तनिष्कची वादग्रस्त जाहिरात

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2020 - 13:41

जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.

https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA

वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.

मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्‍या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.

विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.

पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्‍या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.

बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गदर मध्येही होते >>> आमच्या family मध्ये ही आहे. No Conversion. नवर्‍यामुलाने त्याच्या आईच्या आधी माझ्या कानावर घातले होते तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला होता की तू Convert होणार का? त्याने नाही म्हणताच विचारले तिला म्हणालायस का कन्व्हर्ट हो? त्याने नाही म्हटल्यावर मी लागलीच "शाब्बास!" म्हणून इतर काही प्रश्न विचारून (जे मी कुठल्याही जातीधर्मातल्या मुलीच्या बाबतीत विचारले असते) माझी सहमती दर्शवली. जसे आहात तसेच एकमेकांना स्वीकारा. धर्मांतराची अट नको. मुलीच्या दोन्हीकडल्या आज्यांपासून सगळे आनंदाने लग्नसोहळ्यात सामिल होते. जे काही १० दिवस आमचे ते नातेवाईक भेटले ते सर्व अगदी सज्जन, शांत, समंजस, liberal वाटले. हळद वगैरे दोन्ही फॅमिलींनी एकत्रच माझ्या सासरी केली. सगळे एकत्र नाचलो. आमचे नातेवाईक व त्यांचे ३५ नातेवाईक एवढी मंडळी घरात जमल्याने मुलाची आई, मी व इतर २-३ बायकांची आदरातिथ्य करण्यात चांगलीच धांदल उडाली होती. मग मुलीचा एक काका सरळ स्वयंपाकघरात घुसून मला विचारून विचारून ट्रॉलीतल्या ताटल्या काढणे, ताटात पदार्थ घेवून बाहेर सर्व करायला जाणे वगैरे फटाफट करू लागला. मुलीचे जवळचे नातेवाईक संपर्कात असतात. नातेवाईकांप्रमाणेच आपुलकीने वागतात. आमच्या घरात थोडे RSS चे वातावरण असले तरी त्यामुळे त्यांना काहीच प्रोब्लेम वाटला नाहिये. रजिस्टर लग्नाच्या वेळेला घरी परत येताना RSS वाला मुलाचा मोठा भाऊ ड्राईव्ह करत होता आणि मागे मुस्लिम वर्‍हाडी होते. देव न करो, पण कधी वेळ पडलीच तर मुलाचा मोठा भाऊ तिचा मोठा भाऊ असल्यासारखा तिच्या रक्षणाला उभा राहील. सब चंगास्सी.

ही झाली आमच्या घरची गोष्ट. परंतु, समाजात कुठल्याही जाती, धर्म व सामाजिक पातळीतल्या फरकावरून केले जाणारे छळ, ऑनर किलिंग्ज अत्यंत घृणास्पद आहेत व ते समाजाने collectively टाळायला हवेत.

माझ्या एका मित्राची सख्खी बहिण अशाच 'लव्ह जिहाद' ची बळी होताहोता वाचली आहे. अगदी पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण .
वडील मोठ्या पदावर सरकारी नोकर, आई आणि भाऊ चांगल्या ठिकाणी नोकरीला. घरात अगदी चांगले वातावरण. असे असूनही त्याची लहान बहिण एका 'भंगारवाल्याच्या' प्रेमात पडली आणि एक दिवस घरातून गायब झाली. अखेरीस पोलिसांनी शोधून परत आणले कारण तिचे वय १८ पेक्षा कमी होते. नंतर त्या भंगारवाल्यावर कारवाई केली की नाही ते माहित नाही. ठिकाण : नागरी निवारा परिषद वसाहत, गोरेगाव पू.

ऑ? जातीधर्म द्या सोडून पण आजकाल मुलेमुली आर्थिक-सामाजिक स्तर थोडाफार जुळत असेल तरच पुढे जातात. भौतिकवादी जगात असे वडील मोठे अधिकारी आणि ही भंगारवाल्याबरोबर काही झेपले नाही. पण प्रेम आंधळे असते त्यामुळे झालेही असेल.

