रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे.
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.
मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)
बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.
याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.
आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.
असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..
प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)
खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.
(फोटोचा प्रताधिकार माझाच )
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.
पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!
ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.
प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..
प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.
cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत
प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<
उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )
तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे
प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.
प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,
>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!
चुपके चुपके
चुपके चुपके
tech tar
तुझ्या माझ्या संसाराला आणि
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मराठी चित्रपटात गोर्या गोर्या गालावरी खूप श्रवणीय गाणे आहे पण बघायला बकवास. खूपच बाळबोध चित्रण.
ये तो पहला जाम है,
ये तो पहला जाम है,
अभी तो शाम है
ओ मेरी बेबी डाॅल... एक फुल
ओ मेरी बेबी डाॅल... एक फुल चार काटे. सुनील दत्तचा so called rock n roll
गाणं छान आहे हो पण.....
गाणं छान आहे हो पण......आपल्याला पण २ गिरक्या घ्याव्याशा वाटेल असे. सुनील दत्त चालवून घ्यायचा.
मेरा दिल अब तेरा ओ साजना मधल्या राजकुमारचं काय करूया? लताचा आवाज, मीनाकुमारीचे विभ्रम...... आणि हा प्राणी काय करतोय त्याचे त्याला माहीत !!! आपल्याला नाही येत तर सूट घालून प्रेक्षकात बसून टाळ्या वाजव की.
दोन्ही हात उंचावून चिपळ्या वाजवल्यासारखा नाचतोय. एक्स्ट्राज पण चांगले नाचलेत त्याच्यापेक्षा.
गाण्याच्या शेवटी फक्त मीनाकुमारीचा हात हातात घेऊन झोके द्यायचेत साधे तर स्पॅनरने नटबोल्ट घट्ट केलेत.... असो.
१००%
१००%
राज कुमार ह्या ओव्हर हाइप्ड नटाविषयी बोलावे तितके कमीच! त्याचा नाच हा तर निखळ विनोदाचा विषय आहे! दिल अपना और प्रीत पराई ह्यातले त्याचे नाच अशक्य विनोदी आहेत. सिनेमाचा नृत्य दिग्दर्शक सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दीर्घकाळ डिप्रेशनमधे गेला असेल बहुधा!
हीर रांझाही त्यातलाच प्रकार.
@कारवी
@कारवी

दोन्ही हात उंचावून चिपळ्या वाजवल्यासारखा नाचतोय.
राजकुमारचा नाच
राजकुमारचा नाच

बिचारयाला नाचताच येत नसेल तर त्याचा काय दोष.. चोरीओग्राफरने सावरून घ्यायला हवे होते
जसे की तिरंगामध्ये नाना आणि राजकुमार दोघांचीही नाचाची बोंब. म्हणून पी ले पी ले ओ मेरे राजा आणि जानी गाण्यात दोघे दणादण दारूच्या बाटल्या फोडत होते
दुसर्या एका धाग्यामुळे हे
दुसर्या एका धाग्यामुळे हे गाणं आठवलं.
काही खातापिताना बघू नका. ठसका लागेल.
https://www.youtube.com/watch?v=X8Ky3pUpzZk
अगायाया
अगायाया
इतकी नाचत करायची सगळी कामं.अश्याने आज संध्याकाळचा स्वयंपाक उद्या संध्याकाळी व्हायचा.
सुपात पाखडलेलं न धुताच
सुपात पाखडलेलं न धुताच शिजायला टाकलं. काय होतं ते ?
नवरंग बहुदा पहिलाच हिंदी
नवरंग बहुदा पहिलाच हिंदी रंगीत सिनेमा होता ( चु भु दे घे) त्यामुळे रंगाबाबत जरा जास्तच हात सैल सोडला असावा.
(एच टी एम एल मध्ये ब्लिंक, रंगीबेरंगी अक्षरे, इकडे तिकडे स्क्रोल करणारा मज्कूर, ई ई करता येते हा शोध लागल्यवर पब्लिक ने सढळ वापर केला होता. सर्व जण जिओसिटी वर आपापले होम पेज तयार करत)
काय फनी आहे.
काय फनी आहे.
मध्यंतरी हेमामालिनीने जमिनीला झाडूचा स्पर्श न होऊ देता स्वच्छता मोहिम केली होती त्या क्लीपची आठवण झाली
@भरत , प्रचंड हसले विडिओ
@भरत , प्रचंड हसले विडिओ पाहून..
