तनिष्कची वादग्रस्त जाहिरात

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 October, 2020 - 13:41

जेव्हा मला समजले की तनिष्कच्या जाहीरातीवर वाद चालू आहे तेव्हा मी काय वाद आहे हे जाणून घेण्याआधी ती जाहिरात बघितली.

https://www.youtube.com/watch?v=LMOHY4naVYA

वाद काय असावा याची कल्पना मला तिथेच आली.

मी वैयक्तिकरीत्या सर्वधर्मसमभाव आणि समतेचे संदेश देणार्‍या जाहीराती आणि तश्या पोस्ट वा लेख तसेच चित्रपटांचे समर्थन करतो.
त्यामुळे मला तरी प्रथमदर्शनी त्या जाहीरातीत काही गैर वाटले नाही.

विरोधकांनी जो लव्हजिहादचा मुद्दा उचलला आहे त्याबाबत सांगायचे झाल्यास लव्हजिहाद असे काही नसतेच वगैरे मला म्हणायचे नाहीये. दहशतवाद आहे तर लव्हजिहादही नक्कीच असेल. पण टाटा त्याला बढावा द्यायच्या हेतूने नक्कीच असे काही करणार नाही. हे म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या विवाहाला लव जिहाद म्हटल्यासारखे झाले.

पण हल्ली असे वाद फार दिसू लागलेत. म्हणजे अगदी बलात्कारातही जात धर्म शोधले जातात. तिथे जाहीरात वा चित्रपटांमागे हा अँगल शोधणे तर सोपेच आहे.
दुसरीकडे होतेय काय तर अश्याने जातीधर्मातील दरी वाढती दिसू लागल्याने अश्या सर्वधर्मसमभावाच्या जाहीरातीही त्याचेच बायप्रॉडक्ट म्हणून जास्त दिसू लागल्या आहेत. मग त्यात काहीतरी खुसपट शोधून आणखी वाद… उदाहरणार्थ हि जाहीरात बनवणार्‍या टीममध्ये कोणीतरी एक मुसलमान आहे असे कानावर आले आहे. अर्थात, जाहीरातीची थीम जर मुसलमान कुटुंब दाखवणे असेल तर ते हुबेहुब दाखवायला त्यामागे कोणीतरी मुसलमान असणारच हे स्वाभाविक आहे.

बाकी दोन्ही बाजूंचे भाजणारे आपली पोळी भाजताहेत. स्वतःला सेक्युलर म्हणवणारेही काही कमी ढोंगी नाहीत. चिंता आहे ती सोशलसाईटमुळे खूप युवा वर्ग या वादात ओढला जाऊ लागला आहे. देशासमोर प्रश्न खूप आहेत. कोरोना मुक्कामालाच आहे. यात असे वाद चवीपुरते ठिक आहेत. पण सातत्याने होत त्यातच उर्जा खर्च होऊ लागली तर अवघड आहे.

तर या वादाला खतपाणी घालायला नाही तर असे वाद टाळा हि विनंती करायला हा धागा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या गोष्टीने, वाद होइल किंवा त्याचे तीव्र प्रतिसाद उठू शकतील सध्याच्या घडीला, त्या गोष्टी कराच कशाला?
असे कोणाच्यात बदल असे होणार? एका जाहिरातीने? तुमचा हेतु जरी चांगला असला तरी, पद्धत व वेळ असते.
आणि, मूळात धर्म आणलाच कशाला मध्ये? ज्याची पाळंमूळं खोल आहेत.
जाहीरतातीत आणखी पुढची स्टोरीलाईन दाखवायची ना मग,
...
मुलगा जन्मतो, आणि हिंदू मुलीला तिच्या आवडीप्रमाणे, मुस्लिम सासर बाळाचे नाव ठेवायला सांगतात, किंवा हिंदू नावाचाच आग्रह करतात. .. अर्धा पिक्चर दाखवून कसला विचार करायला लावता पब्लिकना? Wink
ह्या असल्या अर्ध्या जाहीरातीवर काय बोलायचे? Proud

धागा उडवा आता .. Wink

केंद्रात भाजप सरकार असल्यामुळे सध्या "अच्छे दिन" आले आहेत.
त्यामुळे जनतेत सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

दलावाईंचा लेख वाचला.आवडला.
भिन्न संस्कृतीत मुली लग्न करून देताना मुख्य काळजी 'त्या धर्मातल्या ज्या गोष्टी आपण ऐकीव माहितीवर माहिती बाळगून आहे त्याने आपल्या मुलीला काही त्रास होईल का' ही असते.
पण जाती पोटजाती पत्रिका बघून केलेल्या लग्नातही बायका मुलींना त्रास होतातच.(कोणत्याही स्वतःच्या/इतर/रेस/धर्मात लग्न करताना समोरची पार्टी, स्वभाव नीट ओळखून चांगल्या स्वभावाच्या माणसात लग्न करावं असं काहीसं अनुमान काढून विचार संपवते)

