहाणी मुलं माझी उठलीच की! षटकोनी आकाशदिवा कसा शोभतोय दारात. सगळे तयार होऊन कसे छान दिसत आहेत. हरखून जायला होतं दर दिवाळीला माझं आनंदी कुटुंब पाहून क्षण हे अमूल्य असे जपून ठेवावेत जसे.
१.छानच झाले दिवाळीची आठ दिवस
१.छानच झाले दिवाळीची आठ दिवस सुट्टी मिळाली ऑफिसला.
२.जोरदार घराची सफाई सुरु आहे,दिवाळी जवळ आली ना.
३.झाले गेले विसरून आप्तेष्टांबरोबर दिवाळी साजरी करूया.
इतके जमले..
मृणाली , छानच लिहिलेत .
मृणाली , छानच लिहिलेत .
१.मायबोलीवरची दिवाळी पण
१.मायबोलीवरची दिवाळी पण गणेशोत्सव सारखीच उत्साहवर्धक आणि कलापूर्ण असेल ना..
२.यंदा दिवाळीत मी माबो खास अनारसे, चकल्या आणि करंज्या करून बघणार आहे..
३.रांगोळी पण फक्त फुलांचीच असेल.
४.लांब कुठेतरी फिरायला जाणे ह्या दिवाळीत जमणार नाही.
५.वाटच बघत होते दिवाळीची, त्या सणाच्या आनंदाची, कोरोनामुळे आलेल्या मंदीतून, छोटे उदयोजक थोडे सावरतील, रांगोळी, फटाके , उटणे , घरगुती फराळ विकणारे सगळ्यांना जरा बरे दिवस येतील..
क - काय बेत यंदाच्या लॉकडाऊन
क - काय बेत यंदाच्या लॉकडाऊन स्पेशल दिवाळीचा? किल्ला जरुर करा हं
ख - खरेदी आणि खादाडीची तयारी यंदा ऑनलाईन ना,कुठली खरेदी आणि खादाडी? अहो दिवाळीची.
ग - गरज असेल तर पडा की बाहेर दिवाळीच्या खरेदीला पण सगळी काळजी घेऊन मगच.
घ - घरातच किती काळ दार लावून बसणार. काळजी घेऊन बाहेर पडा कंदील पणत्या घेऊन या
च - चकली, चिरोटे जरा किचकटीचं काम पण चवीला एक नंबर राव
छ - छ्या! त्या डाएट चिवडा आणि लो ऑईल करंज्यांना काही अर्थ नाही. दिवाळीत खा प्या मजा करा आणि मग कॅलरी जाळायला व्यायामही करा
ज - जमलच तर सगळ्या मित्रमंडळातर्फे मिळून फराळ उपक्रम राबवा आणि कोविड आयसोलेशनमधल्या पेशंटना तो देता येईल का याची तुमच्या वॉर्डमधे चौकशी करा
झ - झेंडूचे तोरण दिवाळी पहाट करता आधीच आणून ठेवा
त्र - त्रास करुन पाठ दुखवून उगा सगळं एकहाती करु नका. दिवाळीची काही कामे आऊटसोर्स करुन मोकळे व्हा
ट - टळटळीत दुपारी दिवाळीच्या खरेदीला जाणे टाळा आणि गेलातच तर टोपी आणि पाणी जवळ बाळगा
ठ - ठरवलयत का यंदा कंदील घरी करायचा की विकत आणायचा? ठोंब्यासारखे बघू नका, नसेल ठरवलं तर ठरवा आणि कामाला लागा.
ड - डबे घासून पुसून तयार ठेवा फराळ भरायला
ढ - ढोल ताशे? नको नको यंदा कानाला जरा आराम द्या
ण - ण चा न आणि न चा ण करु नका रे उगाच.
दिणाच्या नाही दिनाच्या शुभेच्छा देतात. तो ण खोडून न लिहा बघू ग्रीटिंग्जवर. आणि पनती नसतं पणती असतं ते.
