तनिष्कची वादग्रस्त जाहिरात

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2020 - 13:41

जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.

https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA

वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.

मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्‍या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.

विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.

पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्‍या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.

बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हा मंडळींना कायद्याच्या पुस्तकी चर्चेत रस आहे की स्त्रियांच्या प्रत्यक्ष स्थितीबद्दल कळवळा आहे? की आणखी काही?

आकडेवारी दाखवते आहे की कायदे असूनही बहुपत्नी त्व, बालविवाह यांतून हिंदू स्त्रियांची सुटका झालेली नाही. परित्यक्तांची संख्या ट्रिपल तलाक पीडित महिल्यांच्या संख्येच्या कित्येक शे पट आहे. त्याबद्दल काय कायदा आहे?

आता तुम्ही कायद्याचा मुद्दा काढलाच आहे तर सांगा. धर्मेंद्रने दुसरे लग्न करण्यासाठी हिंदू विवाह कायद्याला डोळा घालत मुस्लिम धर्म स्वीकारून दुसरे लग्न केले. त्याच्या पत्नी ला याबद्दल काय करता आले? नवर्‍याने धर्म सोडला या कारणासाठी तिने घटस्फोट घेतला का? नवर्‍याला दुसरे लग्न केले म्हणून पोलिसात दिले नाहीच. उद्या जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे मृत्यू होतील तेव्हा त्यांचे अंत्यविधी कोणत्या धर्मानुसार होणार? इस्लाम? हे दोघे प्रॅक्टिसिंग मुस्लिम्स नावालातरी आहेत का? आणि गंमत म्हणजे ज्या पक्षाने मुस्लिम स्त्रियांना ट्रिपल तलाकच्या छळातून सोडवले म्हणता त्याच पक्षाचे हे दोघे खासदार. संसद सदस्याला एक शब्द लॉमेकर असा आहे. कुठे आहे कायदा?

वटवृक्ष, मुंबई मि ररमधल्या हैद्राबादच्या बातमीचा इथे काय संबंध ते सांगाल का? मला ती बातमी वाचुन काही कळले नाही.

दुसरी बातमी - हलालाचा आधार घेऊन सुनेवर सासर्‍याने बलात्कार केल्याची. ही प्रथाही कायद्याने रद्द व्हावी असे मी आधीच लिहिले आहे. ट्रिपल तलाक रद्द झाल्यामुळे ती तशीही संदर्भहीन झाली आहेच.
पण कुटुंबा अंतर्गत बलात्काराचा जो मुद्दा आलाय तो फक्त मुस्लिमांत आहे का? मनोज शौकीन हे कोण आणि त्यांनी काय केलं ते माहीत करून घ्या.

आकडेवारी दाखवते आहे की कायदे असूनही बहुपत्नी त्व, बालविवाह यांतून हिंदू स्त्रियांची सुटका झालेली नाही.///

बलात्कारविरोधी कायदा असूनही बलात्कार थांबलेले नाहीत. तर मग यावर ते कायदे रद्द करणं , बलात्कार लीगल करणं हे सोल्यूशन असू शकतं का? तुमचं लॉजिक तर तेच सांगतंय.
आम्ही म्हणतोय की सर्वाना समान नागरी कायदा लावा. स्त्रियांना न्याय्य हक्क द्या रिगार्डलेस ऑफ रिलीजन.

वटवृक्ष, मुंबई मि ररमधल्या हैद्राबादच्या बातमीचा इथे काय संबंध ते सांगाल का? मला ती बातमी वाचुन काही कळले नाही. >>>>>>>>

ती बातमी समजून घ्यायलाच हवी , अशी अपेक्षा हि नाही !
आणि " तीन तलाक छळातून सोडवले म्हणता "
म्हणजे तीन तलाक कायदा पास झाल्याचा तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही .
नको होवू द्या , होरपळ लेल्या कित्तेक बायकांनी त्या कायद्यासाठी भाजप चे आभार मानले आहे !

कृपया विपर्यास करू नका.

