शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७ राजकारण // बाशिंगबळ >>>>>> दोन्हीही नाही !
**कारण + लगीनघाई सुधारून -- हे काम उरकून टाका.--- असे सुचवले मी
हे उत्तर सगळ्यात आधी मानव उडवतील असे वाटले होते मला .... आले नाहीत बहुतेक...

१ लाभ = कर मानले तर...
करमणूक >>>> नाही

कर लाभ नाही; लोभी लाभ आहे. आनंदी गंमत जंमत बाकी आहेच पुन्हा.
करमणूक काय लोक गोळीबार / भुतेखेते / नाच बघून पण करून घेतात.

एक गूढकोडे. सगळे शब्द ५ अक्षरी. शब्द आणि त्याची उकलही द्यायची आहे.
काही ठिकाणी शब्द + शोधसूत्र दिलेले आहे. काही ठिकाणी नुसते शोधसूत्र.
* = शोधसूत्रात / उत्तरात मराठी व्यतिरिक्त इतर भाषा आहेत.

१. लाभापुरतीच आनंदी गंमत जंमत
२. टपरीवरचा चहा अन्नाबरोबर? सरी सरी चालतोय की...! *
३. समग्र पचवणारे / उत्तेजन देणारे घरातील मानाचे व्यक्तित्व
४. सात दगड अन स्वतः ला चुलीचे चटके नाहीत
५. गरम अधिक थंड = कोमट नव्हे, औषधी गुणाचे
६. जलद अक्कलशून्य अनुमोदन राजाच्या डोक्यावर चक्क ? *
७. सोहळा की लढाई..... का बरं असं असावं?
८. एका माबोकराने काठी घेऊन केलेले अशुद्धलेखनाचे तुकडे नेत्रदीपक खरे
९. वैरभावचिन्ह पीडेने त्रस्त अस्ताव्यस्त निषधराज
१०. कुरळे केस शुक्ल षष्ठी युक्त पुण्यसलिला

८ मध्ये पूर्ण शब्द माबोकर नाही, तो शब्दाचा भाग आहे + अशुद्धलेखनाचा तुटका नमुना आहे. अशुद्ध बोलण्याचा नमुनाही होऊ शकतो.....सगळ सुंदर नेत्रदीपक पण हवं वरून.

१० मध्ये २ मराठी नट्या आहेत. एक कुमारी, काठीसहित आहे मूळचीच, दुसरी सोशिक सवाष्ण तर तिची काठी काढून घेतलीय.

कुमार सर, विक्रमसिंहाशिवाय कोणी खेळतय का? अजून क्ल्यू हवेत तर सांगा.

२. आमटीभात
टपरीवरचा चहा = आम tea
भात = सरी
.............
७. लग्नकारण ?

२. आमटीभात >>> Happy बरोबर..... जेवायला बसलात बहुतेक !
टपरीवरचा चहा = आम tea -- बरोबर

बाकी -- . अन्नाबरोबर? --- अन्न म्हणजे भात ( संस्कृत + तामिळ)
म्हणून --- चालतोय की. = ओके = सरी सरी तामिळम्ध्ये देऊन ठेवले

७ लग्नकारण >>>> थोsssडे बदला अजून समानार्थी घ्या ज्यामुळे का बरं असं असावं मागे सुटणार नाही

आम tea हा कॉलेजजीवनातला लई जुना इनोद होता ! ( आंबा + चहा = आमटी !!)
........................................................
३. आद्यपुरुष
समग्र पचवणारे ( आद्यंत – त ) : पचवला

१०. कुरळे केस शुक्ल षष्ठी युक्त पुण्यसलिला
१० मध्ये २ मराठी नट्या आहेत. एक कुमारी, काठीसहित आहे मूळचीच, दुसरी सोशिक सवाष्ण तर तिची काठी काढून घेतलीय.
>>>क्लू वापरून फक्त पुण्यसलिला हे जुळवलं तर अलकनंदा
अलक म्हणजे केस
पण ते शुक्ल षष्ठी काय ते काही कळत नाही

३. आद्यपुरुष
समग्र पचवणारे ( आद्यंत – त ) : पचवला
नवीन Submitted by कुमार१ >>>> आद्यपुरुष नाही...
हे पचवणे / उत्तेजन देणे शारीरिक आहे.
आणि मानाचे व्यक्तित्ब अस्तित्वात असणारे, (मूळपुरूष नव्हे ) ..... ते डोईजडही असते बहुतांश

मी प्रयत्न करतेय , पण थोडे अवघड जातेय .
Submitted by अश्विनी११ >>>> कुठले ट्राय करताय? तुमचा अंदाज सांगा. मी क्ल्यू देते अजून.

अलकनंदा
Submitted by punekarp >>>> बरोबर
अलक म्हणजे केस / कुरळे केस
नंदा तिथी = शुक्ल १ / ६ / ११ असे कोशात आहे..... मलाही आजच कळले
अलकनंदा = गंगेचा मूळ प्रवाह म्हणून पुण्यसलिला

यज्ञकारण ?
Submitted by कुमार१ >>>> नव्हे.
लगीन लग्न बरोबर आहे.... थोडा जुन्या धाटणीचा समानार्थी आठवा
का बरं असं असावं चे उत्तर हवे ना मिळायला

??कारण बघतोय ना आपण?
उत्तरात लग्न आहे पण लग्न नाही
टोपी घाला हात जोडा... म्हणा -- आमचे येथे.....

कार्य का रण ?

बरोबर
हे का बरं असं असावं याचे तार्किक स्पष्टीकरण --- कार्यकारण (भाव)

७. सोहळा की लढाई..... का बरं असं असावं? >>>> याचं सांगताय? सुटले ते. कार्यकारण.
१ ३ ४ ६ ८ ९ राहिलेत.

वैरभावचिन्ह पीडेने त्रस्त अस्ताव्यस्त निषधराज=
नक्षलवाद / नक्षलवादी

निषदराज = नल
वैरभाव चिन्ह = X एक्स
एक्स = क्ष

माझी भाप्रवे.
नविन मराठी शब्दांची ओळख होतीय.

Pages