हा विडिओ उघडल्यावर पुढे लगेच 'आधा हें चंद्रमा ' च suggestion आलं, त्यातला फुलाफुलांचा ड्रेस पण खास आहे.
कमाल होता नवरंग
कमाल होता नवरंग
आश्विनी येना, झाडू मारता मारता नाच इथूनच इन्स्पायर झाले असावेत
त्या नवरंगच्या गाण्यात
त्या नवरंगच्या गाण्यात सुरुवातीला आणि शेवटी 2 क्षण दिसलेली संध्या ही त्याची प्रत्यक्ष बायको असते आणि मध्ये नाचत स्वयंपाक करणारी त्याच्या स्वप्नातली बायको
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=X8Ky3pUpzZk >>>>>
काय आणि किती लिहायचे म्हणून सोडून दिले होते...
आलं का हे आचरट गाणे इथे.
सुरूवातीला नायक असा बघतोय की -- कोण जाणे काय जेवायला लागतेय या कल्पनेने घाबरलाय
आधी वाटण घालते मग त्यातच कच्चे तांदूळ? पुलाव केला तरी तांदूळ भिजवून निथळून घालतात.
लगेच पळीने ढवळते तेव्हा जलतरंग वाजवलाय मागे. स्टाईलमध्ये ठेवलेली पळी ठणठणत खाली येते.
ती उचलायचे सोडून मॅडम चूल फुंकतात. फुंकणीचा आवाज कशाने केलाय कोण जाणे.....
तो तीखे तीखे नयन गातोय --- ही प्रेमळ कटाक्ष टाकतेय
मग स्वैपाकाच्या मध्येच झाडलोट... हात न धुता त्याच हाताने स्वैपाक + लोणी
सगळे पाहून गीतकारही हबकलाय....
पारस से सोना टकरा गया म्हणे. पारस लोहा टक्कर = सोना हे विसरला बहुतेक.
आणि अहाहा शेवट --- सर्कशीतल्या हत्तीसारखी पोझ घेऊन जेवण वाढल्याची वर्दी. कित्ती छान.
पिंजरातलं “छबीदार छबी मी
पिंजरातलं “छबीदार छबी मी तोर्यात उभी” पाहीलयं का कुणी? जगदीश खेबूडकरांच्या लावण्या, राम कदमांचं पाय थिरकवणारं संगीत, उषा मंगेशकर यांनी तर एखाद्या फटाकड्या लावणीसम्राज्ञीचा नखरा आपल्या आवाजाच्या फेकीतून उभा केला आहे. पण पडद्यावर बघून मात्र सपशेल भ्रमनिरास. .
विचीत्र फुटवर्क, भडक हावभाव, जर्की हातवारे बघून म्हणावसं वाटतं “अरे करना क्या चाहती हो?” पाठीमागे नाचणार्या मुलींची ग्रेस पहा. चारहीजणी झोकात नाचल्या आहेत.
संध्या यांच्या नृत्यकौशल्याचा विषय निघाला त्यामुळे आठवले ते पाठवले.
https://youtu.be/zWoTi6-6u7Q
आणि ब्लाऊज बाह्या किती टाईट
आणि ब्लाऊज बाह्या किती टाईट आहेत.बदलताना नक्की आधी कात्रीने थोडा कापावा लागला असेल बाह्यांना
या गाण्यात स्व. संध्या ताई
या गाण्यात संध्या ताई सुरुवातीला डोळे मिटून कुटत असतात तेव्हा नंतर डोळे उघडून काहीतरी हॉरर सीन असेल असं वाटतं.कारण हिरो पण घाबरून बघतोय.
स्व. संध्या ताई यांचा नाच आणि
संध्या ताई यांचा नाच आणि हॉरर सीन हे समानार्थी शब्द आहेत --- भारतीय चित्रपट अभिनय कोशात, बघा कधीतरी.
त्यांनी सौन्दर्य / नृत्य / सुख यामागे विशेषण लावतात तसे नावामागे लावले वाटून मी चोप्यपस्ते केले. लक्षात नाही आला दुसरा अर्थ, सॉरी.
आहेत त्या अजून . स्व करू
आहेत त्या अजून . स्व करू नका.
एका पायावर उभे राहून जेवायला
एका पायावर उभे राहून जेवायला बसा असं सांगणं आणि पदराने वारा घालणं भारी आहे.