त - तब्येत जपून झेपेल तितकीच कामे करा. तबक घासून लख्ख करा. ताट वाट्या असतील चांदीच्या तर वापरा की त्या. ठेवून काय करणार त्यांचं? तसे तुम्ही हुशार आहात म्हणा सगळे
थ - थकला असाल दिवाळीचं करुन तर थोडी विश्रांती घ्या. थंड लिंबू सरबत घ्या.
द - दिवाळी आली की उत्साह संचारतो अंगात तो हा असा
ध - धनत्रयोदशी कधी आहे? त्यादिवशी काय प्रसाद असतो तुमच्याकडे?
न - नारळ रवा पाकातले लाडू इथल्या माबो रेसिपीने अगदी फक्कड होतात. त्याचा नोड बुकमार्कच करुन ठेवा
प - पाडव्याचा बेत आणि पाडव्याची भेट ठरली की नाही? धागा नाही आला ऋन्मेषचा पाडव्याला काय देऊ यंदा असा, तरी पाडवा कॅलेंडरवर आहे हे विसरु नका
फ - फराळाच करा किंवा विकत आणा पण फराळाचे धागे मात्र वर आणा तेव्हढे. फटाक्यांना जरा विश्रांतीच द्या बुवा
ब - बेसन लाडू रवा बेसन लाडू यांच्याही हिट्ट ऱेसिपींचे धागे बुकमार्क करुन ठेवा इथले
भ - भाजक्या पोह्यांचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा जो आवडेल तो करा आणि इथे नैवेद्य दाखवा फोटोतून तरी. भाजणीची चकली ही करा आणि आम्हालाही द्या थोडी पाठवून
म - मायबोली आणि मायबोलीकरांना दिवाळीच्या कामांसाठी शुभेच्छा!
य - यंदा करोनाचे सावट असले तरी दिवाळी बाकी दणक्यात होणार आपली
र - रजेचाही प्रश्न नाही यंदा दिवाळीत बहुतेकांना. रांगोळी दारापुढे काढून मस्त साजरी करुया दिवाळी हसतमुखाने
ल - लोकहो! त्या कारंटला कोरोना समजून फोडूनच काढा यंदा.
व - वजन वाढेल याची चिंता करत बसू नका. लाडू करंजी खा मस्तपैकी फक्त बेताने खा moderation is the key विसरु नका
श - शेणाने सारवलेल्या अंगणात आम्ही लहानपणी रांगोळी काढायचो. मग आला गेरु. आता आले रेडीमेड स्टेन्सिल्स. पण तरी रांगोळीची गंमत काही खासच
ष - षटकोनी कंदील हो आपला पूर्वीचा! येतो का करता तुम्हाला?असेल तर टाका की DIY इथे
स - सणासुदीला चैतन्यमय वातावरणात उत्साह द्विगुणित होतो म्हणतात. बघुया यंदा दिवाळीत यातले किती काय दिसते
ह - हसरा सण दसरा तशी दिव्यांनी सजली ती दीपावली. हसत रहा खुश रहा दिवाळी मनापासून साजरी करा
ळ - ळमा वाला लदिकं वाला ळीवादी रीजसा राक
ज्ञ - ज्ञानदीप उजळू दारी
दिवाळी मंगलमय हो खरी
कवीनं मस्त जमवल्यास कि अगदी..
कवीनं मस्त जमवल्यास कि अगदी.. शॉर्ट स्टोरी सारखे..
कविन , श्रवू , तेजो मस्तच !!
कविन , श्रवू , तेजो मस्तच !!
कविन यांनी तर षटकार मारला आहे .
तेजो, कविन मस्तच.
तेजो, कविन मस्तच.
कविन ते ड वालं वाक्य डबे पासुन सुरू करायचं राहिलय, तेवढे ठीक करा.
धन्यवाद मानव, केले दुरुस्त
धन्यवाद मानव, केले दुरुस्त
मस्त लिहीलंय तेजो, कविन !
मस्त लिहीलंय तेजो, कविन !
सर्व लोकहो,
सर्व लोकहो,
किती सुंदर लिहीले आहेत !
दिवाळीपूर्व आनंदाची सुरवात...