हे मुद्दे तनिष्कच्या जाहिरातीच्या धाग्यावर तुम्ही लोकांनी आणलेत कारण प्रेम विवाह म्हणजे लव्ह जिहाद. हिंदू मुलींना फसवून त्यांचा छळ केला जातो असा तुमचा दावा आहे. बहुपत्नीत्व, बालविवाह, बलात्कार ही त्याची रूपं. यासाठी तुमच्याकडे आकडेवारी नाही. काही घटना, काही बातम्या आहेत. या कारणासाठी तुमचा आंतर्धमीय विवाहाला विरोध आहे. सुरुवातीच्या काही प्रतिसादांतून जाणवतं की हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्या विवाहाला तुमचा विरोध नाही. (तुम्ही - अनेकवचन - समविचारी लोक. इथे मुस्लिम द्वेष हे समान सूत्र)
हिंदू मुलींची लग्न त्यांच्याच धर्मात जातीत झाली तरी या छळापासून त्यांची सुटका होत नाही हे आकडेवारी सांगते ; , बातम्या आणि घटनाही सांगतात. हा तुमच्या मुद्द्याला छेद देणारा मुद्दा.
दुसरा मुद्दा - इन्स्टंट ट्रिपल तलाक, हलाला यांमुळे पीडित झालेल्या मुस्लिम स्त्रियांची संख्या खुप कमी आहे. ( म्हणून त्या छळाकडे दुर्लक्ष व्हावे असे मी म्हणत नाही. दोन्ही गोष्टी अवैध ठरायलाच हव्यात).
To put things in perspective बालविवाह, बहुपत्नीत्व यांनी पीडित हिंदू स्त्रियांची संख्या प्रचंड आहे.

हिंदू तरुणीचा मुस्लिम तरुणाशी विवाह झाला की तो आणखी तीन बायका करणार, हिला इन्स्टंट ट्रिपल तलाक देणार आणि हलाला करायला लावणार असे चित्र तुम्ही रंगवताय ते अति अतिरंजित आहे. त्याचवेळी हिंदु धर्मातच लग्न झालेल्या मुलींच्या भयाण वास्तवाकडे तुम्ही दुर्लक्ष करणार.

>पुरोगामी लोकांनी ट्रिपल तलाकला कडाडून विरोध केला.
न कंटाळता खोटे बोलत रहाण्याचा कसबाचे कौतुक करावे कि निषेध ?
ट्रिपल तलाक कायद्याला विरोध हा त्याच्या क्रिमिनलायझेशन ला होता.

पण कुटुंबा अंतर्गत बलात्काराचा जो मुद्दा आलाय तो फक्त मुस्लिमांत आहे का? मनोज शौकीन हे कोण आणि त्यांनी काय केलं ते माहीत करून घ्या >>>>>
प्रतिसाद पूर्णपणे गंडला आहे !
कुटुंबां अंतर्गत अत्याचार साठी त्या मनोज ला खडी फोडायला पाठवायला आय पी सी भक्कम आहे हो !
पण हालाला द्वारे अत्याचार करण्यास परवानगी देणाऱ्या शरीयत चे काय ?
त्या युपी मधील सासरे बुवा ना शरीयत कोणती शिक्षा देवू शकते ?

NCW chief sparks row after meeting Maharashtra governor to discuss ‘rise in love jihad cases’
https://scroll.in/latest/976317/ncw-chief-sparks-row-after-meeting-mahar...
यांच्याकडे कोणीतरी थोडे बरे लोकं नाहीत का ? ह्या ताईंचे जुने ट्विट्स आता बाहेर येतायेत
https://twitter.com/sharmarekha

बरे लोक ? हे तर क्वालिफिकेशन आहे तिथे ! आणी या ताई मुंबईत येऊन राज्यपालांना भेटल्या व महाराष्ट्रत नसलेल्या लव्ह जिहाद बद्दल काळाजी व्यक्त केली.

<प्रतिसाद पूर्णपणे गंडला आहे>

त्याच प्रतिसादातलं हालाला प्रथा कायद्याने रद्द व्हावी हे मी लिहिलेलं वाक्य वाचण्याचं तुमचं कौशल्य अफाट आहे. हैद्राबादच्या बातमीत हलाला घुसवलंत तेव्हाच ते लक्षात यायला हवं होतं.

