तनिष्कची वादग्रस्त जाहिरात

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2020 - 13:41

जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.

https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA

वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.

मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्‍या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.

विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.

पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्‍या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.

बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ हिण्दू आणि बहुपत्नीत्व या वरील चर्चेला अनुसरून एक प्रश्न -

पहिल्या बायकोला मूल होत नसेल तर तिचा नवरा तिच्या संमतीने आणि तिला घटस्फोट न देता दुसरे लग्न करू शकतो का?

आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये ओळखीचे एक कुटुंब दोन बायका आणि तीन मुलांसह नांदत होते. सुखाने म्हणणार नाही कारण कुरबुरी चालायच्या.
पहिल्या बायकोला मूल नाही म्हणून दुसरे लग्न केले. दुसरया बायकोला दोन मुले झाली. त्यानंतर पहिल्या बायकोलाही उपासतापास करून मूल झाले.

अजून एक यालाच अनुसरून प्रश्न
या केसमध्ये दोष नवरयात असेल तर बायको दुसरे लग्न करू शकते का?
पहिल्या नवरयाला न सोडता?

आवरा ..
इतकं सगळं अलबेल आणि सेम टू सेम आहे तर why oppose UCC?

अजून एक यालाच अनुसरून प्रश्न
या केसमध्ये दोष नवरयात असेल तर बायको दुसरे लग्न करू शकते का?
पहिल्या नवरयाला न सोडता?

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 18 October, 2020 - 14:12
--
सर्व प्रश्न उत्तरे

हो
नवीन Submitted by BLACKCAT on 18 October, 2020 - 14:14
--

पंक्चरछाप लोकांची रितच निराळी. Lol

पंक्चर नाही

ही तुमची पद्धत आहे

अयोध्यानगरी ते हस्तिनापूर ते झाशी ते शनिवारवाडा : बायकांना मुले न होणे , हा तुमचा जुना प्रॉब्लेम आहे , Proud पंचरवाल्यांचे काय नाय , व्यवस्थित वेळच्या वेळी पोरे होतात

म्हणून आताही हिंदू बाई बोलली की मला मूल व्हायला दुसरा नवरा पायजे , तर कायदा तिला हो म्हणतो
अनाहत की कोणता शिणीमाही आला होता, पण तोही पौराणिक काळातील होता

भारतातील कायदा हा द्वि भार्या प्रतिबंधक कायदा आहे , तो पुरुषांना लागू आहे

द्वि नवरा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात नाही , अगदीच पहिल्या नवऱ्याने कोर्टात केस नेली तर कोर्ट बाईस समज देऊन सोडून देते , ना अटक , ना दंड , पण कायद्यानुसार दुसरे मॅरेज नल एन्ड वोईड होते

नवर्याने फसवले तर मोठी शिक्षा होते

स्त्रीने फसवले तर समज देणे , किरकोळ शिक्षा वगैरे होते

व्हॉट्स ऍप वर छोटासा स्क्रीन शॉट आलेला होता या बातमी बद्दल !
गुगलून बघितले असता हलाला सारख्या जुनाट घाणेरड्या प्रथेचे काळे वास्तव अजुन गर्द झाले . त्या मुळे होणारे हाल त्या महिलाच जाणोत !
वाईट या गोष्टींचे वाटते की २१ व्या शतकात हि मुस्लिम समाज या घोर प्रथेतून महिलांची सुटका करू शकला नाही.
शिवाय सोशल मीडियावर तनिष्का च्या एकात्वाम जाहिरातीला समर्थन देणाऱ्या ढोंगी विचारवंतांनी
हलाला बद्दल काही बोलल्याचे आठवत नाही !!!

https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/hyderabad-woman-complains...

ससुर से हलाला के बाद मां बनी महिला, अब शौहर रखने को तैयार नहीं

उत्तर प्रदेश के बरेली में एक महिला का ससुर के साथ हलाला करवाया गया और फिर पहले पति के साथ निकाह हुआ। इस दौरान महिला गर्भवती हो गई और उसने एक बच्चे को जन्म दिया। अब उसका शौहर महिला व उस बच्चे को रखने को तैयार नहीं है।
https://www.jansatta.com/rajya/uttar-pradesh/woman-become-pregnant-after...