धर्माच्या नावावर एक अख्खा देश तोडला आणि लाखोंच्या कत्तली केल्यात त्यांच्या जखमा अजुनही भरल्या नाहीत. या जखमांवर मीठ चोळणार्‍या या जाहिराती हव्यातच कशाला?

एम एफ हुसैन जसे सरस्वतीचे वादग्रस्त चित्र काढतो तसे अल्लाचे काढतो का? ते एक कार्टून प्रकाशित करणार्‍या कार्यालयावर हल्ला झाल्याचं लोक विसरलेत का? पैगंबराचा सिनेमा बॅन झाला ही तर ताजी गोष्ट आहे.

तस्लिमा नसरीन आणि सलमान रश्दींची पुस्तके का बॅन होतात? जीवे मारण्याचे फतवे का निघतात? देश सोडू़न परागंदा व्हायची वेळ का येते?

एक श्रीमंत बाप
एक कबाडीया बाप

मला दिल आठवला

जब काली बोरी में पैक होकर ही है रहना, तो तनिष्क का गहना लेकर क्या करोगी बहना?

हा साधा प्रश्न नसेल का पडला तनिष्कवाल्यांना ...

Submitted by उनाडटप्पू on 16 October, 2020 - 19:02

और यह लगा सिक्सर!

Gold jewelry is haram for males only. Women can wear gold and jewelry which is not haram. Also it is haram to wear pure silk for males. ... Great Allah knows better which is good for Man and which is good for women.

गुगलवर दिसले

जाहिरात isolation मध्ये पाहिल्यास ओके आहे. खटकण्यासारखं काही नाही. पण सद्य परिस्थितीच्या context मध्ये पाहिल्यास ती प्रातिनिधिक नाही असं वाटल्यामुळे लोकांना खटकली आणि टोन डेफ वाटली.
इथेच गॉन विथ द विंड चा धागा होता त्याची आठवण झाली.

माझ्या मते कोणताही हिंदू मुस्लिम विवाह लव्ह जिहाद आहे.............

हो का ???
असे किती हिंदु मुस्लिम विवाह प्रत्यक्ष पाहिलेत ?????

जब काली बोरी में पैक होकर ही है रहना, तो तनिष्क का गहना लेकर क्या करोगी बहना?>>>>>
परफेक्ट !!!

जब काली बोरी में पैक होकर ही है रहना, तो तनिष्क का गहना लेकर क्या करोगी बहना?>>>>>
>>

मुस्लिम बायका दागिने वापरत नाहीत का?
मला जास्त कल्पना नाही.
पण आमच्या ऑफिसमध्ये बरेच मुस्लिम मुली आहेत, त्यांना पाहिलेय दागिने घालताना.
आणि त्या ऑफिसला येताना बुरखाही घालत नाहीत. हे म्हणजे सर्व मराठी माणसं धोतर घालतात म्हटल्यासारखे झाले.

त्या जाहीरातीतही कोणी महिला काळ्या किंवा पुर्ण झाकलेल्या बुरख्यात दाखवली नव्हती.
यावर मुस्लिम चिडायला हवेत ना जर हे त्यांना मान्य नसेल तर??

नवर्‍यामुलाने त्याच्या आईच्या आधी माझ्या कानावर घातले होते तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला होता की तू Convert होणार का? त्याने नाही म्हणताच विचारले तिला म्हणालायस का कन्व्हर्ट हो? त्याने नाही म्हटल्यावर मी लागलीच "शाब्बास!" म्हणून इतर काही प्रश्न विचारून (जे मी कुठल्याही जातीधर्मातल्या मुलीच्या बाबतीत विचारले असते) माझी सहमती दर्शवली. जसे आहात तसेच एकमेकांना स्वीकारा. धर्मांतराची अट नको. >>>>>>>>>
+११११११११
प्रेम विवाह मध्ये सर्वात महत्वाची हीच बाब आहे !

ते दोन्ही जीव आणि कुटुंबीय धर्माची सक्ती करत नसतील तरच आंतरधर्मीय विवाहांना अर्थ आहे .