( अ ते अ: )
( अ ते अ: )
अनेकविध सणांपैकी सर्वांनाच हवाहवासा वाटणारा हा सण.
आश्विन महिन्याचे दोन्ही पक्ष उत्साही, उत्सवी करणारे हे सण, दसरा नि दिवाळी.
इष्टमित्र, कुटुंबिय, शेजारी, घरगुती मदतनीस क्वचित प्रतिस्पर्धीसुद्धा, सार्यांनाच स्नेह आणि आनंदाने जवळ आणणारा हा सोहळा.
ईनमिनतीन मुख्य दिवसांचे वास्तव्य याचे पण उरलेले ३०० दिवस पुरेल इतका तजेला मनाला देऊन जातो.
उषःकाल कसा दिसतो हे पहायची संधी सूर्यवंशींना देणारा हा सणांतला वासुदेव.
ऊनऊन पाणी, सुगंधी तेल-उटणे, चविष्ट फराळ, रेखीव रांगोळ्या, सनईची सीडी, त्यात भर टाकणारे पैंजण-चुड्यांचे नाद आणि मुलांची किलबिल..... पंचेंद्रियांना तृप्त करणारे हे दिवस.
एकादशीपासून सुरू होऊन द्वितीयेपर्यंत देव, गायीवासरे, आरोग्यदेवता, सत्प्रवृती, शुभलक्ष्मी, दातृत्व, नव्याची पायाभरणी, निरपेक्ष प्रेमभावना अशा सार्या मंगल गोष्टींचा सन्मान करणारा हा सण.
ऐपत, सामाजिक स्थान, अडचणी, धर्म-जात-प्रांत-देश भिन्नता सारे विसरून आनंदाची गोडी प्रत्येकाला चाखवणारा हा सणाधिराज.
ओळख, मैत्री, नाते या चौकटीबाहेरच्यंनाही शुभेच्छा, मिठाई आणि स्नेहात हसतमुखाने सहभागी करून घेणारी, दिवाळी.
औक्षण, भेटवस्तू, नवी खरेदी, स्वच्छ नेटकी सुशोभित घरे, रोषणाई, वस्त्रालंकारांनी सजलेले आबालवृद्ध, पथ्य विसरून चाखलेली पक्वान्ने या सार्याने मनाला येणारी टवटवी --- शब्दातीत.
अंगण नाही म्हणून न हिरमुसता पायर्या, व्हरांडा, मुख्यदार, बाल्कनी, खिडकी सारे काही रांगोळी, तोरणे, पणत्या-माळा-कंदीलाने शॄंगारून दिवाळीचे चोहीकडून स्वागत करणारे आपण...
अ:हा दिवाळीबद्दल नुसते लिहूनच मन प्रसन्न झाले.
धन्यवाद अश्विनी..... सुरेख उपक्रम सुचतायत सर्वांना
मस्त आहे दिवाळी लेखन
मस्त आहे दिवाळी लेखन सर्वांचे
तो ण खोडून न लिहा बघू ग्रीटिंग्जवर. आणि पनती नसतं पणती असतं ते. >>>> ग्रीटिंग्जचे होर्डिंग्ज केले तर जास्त योग्य वाटेल का कविन?
होय होय. होर्डींग जास्त सूट
होय होय. होर्डींग जास्त सूट होईल
माझे चार आणे -
माझे चार आणे -
छ - छतावर आकाशकंदील , दारात पणती आणि घरासमोर रांगोळी असे चित्र बघितले की हमखास दिवाळीची आठवण होते .
ज - जसे दिवाळीचे दिवस जवळ येतात , वातावरण उत्साही व्हायला लागते .
झ - झगमगती बाजारपेठ खरेदीसाठी खुणावू लागते .
ट - टिकल्या , फुलबाजी , भुईनळे , भुईचक्र विकणारी दुकाने सजायला लागतात .
ठ - ठिपक्यांची की छापाची रांगोळी काढायची यावर चर्चा होते .
ड - डबे विविध फराळाच्या पदार्थांनी भरले जातात .
ढ - ढीगभर आवरा अवरी करून घर दिवाळीसाठी सज्ज होते .