हे बघा! आणि हा जनसत्ता म्हणजे लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस वाल्यांचा म्हणजे पुरोगामी पेपर आहे बरं का.

हैदाराबाद ची बातमी प्रिंट मध्ये पण आहे !
थोडक्यात प्रिंट , लोकसत्ता , जनसत्ता यांची थोडी तरी अक्कल शिल्लक आहे .
पण सतत इतर धर्मियांना अक्कल शिकवणारे बरखा , राजदीप ,शबाना , जावेद आणि त्यांच्या मागे फिरणारी झुंड मात्र असल्या विषयावर मौन बाळगतात !

स्त्रिया हा नेहमीच समाजातील शोषित घटक राहिला आहे. मग धर्म कोणताही असो. प्रथांनुसार कमी जास्त प्रमाणात शोषण होते. पण मानवी आणि पुरुषी वृत्ती तीच. त्यातही प्रांतप्रदेश कुठला आहे यानुसारही हा भेद कमीजास्त आढळतो. जसे महाराष्ट्रापेक्षा उत्तरेकडील राज्यांमध्ये स्त्रियांचे स्थान आणखी दुय्यम आहे. आणि जिथे खाप पंचायची चालतात तिथे तर विचारायलाच नको. क्राईम पेट्रोलमध्ये एकेक खरे किस्से पाहिले आहेत ते मती गुंग करतात की आपण कुठल्या समाजात राहतो आणि हे लोकं कुठल्या असे वाटते. तेच शहरी मुलीला असे सहजी दडपणे शक्य नाही. पण त्यामुळे त्यांची हेरासमेंट चुकली अशी नाही, ती वेगळ्या प्रकारे करायचे प्रयत्न असतात. म्हणून मला वाटते याबाबत एकमेकाच्या जातीधर्मावर बोट दाखवण्यापेक्षा एकत्र लढायला हवे. कारण शेवटी मुली आपल्याही घरात आहेतच.

आणि हो, एकूणच याचा आणि तनिष्कच्या जाहीरातीचा काही थेट संबंध नाही.
अशी वृत्ती असलेल्या एखाद्या स्वधर्मीय घरात मुलगी द्यायची की एखाद्या सुसंस्कृत परधर्मीय घरात द्यायची असे दोन पर्याय समोर आले तर आपण काय करू याचा विचार प्रत्येक धर्मीयाने करावा. शेवटी सुसंस्कृतचाच महत्वाची.

येऊ देत हलाला प्रथेबद्दल इतरही पुरुषांचे प्रतिसाद. बायकांनी आणि ज्यांना मुली आहेत अशा पालकांनी वाचावं आणि विचार करावा!

कट्टरपणामुळे एकच धर्मातील जोडपे सुद्धा वेगळे होऊ शकतात. टॉम क्रूझ आणि केट हे सुद्धा धार्मिक कट्टरतेमुळे वेगळे झाले.

हलाला सारखीच प्रथा - नवर्‍याच्या ४ भावांकडुन मुले होणार्‍या स्त्रिया आपल्या संस्कृतीत(!) अजुनही सापडतात (उत्तर भारतात).

NCW chief sparks row after meeting Maharashtra governor to discuss ‘rise in love jihad cases’
https://scroll.in/latest/976317/ncw-chief-sparks-row-after-meeting-mahar...
यांच्याकडे कोणीतरी थोडे बरे लोकं नाहीत का ? ह्या ताईंचे जुने ट्विट्स आता बाहेर येतायेत
https://twitter.com/sharmarekha
Photo_2020-10-21_09-43-07

वटवृक्ष , तुम्ही लिंक दिलेल्या बातमीत हलालाचा उल्लेख आहे का? त्या बातमीत म्हटलाय तसाच प्रकार राजस्थानातही झाला होता. त्यात २०१४ मध्ये केंद्रात मंत्री झालेल्या निहालचंद मेघवाल यांचंही नाव आलं होतं.