त्यां रेखा शर्मांनी काल रात्रभर बसून बर्‍याच ट्वीट्स डिलीट केल्या. पण लोकांनी त्या आधीच त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले होते आणि ट्विटर आर्काइव्ह्जवर सेव्हही केल्या होत्या.
अशी स्त्री राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्षा असणं यासारखा भारतीय स्त्रियांचा अपमान आणि त्यांच्यावरचा अन्याय नाही. त्याबद्दल काही लोक अगदी मूग गिळून बसतील.

Happy
Happy
हा ! हा !!!
प्रतिसाद छान एडीट केलेत /\

हेलगाताई, "तुम्ही लोक ..." म्हणून तुमच्या पोस्टमध्ये बरेच दावे केले आहेत ("आंतर्धमीय विवाहाला विरोध आहे" वगैरे). माझं त्यांच्याशी काही घेणं देणं नाही.
कायद्यातील सुधारणा आणि समाजातील सुधारणा ह्या mutually exclusive आहेत असं तुम्हाला वाटतं का? समाजात दुरवस्था आहे म्हणून कायदे सुधारू नयेत का? हलाला प्रथा कायद्याने रद्द व्हावी असं तुम्ही लिहिलं आहेच. तेच पुढे नेऊन सर्वच बाबतीत आजच्या काळाशी सुसंगत असा, सर्व धर्मांसाठी सारखा कायदा असावा असं तुम्हाला वाटत नाही का? असा कायदा असेल तर हिंदू किंवा मुसलमान लोकांची स्थिती त्यामुळे अधिक वाईट होईल? की सुधारण्याला थोडी का होईना मदत होईल?
सर्वांना सारखा कायदा असेल तर आंतरधर्मीय विवाहांसाठी "वेगळा कायदा" हा विचारात घेण्याचा मुद्दा राहणार नाही, एक अडसर कमीच होईल.

रेखा शर्मा ह्या अतिशय उथळ बाई आहेत. त्या पदासाठी लागणाऱ्या परिपक्वतेचा त्यांच्यात अभाव आहे. ह्यापेक्षा जरा बरी व्यक्ती मिळाली नाही का ह्यांना?

हलाला बद्दल पोटशुळ येऊन विरोध करणार्‍यांना आपल्या धर्माच्या चालीरितींत लिहिलेले नसतानाही पोटच्या मुलींवर बलात्कार करणात्यांबद्दल काय वाटते?

आपल्याच धर्मात विधवा मुलींच्या अनौरस मुलांसाठी कुणी बालसंगोपन केंद्र सुरु केले याची माहिती नाही असे दिसते. आपल्या धर्मातील घाण आधी सुधारायला हवी असे यानिमित्ताने वाटते.

या जाहिराती विरुद्ध लव जिहाद, खोटा एकोप्याचा संदेश, रोल रिवर्स करून बघा मग समजेल कसे दंगे होतात ते असे अनेक मुद्दे मांडले आहेत.
हे सगळं बरोबर आहे पण आता पुढे बघावं. हेच करत राहिलं तर पुढची 10000 वर्ष शांतता नांदणार नाही. अगोदर त्यांच्या आणि आपल्या बाप दाद्यांनी एकमेकाला कापलं. आज आपण तेच करतो आहोत. उद्या आपली आणि त्यांची मुलं पण हेच करणार आणि परवा आपल्या मुलांची मुलं पण तेच करणार. का? तर सदियों से यही चला आ रहा है. आज मागचं विसरून शांततेकडे पहिलं पाऊल टाकलं तर कदाचित पुढच्या 100-200 वर्षात शांतता नांदेल. हो, अगदी आपण 100% बरोबर आणि ते 100% चूक असतील तरीही. हा पॅटर्न कुठेतरी तुटला पाहिजे.

