तनिष्कची वादग्रस्त जाहिरात

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2020 - 13:41

जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.

https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA

वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.

मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्‍या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.

विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.

पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्‍या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.

बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार बुवा भिडस्त तुम्ही , पण काकदृष्टी ऊत्तम आहे हो.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे. >> असे दणकून लिहायचे हो, आजवर कोणाच्या काकाची की चाचाची भिती वाटली नाही आपल्याला ती आज वाटतेय होय Proud

रूनमेश
स्वतःची बुध्दी शाबीत असती तर हा धागा काढला नसता.
इंग्रज 5 स्टार हॉटेल मध्ये कुत्रा आणि भारतीय ह्यांना प्रवेश नाही असे म्हणत होते .
तेव्हा टाटा नी ताज हॉटेल निर्माण केले.
Covid 19 मध्ये देशातील सर्व उद्योग पती नी कामगार ना कामावरून काढले त्यांची 20 ते 25 वर्षाची देणी पण दिली नाहीत.
टाटा हा एकमेव उद्योग समूह आहे त्यांनी 1 पण कामगार कामावरून काढला नाही.
कॅन्सर वर उपचार करणारे एकमेव रुग्णालय टाटा चालवतात.
त्या उद्योग समूह वर आरोप करणारे नालायक लोक आहेत.
आणि त्या वर धागा काढणार तू पण नालायक आयडी आहेस.

हेमंत हो
सहमत अहे.
टाटांनी अश्या ट्रोलरना भीक घालत ती जाहीरात मागे घेणे हे मलाही आवडले नाही.

कोण होते ते लोक ज्यांना जाहीराती मध्ये लव्ह जिहाद दिसला? इथे माबोवर पण त्या मताचे कोणी आहेत का? कारण माझे मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी यांच्या गृप्समध्ये ही चर्चा झाली, पण तिथे कोणालाच ही जाहिरात पाहून असा काही विचार डोक्यात आला नव्हता. मग वादंग माजल्यावर तो मुद्दा हायलाईट झाला असे म्हणणारे सगळे भेटले. मलाही ती जहिरात क्युट वाटली होती. उगीच सगळीकडे धर्म, जात आणि राजकिय पक्ष आणून गोधळ घालायचा ही वृत्ती वाढत चालली आहे. पार जहिरात काढून टाकायला लागावी एवढा इश्यु करावा असं काही होतं, असे वाटणारे कोणी इथे आहे का?
कंगना रानावतचे ट्विट वाचले. तिच्याबद्दल आदर नव्हताच पण आता ती टोकाची मूर्ख वाटायला लागली आहे. तिच्या हल्लीच्या ट्विट्समुळे तिला टोकाचा अटेन्शन सिकिंगचा आजार झाला आहे असं वाटतं.

@ हायझेनबर्ग,
आपण लिहीली तशी पोस्ट मला अपेक्षितच होती. तरीही लेखाच्या शेवटी ते वाक्य टाकले. याचे कारण आपण म्हणालात तेच. ईथे धागा काढताना मला कोणाच्या काकाची वा चाचाची भिती वाटत नाही. ज्याला जो अर्थ लावायचा त्याने तो खुशाल लावावा. आपण आपल्या हेतूशी प्रामाणिक राहावे.

बाकी ईथे कुठलाही विषय चर्चेला घेताना पातळी सोडली जाणार नाही याची मला खात्री असते. कारण (काही राजकीय धाग्यांवर डुआयडीने धुमाकूळ घालणारे सन्माननीय अपवाद वगळता) मायबोली हा फेसबूक ट्विटर सारखा ट्रोलर कट्टा नाहीये.

तनिष्क एक तात्कालिक निमित्त झाले. पण हा विषय मनात घोळत होताच.
अगदी कालचेच घ्या, अक्षयकुमारच्या लक्ष्मीबॉम्बचा ट्रेलर बघितला. खाली कॉमेंटमध्ये समजले की त्यावर काही लोकं बहिष्कार टाकत आहेत. त्या बहिष्काराचे कारण नाही समजले. मात्र त्यांना एक प्रत्युत्तर असे आलेले की आम्ही आमच्या हिंदू सुपर्रस्टार अक्षयकुमारचा पिक्चर बघणार, तुम्ही त्या खानांची चाटा. बरं ते लक्ष्मीबॉम्बवर बहिष्कार टाका म्हणणारेही होते हिंदूच. कोण कोणाच्या मनात काय भरवते आणि लोकं आपसात भांडायला लागतात समजले नाही. मी दोन्ही बाजूंच्या पोस्टना मनोमन डिसलाईक करून तिथून बाहेर पडलो.