दुसरी ऑगस्ट २०१८ ची बातमी हलाला या भयंकर कुप्रथेबाबत आहे. ती इन्स्टंट ट्रिपल तलाकची कधी कधी होणारी पुढची पायरी आहे. इन्स्टंट ट्रिपल तलाक बेकायदा ठरवला तेव्हाच हलालाही बेकायदा ठरवायला हवे होते.

इथे मुस्लिमांमधील बहुपत्नीत्वाबद्दल अनेकदा लिहिलं गेलंय. हिंदू कोड बिल आणि त्यात द्विभार्याप्रतिबंध होऊनही हिंदूंमध्येही ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली नाही.
उत्तर प्रदेशातल्या एका गावात पुरुषांनी दोन किंवा अधिकही बायका (एकावेळी ) करणं अगदी राजरोसपणे चालत<

या लेखावरून दिसतं की १९७४ पर्यंत तरी हिंदूं मध्ये बहुपत्नीत्वाचं प्रमाण मुस्लिमांपेक्षा जास्त होतं. तसंच २००६ च्या आरोग्य सर्वेक्षणात आढळलं की सगळ्या धर्मात हा प्रकार होतो. संतती विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी दुसरी बायको करणे अजूनही चालते.

बालविवाहाबद्दलची आकडेवारीही वेगळी नाही.
जनगणने च्या आकडेवारीनुसार घटस्फोटित स्त्रियांपेक्षा परित्यक्तांचे प्रमाण दुप्पट आहे. २३ लाख परित्यक्तांपैकी २० लाख हिंदू आहेत.

आणि अ‍ॅब्सोल्युट आकडे बघितले तर यामुळे भोगाव्या लागणार्‍या हिंदू स्त्रिया, मुलीं चे आकडे खूप जास्त आहेत.

अशी वृत्ती असलेल्या एखाद्या स्वधर्मीय घरात मुलगी द्यायची की एखाद्या सुसंस्कृत परधर्मीय घरात द्यायची असे दोन पर्याय समोर आले तर आपण काय करू याचा विचार प्रत्येक धर्मीयाने करावा. शेवटी सुसंस्कृतचाच महत्वाची.
+१००
खरे तर या विषयावर हिंदुंनाही अजून बरीच प्रगती करायाची आहे. ऑनर किलिंगची दोन उदाहरणे तेलंगणात नुकतीच घडली. रेड्डी माणसाने वैस्या जावयाचा खून केला. दुसर्‍या एका वैस्या माणसाने दलित जावयाचा खून केला. पण (काही) उच्चवर्णीयांना आपल्या धर्मात सुधारणा करण्यापेक्षा ट्रिपल तलाक व हलालाचेच जास्त ऑब्सेशन असते. बरं ते मुस्लीम स्त्रीयांविषयीच्या जेन्युइन कन्सर्न मधून आले असते ते तर एकवेळ क्षम्य असते पण तेही नाही. यामागचा अल्टेरिअर मोटिव्ह म्हणजे हिंदु हायरार्की मधले आपले स्थान मजबूत करणे.

मुळात एखाद्या धर्मातील्/जातीतील अशी निवडक उदाहरणे देऊन जनरलाईझ करणे हे किडक्या मनोवृतीचे लक्षण आहे. ओळखीतल्या एका ब्राम्हण मुलीचे अगदी कांदेपोहे टाईप लग्न झाले. लग्न होउन अमेरिकेत अली तेव्हा नवरा गे असून त्याचा आधीच एक लिव्ह इन बॉयफ्रेंड आहे हे कळाले. दारू, मारहाण ई ई. बॅटर्ड वूमन होस्टेल मध्ये रहिली. काही दिवसानी एका अब्राह्मण व एक लहान मुलगी असलेल्या विधूर माणसाशी लग्न झाले आज आनंदात आहे. या घटनेचे जनरलायझेशन करून आपली मुलगी ब्राह्मणाला देऊ नका असा कुणी प्रचार केला तर ते मूर्खपणाचे आहे. चांगली व वाईट माणसे सर्व धर्मात असतात.

पटतंय विजय.
पेपर मध्ये हुंड्यावरुन छळ, लॉक डाऊन मुळे नोकरी गेल्याने बायकोचा छळ या बातम्यांत सध्या सर्व धर्मीय उदाहरणे आहेत Sad
ही वृत्ती आहे.

