Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान खेळ चालू आहेत. सध्या
छान खेळ चालू आहेत. सध्या कामात बराच गुंतलेलो असल्याने भाग घेऊ शकत नाहीये.
बघतो जमलं तर
यात विशेषनामे आहेत का?
यात विशेषनामे आहेत का?
५ ४ ४ ३ ३ आणि संपत्तीची २ २ ३
५ ४ ४ ३ ३ आणि संपत्तीची २ २ ३ ४ ३ आहे ........ ठळक केलेले मला काहीच कळले नाही.कोणी सांगेल का?
वाक्यातला कुठला शब्द किती
वाक्यातला कुठला शब्द किती अक्षरी आहे ते
पहिला ५ अक्षरी, दुसरा तिसरा ४ ४ अक्षरी असे
कारण शब्दांतील स्पेस आणि * यामुळे शब्द कुठे संपतात कळत नाहीये
यात विशेषनामे आहेत का >> होय,
यात विशेषनामे आहेत का >> होय, एकाच व्यक्तीचे आणि चित्रपटाचे नाव ( ते तुम्ही बसेल असे ठरवा !)
देवकी
देवकी
"आणि संपत्तीची" हे दिलेले शब्द.
अंकांच्या इथले ओळखायचे. ( ५ अक्षरी शब्द.. )
आता उत्तरे द्यायची वेळ झालेली
आता उत्तरे द्यायची वेळ झालेली आहे. ज्यांची तयार आहेत त्यांनी जरुर द्या.
जर कोणी खेळात उशिरा समाविष्ट झालेले असेल, तर त्यांनी ही उत्तरे न बघता सावकाश आपल्या सोयीनुसार स्वतःची द्यावीत
ओके. देते झालेय तितके.
ओके. देते झालेय तितके. विशेषनामे अडकली.
१. राजकारण, गुंडगिरी,
१. राजकारण, गुंडगिरी, उत्कर्षाचे राक्षसी व्यसन आणि संपत्तीची हाव याची वाळवी समाजाला लागली आहे.
२. सचोटी आणि प्रामाणिक प्रयत्न यांना काडीची किंमत उरलेली नाही, या** निषेध करणे असा अ**त *वे यांच्या या चित्रपटाचा हेतू आहे
३. एका गाजलेल्या भारतीय नाटककाराच्या लेखनावर हा चित्रपट आधारित आहे.
४. भारतात तो ‘ज*रि*’ या नावाने प्रसारात आला असला तरी इतर राष्ट्रांत तो *ळ*च नावाने प्रसिद्ध झाला.
५. त्याचे भारतीयीकरण करताना अ**त यांनी आजचे जनमानस विचारात घेतले, हे उघड आहे.
६. ते अतिशय नेमाने आणि सगळ्या प्रसिद्ध चित्रपटात समजलेले / उमगलेले आहे.
७. त्यांच्या अनेक चित्रपटातून त्यांनी समाजविषयक प्रश्नांची उत्तम खतावणी मांडली आहे.
खात्री नाही ---
*ळ*च = वाळवीच;
‘ज*रि*’ = जनरित / जगरित / जगरिती;
अ**त *वे = अभिजीत / अनिकेत भावे / सावे
कारवी
कारवी
सुंदर !
अधिक काही आता लिहीत नाही
वा ! पुनेकर यांचा पुन्हा आला की मी लिहितोच.
विशेषनामे विचार करतेय....
विशेषनामे विचार करतेय.... सापडली तर लिहून चालतील का? की टाईम अप?
कारवी , अतिशय सुंदर !!!! ,
कारवी , अतिशय सुंदर !!!! , मला 1 /2 च लिहिता आली होती .
कधीही लिहा ...
कधीही लिहा ...
जमलेय तेवढे लिहा ..
पण जरूर लिहा ....
अश्विनी , तुमची मूळची लिहा ना ..... गंमत येते !
:)ुतुम्ही उत्तर का वाचले? ४
बरोबर की चूक याला महत्व नसून
बरोबर की चूक याला महत्व नसून कल्पकतेला आहे.
बिनधास्त चुकीचे लिहा !
मला वाटते , कारवी,
मला वाटते , कारवी,
तुम्ही तुमचे उत्तर काही वेळ मिटवून ठेवा (.) !
कुमार१ , आपण खरेच
कुमार१ , आपण खरेच वैविध्यपूर्ण उपक्रम देत आहात . त्याबद्दल आपले आभार . आज जास्त वेळ यात भाग घेता येत नाहीये . तरी पुढच्या वेळेस पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन.
हरकत नाही,
हरकत नाही,
धन्यवाद.
या प्रयोगातून आता सूचना येतील आणि मग त्याचे पक्के स्वरूप ठरवूया.
पुणेकर, देवकी .... अजून कोणी ...
येउद्यात
१. राजकारण, गुंडगिरी , उ**चे
.१. राजकारण, गुंडगिरी , उ**चे राक्षसी सेवन/ वर्तन (?) आणि संपत्तीची हाव याची वाळवी समाजाला लागली आहे.
