Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मॅचेस फिक्स्ड आहेत असं
मॅचेस फिक्स्ड आहेत, असं ऋन्म्या म्हणाल्या पासुन आता मॅचेसचा स्टार्टलिंग फिनिश बघायला मिळत नाहि...
तेवाटीया, करन टाइप बॅटस्मनना
तेवाटीया, करन टाइप बॅटस्मनना मधेच स्लोअर वन का टाकण्यात येतो हे मला काही कळले नाही. आर्चर, रबाडा आणि सगळे १४० + बोलर्स नुसते फास्ट टाकत राहिले तरी जास्त यशस्वी आणि इकॉनॉमिकल ठरतील अशा बॅटस्मन विरूद्ध. हरी देम अप.
आर्चर चा संपूर्ण स्पेलच
आर्चर चा संपूर्ण स्पेलच खतरनाक होता.
>>
+७८६
त्याला तिसरी ओवर द्यायलाच हवी होती. तिथेच धवन वा अय्यर गेला असता तर सामना वेगळा असता. मागेही दिल्लीविरुद्धच त्याला असाच मागे सडवलेला.
रहाणेने त्यालाच मुर्खासारखे मारायला जाणे आणि तो देखील असा फटका जो आर्चरने आर्चरने काल जी लेंथ पकडली होती त्यावर मारणे फार अवघड होता हे पाहता त्याचे डेस्परेशन जाणवले. झटपट सिद्ध करायचे होते त्याला स्वतःला. कारण पंत येताच शॉ, धवन, रहाणे पैकी एक जाणार त्यात त्याचाच नंबर वरचा आहे हे त्याला माहीत आहे.
मॅचेस फिक्स्ड आहेत, असं
मॅचेस फिक्स्ड आहेत, असं ऋन्म्या म्हणाल्या पासुन आता मॅचेसचा स्टार्टलिंग फिनिश बघायला मिळत नाहि... Proud
>>>>>>>>
सुरुवातील तश्याच ईन्स्ट्रक्शन्स होत्या. सामन्यात रंग भरा. एकदा पब्लिक खेचली की मग गरज नसते. आणि तसेही ईतके चमत्कार नमस्कार झाले सुरुवातीला की लोकंही संशय व्यक्त करू लागलेले.
असो, आता संपता संपता वा प्लेऑफला पुन्हा क्लोज एनकॉऊंटर बघायला मिळेल अशी अपेक्षा.
त्यात चुकून सालाबादाप्रमाणे मुंबई चेन्नई अखेरीस आमनेसामने आले की तयार राहा एका चेन्नई चेस लास्ट बॉल फिनिशला
आज ABD ला चक्क सहाव्या
आज ABD ला चक्क सहाव्या क्रमांकावर खेळायला पाठवले अनाकलनीय निर्णय...
नशिब तरी शेवटच्या ओवरला 24 रन्स आले नाहीतर 150 ते 155 च्या दरम्यान पोहोचले असते.
Ex-RCB beating RCB
Ex-RCB beating RCB
मॅचेस नक्की फिक्स असाव्यात..
मॅचेस नक्की फिक्स असाव्यात..
शेवटच्या षटकात २ धावा काढायला गेल आणि राहुल असताना शेवटचा चेंडू लागावा..
3 षटकात १० धावा हव्या होत्या आधी!! तरीही...
19व्या षटकात सामना संपणं सहज
19व्या षटकात सामना संपणं सहज शक्यच नाहीं तर अपरिहार्य होतं. उगीच नाटकं करतात !!!
3 षटकात १० धावा हव्या होत्या
3 षटकात १० धावा हव्या होत्या आधी!! तरीही…
>>>
१८-१९ व्या ओवरला ज्या ९ धावाच आल्या त्यातही ३ वाईड होत्या. मारले यांनी ६ धावाच
आणि गेल राहुल दोघे तगडे फलंदाज.. सेट असताना.. षटकारांची बरसात करत असताना.. गेल्या सामन्याचा वाईट अनुभव असताना पुन्हा तीच स्लो व्हायची चुकी का केली असावी बरे??
लास्ट ओवरलाही बाउंडरीला मिसफिल्ड होते पण एकच धाव घेतली जाते.
विनिंग शॉटही बाकी धमाल आला..
बाकी शेवट सोडा.. आज पहिल्यापासून मला बरेच गोष्टी नवीन आणि मजेशीर वाटल्या
१) गेलचा समावेश झाला
२) मॅक्सवेलला पहिली ओवर दिली गेली
३) एबीडीच्या आधी फलंदाजीला सुंदर आणि शिवम दुबे आले
४) गोलंदाजी मात्र नेहमीप्रमाणे सुंदरला पॉवरप्लेमध्ये दिलीच नाही.