ण - ण ला विसरून कसे चालेल , तोच तर प आणि ती ला जोडून पणती बनवतो जी दिवाळीची शान असते .
त - तेल , उटणे , मोती साबण यांची अभ्यंगस्नानासाठी खरेदी होते .
थ - थोडेसेच फराळाचे पदार्थ करायचे या वर्षी ! हा दरवर्षीचा पण यावर्षीही मोडतो .
द - दिवाळी अगदी जवळ आलेली असते .
ध - धनत्रयोदशी ला दिवाळीची औपचारिक सुरुवात होते .
न - नरकचतुर्दशी हा पहिला दिवस लवकर उठून , अभ्यंगस्नान करून , फराळावर ताव मारून पार पाडतो .
प - पुण्यात ' दिवाळी पहाट' नावाने संगीताच्या कार्यक्रमाचे पेव फुटले आहे .
फ - फटाक्यांची आतिषबाजी डोळ्यांचे पारणे फेडते .
ब - बत्तासे - लाह्या , अनारसे यांचा नैवेद्य दाखवून लक्ष्मीपूजन संपन्न होते .
भ - भाऊ- बहिणीची माया दाखवणारी भाऊबीज वाटच बघत असते .
म - मध्येच पतीपत्नी मधील नाते वृद्धिंगत करणारा पाडवा येतो.
य - यंदा पाडव्याची ओवाळणी काय ? हा समस्त स्त्रीवर्गाचा औत्सुक्याचा विषय !!!
र - रोज दिवाळीचे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या जिभेला झणझणीत मिसळीची चव तृप्त करते .
ल - लहानथोर सर्व नातेवाईकांची भेटही या सणानिमित्ताने होते.
व - वर्णन करता करता धनत्रयोदशी नंतर येणारी वसुबारस कशी विसरले मी ?
श - शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी सजलेला किल्ला हे दिवाळीचे आणखी एक आकर्षण !!
ष - षटकोनी आकाशकंदील घराची शोभा वाढवत असतो .
स - सगळ्या सणांचा राजा म्हणून दिवाळी चा तोरा काही वेगळाच असतो नाही ?
ह - ' हॅप्पी दिवाली ' चे संदेश आणि शुभेच्छापत्रे यांनी मोबाईल ची गॅलरी भरून गेलेली असते .
त्र - त्रिपुरी पौर्णिमेने या दीपोत्सवाची सांगता होते .
ज्ञ - ज्ञान सागरातील माझ्या शब्दसंग्रहमधून दिवाळी वर लिहिण्याचा माझा एक प्रयत्न आणि येणाऱ्या दीपोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!!
कारवी , अतिशय सुंदर !!
कारवी , अतिशय सुंदर !!
मस्त आहे दिवाळी लेखन सर्वांचे
मस्त आहे दिवाळी लेखन सर्वांचे
आता खरंच दिवाळी जवळ
आता खरंच दिवाळी जवळ आल्यासारखे वाटतंय..
भारीच सगळे!!
भारीच सगळे!!
क: करणारे रे बाबा ...अनारसे
क: करणारे रे बाबा ...अनारसे
ख: खवय्या आहे पक्का ... बापावर गेलाय
ग: गौरी, टाकलेस ना तांदूळ भिजत
घ: घुरघुर मिक्सर चा आवाज नको वाटतो पण मेले हे तांदूळ काही वाटल्या जात नाहीत त्या घरघंटीवर.. कधी समीरचा काॅल तर कधी सारंग... केव्हा दळणार? अग बाई हे काय ? तांदूळ कुठे गेले? विसरली वाटतं? ऐकलं की नाही देव जाणे...किती ताण आजकाल ह्या पोरींना... आपलं कामं त्यात बबड्याचा आॅनलाईन अभ्यास..
च: चकलीची भाजणी करावी म्हणते आज. सावनी, आहे का ग तुला वेळ? मी सांगते त्या मापात ती सगळी धान्य घे. धू आणि वाळत घाल.