चांगले विचार मांडुन आपलं अन आपल्यासोबत समाजाचंही भलं कसं होईल यावर चर्चा होण्याऐवजी ''त्या अमुक तमुककडे असं आहे तर ते बरं चालतं मग'' असं म्हणुन चर्चा भरकटवण्यात काही आयडी माहीर आहेत...

हेल्गाताई, हिंदू बहुपत्नीत्व करत असतील तरी त्याला आडकाठी करणारा कायदा आहे. ह्या कायद्यानुसार शिक्षा झाल्याच्या बातम्यासुद्धा येत असतात. पण मुसलमानांनी बहुपत्नीत्व केलं तर त्याला कायद्याची आडकाठी नाही. निदान कायद्याने तरी त्यावर बंदी घाला. मग त्या कायद्याची अंमलबजावणी हळू हळू करता येईल. हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजात सुधारणा करण्याचा प्रबोधन हा एक मार्ग आहे पण त्याला कायद्याचं पाठबळ आणि धाक सर्व धर्मांसाठी आवश्यक आहे. मुद्दा हा आहे. हिंदू समाजात कुप्रथा अस्तित्त्वात आहेत म्हणून मुसलमानांच्या प्रतिगामि कायद्यांत सुधारणा करण्याबद्दल बोलूही नये अशी भूमिका (तुमची कदाचित नसेल) काही लोक घेतात हे बघून वाईट वाटते. मुळात कायदा हा सर्वांसाठी एक असणे हेच न्याय्य आणि पुरोगामी आहे.

लग्नाच्या एकुलत्या एक बायकोलाही सोडुन पळणार्‍यांचा इतिहास-वर्तमान असणार्‍या आजच्या जमान्यात कोण ४ बायका करत असतील तर ते डोळे उघडे ठेऊन शहानिशा करण्याची गरज आहे. साप साप म्हणुन उगाच भुई धोपटण्यात काहीही अर्थ नाही असे मला वाटते.

https://zeenews.india.com/hindi/zeesalaam/news/hyderabad-a-woman-accused...
आरोपी ला जात धर्म नसतो तरी ही
सेंगर प्रकरण मध्ये आरोपी चे नाव घेवून उदोउदो करणाऱ्या मीडिया ने या महिलेच्या केस मध्ये मात्र मुस्लिमांच्या कट्टर ते मुळे आरोपींच्या धर्माचा उल्लेख टाळला . आणि हेच फाजील लाड शाहाबनी केस पासून सतत होत असल्या मुळे त्यांच्या महिलांना नरकात अजुन ढकलले गेले .
तरी पण या बातमी तील खातुन आणि तलाक हे शब्द पुरेसे आहेत .....

शिवाय या केस मध्ये लेफ्ट विंग चे विद्यार्थी नेते अडकल्या मुळे आणि धर्मातील निवडक उद्दाहारणे दाखविल्या मुळे कुजक्या मेंदू वाल्यांना कळवळा येणे साहजिकच आहे .
धाग्याचा विषय नसताना अयोध्या , हस्तीनापुर वरील कॉमेंट्स करणाऱ्या चे हेच सडके मेंदू
मात्र सोईस्कर दुर्लक्ष किंवा कौतुक करतात !!!!!
उत्तर प्रदेश मधीलच दोन बातम्या वर आहेत , त्यातील एक बातमी हिंदू व्यक्तीच्या दोन दोन बायका बद्दल तर दुसरी बातमी मुस्लिम महीलेच सासऱ्या बरोबर हलाल बद्दल आहे .
हिंदू धर्मात जुन्या काळात काही जण दोन बायका करायचे , गेल्या चाळीस वर्षात आय पी सी मुळे ते अशक्य आहे. पण मुस्लिम धर्मातील शरीयत मुळे गेल्या वर्षापर्यंत तीन तलाक आणि हालाला पद्धत मुळे हजारो महिलांचे विटंबना होवून देशोधडीला लागत होत्या त्याचे काय ?

थोडक्यात हिंदू धर्मावरून अक्कल चे तारे तोडणाऱ्यानी अगोदर स्वतःची हातभर फाटलेली कपडे बघावी त आणि मग इतर धर्मातील ठिगळे उसवावी !

