Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
६. ढग***
६. ढगढग *
(अक्कलशून्य = ढ, जलद= ढग).
ढगढग - अनुमोदन
६ च मी ही ढग वरच अडलेय
६ च मी ही ढग वरच अडलेय
ते डोक्यावर चक्क काही जुळत नाहीये
१ अलभ्यलाभ
१ अलभ्यलाभ
यात लाभापुरताच आनंद आणि गंमत आहे बाकी ते सेपरेट अलभ्य बघितले तर त्यात लाभ नाही गंमत नाही
माझ्यासाठी एकूणच असे कोडे
माझ्यासाठी एकूणच असे कोडे प्रकार नवीन असल्याने जरा अंदाज घेत चाचपडतच सोडवतेय. जमेल कधीतरी
आपण अजून बारा तास कारवी यांची
आपण अजून बारा तास कारवी यांची वाट पाहू.
नंतर काही न समजल्यास हे कोडे स्थगित ठेवू, म्हणजे पुढच्या कोणाला नवे देता येईल.
मी तर Mr.India झाले आहे...
मी तर Mr.India झाले आहे... मध्येच येऊन वाचते आहे.
कोणी इच्छुक असाल तर नवा खेळ
कोणी इच्छुक असाल तर नवा खेळ देऊ शकता.
या खेळासाठी मी ७ वाक्यांचा
या खेळासाठी मी ७ वाक्यांचा परिच्छेद निवडला आहे. हा मजकूर म्हणजे एका सामाजिक पुस्तकाचा परिचय आहे. ७ वाक्ये मुद्दाम सुटी दिली आहेत आणि ती देताना त्यातील काही अक्षरे पुसून तिथे कंसात अंक घातले आहेत. अंक = पुसलेल्या अक्षरांची संख्या. उदा. (१), (३).
तुम्ही सर्व (अक्षरे) ओळखून अर्थपूर्ण वाक्ये करायची. नंतर सर्व वाक्ये एकत्रित वाचल्यावर वर दिलेल्या आशयाचा परिच्छेद झाला पाहिजे.
आपण ४ तास वेळ घेऊ. उत्तराची वेळ झाली की मगच आपापला परिच्छेद डकवा. असे करताना आधीचे प्रतिसाद वाचू नका ! त्यातच खरी गम्मत येईल.
हा खेळ म्हणजे एक प्रकारे ‘लिखित कानगोष्ट’ असेल. यात कुणीही पूर्ण बरोबर/चूक असणार नाही. दिलेला आशययुक्त परिच्छेद झाला की बास.
सर्वात शेवटी मी मूळ परिच्छेद डकवेन. मग आपण तुलना करू. तुम्ही हुबेहूब बरोबर यावे अशी बिलकूल अपेक्षा नाही. उलट उत्तरांतील विविधतेची मजा लुटूयात !
७ वाक्ये विभागून २ प्रतिसादांत लिहीत आहे. तसेच प्रत्येक वाक्य सुटे करून अनेक ओळींत लिहीत आहे. काही ठिकाणी शब्दांमध्ये सुटे दिसण्यासाठी ........ असे केले आहे. ते विरामचिन्ह नाही.
...............................................................
१. म(२).... (१)हि(१)त खूप
(२)लेली ही .... का(३).... आहे.
२. मी... वि(२)......दशे(१)..... अ(१)ता(१)......
ती... (२)म...... वा(१)ली... होती.
३. या.... का(३)त...... खे(२)न...... म(२)ग(१)त........ शि(२)सा(१).....
आ(२).... (१)रु(१)चे...... व(१)न...... (२)ले .......आहे.
४. ते अ(२)..... च(२)ल..... आहे.
.......पुढे चालू.....
मागून पुढे चालू...
मागून पुढे चालू...
५. त(२)न...... म(१)वि(१)ल(१)न...... वातावरण,
व(२)गृ(२)ल....... (२)ध...... अ(२)व....... आणि ए(२)च
म(२)ग(१)....... म(२)त्ती(१)र....... त्यात..... (२)ख...... प्र(२)......... टा(२).... आहे.
६. (२)ण...... (१)व(१)चे....... श(२)...... वा(२)र(१)त
गां(२)न...... जाणे, हे(१)...... छान व(२)....... आहे.
७. (२)ब(१)चा.......... (२)ट........ मात्र (२)श
प्र(२)चा.... किंवा....... वा(३)र .......फारसा....... प(३......) न...... (३)रा वाटतो.
...............................
प्रयत्न करणार
प्रयत्न करणार
जे कोणी सोडवत असतील त्यांनी
जे कोणी सोडवत असतील त्यांनी उपस्थिती नोंदवावी.
धन्यवाद !
1 ते 4 जमलाय.
1 ते 4 जमलाय.
हो, सोपे वाटत आहे
हो, सोपे वाटत आहे
छान,
छान,
पण थांबा..... ४ तास पुरे होउ द्यात...
हळूहळू अन्य लोक येत असतात...