मुलीला लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर आणि मुस्लिम रीतिरिवाज पाळायला लावल्या मुळे अंतर्गत वाद होवून पोलीस केस झाल्या मुळे लव जिहाद च्या केसेस उघडकीस आल्या !

मुख्य म्हणजे उच्च शिक्षित आणि आर्थिक स्वावलंबी असणाऱ्यांनीच आंतरधर्मीय लग्न करावीत , म्हणजे दोघांच्याही कुटुंबीयांचा हस्तक्षेप होणार नाही !!!

मुस्लिम बायका दागिने वापरत नाहीत का?
>>>>>>>>>
शक्यतो घरातच घालत असतील !
पण बुरखा घालणाऱ्या स्री यांचे प्रमाण जास्त असल्या मुळे genuine प्रश्न वाटतो ......

दागिने फार घालता येत नसतील.ज्यांना पूर्ण बुरखा ऐवजी रंगीत हिजाब फक्त हेडस्कार्फ वापरण्याची परवानगी असेल त्या बायकांच्या हिजाब मध्ये वेगवेगळे कलर कलेक्शन, हिजाब ला सोनेरी चेन बॉर्डर खडे वगैरे पाहिले आहे.
घरामध्ये,ओळखीच्या क्लोजड स्पेस मध्ये हिजाब न वापरण्याची परवानगी असेल.तेव्हा दागिने घालत असतील.

पण बुरखा घालणाऱ्या स्री यांचे प्रमाण जास्त असल्या मुळे genuine प्रश्न वाटतो ...…
>>>
जास्त म्हणजे किती आहे?
वर म्हटल्याप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये एकही मुलगी बुरखा घालून येत नाही.
मुद्दा टक्केवारीचाही नाही. त्या बुरखा न घालता फिरतात म्हणजे बुरखा कंपलसरी नाहीये असे मला वाटते. त्यामुळे प्रश्न जिनिअस वाटत नाहीये Happy

एम एफ हुसैन जसे सरस्वतीचे वादग्रस्त चित्र काढतो .....
नुसते सरस्वत, लक्ष्मी, सीता यांचेच नाही तर ज्या भारत देशात राहिला, जिथे नाव कमावले त्या भारतमातेचेही नग्न चित्र काढले होते त्या *****, *****, ****, **, ** ने

जास्त म्हणजे किती आहे?
वर म्हटल्याप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये एकही मुलगी बुरखा घालून येत नाही.>>>>>>>

जॉब करण्यात मुस्लिम स्री यांचे प्रमाण एक तर नगण्य असते , एखादी असेल तर ती पुढारलेल्या विचारांची असते त्यामुळे बूरख्या चा प्रश्न निकाली !

सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या सण समारंभात हमखास बुरख्याचा वापर होती मग त्या वेळी त्यांनी दागिने घालून कितपत उपयोग !
हा ' मुद्दा ' चर्चेचा होता हो !

मुस्लीम-मुस्लिमेतर विवाह, ज्यात मुस्लिमेतर व्यक्तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते, तो लव्ह जिहाद होय.

लग्न वगैरंसारख्या समारंभात बायकांसाठी वेगळी जागा असते. तिथे बायका खूप दागिने घालून वावरतात. मेक अप, लिप स्टिक परफ्यूम हाय हीलस, उंची साड्या शरारे, अगदी स्टायलिश. बुरखा नसतो.

वर म्हटल्याप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये एकही मुलगी बुरखा घालून येत नाही.>>>>>>> मी US मधेही हिजाब घालून येणारी कलीग बघितली आहे

नवरा मेला की दागिने घालू नयेत अशी श्रद्धा असणार्याना , मुसलमान बायका बुरखा घालतात तर त्यांना दागिने कशाला हवेत , असा प्रश्न पडणे अगदी नैसर्गिक आहे

उttar Pradesh BJP has issued a show cause notice to the controversial party leader Raghuraj Singh who triggered a fresh controversy by demanding a ban on Burqa worn by Muslim women. He has been given seven days time to reply and has been asked why he shouldn't be expelled for indiscipline and flouting party's principle.