५) विकेटस सामना जिंकवू शकत होत्या पण कोहलीने आपल्या लाडक्या चहलच्या ओवर पुर्ण न करता त्याला लास्ट ओवरला ठेवले.
६)
अजून बघा कोणाला काही आठवतेय का .. मी काम करता करता सामना बघत होतो. छोट्यामोठ्या घटना मिस झाल्या. हे बॅटीग ऑर्डर आणि बोलिंग चेंजेस तेवढे लक्षात आले.
*अजून बघा कोणाला काही आठवतेय
*अजून बघा कोणाला काही आठवतेय का* - . मैदानाची सीमारेषा जवळ असूनही धांवाचं लक्ष्य वाढवायला एबीडीला वरच्या क्रमांकावर फलंदाजी न देणं , हें सर्वात जास्त अचंबित करणारं.
म्हणजे आयपीएल फिक्स असते यावर
म्हणजे आयपीएल फिक्स असते यावर एकमताने शिक्कामोर्तब झालंय.
*अजून बघा कोणाला काही आठवतेय
*अजून बघा कोणाला काही आठवतेय का* - . मैदानाची सीमारेषा जवळ असूनही धांवाचं लक्ष्य वाढवायला एबीडीला वरच्या क्रमांकावर फलंदाजी न देणं , हें सर्वात जास्त अचंबित करणारं.
>>
कोहली म्हणाला की त्याला लेफ्टी रायटी चे कॉम्बिनेशन हवे होते.
*म्हणजे आयपीएल फिक्स असते
*कोहली म्हणाला की त्याला लेफ्टी रायटी चे कॉम्बिनेशन हवे होते.* - कांहींही ! तसंच होतं तर कोहलीने शेवटीं येवून एबीडीला वरच्या क्रमांकावर पाठवणं , हा अधिक शहाणपणाचा पर्याय होताच की !
*म्हणजे आयपीएल फिक्स असते यावर एकमताने शिक्कामोर्तब झालंय.* निदान, सामने एकतर्फी होवूं देवूं नयेत व शक्यतो 20व्या षटका पर्यंत खेंचून न्यावे, इतपत तरी ठरलेलं दिसतंय !
-
मला तर हल्ली असाही संशय यायला लागलाय
बांऊंडरी लाईनवर अगदीं सोपा झेल असला, तरीही सीमारेषेच्या आंत- बाहेर उडी मारूनच तो
इंटरेस्टींग करूनच घ्यायचा !
आयपीएल बघायचा मूड जातो यार या
आयपीएल बघायचा मूड जातो यार या असल्या संशयास्पद मॅचेसमुळे!
शारूकने कप्तान बदलला!! पण
शारूकने कप्तान बदलला!! पण उलटा परिणाम फारच एकतर्फी झाला सामना..
भाऊ, कॅच चे अगदीच पटलं बघा...
तसंच होतं तर कोहलीने शेवटीं
तसंच होतं तर कोहलीने शेवटीं येवून एबीडीला वरच्या क्रमांकावर पाठवणं , हा अधिक शहाणपणाचा पर्याय होताच की >> भाऊ तुमचा आयडी ऋण्म्याने पळवला का ?
कोहली तीन नि अॅबे चार वर जास्त चांगले खेळतात ते कशाला बदला ?
*कोहली तीन नि अॅबे चार वर
*कोहली तीन नि अॅबे चार वर जास्त चांगले खेळतात ते कशाला बदला ?* - असामीजी, एबीडीला खूपच खाली , (नवोदितांनंतर) फलंदाजीला पाठवला होता, त्यावरचीच माझी प्रतिक्रिया आहे ती !!
कोहली चा तो निर्णय 'आफ्टर द
कोहली चा तो निर्णय 'आफ्टर द फॅक्ट' होता. त्याने खेळताना, ड्रेसिंग रूम कडे खूण करून लेफ्ट हँडेड बॅट्समन ला पाठवायला सांगितलं होतं. त्यामुळे तो खाली आणी एबी वर येणं शक्य नव्हतं. असो.
आज अगदीच एकतर्फी मॅच झाली. उद्या आणी परवा डबल हेडर!
असे मिड सीझन कॅप्टन बदलणे फार
असे मिड सीझन कॅप्टन बदलणे फार काही योग्य वाटत नाही यार!
डीकेला बदलायलाच पाहिजे होते पण ते सीझन सुरु व्हायच्या आधी!
शेक्सपियरचे एक वाक्य आहे -
शेक्सपियरचे एक वाक्य आहे - कोणी बदनामी करणारा " ..robs me of that which not enriches him, and makes me poor indeed"
काल पंजाबने आरसीबी ला हरवताना हेच वाक्य आठवले. मी शेक्स्पियर वगैरे वाचलेला नाही. हे त्याचे वाक्य दुसर्या एका आवडत्या पुस्तकात आहे. पंजाब तळाशी आहे. या विजयाने त्यांना काहीच फायदा नाही. पण आरसीबी खाली घसरले
काल १७ बॉल्स मधे ९ की १० हवे होते तेव्हा इझी जिंकतील असे समजून मी बघणे सोडून दिले. नंतर बघतो तर एक बॉल मधे एक रन हवा असे इक्वेशन होते. कोणी जबरी बोलिंग केली की पंजाबने गलथान बॅटिंग केली माहीत नाही.