चूल फुंकल्यावर डोळे चोळतेय पण नायकाचं लक्ष तिच्या बालों में आहे
बाहुलीसारखी मान हलवणं ही सिग्नेचर मुव्ह दिसते आहे. शांताराम, संध्या आणि नृत्य दिग्दर्शक यांच्यातल्या कोणाची ते माहीत नाही.
आणि ब्लाऊज बाह्या किती टाईट
आणि ब्लाऊज बाह्या किती टाईट आहेत.बदलताना नक्की आधी कात्रीने थोडा कापावा लागला असेल बाह्यांना...हेच माझ्या मनात आले होते. (किंवा अंगावर शिवला असेल)
माहिती नव्हते , धन्यवाद भरत.
गाणे
दों आंखे बारा हात आणि नवरंग... मध्ये तिचे लाउड हावभाव आणि त्यासाठी घेतलेले क्लोज अप , प्रचंड ग्लो होणारा मेकअप (Aura आहे चक्क) बघून थक्क झाले होते. अजिबात गोडवा नाही चेहऱ्यावर !! (किंवा त्याकाळातले हेच सुंदर असेल)
! (किंवा त्याकाळातले हेच
! (किंवा त्याकाळातले हेच सुंदर असेल)>>
नाही हो. किती सुंदर अभिनेत्र्या होत्या, सुंदर नाचही होते.
ओह व्हेरी सॉरी
ओह व्हेरी सॉरी
संध्या ला दिर्घआयु लाभो माझ्याकडून अशी चूक झाल्याबद्दल.
आणि ब्लाऊज बाह्या किती टाईट
आणि ब्लाऊज बाह्या किती टाईट आहेत.बदलताना नक्की आधी कात्रीने थोडा कापावा लागला असेल बाह्यांना...हेच माझ्या मनात आले होते. (किंवा अंगावर शिवला असेल)>>>
त्याकाळातल्या बर्याच हिऱोईनचे तंग चुडीदार कुर्ते बघून त्यांना त्यात गाणं, नाच तर दूरच पण श्वासही कसा घेता येत असेल असा प्रश्न पडायचा
अगदी चवळीच्या शेंगेची अंगकाठी असलेल्या सायरा, शर्मिला, साधनावरही हे इतके घट्ट कपडे नाही चांगले दिसायचे हेमावैम. कपडे अगदी अघळपघळ नकोत अंगाबरोबर व्यवस्थित बसणारे हवेत हे मान्य पण ते कपडे अतीच तंग होते..मग नंदा माला सिन्हा आशा पारेख वगैरेची तर बातच नको 
! (किंवा त्याकाळातले हेच
! (किंवा त्याकाळातले हेच सुंदर असेल)>>
नाही हो. किती सुंदर अभिनेत्र्या होत्या, सुंदर नाचही होते...
हो मानव,
जुन्या मायबोलीवर तिच्या सौंदर्याची स्तुती करणारे/तिला प्रत्यक्ष पाहिलेले पुष्कळ प्रतिसाद वाचले होते म्हणून मला वाटले माझ्या द्रुष्टीचा/वयाचा दोष आहे की काय !
अगदी चीकू,
तौबा ये मतवाली चाल मध्ये मनोजकुमार/ मुमताजच्या कुर्तीची झीप कव्हर फोल्ड ओपन झाले आहे "चाल" दाखवण्याच्या नादात कधीही उसवेल किंवा pop ओपन होईल असे वाटते
विकी म्हणतंय Navrang is noted
विकी म्हणतंय Navrang is noted for its dance sequences by Sandhya.
शांतारामांच्या किंवा कदाचित त्या काळातल्या कल्पना वेगळ्या होत्या. संध्या त्या बरोबर प्रत्यक्षात उतरवायच्या. आता ६० वर्षांनी ते विचित्र वाटतंय.
मी लहानपणी जेव्हा हा चित्रपट पाहिलाय किंवा छायागीत, चित्रहारमध्ये गाणी पाहिलीत तेव्हा त्या नाचाचे खूप कौतुक वाटायचे. होळीला न चुकता "जारे हट नटखट" लागायचं आणि ते आवडायचं.
नवरंगमध्येच तुम सैंया गुलाब के फूल या गाण्यावर घोड्यासोबत नाचाची जुगलबंदी आहे.
Pages