Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१, ५ उत्तरे थोड्याच वेळात
१, ५ उत्तरे थोड्याच वेळात देतो
..............................................................
१.व्यावसायिक, एक उकार व अंत्य जोडाक्षर (५)
लाकूडतोड्या
५.आत्ताशी बालवाडीत, पण लिहितोय इंग्रजावाणी ! (5)
gmbhn
...... समान वैशिष्ट्य ओळखा. रोचक आहे !
वैशिष्ट्य ओळखायला त्यांचे
वैशिष्ट्य ओळखायला त्यांचे प्रोफाइल पहावे लागेल की केवळ वरील सदस्यनाम पुरेसे आहेत?
ते तुम्हीच ठरवा !
ते तुम्हीच ठरवा !

हे वरचे माहिती नव्हते पण खेळ
हे वरचे माहिती नव्हते पण खेळ रंजक वाटला.
खेळ रंजक वाटला >> अजून चालू
खेळ रंजक वाटला >> अजून चालू आहे....
ओळखा की... वै..
यांनी अजून लेखन केलेले नाही..
यांनी अजून लेखन केलेले नाही... हे समान वैशिष्ट्य वाटतयं पण रोचक नाही.
अस्मिता, नाही.
अस्मिता, नाही.
प्रगल्भ पाहा :
https://www.maayboli.com/user/76539/created
सर्व १० ना लागू
हो की....
हो की....
प्रोफाइल कसे शोधायचे. मी
प्रोफाइल कसे शोधायचे. मी शोध सुविधा मध्ये लाकूडतोड्या शोधलं तर ही एवढी यादी आली लाकूडतोड्या शब्द असलेल्या सर्व प्रतिसदांची, पण प्रोफाइल नाही दिसलं.
खेळ छान आहे . बरेचसे id माहीत
खेळ छान आहे . बरेचसे id माहीत नाहीत . तरी पुढच्या वेळी प्रयत्न करीन .
प्रोफाइल कसे शोधायचे >>
प्रोफाइल कसे शोधायचे >>
एकेकाळी यादी होती....
बघा कारवी काय म्हणताहेत...
शुभेच्छा
उद्या भेटू.... मग सांगतोच
उत्तरे दिली पण....?
उत्तरे दिली पण....?
अरे....देवनागरी गमभन आयडी माहीत होते .... हे बघायला पाहिजे होते.
५.आत्ताशी बालवाडीत, पण लिहितोय इंग्रजावाणी ! (5) gmbhn >>>>
अबक१ गमभन दोन आठवले होते पण ५ अक्षरी नाहीत म्हणून ड्रॉप केले.
लाकूडतोड्या आयडी माहीतच नव्हता. मी शोधसूत्राचा असा अर्थ लावला ----
पहिली ३अक्षरे व्यावसायिक + ४थे उकारान्त अक्षर + ५वे जोडाक्षर = ५ अक्षरी नाव
@ मानव, प्रोफाइल कसे शोधायचे. >>>>> पानाच्या वर मदतपुस्तिकात, मायबोलीकरांची सूची आहे
@ अस्मिता --- लेखन केलय बर्याच जणानी. पहिले २-३ झाल्यवरच मी वैशिष्ट्य शोधले ज्यामुळे पुढचे सोपे गेले असते शोधायला. काही शॉर्टकट....पण अॅट अ ग्लान्स नाही दिसले काही.
छान होते कोडे
छान होते कोडे
१. व्यावसायिक, एक उकार व
१. व्यावसायिक, एक उकार व अंत्य जोडाक्षर (५) --- लाकूडतोड्या
२. संयमीला सूर लागतो (४) -- मनस्विनी
३. अरबी उगम व फक्त मुळाक्षरे. खरंच असं असते ? (३) --- अजब
४. तेजाला पाणी चिकटले (४) --- सूर्यगंगा
५. आत्ताशी बालवाडीत, पण लिहितोय इंग्रजावाणी ! (5) --- gmbhn
६. भाल्याला त्याचेच मुळाक्षर लावा (३) --- कुंतल
७. आहे दगडोबा, पण भाषेत स्थान आहे (३) --- परीस
८. राजघराण्याची प्रेमळ सून, एका जोडाक्षरासहित (३) ---- वत्सला
९. मोठेपणा, धीटपणा व शहाणपणाचा संगम. जोडाक्षरे हवीतच (३) --- प्रगल्भ
१०. मी आहे स्वरांमध्ये आणि ते लटांबर माझ्यापाठी (३...). --- कोमल१२३४५६
आता शोधा वैशिष्ट्य. सगळे एकत्र चिकटवले.
वैशिष्ट्य: हे सगळे कुमार१
वैशिष्ट्य: हे सगळे कुमार१ यांचे चाहते आहेत.
येस, सुफळ संपूर्ण. नवीन
येस, सुफळ संपूर्ण. नवीन कोड्याला जागा रिकामी.
अगदी बरोबर, मानव.सर्व
अगदी बरोबर, मानव.
सर्व सहभागींचे अभिनंदन.
कारवी, खूप छान.
मजा आली.
शुभेच्छा !
कोणी देत असाल तर स्वागत आहे.
कोणी देत असाल तर स्वागत आहे.
अन्यथा उद्या सर्वांच्या सहकार्याने एक नवीन प्रयोग करण्याची इच्छा आहे.
उद्या जरूर वेळ काढा.
धन्यवाद !