>>शेवटच्या षटकात २ धावा
>>शेवटच्या षटकात २ धावा काढायला गेल आणि राहुल असताना शेवटचा चेंडू लागावा..<<
नाहितर काय; अश्याने आय्पिएल्च्या डायहार्ड फॅन्सचे वांदे करुन ठेवतात.
भूत पाहायचे म्हटले तर हवे
भूत पाहायचे म्हटले तर हवे तिथे बघता येते. काय कुठे बघायचे हे आपल्यावर असते. इथे वाचा शेवटची ओव्हर
https://www.espncricinfo.com/series/8048/commentary/1216531/royal-challe...
१८ मधे ११ हवे होते. अठरा नि एकोणिसाव्या मधे ५ नि चार काढले होते. पंजाब मागच्या तीन मॅचेस (क्रमाने नाही) कशा हरली होती हे बघा.
मॅचेस फिक्स च असतात ह्यावर एकमत असेल तर इथे येण्यात वेळ वाया कशाला घालवताय हा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा. फिक्स करणारे हुशार कि तुम्ही ह्याचे उत्तर तुमच्या स्वतःकडेच आहे.
(तुम्ही मधे ऋणम्याला धरत नाही त्याला मायबोली अॅडमिन ने मायबोली वरचा ट्रॅफिक वाढवून मायबोली जिवंत ठेवायला नि समस्त स्टोरेज वाल्यांनी प्रोव्हायडर्स ना स्टोरेज विकत घ्यायला लागावा म्हणून नेमलय )
>>इथे वाचा शेवटची ओव्हर...<<
>>इथे वाचा शेवटची ओव्हर...<<
सिरियस्ली? व्हाय ड्रॅग टु लास्ट ओवर व्हेन यु हॅव अँपल विकेट्स इन हँड? १८ बॉल्स, ११ रन्स नीडेड, अँड दे वेट टु हिट ६ ऑन द लास्ट बॉल. आर यु एफिंग किडिंग योरसेल्फ?
आय्पिएल फॅन ऑफ द इयर अॅवॉर्ड हासील करना है क्या?..
*कोहली चा तो निर्णय 'आफ्टर द
*कोहली चा तो निर्णय 'आफ्टर द फॅक्ट' होता* - हें कळण्याइतपत क्रिकेटची समज मला असावी, हें मान्य करायला हरकत नसावी असं मला वाटतं.
फक्त, मला समजून हें घ्यायचंय कीं डावरा- उजवा फलंदाजांची जोडी असण्याचा फायदा इतका प्रचंड असतो का कीं तो मिळावा म्हणून एबीडीच्या कुवतीच्या फलंदाजालाही डावलून नवोदित डावरया फलंदाजांनाही वरच्या क्रमांकावर खेळवणं शहाणपणाचं असतं? चर्चेचा मुख्य मुद्दा तोच होता.
जे क्रिकेटचे जन्मजात पंखे
जे क्रिकेटचे जन्मजात पंखे असतात असतात ते आयपीएलच काही गल्ली क्रिकेटचा देखिल मन लावून आनंद लुटतात!
त्यामुळे असले काही पाहिले की वाईट नक्की वाटते पण क्रिकेट बघणे सुटत नाही.
काल कसे सामना जिंकण्याची खात्री १०० % टक्के झाली की एकाच षटकात चौकार षटकार मारून संपविला उगा रंगत निर्माण करायच्या भानगडीत पडले नाही पंड्या आणि डी-कॉक, राहुल- गेल सारखे..
बघायला गेलं तर हे विश्वच एक
बघायला गेलं तर हे विश्वच एक फिक्सिंग आहे. जे होणार ते होणारच. एक म्हण आहे जास्त बारकाईने बघायला गेलं तर बायकानाही मिशा दिसतात, त्यामुळे फिक्सिंग आहे की नाही या फंदात न पडता क्रिकेटचा आनंद घ्यायचा,करमणूक करून घ्यायची आणि सोडून द्यायचं.