ज्या धर्मातील लोकांना आपल्याच धर्मातील वाईट चालीरिती लपवुन ठेवून इतर धर्मातील चालीरीतींंबद्दल तावातावाने बोलणे एकवेळ जाउद्या पण आपल्याच धर्मातील लोकांशी साधे सौजन्याने वागता-बोलताही येत नाही त्यांनी इतर धर्मातल्या चांगल्या वाईटावर बोलणे किती हस्यास्पद वाटते नै...!!

ज्या धर्मातील लोकांना आपल्याच धर्मातील वाईट चालीरिती लपवुन ठेवून इतर धर्मातील चालीरीतींंबद्दल तावातावाने बोलणे एकवेळ जाउद्या पण आपल्याच धर्मातील लोकांशी साधे सौजन्याने वागता-बोलताही येत नाही त्यांनी इतर धर्मातल्या चांगल्या वाईटावर बोलणे किती हस्यास्पद वाटते नै...!!>>>>>> डिजे, पॅरीस मध्ये काय झाले हे माहीत असेलच तुम्हाला. नसेल त॑र काळु माऊला विचारा, त्यांच्या धर्मात याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे म्हणतात.

Proud

पेरिस मध्ये त्या खुनी माणसाला पोलिसांनी लगेच ठार केले

आपल्याकडे चार्वाक तुकाराम ते लंकेश दाभोलकर इ चे खुनी अजून सापडले नाहीत , मोदींनी त्यांना शोधून ठार करावे

असे मी लिहिले होते

खुनाला मी खुनच म्हटले, वध नाही म्हटला की त्याच्यावर नाटक नाही लिहिले

फ्रांस मधल्या पॅरिसच्या कुठल्याशा धर्मातील व्यक्तीने काय केले याबद्दल भारतातल्या मराठी माणसांनी मराठी माणसाला सुनावणे चांगले वाटत नाही... आपल्या घरातील, भावकीतील, गावातील................पोटजातीतील,जातीतील,धर्मातील प्रॉब्लेम्स प्रायॉरिटीने रिझॉल्व्ह करायला हवेत तेव्हा कुठे आपण इतरांच्या धर्मात काय चालु आहे त्यावर बोलु शकु असे मला वाटते..

हेल्गाताई, हिंदू बहुपत्नीत्व करत असतील तरी त्याला आडकाठी करणारा कायदा आहे. ह्या कायद्यानुसार शिक्षा झाल्याच्या बातम्यासुद्धा येत असतात. पण मुसलमानांनी बहुपत्नीत्व केलं तर त्याला कायद्याची आडकाठी नाही. निदान कायद्याने तरी त्यावर बंदी घाला. मग त्या कायद्याची अंमलबजावणी हळू हळू करता येईल. हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजात सुधारणा करण्याचा प्रबोधन हा एक मार्ग आहे पण त्याला कायद्याचं पाठबळ आणि धाक सर्व धर्मांसाठी आवश्यक आहे. मुद्दा हा आहे. हिंदू समाजात कुप्रथा अस्तित्त्वात आहेत म्हणून मुसलमानांच्या प्रतिगामि कायद्यांत सुधारणा करण्याबद्दल बोलूही नये अशी भूमिका (तुमची कदाचित नसेल) काही लोक घेतात हे बघून वाईट वाटते. मुळात कायदा हा सर्वांसाठी एक असणे हेच न्याय्य आणि पुरोगामी आहे.///

परफेक्ट! इतकी बेसिक गोष्ट ज्यांना कळत नसेल त्या समाजाचं काही नाही होऊ शकत.

पुरोगामी लोकांनी ट्रिपल तलाकला कडाडून विरोध केला. समान नागरी कायदा येईल तेव्हा तर चवताळून विरोध करतील पुरोगामी.
आणि 2024 किंवा 29 ला भाजपला सिम्पल मेजोरीटी इतक्या सीट नाही मिळू शकल्या व पुरोगामी सरकार बनलं तर ट्रिपल तलाक रद्द होऊ शकेल- नव्हे- होईलच व युनिफॉर्म सिव्हिल कोड तर विसराच.

Pages