तनिष्कची वादग्रस्त जाहिरात

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2020 - 13:41

जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.

https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA

वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.

मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्‍या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.

विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.

पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्‍या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.

बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरीका वा पाश्चात्य देशातील मुस्लिम जास्त कट्टर असतील. भारतातील तुलनेत तितके धार्मिक प्रथांबाबत कट्टर नसावेत म्हणून आमच्या ऑफिसमधील ज्या सात-आठ मुस्लिम मुली असतील त्या बुरखा वा हिजाब काय म्हणतात ते घालून येत नाहीत. पण दिवाळी नवरात्रीला ट्रेडिशनल डे च्या दिवशी मात्र नटलेल्या थटलेल्या दिसतात.

मुसलमानांच्या लग्नात बायका बुरख्यात राहतात का बघायला हवे. कारण याबाबतही माझा अनुभव वेगळा आहे. मी तर मस्त चमचमणारे कपडे घातलेल्याच बायका बघितल्या आहेत.

फार लांब कश्याला जा. माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला आमची तेव्हाची मुसलमान कामवाली बाई आपल्या मुलीसह ईतके झगमग कपडे घालून आली होती की आम्ही सोडून आमच्या एकाही गेस्टचे ईतके भारी कपडे नव्हते Happy

बहुधा त्यांच्या ठराविक सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपारीक पोशाख म्हणून ते रंगीत बुरखे वगैरे घालत असावेत. अजून कोणी जाणकार असतील तर माहितीत भर घालावी

जीना नी मित्राच्या मुलीशी लग्न केलं , जीनांचा स्वतःच्या मुलीच्या लग्नाला अत्यंत विरोध होता. असं सगळं सांगा.

आता बीजेपी च्या माणसाला नोटीस दिली ते सांगताय , तसं जरा आत्ता पॅरिस मध्ये काय झालं ते सांगा बरं.
माहित नसेल तर तुमचं आवडत बीबीसी बघा.

हो , जिनाचा विरोध होता, दिना जिना आणि नेव्हिल वाडिया हे लव्ह मॅरेज होते

पण नंतर ते वेगळे राहू लागले होते
जिनाची मुलगी लग्नानंतर बहुतेक कधीही पाकिस्तानात गेली नसावी,
अखेर तिने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते , ती तिकडेच मेली

तनिष्का वरून ज्ञानाचे डोस देणारी निधर्मी गैंग पॅरिस घटने नंतर ट्विटर वरून गायब झाली आहे !
आणि जे काही उरले आहेत त्यांना आरसा दाखवलेला न आवडल्या मुळे शिवीगाळ करत सुटले आहेत !

New Delhi: A marriage of a Hindu woman with a Muslim man is not "regular or valid" but the child born out of such wedlock is legitimate, the Supreme Court on Tuesday held. It also said that the legal effect of such an irregular marriage is that a wife is entitled to get dower but cannot inherit the husband's property.
>>>>>>>>>>>>
कायद्यातील या त्रुटी चा अभ्यास न करता जाहिरात प्रसारित केली हि तनिषकाची घोडचूक च आहे !

मुस्लिम बरोबर लग्नाला समर्थन देऊन हिंदू महिलांचे आयुष्य असुरक्षित करण्यास तनिष्का ने हातभार च लावलाय म्हणायचं !

Paris(CNN)A man decapitated a schoolteacher in a suburb of Paris on Friday afternoon and was later shot dead by police, France's anti-terror prosecutor told CNN.

The victim's body was found in Éragny-sur-Oise, northwest of the French capital, according to the French National Anti-Terror Prosecutor's office. The prosecutor's office confirmed that the attacker was killed by police in the same area.

The victim was a teacher at a secondary school in the region of Conflans-Sainte-Honorine, according to the prosecutor's office. The teacher recently showed controversial caricatures depicting the Prophet Mohammed to his students, according to multiple French media outlets, including CNN affiliate BFMTV.

पेरिस मध्ये धार्मिक कारणाने खून करणार्याला पोलिसांनी लगेच शोधून ठार करून टाकले.

