शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण उत्तर
एक छानपैकी कथा मनात तयार झाली होती. मग ताव हवा होता म्हणून दुकानात गेलो, तर ते बंद होते. खरं म्हणजे दुकानबंदीचा नियम आता हटवला आहे. माघारी फिरतोय तर तेवढ्यात रस्ता अडवलेला दिसला. आता मी घरी पोहोचणार कसा ?

या शहरात कधी कशास मना करतील तेच जाणोत ! काय आपण करणार लोक ? आपली नाडी तर वरच्यांच्या हातात ना. मग म्हटले, चला दुसरीकडे निघालो खरा, पण जसा तिकडे पोचायला लागलो तसा पुन्हा रस्ता रोधलेला. अन बाजूस हा मोठा जमाव.

म्हटले, काय झालं हो? तर म्हणाले त्यांच्या सज्जन नेत्याला अटक झाली आहे. कपाळावर हात मारला. आजच्या मंगलदिनी खरेतर त्यांचे हे कृत्य निषिद्ध होते.

पण त्यांना त्यांच्या मर्यादा समजत नाहीत, हे त्यांनीच पुन्हा एकदा दाखवून दिले होते. फीत कापण्यापुरता यांचा जनतेशी संबंध. हे आम्हाला काय शिस्त लावणार ? विचार करकरून आपलीच कोंडी होते राव.

घरी पोहोचणार *कसा *
बाजूस हा मोठा* जमाव.*- ह्यांचा अर्थ 'बंद' असा होतो..?

तेजो,
होय ! सर्व १४ 'बंद' चेच अर्थ आहेत.

अरे , नवीन कोडे येऊन संपलेही . आज उशिरा पाहिले गेले . छान होते . कुमार सर , एक सुचवू का ? तुम्ही कोडे कधी देणार याची साधारण वेळ सांगत जाल का ? म्हणजे त्या सुमारास वेळ काढून बघता येईल .

अश्विनी,
काळ संध्याकाळी तशी दिली होती व मागच्या कोड्यालाही २४ तास आधी दिली होती.
सर्वांनीच आधी सांगत जाऊ.
उशीरा आल्यास पुढचे प्रतिसाद न बघण्याचा संयम ठेवला, तर जमेल की !! Bw
सर्वांना धन्यवाद.

बाकी कोड्यासमोर अगदी बालिश वाटेल, पण तरी सांभाळून घ्या हा प्रयत्न..

1, मी सुई नाही पण घुसते, नाही जिवंत पण उडते..मी कोण??

2. मी कधी गोल,कधी चौरस, कधी लहान, कधी मोठा, मी स्वतः हुन तुमच्याकडे येतो, पण विकत नाही घेता येत.. असतो रंगहीन पण रंगू शकतो कुठल्याही रंगात.. मी कोण??

3. मला टेबलावर ठेवा, कट करा,पण खाऊच नाही शकणार, मी कोण??

4. माझ्याकडे खूप keys आहेत, पण एक कुलुप उघडेल तर शपथ, मग मी कोण??

5. मला खायचा प्रयत्न केलात तर तुम्ही ही दुसऱ्याचे खाणे नक्की व्हाल, मी कोण??

6, मलाही आहेत 4 बोटं, अगदी अंगठाही, पण दुखणार नाही बिलकुल जरी एखादे कापले? मी कोण?

7.पाण्याशिवाय माझे अस्तित्व शून्य,वाचा मला सरळ किंवा उलटे,तरी माझी ओळख तीच. मी कोण?

8.अशी मी बाई वेगळी,थंडीतही वितळून जाई, मी कोण?

माझं वरातीमागून घोडे ..... लाईट नव्हते तर नेट बंद झाले

ताव हवा होता म्हणून दुकानात
दुकानबंदीचा निर्णयआता हटवला
तेवढ्यात रस्ता अडवलेला दिसला
घरी पोहोचणार कसा
कधी कशास बंद करतील
आपली शेंडी तर
तसा पुन्हा रस्ता भरलेला / व्यापलेला अन बाजूस हा मोठा जमाव
सज्जन नेत्याला अटक झाली
शासकांचे हे कृत्य अयोग्य / अतर्क्य / चुकीचे होते
त्यांना त्यांच्या मर्यादा समजत नाहीत
फीता कापण्यापुरता यांचा जनतेशी संबंध.
हे आम्हाला काय शिस्त लावणार ?
विचार करकरून आपलीच गोची होते राव.