२. **टी आणि प्रामाणिक प्रयत्न यांची काडीचीही किंमत उरलेली नाही, यावर
निषेध करावा असा अ**त *वे यांच्या या चित्रपटाचा हेतू आहे
३. एका गाजलेल्या *र*य **कका** *ख*वर हा चित्रपट आधारित आहे
४. भारतात तो ‘जगरित’ या नावाने
प्रसारित झाला असला तरी इथल्या राज्यात तो मुळच्याच नावाने प्रसिद्ध झाला.
५. त्याची *र*यी*र* करताना यांनी आजचे जनमानस विचारात घेतले, हे उघड आहे
६. ते अतिशय नेमक्या आणि प्रगल्भ प्रकारे चित्रपटात उमटलेले आहे
७. त्यांच्या अनेक चित्रपटातून त्यांनी समाजविषयक प्रश्नांची उत्तम *ता*णी केली आहे.
नाव ...अनिकेत भावे / अभिजित सावे वगैरे काहीही
पुणेकर, छान.
पुणेकर, छान.
आता थोडा वेळ कारवी यांच्याप्रमाणे ते मिटवून ठेवा.
मजा आली. काही शब्द नाही आले.
मजा आली. काही शब्द नाही आले. आलेत ते ही सगळे बरोबर असतील असे नाही
अहो, तीच तर मजा आहे !
अहो, तीच तर मजा आहे !
आता असे करू.
बरोबर तासाने कारवी, पुणेकर तुम्ही तुमची उत्तरे आता आहेत तशीच डकवा.
मग मी मूळ लिहीन
छान सहभाग ...
.... कारवी, पुणेकर करा संपादित आता
कारवी, छानच. सचोटी शब्द नाही
कारवी, छानच. सचोटी शब्द नाही आठवला मला. नाटकाकाराचे हा शब्द पण अवघड होता.
( कोड्यात एखादा * चुकला
( कोड्यात एखादा * चुकला असल्यास क्षमस्व ! )
.......................
राजकारण, गुंडगिरी, उन्मत्तांचे राक्षसी वर्तन आणि संपत्तीची हाव याची वाळवी समाजाला लागली आहे.
सचोटी आणि प्रामाणिक प्रयत्न यांना काडीचीही किंमत उरलेली नाही, याकडे निर्देश करावा असा अभिजित दवे यांच्या या चित्रपटाचा हेतू आहे.
एका गाजलेल्या परकीय नाटककाराच्या लेखनावर हा चित्रपट आधरित आहे.
भारतात तो ’जनरिपु’ या नावाने प्रसारित झाला असला तरी इतर राष्ट्रांत तो मूळच्याच नावाने प्रसिद्ध झाला.
त्याचे भारतीयीकरण करताना अभिजीत यांनी आपलं जनमानस विचारात घेतलं, हे उघड आहे.
ते अतिशय नेमकं आणि चांगल्या प्रकारे चित्रपटात उमटलेले आहे.
त्यांच्या अनेक चित्रपटांतून त्यांनी समाजविषयक प्रश्नांची उत्तम हाताळणी केलेली आहे.
......................................................
धन्यवाद सर. छान होता खेळ.
धन्यवाद सर. छान होता खेळ.
कारवी, पुणेकर खूप छान !
कारवी, पुणेकर खूप छान !
प्रयत्न केले त्यांचेही आभार.
रच्याकने ...
ज्या मूळवरून हा उतारा रचला त्याबद्दल..
मूळ नाटक : Enemy of the people
by Ibsen
भारतीय चित्रपट : गणशत्रू
दिग्द : सत्यजित राय.
छान होता खेळ सर. मजा आली.
छान होता खेळ सर. मजा आली.
काही वाक्य चुकली....लिहीलेली अर्थपूर्ण नाहीत कळले पण दुसरा शब्द नाही आला.
अरिहंत दवे सुचले होते....
बाकी ढाचा ठीक आहे.... ३ शब्द दिल्याने वाक्य रचायला खूप मदत झाली ?
पुढच्या वेळी होते मूळचे होते तसे ---- आणि, आहे, व इतकेच द्या ---- म्हणजे बघू कसे जमते......
punekarp, मस्त जमलेय.....
punekarp, मस्त जमलेय..... नाटककार मागचे पुढचे शब्द राहिल्याने गेला... मला पण शेवटी आला.
मराठी सिनेमा गृहीत धरला.
अनिकेत भावे / अभिजित सावे --- नावे इतकीच सुचली मला पण
दसऱ्यानिमित्त सर्व शब्दप्रेमी
दसऱ्यानिमित्त सर्व शब्दप्रेमी परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आपला स्नेह वृद्धिंगत होवो !
सर्वांची श्रीखंडझोप झाली असेल
सर्वांची श्रीखंडझोप झाली असेल, तर द्या कोणी !
Pages