हितं चार्वाक , तुकारामापासून गौरी लंकेश पर्यंत अनेकांचे खुनी अजून सापडले नाहीत , मोदीजी व शहाजी पेरिसच्या लेव्हलला आपली सुरक्षा व्यवस्था नेतील व खुन्याना ठार करतील , हीच अपेक्षा बाळगूया

परदेशी स्थायिक झालेल्या कोणालाही, खासकरून भारतीयांना मायभूमी ची तिथली माती, तिथला गंध, संस्कृती,(मुख्यकरून सणवार) ह्याची प्रचंड ओढ असते आणि सतत आठवण येत असते. त्या ओढीने तो आठवणीतली जुनी मायभूमी म्हणजे ते वातावरण जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. शिवाय आयडेंटीटी क्रायसिसमुळेही नव्या आयडेंटीटीला सरावेपर्यंत जुन्या आयडेंटिटीला घट्ट चिकटून राहातो. इकडे मायभूमी सतत बदलत असते. पण ही माणसे मायभूमीची जुन्याच स्वरूपात आठवण ठेवतात आणि कालप्रवाहात एक बेट बनून राहतात. संस्कृतीबाबत जुन्या विचारांचे, बनतात. परक्या देशात आपली संस्कृती आपल्यालाच राखली आणि वाचवली पाहिजे अश्या दृढ कल्पनेने जुन्याच आचारविचा रांना कवटाळून बसतात. पट्टीचे कर्मठ होतात.
अर्थात आता त्वरित आणि वारंवार संपर्क साधता येतो त्यामुळे ही मानसिकता बदलली आहे.

legal effect of such an irregular marriage is that a wife is entitled to get dower but cannot inherit the husband's property. >>
मोठी त्रुटी आहे ही कायद्यातील.

१००

सध्याच्या न्यायाने येत्या ४/५ दिवसात सोनी टीव्ही चॅनेलनेही आपली लाल करुन घ्यायची तयारी करुन ठेवायला हवी अस दिसतय.
माझा अंदाज.
सोमवारी एक खेळाडु जी हॉटसीट वर येणार आहे ती मदरस्यातील विद्यार्थ्यांना मोफत* शिक्षण देतेय. आम्हाला सरकारी मदतीची गरज नाही वगैरे म्हणताना दिसली. हे नेमकं ओरीसा सरकारने नवा कायदा बनवायच्या वेळेसच कसं काय उपटलं असाही अन्वयार्थ निघु शकेल.

लग्न वगैरंसारख्या समारंभात बायकांसाठी वेगळी जागा असते. तिथे बायका खूप दागिने घालून वावरतात. मेक अप, लिप स्टिक परफ्यूम हाय हीलस, उंची साड्या शरारे, अगदी स्टायलिश. बुरखा नसतो.
नवीन Submitted by हीरा on 16 October, 2020 - 22:53

एक तर स्वतःला त्या खास वेगळ्या जागेत प्रवेश असावा अथवा टीवी सिरीज पाहून लिहिलं असावं.

बुरख्याच्या आत दागिने घातले तर काय होते ? तुम्ही अंडरपेंट घालता ना आत , तसे

मी दागिने विकत घेणार आणि घालणार , वरून बुरखाही घालणार , तुला नाही दाखवणार

कुणी असेल दाखवत तर तिच्याकडे बसा बघत जिभल्या चाटत

मी नै दाखवणार

न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती ???

हिंदू, मुस्लिम, पारसी, क्रिस्ट्यन अनेकांच्या लग्नादि समारंभांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. मुस्लिमांच्या लग्नात पुरुषांच्या शेजारीच जाळीदार पडदे किंवा पार्टिशन लावलेल्या जागेत महिला बसतात. त्या अदृश्य नसतात उलट बऱ्यापैकी दृश्यमान असतात.

एक तर स्वतःला त्या खास वेगळ्या जागेत प्रवेश असावा>>नाही बिपीन जी,बरेच ठिकाणी मित्र परिवार यांनाही आमंत्रण असते,माझ्या माहेरी सुद्धा घराशेजारी 3 4 घरे आहेत मुस्लिमधर्मीयांची, कॉलेज मध्ये सुद्धा खूप मैत्रिणी होत्या ,लग्न ,बारसे,ओटीभरण आमंत्रणे असतात,
मी नाही पण आई जाते,आपल्याच जवळपास असणाऱ्या पद्धती असतात त्यांच्याही, फक्त नावे आणि करण्याची पद्धत थोडी वेगळी
अगदी सवाष्ण बाई वारली की आपल्यासारखी तिचे प्रेत सजवण्याचीही पद्धत आहे, फक्त हळदी कुंकू ऐवजी खूप फुले आणि अत्तर वापरतात बाकी साडी ,बांगडी ,गजरे वगैरे सेम
बहुतेक हिंदूमध्ये हळदी कुंकू चे पाणी शिंपत जातात 5 7 पावले त्यांच्यात अत्तराचे पाणी शिंपतात
हे सगळे माझ्या आईने प्रत्यक्षात पाहिले आहे

म्हणूनच मला ती add जरा ऑड वाटली,की त्या धर्मात सुद्धा ही ओटीभरण असतेच मग जाहिरातीत असं का म्हटलं आहे ?

