पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

लॉल.

बरं ह्यांच्याकडची भूतं कॅमेराकडे बघून हसतात... नायतरं कुठे कुठे सेल्फीत दहा वेळा इकडे बघा इकडे बघा केलं तरी भलतीकडंच बघतात लोकं...

वातावरण एकदम कोंदट झालंय. हवा थांबल्यासारखी वाटते.

आणी ते कुबट वास, विचित्र थंडावा, पिंपळपानांची सळसळ, हवा नसतानाही घोंगावणारा वारा, अंगावर येणारा निळसर गडद काळोख वगैरे राहिले का ???????????????

अस्वस्थता वाढली आहे. >>>>> कोणाची?
लवकरच हे घर सोडून जाणार आहे. >>>>> कोण? भूत की तुम्ही?
पुरे झालं आता. काय रिकामे उद्योग.... फार आठवण काढली सतत तर खरोखर यायचं कोणी.

आजपासून तर अनुभव वाढायला हवेत >> VB, द्या आणखीन आयडिया! मागे ती अमावास्येची दिलीत. मला वाटायला लागलंय की तुमचे प्रतिसाद वाचूनच भूत ठरवतय कधी जोमात यायचं ते.

मला आता वाटायला लागले की मेल्यावर भूत बनून मी अनिळजी वगैरेंची फिरकी घ्यावी Wink
पण ते भांडी घासा वगैरे कुठलीच कामे मी भूत झाल्यावर करणार नाही. हवं तर वाहते नळ, लूज बटणं वगैरे ठीक करून देईन चांगल्या खाऊच्या बदल्यात.

अरे चिल करा हो लोक्स,
त्यांनी गम्मत केली,खरंतर यामुळे च इथे सल्ले देताना खूप भावनिक वगैरे होऊ नये, कारण समोरची व्यक्ती खर बोलतेय की खोट ते कळत नाही,पण जेन्युअल प्रश्न असू शकतो असा विचार करून आपण सांगायचं काम करायचं,न जाणो यातून एखाद्या रोमात असलेल्याला मदत होईलही
हा आता वाईट वाटतच आपण फसवलं गेल्यामुळे पण त्व्हर्च्युअल जगात त्याला पर्याय नाही

साहेबांचे मुळात मोजकेच प्रतिसाद आहेत. त्यांनी एखादी कमेंट टाकायचा उशीर का लगेच पुढे पन्नासेक प्रतिक्रिया फिक्स असायच्या. हा ताजे प्रेताचाच नवीन व्हर्जन होता. तो धागा बंद झाल्यावरच हे उगवले. बहुतेकांना पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची कल्पना होतीच पण राजकारणानन्तर कोतबो आणि अमानवीय हुकमी एक्के आहेत इथले. आता बघा लवकर असा नवा धागा परत कोणी काढणार नाही पण दुसरे काही इंरेस्टिंग कोतबोवर येईलच थोड्या दिवसात. काही लोक्स खरोखर भोळी कोकरे आहेत इथे Happy

अनिलजी @काल फार काही भयानक अनुभव नाही आले. फक्त अस्वस्थता वाढली आहे. लवकरच हे घर सोडून जाणार आहे. '>>>>आता काय झाले अनुभव कमी झाले तर राहा की कशाला सोडून जाणार आता.

अनिलजीच्या भुताने आयफोन ची मागणी केली आहे >> हे नक्कीच भयानक आहे, अनिळजींच्या किडन्या कामी येनार बहुतेक...lol

अनिळजी @ मी रोज हा धागा वर तुमची प्रतिक्रिया आहे का नाही बघते त्या मुळे कळते की तुम्हाला काही झाले नाही तुम्ही नीट आहेत भिते तुम्हाला अजून घाबरून आहेत

भूत परतीच्या वाटेवर आहे.. म्हणे लोकं हलक्यात घेतात, घाबरतच नाहीत.. पण जाताना आय फोन घेऊन जाणार आहे..

भयानक अनुभव रोजच येत आहेत. पण देवाच्या कृपेने आम्हाला काही होत नाही. आमच्या भोवती एक कवच निर्माण झालंय. ते तोडणं त्या शक्तीला शक्य होत नाही.

भयानक अनुभव रोजच येत आहेत. पण देवाच्या कृपेने आम्हाला काही होत नाही. आमच्या भोवती एक कवच निर्माण झालंय. ते तोडणं त्या शक्तीला शक्य होत नाही.>>>> रिंगणात फिरणे किती तापदायक असते, त्यातुन काही लोक पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतात. Proud बाहेर येतच नाहीत. मला वाटले होते की मोठाल्या कवित करता आल्या, मोठाले लेख लिहीता आले, मोठाले विचार मांडता आले म्हणजे ती व्यक्ती मनाने मोठी असते. पण तसे नसते. लोकांनी मोठ्या केलेल्या व्यक्ती मनाने फार्र फार्र खुज्या असतात. Proud

नुकतेच प्राचीन इजिप्त विषयी भरपूर वाचन केले आहे त्यामुळे अनिळजींनी बाराव्या पानावर लिहिलेला प्रतिसाद "परत आलो तेव्हा घरी सगळा पसारा होता" हा इसपू बाराव्या शतकात लिहिला होता असे वाटू लागले आहे. इसवीसनपूर्व बाराव्या शतकापासून प्रजेचा अनिळजी वरचा विश्वास उडाला Lol योगायोगाने आता एकविसावे पान आणि शतक सुरू आहे

मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली.. >> धाग्यातील परिवाराच्या या उल्लेखामुळेच अनेकांनी काळजीपोटी आपल्यापरीने उपाय सुचवले, ते कसे आहेत याबद्दल विचारले. यात प्रतिसाद देणाऱ्यांचा दोष मला तरी वाटत नाही. वर कोणीतरी म्हटले तसे माबोकर भोळी कोकरे वगैरे आजिबातच नाहीत. हा संवेदशील नक्कीच आहेत. प्रसिध्दीच्या हव्यासाने धागालेखकाने परिवारालाच कामाला लावले त्याला कोण काय करणार.

इजिप्त मध्ये पण पसारा करायचे?
म्हणजे आमच्याकडे कपडे आणि कॉम्प्युटर केबल अस्ताव्यस्त पडलेल्या असतात तसे त्यांच्याकडे उंटाच्या दुधाचे जार, सोन्याची नाणी आणि तो डोक्याला लावायचा पट्ट्याचा हेडगिअर वगैरे पडलेला असेल ना? Happy

Pages