लव जिहाद असेलही किंबहुना तो आहेच. पूर्वी तो पसरवणं सहज शक्य होतं. आता या इंटरनेट आणि 24x7 इन्फॉर्मेशनच्या युगात ते तितकसं सहज राहिलेलं नाहीय. अर्थात नवनवीन प्रकार होतच राहतील पण आता कमीत कमी इतिहासाकडे बघून निर्णय घेणं थांबवून पाहिलं पाहिजे. लव जिहाद च्या नवीन केसेस केस टू केस हॅण्डल करायला हव्यात. ट्रिपल तलाक, 370 हटवून सरकारने दाखवून दिलंय की गरज पडली तर बूच मारायला कमी केलं जाणार नाही. ट्रीपल तलाक हटवल्यामुळे त्यांच्यातल्या चांगल्या लोकांचा एका छोटा % का होईना सरकारच्या बाजूने उभा राहिला असेल. अर्थात हे माझे speculations आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या ad चे क्रिएटिव्ह डायरेक्टर मुसलमान आहे. कदाचित तो या चांगल्या % मधला असेल आणि खोटा एकोप्याचा संदेश न देता त्याला खराखुरा एकॉप्याचा संदेश अपेक्षित असेल. % कमी आहे पण शून्य नाहीय. किंवा त्याला controversy करून ब्रँड ची जाहिरात करायची असेल (जे साध्य झालेलं दिसतंय). Long story short, मागचं उगाळत न बसता यापुढे होणारे अन्याय, क्रिमिनल केसेस केस टू केस बेसिस वर हाताळण्यात याव्या. या इन्फॉर्मेशन ओव्हरलोड च्या जमान्यात होणारे अन्याय दाबून ठेवणं पूर्वीप्रमाणे सोपं नाही. कोणी खोटा जरी एकोपा दाखवत असेल तरी त्याला बढावा देण्यात यावा. कोण ओपनली तोडायची भाषा करत असेल तर त्याला तिथल्या तिथे तोडाव. पण कोणी एकोप्याचं बोलत असेल तर त्यात उगाच मागचा इतिहास आठवून खुस्पट काढू नये. या ad मध्ये एकोप्याचा संदेशच दिलाय ना. मग मागचं गुऱ्हाळ न उगाळता आपण चांगल्यावरच फोकस करूया ना. असं केलं तर कदाचीत आपल्या मुलांची मुलं शांततेत नांदतील.

अर्थव्यवस्था कोविड वगैरे काही महत्वाचा नसते. तनिष्क ची जाहिरात बंद नाही झाली तर बांगलादेश आपल्या पुढे जाईन ना!

अगोदर त्यांच्या आणि आपल्या बाप दाद्यांनी एकमेकाला कापलं. आज आपण तेच करतो आहोत. उद्या आपली आणि त्यांची मुलं पण हेच करणार आणि परवा आपल्या मुलांची मुलं पण तेच करणार. का? तर सदियों से यही चला आ रहा है. आज मागचं विसरून शांततेकडे पहिलं पाऊल टाकलं तर कदाचित पुढच्या 100-200 वर्षात शांतता नांदेल. हो, अगदी आपण 100% बरोबर आणि ते 100% चूक असतील तरीही. हा पॅटर्न कुठेतरी तुटला पाहिजे.>> +++++११११११११११११११११

तनिष्क ची जाहिरात बंद नाही झाली तर बांगलादेश आपल्या पुढे जाईन ना!>> तो तर अल्रेडी गेला... Uhoh

प्रवीण,
तुमचे विचार प्रामाणिक आणि उदात्त आहेत. पण-
Islam is a religion that is in crisis all over the world today, we are not just seeing this in our country.
हे इंग्रजीतील वाक्य माझं नाही तर फ्रान्सच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचं आहे. म्हणजे हा केवळ भारत-पाकिस्तान असा प्रॉब्लेम नाही. जगात सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे(असं Macron म्हणतायत!).

अजबराव, या वरच्या प्रतिसादानंतर तरी ट्रिपल तलाक, इत्यादीबद्दल इथे लिहिणार्‍यांचा हेतू मुस्लिम किंवा मुस्लिमांशी लग्न करणार्‍या स्त्रियांबद्दल कळवळा हे नाही, हे तुमच्या लक्षात यावे.

हिंदू धर्म बहुसंख्य असून देखील सतत मोठ्या भाऊ ची भूमिका निभावत आहेत म्हणून तर किरकोळ अपवाद वगळता शांतता नांदत आहे !