बुरख्या बद्दल सुद्धा सगळ्यांना सेम नाही,काही घरात स्ट्रिक्टली घालावा लागतो काही ठिकाणी नाही,
माझ्या आतापर्यंत च्या पाहण्यात फक्त 1 जण बुरखा घालायची ते ही कॉलेज मध्ये असताना फक्त ,आता नाही घालत ती सुद्धा

सोमवारी एक खेळाडु जी हॉटसीट वर येणार आहे ती मदरस्यातील विद्यार्थ्यांना मोफत* शिक्षण देतेय. आम्हाला सरकारी मदतीची गरज नाही वगैरे >>>>>>
नाव काय हो तिचे ?
आणि करू द्या की सगळा खर्च ! या बाबत कोणाची हरकत नसावी ..

फक्त तेथे शिकून बाहेर पडलेल्या ना " दिल्ली आणि बँगलोर घटने प्रमाणे शुल्लक कारणावरून सार्वजनिक ठिकाणी नासधूस आणि देश संपत्ती ची होळी करणे चांगले नाही " इथ पर्यंत ज्ञान प्राप्त झाले तरी भरपूर शिकले असं म्हणता येईल !

मृणाली जेब्बात!
बाकी काय तो धागा आणि काय ती चर्चा!

मुस्लिम मुलीला हिंदू नवऱ्याने आणि कुटुंबाने फसविल्याच्या घटना शोधाव्या लागतात !
तर याच्या उलट पायलीच्या पन्नास सापडतात .

आणि वर उल्लेख केल्या प्रमाणे त्या दोन जीवांचे आर्थिक स्वावलंबी त्व पण महत्त्वाचे असते .

तुम्हाला बुरखा घालण्याची सक्ती नाही म्हणजे सासर ची मंडळी आणि मिस्टर पुढारलेल्या विचाराचे आहेत , यातच सर्व आले !
मात्र इतर हिंदू मुली या बाबतीत कमनशबी ठरतात .

मुस्लीम स्त्रिया म्हणजे कुणी परग्रहवासी नाहीयेत...इथे त्यांच्या कपडे आणि दागिन्यांवरून चर्चा चालू आहे...
तोंडभर घुंघट ओढून बाकी सगळं दाखवणार्या स्त्रियांबद्दल कुणाला आक्षेप नसतो...
पण पूर्ण अंग झाकणार्या बुरखा्याबद्दल इतका द्वेष का??

मृणालि, बरोब्बर.
उगीच जनरालायझेशन कशाला करावे.

मात्र इतर हिंदू मुली या बाबतीत कमनशबी ठरतात .....

मग फक्त मुस्लिम मुलांनी फसवलेल्या का???
सगळ्याच फसवल्या गेलेल्या मुलींबाबत चर्चा करा न...

धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांचा विवाह वैध आहे का? धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे स्टेटस काय आहे?

धर्मेंद्र कागदोपत्री पत्नी म्हणून कोणाचे नाव लावतात?

बहुपत्नीत्वाचे प्रमाण हिंदूंमध्ये मुस्लिमांइतकेच होते.

१९६० साली फक्त ५% मुस्लिम पुरुष एकापेक्षा जास्त बायका असलेले होते. मग मुस्लिम पुरुष सर्रास चार बायका करतात असे चित्र का रंगवले जाते? कोणाच्या पाहण्यात असे पुरुष आहेत?

विवाहासाठी किमान वयाचा नियम मुस्लिमांत पाळत नाहीत, असे वाचले. बालविवाह झालेल्यांत ८४ % हिंदू होते .

मग आक्षेप नक्की कशाला आहे?