ती एक सर्फची जाहिरातही आली होती. होळीच्या वेळी. त्याच्यावरही गदारोळ झाला होता. हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा दाखवले होते. सगळेजण रंग खेळत असतात तर ती मुलगी सगळ्यांना आपल्यावर रंग, फुगे उडवायला सांगते आणि मग सगळ्यांकडचे रंग संपून जातात तेव्हा आपल्या मुस्लीम मित्राला बाहेर यायला सांगते. त्याने पांढरेशुभ्र कपडे घातले असतात मशीदीत नमाज पढायला जायचं म्हणून. मग ती त्याला आपल्यामागे सायकलवर मशीदीत सोडते अशी थीम होती.

कसला भुरटा चोर आहेस रे
स्वतःला टीआरपी मिळवायला मिळेल तो विषय घेतोस
आयुष्यात कधीतरी लाज वाटते का का तीही नाही
दे आता यावर एक असंबद्ध प्रतिसाद तेवढीच अजून एका प्रतिसादात भर
तुला काय तेच हवंय

तनिष्क प्रकरणाबद्दल अडवाणींचे अभिनंदन,

ह्यांच्या रथयात्रेने मंदिर होईल न होईल , पण सामाजिक शांततेला हे राम म्हणायला लावण्याचा हेतू मात्र साध्य झाला आहे

ऋ, लव जिहाद म्हणजे काय असतं नक्की?
टाटाच्या अ‍ॅड मधे नॉर्मल माणसाला खटकण्यासारखे काहीही नाही.
देशात फक्त ट्रोलिंग हा एकच धंदा असणारे लाखो लोक आहेत. इथेही बरेच आहेत.
कंगना अतिशय मुर्ख बाई आहे हे पुन्हा कळले.

तरी म्हणलं ऋन्मेषने अजून धागा कसा नाही काढला !>>> Happy

मलाही त्यात खटकण्यासारखे काही जाणवले नव्हते. जाहिरात मागे घेऊन एक वादग्रस्त होऊ पाहाणारे प्रकरण मुळातच मिटवण्याचा आणि धुराळ्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर तो स्तुत्य मानावा लागेल. मुळातच चूक होती म्हणून लोकक्षोभापुढे टाटांना नाक घासत माघार घ्यावी लागली असे म्हणणे बालिशपणाचे होईल.
ब्रुकबॉण्डच्या काही जाहिरातीसुद्धा याच धर्तीवर होत्या आणि प्रसन्न वातावरण होते त्यात. नशीब तेव्हा असा धुरळा उठला नाही.
इंडस्ट्रियल रायवलरीसुद्धा असू शकेल कदाचित.

हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.>>मग काय म्हणायचे त्यांच्या विवाहाला?

कुणितरी खालच्या लोकांनी केलेला उद्योग आहे >>> कसला उद्योग? काय चूक आहे त्या जाहिरातीत?

ऋ, लव जिहाद म्हणजे काय असतं नक्की?
>>>
सस्मित हे खरेच माहीत नाही का?
हा जिहादचाच एक प्रकार समजला जातो जिथे थेट बॉम्बस्फोट वगैरे अतिरेकी कारवाया न करता मुस्लिम युवकांना पैसे पुरवून ईतर धर्मीयातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे असे प्रकार केले जातात. अर्थात हे प्रत्यक्षात घडते की नाही याबद्दल मतमतांतरे आहेत. मला पर्सनली वाटते हे होत असावे. जे दहशतवादी मुस्लिम युवकांच्या हातात शस्त्रे देतात ते हे सुद्धा करू शकतीलच. पण हे खरे घडत असले तरी जसे दशतवादासाठी संपुर्ण मुस्लिम समाजाला टारगेट करणे चूक तेच यातही लागू. बाकी उद्या आपली मुलगी कुठल्याही धर्माच्या मुलाच्या प्रेमात पडली तरी ती फसू नये या काळजीपोटी जी सावधगिरी आपण घेतो, जी चौकशी करतो तीच ईथेही केले तरी पुरेसे आहे.

मग काय म्हणायचे त्यांच्या विवाहाला?
लव्ह म्यारेज
>>>
+७८६
माझ्यासाठी तर ते आदर्श जोडपे आहे. बॉलीवूडमध्ये जिथे इतके अफेअर आणि डिव्होर्स होतात तिथे यांनी एक हिंदूमुस्लिम विवाह टिकवलाच नव्हे तर छान सुखात नांदत आहेत. आणि हे शाहरूख सुपर्रस्टार काय साधा हिरोही बनायच्या आधीपासून प्रेम असून हे विशेष.

समीना दलवाई यांनी लिहीलेला हा लेख वाचनात आला.

https://indianexpress.com/article/opinion/columns/tanishq-hindu-muslim-a...