छ: छप्पन्न भोग असतो म्हणे नेवैद्याला गुजरातमध्ये पाडव्याला...... मला तर चार पदार्थ करता दमछाक होते पण ह्यावर्षी तुम्ही दोघी मदतीला आहात. कौतुक वाटतं ग पोरींनो तुमचं ! काय ते वर्क फ्राॅम होम सांभाळून करताय मदत.
ज:जरावेळ पड म्हणायला यांना काय जातं ..... काय करु न। किती करु असं झालंय...किती वर्षांनी दोन्ही लेक पोरांबाळांबरोबर आलेत. नाहीतर एकाला सुटी तर दुसर्याला नाही.
झ: झटकावा ना जरा आळस ...बायकोची एवढी काळजी वाटतेय तर .
ट: टाळेबंदी उठली ते बरं झालं बाई आणि घरून काम करता येतंय ते
ठ: ठणकवून सांगितलंय...सध्या तुमचं ते डायट फायट विसरा ...
थ: थकले रे नंदलाला... थकले रे नंदलाला.. चिडवा..चिडवा
न: न करून सांगते कोणाला... आधी नाही म्हणायची हिंमत नव्हती ..आता तर काय सवयीच झालंय ...अजून टेप कशी नाही वाजली .. माझी आई ..... पुराण !
प: पहिला दिवस आज दिवाळीचा ... सगळं मनासारखं झालं.... मुलेही लवकर उठली.. शहाणी पोरं
फ: फराळाच्या ताटाचे फोटो टाकलेत का नाही v r family वर .शरीने टाकलेत फेबुवर.. लाईक्सही आलेत. दिवाडकरांकडून आणायचं अन् टाकायचे माझ्यासारखं घरी करून टाक.. तेव्हा किती लाईक्स मिळतात पाहू
ब: बबड्या, तायडीला मदत कर रे रंग भरायला ...मोठी रांगोळी काढणारे ....... करोना योध्यांची ... त्यांना मानवंदना! तायडीच्या डोक्यात दरवर्षी भन्नाट आयडीया असतात...कौतुक करावं तेवढं थोडं. कला आहे पोरीच्या हातात...
भ: भन्नाट! एकदम चाबूक ! अनारसे तर काही विचारायलाच नको...आईच्या हातची चवमध्ये जायलाच पाहिजे तुला . ... आईच्या हातची की ताईच्या(मंजू)
म: मन प्रसन्न झाले.. अशी कमेंट आलीये बरं का सोनालीची. सोनालीही आली असती तर....
य: यंदाची दिवाळी काही वेगळीच... ... सगळे घरी.. साग्रसंगीत फराळाचं करता आलं गौरी, सावनीच्या मदतीने तरी सुध्दा डोळ्यात पाणी ...आनंदाचे ... दु:खाचे ..
र: रखमाने कशी दिवाळी कशी केली असेल ?
ल: लवकर लस यायला पाहिजे ...
व: वयाने लहानच आहेत रे पोरं...
श: शासन मदत करणारे म्हणे
ष: षटकोनी का नाही ग आजी कुठला पदार्थ का? अगं बाई सानुल्या! दचकले ना मी .. हो खरंच ग पण आपण करु षटकोनी शंकरपाळा हो तुझ्यासाठी
स:सानु अशीच मागून येते ...लाडीगोडी लावून पळून जाते..
ह: हकनाक गेला बिचारा ! लोकांची सेवा करता करता ...सारंगने सांगितलंय तो नोकरी मिळवून देणारे रखमाला आणि समीर मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणारे
ळ: गणूच्या आठवणीने मन हळवं झालं
क्ष: क्षणभर डोळे मिटून प्रार्थना करुयात! असतो मा। सद्गमय...
त्र: त्रैलोक्य सुंदरी देवी परमेश्वरी
पार्वती शंकरी श्री परमेश्वरी
सत्य धर्म शांति प्रेम प्रदायिनी
नमो नमो नमो नमो नारायणी
ज्ञ: ज्ञानाचा दिवा घराघरात उजळू दे!
सुंदर हो !
सुंदर हो !