बरेच चुकले....
आता तेजोंचे बघते

१. विमान / पतंग / शेवरीची म्हातारी / क्षेपणास्त्र (मिसाईल) / बाण / बंदुकीची गोळी
२. पैसा ( नाणी गोल, नोटा चौकोनी, लहान्/मोठे मूल्य, सचोटीचा/काळा रंग)
७. जलज ( ढग -- पाण्यापासून जन्मलेला)

@ तेजो, वेळ मिळेल तेव्हा दिलेल्यापैकी कोणती उत्तरे चूक / बरोबर ते लिहा. म्हणजे विचाराची दिशा बरोबर आहे की बदलावी लागेल हे कळेल.

Sorry, sorry, नेट प्रॉब्लेम

1, मी सुई नाही पण घुसते,माशी नाही पण उडते..मी कोण??- बंदुकीची गोळी

2. मी कधी गोल,कधी चौरस, कधी लहान, कधी मोठा, मी स्वतः हुन तुमच्याकडे येतो, पण विकत नाही घेता येत.. असतो रंगहीन पण रंगू शकतो कुठल्याही रंगात.. मी कोण??.- हाताची नखे

3. मला टेबलावर ठेवा, कट करा,पण खाऊच नाही शकणार, मी कोण??- पत्ते

4. माझ्याकडे खूप keys आहेत, पण एक कुलुप उघडेल तर शपथ, मग मी कोण??- कीबोर्ड

5. मला खायचा प्रयत्न केलात तर तुम्ही ही दुसऱ्याचे खाणे नक्की व्हाल, मी कोण??..- मासे पकडायचा गळ

6, मलाही आहेत 4 बोटं, अगदी अंगठाही, पण दुखणार नाही बिलकुल जरी एखादे कापले? मी कोण?- हॅन्ड ग्लोव्हज

7.पाण्याशिवाय माझे अस्तित्व शून्य,वाचा मला सरळ किंवा उलटे,तरी माझी ओळख तीच. मी कोण?- जहाज

8.अशी मी बाई वेगळी,थंडीतही वितळून जाई, मी कोण?- मेणबत्ती

सगळ्यांचे खूप आभार
नसेल एखादं उत्तर तंतोतंत पटत/लागू होत तर sorry
सांभाळून घ्या
धन्यवाद

Happy अहो सगळी उत्तरे का फोडलीत?
फक्त दिलेली उत्तरे चूक / बरोबर सांगायची.
कोणी पूर्ण चुकीचा अर्थ लावत असेल शोधसूत्राचा तर क्ल्यू एडिट करायचा
जोपर्यंत आम्ही हरलो, उत्तरे सांगा म्हणत नाही खेळणारे ... तोवर चालू ठेवायचे
बघा डिलीट करताय का उत्तरे.....

असू दे
एखादंच राहिलं होतं, बाकी अश्विनी, काकेपांदा, कुमार सर आणि तुम्ही मिळून दिलीच आहेत की बरोब्बर उत्तरे.

पण पुढल्या वेळी नक्की तसे करीन,त्रिवार हरलो म्हणे पर्यंत मुळी उत्तर देणारच नाही

ओके, मी उत्तरे दिसल्यावर स्क्रोल करून खाली गेले.... पाहिली नाहीत दिलेल्या उत्तराशी जुळवून
एक छोटी सूचना --- मराठी व्यतिरिक्त इतर भाषातही उत्तर असू शकेल तर तशी जनरल सूचना देऊन ठेवायची. म्हणजे सोडवणारे मराठी शब्दात अडकून पडत नाहीत

+१
शक्यतो ओळखायचे शब्द अधिकृत मराठी असावेत.

एक नवीन वाक्यखेळ- विषय - दिवाळी
नियम - किमान 5 आणि जास्तीतजास्त जमतील तेवढी दिवाळी विषयावर वाक्ये लिहिणे. प्रत्येक वाक्याची सुरुवात बाराखडी नुसार करावी . उदा - पाहिल्याची सुरूवात क , मग ख .....
जरूरी नाही क पासूनच सुरुवात करणे.

१.काय वर्णावा या सणांच्या राजाचा आनंद ?
२. खरे आहे, आमच्या गावात दिवाळीचा जल्लोष काही औरच असतो !

३. गतिमान जीवनात विरंगुळ्याचे चार दिवस दिवाळीमुळेच येतात.
४. घराचे सौंदर्य दिवाळीत अधिकच बहरून येते.

५. चाहत्यांच्या मनसोक्त भेटी घ्यायला दिवाळीहून सुंदर दुसरा काळ नाही.

Pages