अजून काही बनवलं नाही... नवीन
अजून काही बनवलं नाही... नवीन प्रयोगात सहभागी व्हायला आवडेल.
आपणा सर्वांच्या सहकार्याने एक
आपणा सर्वांच्या सहकार्याने एक नवा प्रयोग करूया.
या खेळासाठी मी ७ वाक्यांचा परिच्छेद निवडला आहे. हा मजकूर म्हणजे एका (काल्पनिक) सामाजिक चित्रपटावरील भाष्य आहे. ७ वाक्ये मुद्दाम सुटी दिली आहेत आणि ती देताना त्यातील काही अक्षरे पुसून तिथे * घातले आहेत.
तुम्ही सर्व * ओळखून अर्थपूर्ण वाक्ये करायची. नंतर सर्व वाक्ये एकत्रित वाचल्यावर वर दिलेल्या आशयाचा परिच्छेद झाला पाहिजे.
आपण ४ तास वेळ घेऊ. उत्तराची वेळ झाली की मगच आपापला परिच्छेद डकवा. असे करताना आधीचे प्रतिसाद वाचू नका ! त्यातच खरी गम्मत येईल.
हा खेळ म्हणजे एक प्रकारे ‘लिखित कानगोष्ट’ असेल. यात कुणीही पूर्ण बरोबर/चूक असणार नाही. दिलेला आशययुक्त परिच्छेद झाला की बास.
सर्वात शेवटी मी मूळ परिच्छेद डकवेन. मग आपण तुलना करू. तुम्ही हुबेहूब बरोबर यावे अशी बिलकूल अपेक्षा नाही. उलट उत्तरांतील विविधतेची मजा लुटूयात !
लवकरच खेळ देतोय.....
सूचनांचे स्वागत !
१. रा**र*, *ड*री , उ**चे
१. रा**र*, *ड*री , उ**चे रा*सी **न आणि संपत्तीची *व *ची वा** *मा*ला ला** आहे. (५ ४ ४ ३ ३ आणि संपत्तीची २ २ ३ ४ ३ आहे )
२. **टी आणि *मा*क प्र** यां* का*ची* किंमत उ**ली *ही, या** नि** क** असा अ**त *वे यां* या *त्र*टा* *तू *हे . ( ३ आणी ४ ३ २ ४ किमत ४ २ , ३ ३ ३ असा ४ २ २ या ५ २ २ ).
३. ए* *ज*ल्या *र*य **कका** *ख*व* हा *त्र*ट *धा*त आ*. ( २ ४ ४ ६ ५ हा ४ ४ २ ).
४. *र*त तो ‘ज*रि*’ या **ने
*सा*त *ला अ*ला *री इ** रा** तो *ळ*च ना** *सि* *ला. (४ तो ४ ३ ४ २ ३ २ ३ ३ तो ४ ३ ३ २ ).
५. त्या* *र*यी*र* करताना अ**त
यां* आ** ज*मा** **रात घे**, हे **ड आ*. (२ ७ करताना ४ २ ३ ५ ४ ३, हे ३ २ ).
६. ते अ**य ने** आणि *ग* प्र** चि***त *म*ले* आ*. (ते ४ ३ आणि ३ ३ ५ ५ २ ).
७. *च्या अ** *त्र**तू* *नी *मा*वि**क **ची उ** *ता*णी **ली आहे. ( २ ३ ६ २ ७ ३ ३ ४ २ आहे).
...................................................................
अक्षरांची शब्दसंख्या
अक्षरांची शब्दसंख्या देण्यापेक्षा २ शब्दांत डबल स्पेस दिली तर? शब्द कळून येतील...
१-२ शब्द सगळ्या ७ वाक्यात मिळून पूर्ण देणार नाही?
२ शब्दांत डबल स्पेस >>>
२ शब्दांत डबल स्पेस >>> चौपट जागा सोडली होती. पण सेव्ह होताना ते जवळ येतेच !
१० छोटे शब्द दिलेत ना.
अजून पाहिजेत का ?
ओके... हो जास्तीचा एण्टर पण
ओके... हो जास्तीचा एण्टर पण नाही घेत...
आणि // आहे // व सोडून -- उत्तर फुटणार नाही असे १-२ शब्द.
उगाच मनाला आधार. आता नजर आहे त्या अक्षरातून शब्द बनवण्यात फसतेय.
ओके देतो ३ शब्द ,थांबा !
ओके देतो ३ शब्द ,थांबा !
१ वाक्याचा अनुभव सांगा.
१ वाक्याचा अनुभव सांगा.
हा प्रयोग आहे. सुधारणा करू.
बस झाले इतके. मागचे पुढचे
सद्ध्या बस झाले इतके. मागचे पुढचे जुळवता येतेय.... उदा--- किंमत उरली नाही
अजून कोणी आले खेळायला तर मग सुचवतील नवीन काही मागणी
कारवी +१
कारवी +१
जे खेळत आहेत त्यांनी उपस्थिती नोंदवा.
उत्तराची वेळ भाप्रवे 14 .००
त्याआधी कोणी उत्तरे जाहीर करू नयेत.
छान आहे हा पण खेळ. प्रयत्न
छान आहे हा पण खेळ. प्रयत्न करते.
जमतील तितकी वाक्य करा. काही
जमतील तितकी वाक्य करा. काही हरकत नाही.
हा प्रयोगच आहे.
नजर भिरभिरेल हे साहजिक आहे.
Pages