ते 6 मध्ये "जाणे, हे(१)......
ते 6 मध्ये "जाणे, हे(१)...... छान व(२)....... आ"
हे च्या जागी ह्या हवे आहे का?
पुणेकर ,
पुणेकर ,
६. (२)ण...... (१)व(१)चे.......
श(२)...... वा(२)र(१)त
गां(२)न...... जाणे, हे(१)......
छान... व(२)....... आहे.
अजून वीस मिनिटांनी उत्तरे
आता उत्तरे द्यायची वेळ झालेली आहे. ज्यांची तयार आहेत त्यांनी जरुर द्या.
जर कोणी खेळात उशिरा समाविष्ट झालेले असेल, तर त्यांनी ही उत्तरे न बघता सावकाश आपल्या सोयीनुसार स्वतःची द्यावीत.
1 मराठी जाहिरात खूप असलेली ही
.
अश्वि नी
अश्वि नी
छान. काही वेळ तुमचा प्रतिसाद संपादित करून तिथे नुसते . ठेवा.
तासाने पूर्ण झाले की सर्व लिहा.
मराठी साहित्यात खूप गाजलेली
मराठी साहित्यात खूप गाजलेली ही कादंबरी आहे
2 मी विद्यार्थी दशेत असतानाच ती उत्तम वाटली होती
3 या कादंबरीत खेड्यातून महानगरात शिकण्यासाठी आलेल्या तरुणाचे वर्णन केले आहे
4 ते अगदी चपखल आहे
5 तत्कालीन महाविद्यालयीन वातावरण, वसतिगृहातील विविध अनुभव आणि एकूणच महानगरी मनोवृत्तीवर त्यात सुरेख प्रकाश टाकला आहे
6 ग्रामीण युवकाचे शहरी वातावरणात गांगरून जाणे हेही छान वर्णले आहे /
7 कादंबरीचा शेवट मात्र हताश/निराश प्रकारचा किंवा वाचकावर फारसा परिणाम न करणारा वाटतो // वाचल्यावर फारसा पटकन न पटणारा वाटतो
झोंबी आहे का ?
झोंबी आहे का ?
खूप आधी वाचली होती.. शेवट
खूप आधी वाचली होती.. शेवट फारसा आठवत नाही..
कोसला पण ह्याच बेसवर आहे.
कोसला पण ह्याच बेसवर आहे..अर्थात मला शेवट पटला नाही..
पांडुरंग सांगवीकर..
पांडुरंग सांगवीकर..
मी उत्तरावर उत्तर दिले.. मूळ
मी उत्तरावर उत्तर दिले.. मूळ प्रश्न बघितलाच नाही.. हे सगळे वर्णन कोसला - भालचंद्र नेमाडे ह्यांचे आहे..
सगळे वर्णन कोसला - भालचंद्र
सगळे वर्णन कोसला - भालचंद्र नेमाडे ह्यांचे आहे..
होय,
पण हे विचारलेच नव्हते !
पुणेकर छान
विक्रम यांचा आला की माझा देतो
विक्रम >> येउ दे तुमचा ...
मराठी जाहिरात खूप असलेली ही
मराठी जाहिरात खूप असलेली ही कादंबरी आहे .
मी विद्यार्थी दशेत असताना ती मोघम वाचली होती.
या कादंबरीत खेड्यातून महानगरात शिक्षणासाठी आलेल्या तरुणाचे वर्णन केले आहे .
ते अगदी चपखल आहे .
तत्कालीन महाविद्यालयीन वातावरण , वसतिगृहातील विविध ..........
तरुण युवकाचे शहरी वातावरणात गांगरून जाणे हे ही छान वर्णन आहे .
कादंबरीचा शेवट मात्र निराश प्रकारचा किंवा वास्तवावर फारसा पटणारा न रुचणारा वाटतो .
विक्रमसिंह बहुधा दुसऱ्या time
विक्रमसिंह बहुधा दुसऱ्या time zone मध्ये असतात
ठीक.
ठीक.
दोघींचा छान सहभाग.
..........................................
१. मराठी साहित्यात खूप गाजलेली ही कादंबरी आहे.
२. मी विद्यार्थीदशेत असताना ती प्रथम वाचली होती.
३. या कादंबरीत खेड्यातून महानगरात शिक्षणासाठी आलेल्या तरुणाचे वर्णन केलेले आहे.
४. ते अगदी चपखल आहे.
५. तत्कालीन महाविद्यालयीन वातावरण, वसतिगृहातील विविध अनुभव आणि एकूणच महानगरी मनोवृत्तीवर त्यात सुरेख प्रकाश टाकला आहे.
६. ग्रामीण युवकाचे शहरी वातावरणात गांगरून जाणे, हेही छान वर्णिले आहे.
७. कादंबरीचा शेवट मात्र हताश प्रकारचा किंवा वाचकावर फारसा परिणाम न करणारा वाटतो.
छान. मोघम शब्द सुचला नव्हता.
छान. मोघम शब्द सुचला नव्हता.
Pages