जोपर्यंत समान नागरिक कायदा नाही तोपर्यंत असल्या जाहिराती काय कामाच्या?
जाहिरातीत दाखवलेल्या हिंदू बाईला वारसाहक्कानं नवर्‍याकडील संपत्ती मिळेल का?, यदा कदाचित घटस्फोट झाला तर पोटगी मिळण्याची शक्यता आहे का?, नवर्‍याला कायद्याने एकापेक्षा जास्त लग्न करण्याची मुभा आहे तर मग काय? इ. इ. प्रश्नांमुळे अशा जाहिरातींना विरोध असू शकतो.

जाहिराती बद्दल माझं स्वतःचं मत न्यूट्रल आहे, त्यांना दागिने खपवायचे आहेत. ..बस्स.

ज्या आठवड्यात बंगलोरचा लक्ष्मीपती आणि दिल्लीचा राहुल ( बहुतेक) या हिंदू मुलांची त्यांच्या गर्ल्फ्रेंड्च्या कुटुंबाकडून फक्त धर्मावरून हत्या होते त्याच आठवड्यात ही जाहिरात दाख्वून काय दाखवताहेत? रिअ‍ॅलिटी ही जाहिरातीपेक्षा वेगळी आहे.

माझा जाहिरातीला विरोध नव्हता पण जाहिरात मागं घेताना जो कांगावा करणारं पत्र्/नोट लिहिली आहे ती फार पॅट्रोनाइझिंग आहे.
दुकानं फोडल्याच्या खोट्या बातम्या, कांगावा इ. मुळे नक्की उद्देश दागिने विकणेच आहे की वेग्ळाच असं वाटतय.

तनिष्क/टाटा ब्रँड कधी धर्माच्या पक्षाच्या राजकारणात पडलेले पाहिले नाहीयेत.काही वेगळा अजेंडा असेल असे वाटत तरी नाही.

ज्या आठवड्यात बंगलोरचा लक्ष्मीपती आणि दिल्लीचा राहुल ( बहुतेक) या हिंदू मुलांची त्यांच्या गर्ल्फ्रेंड्च्या कुटुंबाकडून फक्त धर्मावरून हत्या होते त्याच आठवड्यात ही जाहिरात दाख्वून काय दाखवताहेत? रिअ‍ॅलिटी ही जाहिरातीपेक्षा वेगळी आहे.
--

त्या राहुल नावाच्या मुलाला, "एक काफिर मुस्लिम मुलीशी प्रेम संबध जुळवतोच कसा ?" असे म्हणत, बकरा मारल्यावर जसा सोलतात तसा सोलला होता या जिहाद्यांनी. हि असली बेगडी धर्मनिरपेक्षता, जाहिरातीत दाखवून या जिहाद्यांची मानसिकता बदलणार आहे का ? तर ती अजिबात बदलणार नाही. जर असे नसते तर हिंदू धर्मातील, विविध जातीतील मुलींना फितवून मुस्लिम मुलांबरोबर लग्न करायचे रेट कार्ड छापले नसते मुल्ल्यांनी.

नवतं माहित. पण अंदाज होताच हे असं असेल म्हणून.
माझ्या दुरच्या नात्यात दोन उलटे लव जिहाद आहेत.
काही प्रतिसाद नेहमीप्रमाणेच.
तनिष्कने जाहिरात मागे घेउन सुज्ञपणा दाखवला. अपने इधर ये नॉ चॉलबे.

आमच्या इकडे आधुनिक गांधींच्या अत्यंत विश्वासातले एक स्नेही आहेत. त्यांना तश्या हौशी पत्रकार/लेखक/कवी अश्या बऱ्याच उपाध्या आहेत नावापुढे. तर यांनी २०१४ पुर्व सरकारात असाच जॅक लावून पोराला फौजदार पास करून घेतलं. त्या पोराने जॉइनिंगच्या ठिकाणी गेल्यावर सहा महिन्यातच मुस्लिम बायको करून घरी हजर झाला. घरी मोक्कार राडा झाला आणि बापाला अट्याक यायचा बाकी होता फक्त. काय नाय मग वर्षभरात सगळे अड्जस्ट झाले.
चारेक वर्षांपूर्वी एक हँडसम सीए मित्राने एक्सिस बॅंकेतल्या दहा वर्षांनी मोठ्या मुस्लिम स्त्री/मुलीशी सुत जुळवले होते. ती तशी बाहेरच्या राज्यातील होती. त्याचे स्वजातीय मुलीशी लग्न होईपर्यंत दोनेक वर्षे मजा केली त्यांनी. त्या बाईचे नाही माहिती काय झाले. fwb टाईप रिलेशन होते बहुतेक. मला त्या एजग्यापचे कायम नवल वाटायचे (तसे अस्मादिक स्वतः चांगल्या व्यक्तिमत्वाचे धनी आहेत पण त्यांना असा काही अनुभव आला नाही अजून)

सर्वात अगोदर मुस्लिम समाजाला बुरखा पद्धत बंद करायला सांगा आणि मग जाहिरातीचे कौतुक करावे !
मुस्लिम समाज दिवसेदिवस धार्मिक होत चालला आहे . स्वतः शरीयत कायदा पाळणार इतरांना मात्र सर्व धर्म समभाव चे गोडवे सांगणार !!!

