तनिष्कची वादग्रस्त जाहिरात

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2020 - 13:41

जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.

https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA

वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.

मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्‍या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.

विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.

पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्‍या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.

बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इरॉस नाउ मध्ये एकच कुणीतरी मुसलमान दिसला
उरलेले तुमचेच आहेत

https://en.m.wikipedia.org/wiki/Eros_Now

नवरात्रीला अश्लील जाहिरात आलमोस्ट दरवर्षी कुणीतरी काढतेच , एकदा मॅन फोर्स ची पण होती

पण असे करणे चुकीचे आहे , सण हे सात्त्विकता व संस्कार यासाठी असतात

मलाही इरॉस नाऊ चे ट्वीट खटकले आहे. त्यांनी माफी मागितली आणि ते ट्वीट्स डिलीट केले हे उत्तम झाले. They were not in a good taste at all.

अधिक मासाच्या म्हणायचं होतं का हो ब्लॅककॅट..? Wink

असे झाले तर अजुन एका जाहिरात कंपनीला प्रोत्साहन मिळेल... जावयाला चांदीच्या ताटात अनारसे देऊन १ तोळ्याची सोन्याची अंगठी अन २ तोळ्याची चेन अशी जाहीरात करता येईल. हे पण किती भारी वाटेल ना..? की दंगली वगैरे होतील..??

अधिक मास
केले दुरुस्त

अधिक माणूस आता अफजलखान , आदिलशहा उपजेल तेंव्हा

परंतु जाहिररात वाल्याने असले उद्योग करावेच कशाला? नेगेटिव्ह पब्लिसिटी साठी? हे नक्कीच हीन मानसिकतेचे प्रतीक आहे.
नेहमी हिंदू देव देवतांची गमतीची उदाहरणे द्यायची, आजवर कोणी अल्लाहचे विनोदी उदाहरण दिले आहे का? उत्तर नाही असेच असेल. का? कारण जगातील सगळ्यात शांततावादी धर्माचे लोकं येऊन सरळ मुंडकी कापतात. पॅरिस कार्टून हे एक उदाहरण म्हणून देता येईल. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

मुळात नको तिथे कसली एकात्मता आणि भाईचारा याचे खूळ. अरे जिथे धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे पाडले तिथे धर्म निरपेक्षता म्हणजे कसायाने अहिंसा कशी उत्तम आहे ते सांगण्यासारखे आहे.

नेपाळ भूतान ब्रह्मदेश श्रीलनका इंडोनेशिया मालदीव

सावरकरांच्या अखंड हिंदुस्तानातून सगळे मुसलमानांनी वजा केले का ?

वटवृक्ष यांचा "हिंदू धर्म बहुसंख्य असून देखील सतत..........." हा प्रतिसाद इंटरेस्टिंग आहे.
मुस्लिम मुलीचे (सुनेचे) डोहाळजेवण हिंदू सा सर करते असे दाखवले नाही कारण मुस्लिम समाज सहिष्णू नाही, असे त्यांना सुचवायचे आहे.

त्याचवेळी या जाहिरातीत हिंदू मुलगी मुस्लिम कुटुंबात सून म्हणून गेलेली दाखवली याला त्यांनी पहिल्यापासून आक्षेप घेतला आहे.

आता सांगा , इथे असहिष्णू कोण?

काय बोलताय ? काय संदर्भ लागतोय का ?

आणि इतर लोकांच्या पण ठराविक साच्यातील
प्रतिक्रिया आल्या , वर इतरांना आपली जात धर्म वरून डोस द्यायला मोकळे !
शिवाय पॅरिस आणि बँगलोर मधील कट्टरवादी लोकांनी पसरवलेली दहशत यांच्या तर गावीच नसते .
अशा पुरोगाम्यांचे पीक अजुन वाढो जेणेकरून भारतात आणि जगात शांतता पसरली जाईल .

एक मात्र नक्की जाहिरातीत वापरलेले सलमान आणि रणवीर eros ला शिव्या देत असतील , भविष्यातील होवू घातलेल्या आर्थिक नुकसानी मुळे !

धर्म निरपेक्षता हे तत्व चांगलेच आहे. पण भारतीय पुरोगामी जे प्रमोट करतात ती धर्मनिरपेक्षता नाही.

उर्मिलाच्या नवऱ्याला हिंदुनि अधिक मासाच्या शुभेच्छा , अनारसे दिले का ?>>>> नाही दिले.कारण तीही मुस्लिम झाली न! त्यांच्यात अधिक मास आणि वाण नसते.

तुम्ही त्याला हिंदू करायचे ना

आणि सोने आणि अनारसे द्यायला धर्म कशाला आडकाठी करेल ?

तुम्ही बिर्याणी नाही खात ?

अहो पण ती झाली ना मुस्लिम.मग परत त्याला हिंदू करा,मग तिला हिंदू करा कोणी सांगितलंय. सोने अनारसे कशाला मुद्दाम द्या.त्यांच्यात पुरुष सोने घालत नाहीत.म्हणून नाही दिले सोने.आम्ही बाबा भावना जपतो.