बुरख्यावर बंदी घाला बोलणार्या भाजपा नेत्याला भाजपाकडून नोटीस

https://www.indiatoday.in/india/story/up-bjp-leader-seeks-ban-burqa-part...

इथे यूएसमध्ये अगदी लहान मुलींनाही हिजाब इतकंच काय पूर्ण बुरखा घातलेला पाहिला आहे. मुलीचा बाप आणि भाऊ मात्र जीन्स टीशर्ट अशा अमेरिकन पोशाखात असं चित्र दिसतं.
युरोपात काही ठिकाणी निदान लहान मुलींना तरी बुरखा घालायला लावू नका म्हणून युरोपियन लोकांनी कायदे केले त्यालाही तिथे रेफ्युजी म्हणून गेलेल्या मुस्लिम लोकांचा विरोध आहे.
इराण वगैरे मुस्लिम देशात तर मुस्लिम नसलेल्या बायकानाही काळा बुरखा(चादोर) आणि हिजाब सक्तीचा आहे. गाथा इराणी पुस्तकात मीना प्रभूंनी सविस्तर लिहिलं आहे की कसं इराणमध्ये फिरताना त्यांना हा पोशाख जबरदस्ती घालावा लागला. याच इराणमधून तनिष्कचे मालक असलेल्या टाटांचे पूर्वज इस्लामी आक्रमकांपासून जीव आणि पारसी धर्म वाचवण्यासाठी पळून भारतात आले.

याच इराणमधून तनिष्कचे मालक असलेल्या टाटांचे पूर्वज इस्लामी आक्रमकांपासून जीव आणि पारसी धर्म वाचवण्यासाठी पळून भारतात आले.

Proud

फक्त भूतकालच लिहिलाय का त्यांनी पुस्तकात , की पुढचा भविष्यकाळही लिहिलाय ?

ह्याच टाटांच्या पारशी नातीने रत्तनबाई पेटिट हिने एका मुसलमानाशी लग्न केले आणि इस्लाम धर्मही स्वीकारला, तो मुस्लिम मनुष्य म्हणजे बेरिस्टर मोहम्मद अली जिना

त्यानंतर जिनाच्या मुसलमान मुलीने दिना जिना हिने एका पारशी मुलाशी लग्न केले , तो म्हणजे नेव्हिल वाडिया

मुंबई मधील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल , स्त्री रोग व लहान मुलांचे , ते ह्याच परिवाराचे आहे.

त्यामुळे धार्मिक ऐक्य म्हणजे काय हे जगाला शिकवायला टाटा जाहिरात कशाला काढतील ? त्यांच्या स्वतःच्या घरात इतकी अंतर धर्मीय नातीगोती आहेत , टाटा , जिना आणि वाडिया हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
टाटाकडून एक मुलगी जिना परिवारात गेली
आणि जिनाकडून एक मुलगी वाडिया परिवारात गेली.

ह्याच गोतावळ्यात अजून दोन आडनावे नातेवाईक आहेत , भाभा परिवार - थोर अणूशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा . मिस्त्री परिवार - पालोनजी शापूरजी.

https://en.m.wikipedia.org/wiki/Tata_Group

टाटा , पेटिट , वाडिया - भारतीय नागरिकत्व
जिना - पाकिस्तानी नागरिकत्व
दिना जिना - आधी ब्रिटिश मग अमेरिकन नागरिकत्व
शापुरजी - आयरिश नागरिकत्व

आणि ह्या भाजप्याना भारतीय जाहिरातीत हिंदू मुसलमान लगीन खपेना आणि हे विश्वगुरू होणारेत म्हणे !!

Proud
Rofl

"याच इराणमधून तनिष्कचे मालक असलेल्या टाटांचे पूर्वज इस्लामी आक्रमकांपासून जीव आणि पारसी धर्म वाचवण्यासाठी पळून भारतात आले."
धागा विषयाशी काहीच संबंध दिसत नाही.
पारश्यांच्या आगमनाच्या शेकडो हजारो वर्षे आधी काही मानव गट हळू हळू दवीपकल्पात आले नि मिसळून गेले.

ब्लॅककॅट
टाटा जीना वाडिया छान माहिती. धन्यवाद

Pages