बरं ते दलीत मुलगा आणि सवर्ण मुलीच्या प्रेम प्रकरणात दलीत मुलाची हत्या होते हे पण एक प्रकारचं लव जिहादच झालं ना? फार तर त्याला लव मनुवाद म्हणता येईल.
आज धर्माच्या नावाने शिमगा उद्या जातीच्या नावाने पारवा प्रांताच्या नावाने.

ज्यांना जो धर्म हवा / नको आहे तो वैयक्तिक प्रश्न मानला तरी त्याचे परिणाम काय आहेत- कायदेशीर दृष्टीनं

मुलीच्या वयाची अट -18 वर्षं पूर्ण ही फक्त हिंदू मॅरेज एक्टला लागू आहे. म्हणजे एखादी नाबालिक मुलगी सहज फूस लावून / धर्म बदलून, लग्नाच्या नावाखाली abused होऊ शकते..ज्याला इतर समाजासाठी असलेल्या कायद्यानुसार बलात्कार समजलं जातं.

जोपर्यंत समान नागरी कायदा लागू नाही तोपर्यंत अशा जाहिराती दाखवणं हे अत्यंत misleading आहे.

माझ्या दुरच्या नात्यात दोन उलटे लव जिहाद आहेत.

>> माझ्याकडे पण दुरच्या नात्यात एक उलटा लव जिहाद आहे. ब्राम्हण घरातल्या मुलाने मुस्लिम मुलीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला. कारण तिच्या घरच्यांची तशी अट होती म्हणे.

माझ्या दुरच्या नात्यात दोन उलटे लव जिहाद आहेत.
>>>>

आमच्याकडे सुलटाच लव्हजिहाद आहे. पंधरासोळा वर्षांचा सुखाचा संसार झालाय. पण तरीही काहींनी कायमचे नाते तोडलेय तिच्याशी. मी अर्थातच नाही. कारण सध्या दर रक्षाबंधनला न चुकता राखी पाठवणारी ती एकच बहिण आहे जगात. अगदी हि पोस्ट लिहितानाही हातावर सहज नजर गेली. तिचीच राखी आहे मनगटात Happy

ब्राम्हण घरातल्या मुलाने मुस्लिम मुलीशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला. कारण तिच्या घरच्यांची तशी अट होती म्हणे.
>>>

त्यापेक्षा दोघांनी आपल्या धर्माचा त्याग करायला हवे होते.

त्यापेक्षा दोघांनी आपल्या धर्माचा त्याग करायला हवे होते.
ज्जे बात. कोणताही धर्म नाही हा एक ऑपशन हवा. तसेच आडनाव न लावायचा पण ऑपशन हवा. लोक अडनावावरून जात धर्म शोधतात.

https://www.opindia.com/2020/09/nusrat-jahan-issued-threats-by-islamists...>>>>> असे पण होते की.
>>

@ रश्मी, मलाही बरेचदा असे वाटते की हे असे फतवे आणि धमक्या सोयीने निघत असाव्यात.
कारण जेव्हा शाहरूख खान झायेद खान एखाद्या मै हू ना चित्रपटात आपले नाव राम लक्ष्मण ठेवतात आणि किंवा एखाद्या स्वदेशमध्ये शाहरूख रामाचे गुणगाण गाणारे पुर्ण भजन म्हणतो, तेव्हा त्यावर का निघत नाहीत असे धमकी शिवीगाळचे फतवे?

ज्जे बात. कोणताही धर्म नाही हा एक ऑपशन हवा. तसेच आडनाव न लावायचा पण ऑपशन हवा. लोक अडनावावरून जात धर्म शोधतात.
>>>>
+७८६
मी कधीपासून याची वाट बघतोय. कोणताच धर्म नाही वा जातही नाही. मी पहिला फॉर्म भरेन. कुठले आरक्षणही नको मला. कुठल्या जातीधर्माच्या नावावर मिळणार्‍या सोयीसवलतीही नको. निदान वयाची अठरा वर्षे पुर्ण झाल्यावर तरी हे असे जातधर्मत्याग करायची सोय असावी. नाहीतर फायदा काय सज्ञान झाल्याचा जर जन्मापासून चिकटलेलेच जातधर्म आपली चॉईस न लक्षात घेता तसेच चिकटून राहणार असतील तर.. आणि मी व्यक्ती म्हणून कसा आहे हे प्रथमदर्शनी तरी त्यावरच जज होणार असेल तर.