सिरियस्ली? व्हाय ड्रॅग टु
सिरियस्ली? व्हाय ड्रॅग टु लास्ट ओवर व्हेन यु हॅव अँपल विकेट्स इन हँड? १८ बॉल्स, ११ रन्स नीडेड, अँड दे वेट टु हिट ६ ऑन द लास्ट बॉल. आर यु एफिंग किडिंग योरसेल्फ? >> दोन मिनिटे विचार कर नि सांग राहुल सारख्या प्रतिभावान खेळाडूला जो देशासाठी खेळतो, संघाचा कप्तान आहे, खोर्याने पैसे कमावतोय, ज्याचा ग्राफ वर जातोय नि जाणार आहे अशा सगळ्या खूणा दिसताहेत तो ह्या क्षणी कशाला फिक्सिंग च्या भानगडीत पडेल ? ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट असती तरी समजलो असतो. ह्या क्षणी एव्हढी स्क्रूटीनी होत असताना (परत कोवीड बबल मूळे बाहेरचा काँटॅक्ट जवळ जवळ शून्य असताना ) हि रिस्क घेण्याचे एक फक्त एक कारण दाखव. पुरावा नसताना फक्त फुकट प्लॅटफॉर्म मिळालाय नि टाइप करता येते म्हणून इतरांच्या ईंटीग्रीटी वर ऊठल्या सूठ ल्या ' अमका बॉल फिक्स होता, तमकी विकेट फिक्क्ष होती, अमका सामना फिक्स होता , मीच कसे हे आधी ओळखले होते ' वगैरे मधे तू असशील असे वाटले नव्हते.
फक्त, मला समजून हें घ्यायचंय कीं डावरा- उजवा फलंदाजांची जोडी असण्याचा फायदा इतका प्रचंड असतो का कीं तो मिळावा म्हणून एबीडीच्या कुवतीच्या फलंदाजालाही डावलून नवोदित डावरया फलंदाजांनाही वरच्या क्रमांकावर खेळवणं शहाणपणाचं असतं? चर्चेचा मुख्य मुद्दा तोच होता. >> भाऊ काही दिवसांपूर्वी मी मुंबई जीव तोडून डावरा- उजवा फलंदाजांची जोडी असण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करत असते हे लिहिले होते. त्यांच्या यशाकडे बघून तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न सुरू असेल. दुबे ११ व्या ओव्हर मधे आला होता, तो २-३ षटके फिरवेल नि मग अॅबे ला आणता येईल असा विचार असू शकतो. त्या पूर्ण सामन्यामधे नेहमीच्या चालू फॉर्म्यूला न वापरता बदलून बघू असा विचार दिसला. आज परत सुंदर पॉवर प्ले मधे आला.
आज abd परत वरती आला म्हणजे
आज abd परत वरती आला म्हणजे त्यादिवशी मुद्दाम त्याला खाली पाठवलं होतं. आयपीएल सामने फिक्स असतात असं वाटतंय आता.
>>ह्या क्षणी कशाला फिक्सिंग
>>ह्या क्षणी कशाला फिक्सिंग च्या भानगडीत पडेल ?<<
अरे बाबा, फिक्सिंग म्हणजे ती "भाईने बोला है..." टाइप, पैसे मिळण्याकरता केलेली नाहि. आता समीकरणं बदलली आहेत. आय्पिएलला मी मागे सर्कस म्हणालो होतो, हा त्यातलाच प्रकार आहे. एंटरटेनमेंट वॅल्यु वाढवण्याकरता मॅचेस गरज नसताना ताणायच्या, ओढुन ताणुन सिंटिलेटिंग फिनिश साधायचा वगैरे. काल कशी मुंबईने मॅच मस्त रफादफा करुन संपवली. नो इफ्स, नो बट्स. पंजाबने तसं केलं नाहि, उद्या तश्याच परिस्थितीत अजुन कोणी एंटरटेनमेंटच्या नांवाखाली परत मुर्खपणा केला तर संशयाची सुई हलणारंच ना?..
>>त्यामुळे असले काही पाहिले की वाईट नक्की वाटते पण क्रिकेट बघणे सुटत नाही.<< +१
@ असामी, भावनिक होऊ नका
@ असामी, भावनिक होऊ नका
आयपीएल हे देशासाठी खेळले जात नाही तर मालकासाठी खेळले जाते. ईथले एथिक्स कमिटमेंट वफादारी सारे निकष वेगळेच असतात. माझे कित्येक आवडते खेळाडू आहेत यात त्यांच्या सामन्यातही फिक्सिंग दिसले की मी त्याला फिक्सिंग बोलतो. कारण मला त्यांच्या आयपीएल मधील फिक्सिंग बद्दल काही वाटत नाही. देशासाठी खेळताना केली तर मात्र तोंड बघणार नाही पुन्हा कधी.
आणि हो, धोनी सुद्धा करत असेल ईथे फिक्सिंग, राहुलचे काय कौतुक सांगताहेत. त्यांच्यात ते तसे ठरलेलेच असेल की हे आपल्याला काही ठराविक वेळी सामना रोचक करायला करायचेच आहे. सगळेच करणार आहोत. आणि यात कोणी काही अपराधी वाटून घ्यायची गरज नाही
Pages