मुलीच्या भवितव्याबद्दल काळजी असण्याला असेल तर हिंदू विवाह कायद्यात घटस्फोट न देताच नवर्‍याने सोडलेल्या बायकांकडे काय उपाय असतो?

शितावरून फक्त भात शिजला का नाही बघता येईल पण सगळ्या समाजाला clean चिट देणे अशक्य आहे !
ज्या वेळी हिंदू मुली ना फासविल्याच्या तक्रारी कमी येतील तेंव्हाच सर्व धर्म सारखे समान वाटतील .

शिवाय हिंदू मुलांनी मुस्लिम मुलीला फसविल्याची असतील तर द्या ना उदाहरणे !
काल परवा च मुस्लिम मुली बरोबर असलेल्या प्रेम प्रकरणातून दिल्लीत हिंदू मुलाचा निर्घृण खून केला गेला !
मुलगा हिंदू असेल तर मुलाचा शेवट असतो अणि मुलगी हिंदू असेल तर तिचे आयुष्य खडतर होते , हे १०० % खरे आहे .
आणि मुद्दा तनिष्का ने डोहाळ जेवण साठी हिंदू मुलगी मुस्लिम कुटुंबात सुखी असल्याचं ( गृहीत धरून ) दाखविण्यात आल्या बद्दल होता ! त्या नंतर बुरखा घालणाऱ्या किती स्वतंत्र आहेत ? हे फाटे फुटले ....
तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल वाचले असेलच , शेवट पर्यंत तिला नवऱ्याच्या प्रॉपर्टी त हिस्सा मिळत नाही !!!!
म्हणजे आंतरधर्मीय विवाह विषयक सगळे कायदे मुस्लिम पुरुषांना सुरक्षित करण्यासाठीच लीहले गेलेत काय शंका येते !

मुलगा हिंदू असेल तर मुलाचा शेवट असतो अणि मुलगी हिंदू असेल तर तिचे आयुष्य खडतर होते , हे १०० % खरे आहे ..................

तुम्हाला तुमच्या पुढील चर्चेसाठी शुभेच्छा....

चला हिंदु-मुस्लीम, लव्ह जिहाद हे एव्हरग्रीन मुद्दे इथे सुरु झालेत तर त्या विषयावरचा हा एक सुंदर मल्याळम सिनेमा आठवला नाझरीया आणि जय यांचा. सिनेमा भारी आहेच पण त्यातील गाणी सुद्धा एक नम्बर आहेत.
थिरूमनं इनम निक्काह
https://youtu.be/r-By5njh-hk

मृणालिनी, तुमच्या सारख्या जोड्या आहेत नाही असं आजिबात नाही. पण अशा केसेस खूप कमी आहेत.

इथे उपास करणं कसं चांगलं, अंगभर कपडे with बुरखा कसा चांगला इ. म्हणणं म्हणजे जे हे करत नाहीत त्यांना कमी / वाईट / पापी / काफिर ठरवण्याची पहिली पायरी आहे. Why judge?

कोणीही कोणताही धर्म स्वीकारा, no issue because it's a personal thing but
'लग्न' हा मामला वैयक्तिक नसून कायदेशीर आणि सामाजिक आहे. पुढील प्रश्न वैयक्तिक आहेत, राग मानून घेऊ नका. उत्तरं दिली नाहीत तरी ok.

तुमचं किंवा तुमच्या मैत्रिणींच लग्न special marriage act नुसार झालं की कसं?
त्यात वारसा, घटस्फ़ोट, पोटगी, बहुपत्नीत्वाची मुभा या बाबतीतली तरतूद कशी आहे ?

जोपर्यंत समान नागरी कायदा नाही तोपर्यंत अपवात्मक चांगली उदाहरणे देणं म्हणजे
मी जीवंत आहे त्यामुळे जगात अतिरेकी/ आतंकी हल्ले / खून होत नाहीत असं म्हणण्यासारखं आहे.

{{{ मुस्लिम मुलीला हिंदू नवऱ्याने आणि कुटुंबाने फसविल्याच्या घटना शोधाव्या लागतात ! }}}

एक घटना तर लगेच आठवली. नवरा चांगलाच झोडपायचा रोज बायकोला.

मल्लिका शेख + नामदेव ढसाळ

माझी मल्लिकाला सहानुभूती आणि नामदेव ढसाळ चा जोरदार निषेध.

बघूयात आता अजून कोणकोण निषेध करतंय?

Pages