* घरघंटी >>> हे चक्कीचे व्यापारी नाव की असा शब्द आहे ? हिंदी ?
प्रथमच ऐकला म्हणून विचारतो.
डॉ, माहिती नाही व्यापारी नाव
डॉ, माहिती नाही व्यापारी नाव असावे बहुतेक ... बदल केलाय
मंजुताई , छानच लिहिलेत .
मंजुताई , छानच लिहिलेत . वाचता वाचता टचकन डोळ्यात पाणी आणलेत .
बदल केलाय >>> कशाला !
बदल केलाय >>> कशाला !
मी फक्त माहिती म्हणून विचारले
मंजूताईंची आजी मस्त आहे.
मंजूताईंची आजी मस्त आहे. अशाच ट्रॅक बदलून बदलून बोलतात...
@ मंजूताई ---- थोडी अक्षरं राहिलीत ती सुचवतेय.... तुमच्या कथेला जोडकाम... बघा आवडतात का..
ड : डबे मागच्या आठवड्यात घासून घेतले असते तर.... या पावसाने काय आरंभलय आता....
ढ : ढग आलेत म्हणता? शिडशिडायच्या आधी ते डबे आत घेऊन या. सुकलेले ओले होतील परत...
ण : आणताय ना हो ? इथे चणाडाळ करपेल माझी.... ऐकलंत का...नाही वाटतं....त्या टीव्हीचा ढणढणाट भरीला...पण चहा विचारा ... लग्गेच ऐकू जाईल !
त : तिकडे त्या खोलीत ठेवा सद्ध्या. आणि खाली उतरलात की ते वेलची, जायफळ, किसमिस आणा न विसरता. 'ऑनलाईन नको, नीट स्वतः बघून आणतो' म्हणाला होतात ना... लक्षात नाही?
द : दोन कामे सांगितली कधी चुकून तर पावणेदोन विसरायची ..... करणंही असं की देखल्या देवा दंडवत..... थकले तरी सांगू कुणाला?
ध : धडफळे भावोजींसाठी बेसनलाडू? आहेत लक्षात, करणारे. वहिनींच्याने होत नाही लाडू वळणं आताशा सांधेदुखीमुळे. करू आपण.... आता धणे का विचारताय? भजी? कामाच्या व्यापात कसं हो नको ते सुचतं तुम्हाला... धन्य आहे....करते, थांबा थोडे...
वा !
वा !
दिवाळीवर अजून कोणी लिहिणार असेल तर सांगा.
नंतर कोणी नवे देणार नसल्यास मी देऊ शकतो.
अश्विनी,
अश्विनी,
हा खेळ संपला असे समजायचे का ?
आठ अक्षरी मराठी शब्द
आठ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)
२१ = वनस्पती – हिचे संस्कृत व इंग्लीश नाव तेच !
३६२ = (प्रसंग) तसा ताजा आहे
८५ = काव्यासंबंधी
७८ = कायद्यासंबंधी
४८ = क्षमा
२६ = एक पेय
१२३४५६७८ = त्याचे बघून मी करतो
त्या त्या वेळी कोडी सोडवणं
त्या त्या वेळी कोडी सोडवणं होत नाहीये तरी आवडत्या धाग्याचं कौतुक तर करायलाच पाहिजे.
काय एकेक नवीन कल्पना सुचताहेत.
कुमारसरांची गाजाभ फार छान होती.
अश्विनी , तुमची बाराखडी वापरून विषय सजवा ...ही पण आवडली.
किमान पाच अशी किमान अपेक्षा ठेवून तुम्ही खेळ दिलात तर
सगळी मुळाक्षरं वापरून तुम्ही अगदी रंगीबेरंगी केलीत दिवाळी.
अ ते अ: वापरून कारवीने तर कमालच केली !
तुम्ही द्या, सोडवा ...मी उशीरा का होईना पण वाचतेय.
सॉरी , कुमार सर , नेट
सॉरी , कुमार सर , नेट प्रॉब्लेम मुळे उशिरा बघितला मेसेज .तुम्ही दिलेत पुढचे कोडे , ते सोडवूया .
Pages