ओके erosnow बघितलं. Just wow.
तनिष्कमुळेच त्यांना बळ मिळालं असावं का असं करण्याचं...की चला हा ट्रेंड आहे तर आपण पण करू हेच..
अवघड आहे.

व्हॉट्ट अबाउट्ट नुसरत जहां ? नुसरत जहां ने परधर्मात लग्न केले तर काय खवळले ना आमचे धर्म मार्तंड ! Proud

हिंदु स्त्रिया मुस्लिमांशी लग्न करतात ते चालते या मौलवींना, तिथे का नाही आक्षेप घेत ? पण मुस्लिम मुलीने हिंदु किंवा इतर मुलाशी लग्न केले की लग्गेच नाचानाची होते. हे ढिंगचिका, ढिंगचिका !

> तनिष्कमुळेच त्यांना बळ मिळालं असावं का असं करण्याचं...की चला हा ट्रेंड आहे तर आपण पण करू हेच

तनिश्क च्या जाहिरातीत काहीही ऑफेन्सिव्ह नाहिये. वडाची साल पिंपळाला लावायचे तुमचे कसब वादातीत आहे.

हा बीबी सुरुवाती पासून वाचला तरीही पॅटर्न लक्षत येतो. ती जाहिरात ऑफेन्सिव्ह नाही असेच बहुतेकांचे मत होते. आजच्या काळात अशा जाहिराती यायला हव्यात असेही काहि लोकांनी लिहिले. कालांतराने हा बीबी मागेही पडला असत पण काही ठरावीक आयडी ट्रिपल तलाक, हलाला वगैरे मसाला घेऊन आले व विषयांतर झाले.

<नुसरत जहां ने परधर्मात लग्न केले तर काय खवळले ना आमचे धर्म मार्तंड !>

वर बघा. हिंदू मुलगी मुस्लिम मुलगा यांच्या लग्नावरून किती लोक टणाटण नाचताहेत.

उर्मिलाला हिंदू धर्मातून बाहेरही काढलं.

उर्मिलाच्या लग्नाचे फोटो नक्की बघा. https://www.bollywoodshaadis.com/articles/urmila-matondkar-married-4585

I am a Hindu. That’s the religion I have followed, but I believe in Hinduism in a wider sense, not the kind of Hinduism that’s sold to us today. Even if I had converted to Islam, I would have said it with as much pride. However, it’s none of anyone’s business. I am not just talking about the secular fabric of the country because I am married to a Muslim. Contrary to that, because I always believed in it, I was open enough to marry a man of a different faith."
https://www.dnaindia.com/bollywood/photo-gallery-even-if-i-had-converted...

पण यातलं कोणी धर्मेंद्र , हेमामालिनी आणि धर्मेंद्रच्या बिचार्‍या बायकोबद्दल - प्रकाश कौरबद्दल बोलायला तयार नाही.

Eros च्या चीफ एकझिक्युटिव्ह ऑफिसर चे नाव अली हुसेन आहे !
इतर कोण हिंदू लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करेल का ?
बरं तनिष्का ची जाहिरातीला जबाबदार मुस्लिम च होता !
तरी पण इतर लोक कट्टर नाहीत आणि सहिष्णु असतील या वर आमचा विश्वास आहे बरं का हेलगा जी !

तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे?
अ‍ॅड बनव णारा मुस्लिम आहे याला?

की सून हिंदू आणि सासर मुस्लिम दाखवलं याला?

अ‍ॅड बनवणारा हिंदू असता तर तुम्हांला खटकणार नव्हतं. अ‍ॅड बनवणारी एवढी मोठी टीम. ती त्या क्लायंटकडून पासही करून घेतात. एवढे सगळे त्या एकट्या मुस्लिम माणसाच्या बनावाला बळी पडले? नक्की आयसिसचा हात असणार बघा.

सुन मुस्लिम सासर हिंदू दाखवलं असतं तर तुम्हांला आवडलं असतं. बरोबर?

थोडंसं धरमपाजी आणि स्वप्नसुंदरीच्या लग्नाबद्दल पण बोला ना.

ती फसवा फ्सवी नाही? पहिल्या बायकोवर अन्याय नाही?

ईशा देओलचा धर्म कोणता?

कोणी कशाला बोलायच प्रकाश कौर बद्दल?
She has all the freedom to go to courts and she will get all the protection, alimony, inheritance etc .

उर्मिला म्हणजे तिच ना जी काश्मीर मधून कलम 370 रद्द झालं म्हणून टिपं गाळत होती? तिथल्या गेल्या 70 वर्षातल्या सहिष्णूपणाबद्दल काय म्हणतेय ...

Why isnt she exercising her freedom? what is stopping her? Dont you feel sorry for her?
Dont you think Dharam and Hema have cheated on both Hindu and Muslim religions by adopting it superficially for hoodwinking a law? And the party which claims to care for women's welfare and hindus makes such people MPs. What message does this send?