शिवाय त्या जाहिरातीतील ad मॅनेजर चे कौतुक करणाऱ्यांना एकाच समुदायाला शहाजोगपणा चा सल्ला देण्याचा मोह अवरलेला दिसत नाही !
मुळात तो मॅनेजर मुस्लिम होता , त्याचे विचार खूपच समाजसुधारक होते , तर त्याने हिंदू कुटुंब मुस्लिम मुलीची हौस पूर्ण करताना दाखवायला हवे होते ! त्यातून हि सर्वात छान संदेश गेला असता की नाही ?
उलट जाहिराती मुळे जगातील इसीस , सिमी , तालिबान च्या कट्टर धार्मिक दहशतवाद्यांच्या मनात इतर धर्मा बद्दल आदर वाढीस लावून त्यांचे डोळे उघडले गेले असते आणि ad मॅनेजर ला शांतते चे नोबेल हि मिळाले असते !
मग या परिस्थितीत सोशल मीडिया वरील समाजसुधारकांनी टाळ्या वाजवून त्याच्या कल्पनेला दाद दिली असती का ?

पण का बरे त्याने ते टाळले असावे ? त्याचा समाज सहिष्णु नाही का ? का धर्मगुरूं चा दबाव असतो ?
का बॉलीवुड , स्वयंघोषित समाजसुधारक , ad इंडस्ट्री या सगळ्यांना फक्त हिंदू धर्मातील च उणीवा दिसतात ?

अगदी दुसर्‍या पोटजातीतीलही न खपणार्‍यांनी इतर धर्मातील सून आणण्याची स्वप्नं बघणं खरेतर हस्यास्पद आहे... म्हणुनच कदाचित रिअलिस्टिक सिनॅरिओ वापरुन जाहिरात करावीशी वाटली असु शकते.

हिंदू कुटुंब मुस्लिम मुलीची हौस पूर्ण करताना दाखवायला हवे होते !

बाजीराव मस्तानीत दाखवले की

राहुल गांधीची मुंज कधी करणार ?

आता कोण थेटरात जाऊन पोझिटीव होईल... बॉलीवुडला कदाचीत न भुतो ना भविष्यती मंदी येण्याची चिन्हे आहेत.

युव्ही रेज डिसिन्फेक्शन उपयोगी पडतेय, थिएटर चालू केली तर योग्य काळजी घेऊनच करतील.
(बाकी त्या के आर के च्या विधानाबद्दल नो कमेंट. तो काहीही बोलतो. मागे एकदा इरफान गेल्यावर आता पुढचा नंबर कोणाचा वगैरे म्हणाला होता. तो सतत पाण्यात दगड मारावे तशी विधाने करुन चर्चेत राहत असतो.)

या महामारी च्या काळात वांदे होणार बॉलीवुड मधील सपोर्ट स्टाफ चे .
पण कुत्र्या सारखे हाल झाले पाहिजेत बॉलीवुड मधील मोठ्या माशांचे !!!!
प्रोडक्शन हाऊसेस ना वाटतंय जाणूनबुजून हिंदूंना डीवचून सुद्धा सिनेमे पाहायला गर्दी होईल , तर ते भ्रमात आहेत !
यांची विकृती काही केल्या थांबायचे नाव घेत नाही .

आज Eros now ने नवरात्री निम्मित काही अश्लील अर्थ असलेले ट्विटर वर फोटो अपलोड केले आहेत .
काही दिवसांपूर्वी च इद होवून गेली त्या वेळी eros ने द्वयर्थी फोटो का नाही टाकले ?
हिंदू सणाला उद्देशून अश्लील ट्विट केले गेले , तरी
ट्विटर वर काही भांड " त्यात काय अश्लील आहे ? हिंदूंनी एकोपा ठेवला पाहिजे , हिंदूंनी सहिष्णुता दाखवली पाहिजे " असे बराळणे चालू करतील !!!!

कंगना रनौत ने ओटीटी प्लैटफॉर्म की तुलना पॉर्न वेबसाइट से की, नवरात्रि पर किया था आपत्तिजनक ट्वीट
http://nbt.in/hynILa?bga

Pages