आधी काहीच माहीत नव्हते तेव्हा वाटले होते मुसलमान विरोध करताहेत मुसलमान घरात काफीर लोकांसारखं डोहाळ जेवण दाखवलं म्हणून Wink

तनिष्कने ट्रोलर्सना भीक घालत ती जाहीरात मागे घेणे हे मलाही आवडले नाही.

हिच जाहिरात Vice versa असती, म्हणजे हिंदू मुलाच्या घरी एका मुस्लिम मुलीची गोदभराई जाहिरातीत दाखवली असती तर हिरव्या जिहादींनी देशाच्या सार्वजनिक संपत्तीचे किती नुकसान केले असते ? मुळात असला थिल्लरपणा करुन कसला बोडक्याचा सेक्युलरपणा दाखवायचा प्रयत्न करतात जिहादीप्रेमी हेच कळत नाही.

मस्त आहे ती जाहिरात! मला तर आवडली. यूट्यूबवरची एक कॉमेंट फारच आवडली.
I found the controversial part. The mother-in-law and the daughter-in-law are getting along very well
Wink

मुळात असला थिल्लरपणा करुन कसला बोडक्याचा सेक्युलरपणा दाखवायचा प्रयत्न करतात जिहादीप्रेमी हेच कळत नाही.>> +1000

माझ्या मते कोणताही हिंदू मुस्लिम विवाह लव्ह जिहाद आहे.

खरं कोणत्याही धर्मातल्या सास बहू बद्दल जाहिरात असेल तरी त्यात मोडतोड करण्या सारखं काय आहे?
समाजात जी काही अशी मिक्स रिलीजन मिक्स जाती लग्न होतात त्यातल्या जास्त जास्त सासवांनी आणी सुनांनी प्रेरणा घेतली आणि वेगवेगळ्या प्रथा आणल्या तर हरकत काय आहे?
तनिश्क ने या जाहिरातीवर नीट स्पष्टीकरण देऊन अनेक उदाहरणांतली एक जाहिरात ही आहे, इतर उदाहरणे पहायला स्टे ट्युन्ड म्हणायला हरकत नव्हती. पुढे हिंदू नवरा मुस्लिम नवरी, ख्रिश्चन पारशी, जैन पंजाबी अशी वेगवेगळी कॉम्बी करता आली असती.
(माझा जाहीरातीबद्दल अक्षेप नाही. पण अ‍ॅड एजन्सीजनाही एव्हाना काय वादग्रस्त ठरेल याचे थोडे डोके नको का? यांच्या कल्पकतेसाठी ब्रँड आणि शोरुम ने नुकसान का सोसायचे? ती क्लोरमिंट व्हाईट ची आफ्रिकन वंशीय शुभ्र दात दाखवत झुंबराच्या जागी, आताची ऐश्वर्या आणी तिच्यामागे छत्री धरलेली ब्लॅक रेस ची मुलगी हेही असलेच प्रकार. तुम्ही काय राज्य, काय एरिया, काय समाजात जाहिरात आणताय याचं थोडं तारतम्य नको का?)
शोरुम ची मोडतोड हा निव्वळ बुद्धी गहाण प्रकार आहे. कोणती अ‍ॅड एजस्नी, कोणती जाहिरात याच्याशी शोरुम आणि डिलर्स चा काहीही संबंध नसतो.

शोरुम ची मोडतोड हा निव्वळ बुद्धी गहाण प्रकार आहे.>>
एवढं तारतम्य असतं तर आपण सगळ्यात पुढारलेला देश असतो.

यासाठी वाद होऊ नये म्हणून हिंदु,मुस्लीम,पारशी,जैन,शीख,बौद्ध,ख्रिस्ती यांना पकडून जेवढे परम्युटेशन-कॉम्बिनेशन येतील तेवढ्या ऍड यायला हव्या. एवढे करूनही नंतर अंदमानातील जारवा वगैरे नाराज झाले तर मात्र अवघड आहे.

शोरुम ची मोडतोड हा निव्वळ बुद्धी गहाण प्रकार आहे. कोणती अ‍ॅड एजस्नी, कोणती जाहिरात याच्याशी शोरुम आणि डिलर्स चा काहीही संबंध नसतो.
नवीन Submitted by mi_anu on 16 October, 2020 - 13:53
--

शोरुम ची मोडतोड ही एन.डी.टिव्ही इंडीया या जिहादीप्रेमी चॅनेल नी पसरवलेली एक अफवा आहे. अशी कोणती ही मोडतोड झाली नाही.

https://tfipost.com/2020/10/ndtv-spreads-fake-news-claiming-attack-on-ta...

एका धाग्यावर जी व्यक्ती मायबोली वर नाही तिच्या कुटुंबाबद्दल बोलणे योग्य नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे स्वताच मायबोली वर नसलेल्या व्यक्तीच्या आंतरधर्मीय विवाहाची चर्चा करायची याला काय म्हणायचे??

Pages

नवीन प्रतिसाद लिहा