विकु,
पुरोगामी पवार साहेबांची एनडिटीव्हीची लिंक दिली होती. त्यावर तुम्ही बोललाच नाहीत काही नंतर.

तनिष्कबाबत मीही लिहिलं होतं की आयसोलेशन मध्ये पाहिलं तर आक्षेपार्ह नाही. पण context बघायला हवा.
मुस्लिम पुरुषाशी लग्न केलेल्या हिंदू मुलीने धर्मांतर केले नाही तर ते लग्न valid च नाही व तिला पतीच्या प्रॉपर्टीवर हक्क मिळू शकत नाही असा कोर्टाचा निर्णय आहे. बाकी समान नागरी कायद्याचा प्रश्न अजूनही ओपन आहेच. या context मुळे लोक चिडले.
आता तनिष्क टीममध्ये ही जाहिरात वादग्रस्त होईल हे कोणालाच कळले नसेल असं नाही. तरीही जाहिरात पुश केली गेली कारण पब्लिसिटी मिळेल आणि विशिष्ट कस्टमरना आकर्षित करता येईल. This is highly probable.
Irosnow वाल्यांनाही फ्री पब्लिसिटी मिळाली ज्या साठी एरवी करोडो खर्चावे लागतात.

मुस्लिम पुरुषाशी लग्न केलेल्या हिंदू मुलीने धर्मांतर केले नाही तर ते लग्न valid च नाही व तिला पतीच्या प्रॉपर्टीवर हक्क मिळू शकत नाही असा कोर्टाचा निर्णय आहे. >>>>>>>
या विषयावर पुरोगामी मंडळी ची अवस्था जंगलात फिरणाऱ्या आंधळ्या सारखी होते !
हि शिकलेली माणसे असे का वागतात तर दोन उत्तरे !
पाहिले म्हणजे अटेंशन सिकिंग !
आणि दुसरे म्हणजे ,
काही बोलावे तरी प्रॉब्लेम नाही तरी प्रॉब्लेम ! शेणात पाय तर पडलायच तर मग ते शेण कसे गार गार आणि सुगंधी आहे याचेच सतत वर्णन करत बसतील !

मग ह्यात नवर्याचा किंवा इस्लामचा काय दोष ?

तसाच कायदा हिंदू पिता व मुस्लिम मुलगी यात आहे

Hindu woman denied right to parental property after converting to Islam
The woman, who converted to Islam in 2013 when she married a Muslim man following the death of her first Hindu husband, has sought court's direction to declare her one-third owner of her father's property.

https://www.india.com/news/india/hindu-woman-denied-right-to-parental-pr...

स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाबद्दल तुम्हांला किती चीड आहे आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल तुम्ही मंडळी किती आग्रही आहात, हे बिंग कधीच फुटलंय.

तनिष्कच्या जाहिरातीला, हिंदू मुलगी - मुस्लिम मुलगा यांच्या लग्नाला तुमचा विरोध फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेषा पोटीच आहे हे अगदी ढळढळीत दिसतंय.
पॅरिसमधल्या एका घटनेचा इथे काही संबंध नसताना उल्लेख केलात. त्याच पॅरिसमध्ये दोन मुस्लिम स्त्रियांना अनेकवार भोसकलं गेलं. तो हेट क्राइम होता , त्याचा उल्लेख करायला व्यवस्थित चुकलात.

पुरे करा आता. नवं कॉज शोधा.

https://www.loksatta.com/manoranjan-news/kangana-ranaut-on-eros-now-navr...>>>>>> सनव आणी मृदुला, या झापडबंदांना खरे काय ते पचणारच नाही. एवढे बघुन व वाचुनही हे मीच खरा म्हणून उड्या मारतील.

बाय द वे, काही लोक भारताशी संबंधीत कायम लिहीत असतात, पण त्यांना मराठी पेपर मधल्या बातम्या समजत नसतीलच, नाही का !

करीष्मा भोसले मॅटर यांना माहीत नसेलच. आता त्या विषयी बोलले की लग्गेच, इथे त्याचा काही संबंध आहे का म्हणून रडगाणे सुरु होईल. आहे हिंमत पुचाट लोकांमध्ये अशा गोष्टींचा निषेध करण्याची?

5 वर्षे फडणवीस होता तेंव्हा ही खरिश्मा गप्प होती>>>>>> त्या वेळी सोनु निगम अजान विषयी बोलला होता. आणी त्याला अनेक मुस्लिम लोकांनी पण पाठिंबा दिला होता काळु माऊ. जरा वाचन वाढवा.

कुठलाही वाद असेल तर चर्चा करता येते, पण तेव्हा तुमच्या अब्बु गब्बु आझमी आणी मानसीक गुलामांनी तिला धमकावले होते, कळ्ळे ? म्हणे ही जागा सोडुन जा त्रास होत असेल तर.

Pages