प्रश्न कायदेशीर आहे - वारसाहक्क , पोटगी, मिनिमम वयाची अट, बहुपत्नीत्वाची मुभा हे मुळ आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत ..

फक्त जाहीरात आणि सिनेमात असं खोटं खोटं प्रेम दाखवण्यात काय हशील..सेक्युलरिझम प्रत्यक्षात उतरवा., नुसता जाहिरातींला विरोध करणा-या लोकांना मूर्ख/ अशिक्षीत इ. इ. म्हणून काय उपयोग.
समान नागरी कायदा करा

Kadhi kadhi ultahi dakhva na,tyasathi himmat lagel.muslim mulgi ani Hindu mulga ase dakhvle aste tari chalale asate.

असे प्रकार पूर्वी झाले आहेत

कुणीतरी संत व्यक्तीने जात लावू नका म्हणून अजात अशी जात लावायला सांगितले
पण अजात असल्याने पोरांची लग्ने होईनात
मग अजात अजात अशीच लग्ने होऊ लागली

ऋन्मेष, लव्ह मॅरेज हे जेव्हा दोघांच्या पसंतीने संमतीने होते तेव्हा पुढचा विचार करुन त्यांनी एकमेकाम्च्या नात्याचा आदर हा जपायला हवा. घरात भांड्याला भांडे हे लागणारच, पण कुठुन झक मारली आणी तुझ्याशी लग्न केले, जातीतच / धर्मा तच केले असते तर बरे झाले असते, असा विचार मग दोघांच्याही मनात् शक्यतो येता कामा नये. मी शक्यतो असे म्हणले कारण माणसाच्या मनात काही येऊ शकते. पण पुढे जाऊन जोडीदार त्या वाक्याने दुखावला जाऊन त्या नात्यात दरी वाढु नये इतकेच.

पण अजात असल्याने पोरांची लग्ने होईनात
मग अजात अजात अशीच लग्ने होऊ लागली
>>
सुरवातीला (म्हणजे अनेक दशके, काही शतके) असे होणार हे गृहीतच धरायला हवे ना. यात अजात एक जात झाली असे पाहु नये. हळु हळु जात धर्म न लावणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. शेवटी तेच भविष्य आहे. फक्त वेळेचा प्रश्न आहे.

>>Kadhi kadhi ultahi dakhva na,tyasathi himmat lagel.muslim mulgi ani Hindu mulga

बॉंबे सिनेमात असेच होते ना?

मला तर जाहिरात आवडली. सासु चे वाक्यच "मेरी बेटी खुश है खुप काही सांगुन जाते. " खर तर इथे मुद्दा सासुने अथवा सासरकडच्यांने आपल्या सुनेच्या आवडिची काळजी घेतली पाहिजे असा आहे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तसेच कुठलाही धर्म काही केल्या बदलत नाही. हिन्दु मुलगी मुसलमान घरात गेली आणि तिचे धर्म परिवर्तन केले तरी त्याने काहि फरक पडत नाहि.(माझ्या मते जो पर्यन्त शरिरातिल पहिले रक्त बद्लुन दुसरे रक्त भरले जात नाही. तो पर्यन्त धर्म जात बदलत नाही) प्र्यत्येक धर्माच्या चाली रिति कुठल्या तरी अनुशंगाने तयार केल्या गेलेल्या आहेत. ईथे डोहाळ जेवण हा एक कार्यक्रम आहे. जो फक्त हिन्दु लोक करतात असे आपणास बिंबवले गेले आहे म्हणुन माहित आहे, जर हा कर्यक्रम केवळ आनंद देणे आणि भेटी गाठी होणे या साठि असेल तर तो कोणीही करु शकतो. एकदा तुम्ही दोन वेगळ्या धर्मात लग्न लावले तर मग कोणीही वेगळे रहात नाही. ना जातिने ना धर्माने.

टीपः- जर टाटा वर असलेला राग म्हणुन कोणी त्यांचे कुठल्याही प्रकारच्या वस्तु रस्त्यावर फेकणार असाल तर मी पिशवी घेउन यायला तयार आहे.

>>>माझ्या मते जो पर्यन्त शरिरातिल पहिले रक्त बद्लुन दुसरे रक्त भरले जात नाही. तो पर्यन्त धर्म जात बदलत नाही)

काहीही - रक्त सर्व जाती - धर्माच्या माणसांचं एकसारखंच असतं.

Pages