शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी वेळ नाही झाला.... दुपारपासून माबो साईटला एरर येतेय...
सार्‍यांना सोनेरी शुभेच्छा.....
apta 2020.jpg

चित्रातील काही ओळखायचे आहे काय >>>> Happy नाही हो....इ- सदिच्छाचित्र आहे फक्त. सोनं घ्यायचंय प्रत्येकाने त्यातले.

ठीक. आता देतो.

खाली एक उतारा दिलेला आहे. त्यामध्ये 14 गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. गाळलेल्या जागी जेवढे * असतील तितक्या अक्षरी संबंधित शब्द आहे. आता हे सर्व शब्द अन्य एकाच शब्दाचे 14 विविध अर्थ आहेत. तो मूळ शब्दही तुम्हीच ओळखायचा आहे. त्याचे अर्थ म्हणून जे शब्द निवडाल, ते संबंधित वाक्याशी सुसंगत असावेत. पूर्ण सर्व जागा भरेपर्यंत कोणी मूळ शब्द सांगू नये वा विचारू नये ! (मनात अंदाज घ्यावा). एकेक उत्तर देताना संबंधित वाक्याचा थोडा भाग डकवा म्हणजे नीट कळेल.
………………………………………………….
एक छानपैकी कथा मनात तयार झाली होती. मग ** हवा होता म्हणून दुकानात गेलो, तर ते बंद होते. खरं म्हणजे दुकानबंदीचा *** आता हटवला आहे. माघारी फिरतोय तर तेवढ्यात रस्ता ***** दिसला. आता मी घरी पोहोचणार ** ?
या शहरात ते कधी कशास ** करतील तेच जाणोत ! काय करणार आपण लोक ? आपली ** तर वरच्यांच्या हातात ना. मग म्हटले, चला दुसरीकडे जाऊ. निघालो खरा, पण जसा तिकडे पोचायला लागलो तसा पुन्हा रस्ता **** अन बाजूस हा मोठा ***.

म्हटले, काय झालं हो? तर म्हणाले त्यांच्या सज्जन नेत्याला *** झाली आहे. कपाळावर हात मारला. आजच्या मंगलदिनी खरेतर शासकांचे हे कृत्य *** होते.

पण त्यांना त्यांच्या *** समजत नाहीत, हे त्यांनीच पुन्हा एकदा दाखवून दिले होते.
** कापण्यापुरता यांचा जनतेशी संबंध. हे आम्हाला काय ** लावणार ? विचार करकरून आपलीच ** होते राव.
.......................

नवीन कोडे आले पण....
वाक्याचा अर्थ लागला पण शब्दाचा अर्थ १४च्या समूहाशी जुळला नाही तर तो चूक?

समूहाशी जुळला पाहिजे.
बरोबर. सुरवात तर करा..

जो येईल तो शब्द सांगू शकता.
तीन चार शब्द सांगितले गेले, की सोपे होऊन जाईल

एक छानपैकी कथा मनात तयार झाली होती. मग ताव हवा होता म्हणून दुकानात गेलो, तर ते बंद होते. खरं म्हणजे दुकानबंदीचा नियम आता हटवला आहे. माघारी फिरतोय तर तेवढ्यात रस्ता अडवलेला दिसला. आता मी घरी पोहोचणार कसा ?
या शहरात ते कधी कशास बंद करतील तेच जाणोत ! काय करणार आपण लोक ? आपली नाडी तर वरच्यांच्या हातात ना. मग म्हटले, चला दुसरीकडे जाऊ. निघालो खरा, पण जसा तिकडे पोचायला लागलो तसा पुन्हा रस्ता रोधलेला अन बाजूस हा मोठा जमाव.

म्हटले, काय झालं हो? तर म्हणाले त्यांच्या सज्जन नेत्याला अटक झाली आहे. कपाळावर हात मारला. आजच्या मंगलदिनी खरेतर शासकांचे हे कृत्य *** होते.

पण त्यांना त्यांच्या *** समजत नाहीत, हे त्यांनीच पुन्हा एकदा दाखवून दिले होते.
** कापण्यापुरता यांचा जनतेशी संबंध. हे आम्हाला काय ** लावणार ? विचार करकरून आपलीच ** होते राव.

वरील अटक पर्यंतचे शब्द हे एकाच शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

मानव, छान च !
ते कधी कशास बंद करतील तेच जाणोत !
>>> इथे थोडा पर्यायी निवडणार का ?

४ राहिले....

आजच्या मंगलदिनी खरेतर शासकांचे हे कृत्य *** होते.

पण त्यांना त्यांच्या *** समजत नाहीत, हे त्यांनीच पुन्हा एकदा दाखवून दिले होते.

फीत कापण्यापुरता यांचा जनतेशी संबंध. हे आम्हाला काय ** लावणार ? विचार करकरून आपलीच ** होते राव.

निषिद्ध"
बरोबर , छान
.....................
३...
पण त्यांना त्यांच्या *** समजत नाहीत, हे त्यांनीच पुन्हा एकदा दाखवून दिले होते.

फीत कापण्यापुरता यांचा जनतेशी संबंध. हे आम्हाला काय ** लावणार ? विचार करकरून आपलीच ** होते राव.

पण त्यांना त्यांच्या *** समजत नाहीत, हे त्यांनीच पुन्हा एकदा दाखवून दिले होते. <--- मर्यादा?

गोची* नाही
बाकी होय !
.................................
सुरेख वाटचाल ....
आता फक्त ....
विचार करकरून आपलीच ** होते राव.

कोंडी

कोंडी बरोबर !
आता मूळ शब्दाची औपचारिकता .....

Pages