चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी त्यांचा अलिकडचा अजिबात मेकअप नसलेला आणि क्रीम कलरच्या साडीतला फोटो पाहिलाय. त्यांचे फीचर्स सोबर आणि सुंदर आहेत. वयाचा आबही सांभाळलेला आहे. देव जाणे एवढा भयाण मेकअप आणि विचीत्र केशभुषा त्या काळी का केली असेल?

सरोजा नाचकामात थोडी कमीच दिसतेय. हिच्या जागी वैजयंती असती तर एक मिनिट पाय जमिनीवर टिकले नसते तिचे.

वैजयंती व र
पद्मिनीचा हा एक अतिशय प्रसिद्ध आविष्कार बघा.

मुख्य हिरोईन पद्मिनी आहे, वैजयंतीची थोडी निगेटिव्ह भूमिका आहे. मूळ तामिळ चित्रपट, हिंदीत परत चित्रीकरण केलेय पण कमाल म्हणजे दोघीनीही अगदी तशाच स्टेप्स केल्यात. जाणकार आणि उत्साही लोकांनी दोन्हीही नृत्ये तुकड्यातुकड्यात तुलना करून हा निष्कर्ष काढलाय.

संध्या ह्या अभिनेत्रीबद्दल जरा जास्तच हाईप आहे असे वाटते. अगदी ५०-६० वर्षाचा काळ होता हे मान्य केले तरी तो "अभिनय" अत्यंत खोटा, बटबटीत होता. अनेक उत्तम, श्रवणीय गाण्यांची पडद्यावर पार वाट लावण्यात संध्याताईंचा सिंहाचा वाटा आहे.

त्याच काळातील अन्य सिनेमे पाहिले आणि त्यातील नट्यांचा अभिनय पाहिला तर इतका वाईट, बटबटीत, खोटा अभिनय दिसणार नाही. भयावह वेषभूषा दिसणार नाही. सीमा देव, उषा किरण, जयश्री गडकर, उमा, शोभना समर्थ ह्यांचे जुने सिनेमे पहा. हिंदीतही तेच. एकंदरीत शांताराम ह्यांचे दिग्दर्शन आणि संध्या ह्यांचा तथाकथित अभिनय हे एक डेडली समीकरण होते असेच दिसते.

मुख्य हिरोईन रागिणी आहे, वैजयंतीची थोडी निगेटिव्ह भूमिका आहे. मूळ तामिळ चित्रपट, हिंदीत परत चित्रीकरण केलेय पण कमाल म्हणजे दोघीनीही अगदी तशाच स्टेप्स केल्यात. जाणकार आणि उत्साही लोकांनी दोन्हीही नृत्ये तुकड्यातुकड्यात तुलना करून हा निष्कर्ष काढलाय.>>

ही पद्मिनी आहे का?

एकसे एक आहेत विडीओज Proud

ते गालावर काढलेले खोटे आकडे पण विनोदी दिसत कधीकधी दोन पण पाहिलेले आठवतात बहुतेक वैजयंतीमालाच्या कोणत्यातरी गाण्यात

"संध्या ह्या अभिनेत्रीबद्दल जरा जास्तच हाईप आहे असे वाटते. ...... एकंदरीत शांताराम ह्यांचे दिग्दर्शन आणि संध्या ह्यांचा तथाकथित अभिनय हे एक डेडली समीकरण होते असेच दिसते." - +१ . टोटली सहमत आहे.

१९५९ साली आलेल्या नवरंग च्या बरोबरीनं आलेले, अनाडी, कागज के फूल, पैगाम, गूंज उंठी शहनाई, सुजाता, दिल देके देखो वगैरे सिनेमे काळानुरूप आता जुने किंवा अगदी कालबाह्य सुद्धा वाटतात. राजेंद्र कुमार वगैरे मंडळी बेगडी वाटू शकतात. पण नवरंग च्या आणी संध्याच्या बटबटीतपणाची लेव्हलच निराळी आहे.

संध्याबाई आता म्हातार्‍या झाल्यावर किती अप्रतिम देखण्या दिसत आहेत.

तेव्हाही सुंदर असतीलच पण अति मेकप मुळे ते सौंदर्य बटबटीत वाटत असेल. शिवाय अतिशय ऑकवर्ड हालचाली आणि चेहर्‍यावर भावनांची अतिशयोक्ती यात गंडल्या. त्यांना म्हणे कोरिओग्राफर नसे, त्या स्वतःच आपल्या स्टेप्स ठरवत - बहुतेक अगदी आयत्यावेळी. मग दुसरं काय होणार?

मराठी सिनेमावर, नटनट्या, दिग्दर्शकांवर नाटकांचा प्रभाव असेल कदाचित त्यामुळे मराठी सिनेमातल्या हालचाली, हावभाव बरेचदा लाउड वाटतात मलातरी. अनेकदा आताच्या सिनेमातही वाटतात. सटल काही नसतं बरेचदा.

सीमा देव, उषा किरण, जयश्री गडकर, उमा, शोभना समर्थ ह्यांचे जुने सिनेमे पहा. >>> सुलोचनाही घ्या यात. हे असे अनेक सन्माननीय अपवाद आहेत याची नम्र जाणीव आहे.

त्यांना म्हणे कोरिओग्राफर नसे, त्या स्वतःच आपल्या स्टेप्स ठरवत - बहुतेक अगदी आयत्यावेळी. मग दुसरं काय होणार?>>>

राजकमलमध्ये सबकुछ शांताराम असे होते तेव्हा आणि संध्या शरणभक्त होती.

तो मेकप बाजूला काढला असता आणि नैसर्गिक अभिनय करायला लावला असता तर संध्या चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवू शकली असती. पण तिने भक्ती स्वीकारली आणि तिच्या देवाच्या डोक्यात ज्या कल्पना होत्या त्या जशाच्या तश्या पडद्यावर चितारल्या.

काल संध्याबद्दल सहज शोधले, मधुरा जसराजचा हा एक लेख वाचायला मिळाला.

नाच बीच पण चांगला आहे.मेकअप भडक्क आहे.तोही काही पिरियड फिल्म चा पार्ट असावा.म्हणजे पिक्चर नृत्यावर म्हणून वगैरे
पण मजेशीर आहे खरोखरच. आधा है चंद्रमा मध्ये लहान मुलींच्या गॅदरिंग मेकअप सारखे गालावर लाल ठिपके आहेत(हा संध्या ताईंबद्दल डिसरिस्पेक्ट नाही.त्याकाळी ब्लॅक अँड व्हाइट च्या जमान्यातून नुकतं बाहेर आल्याने भडक मेकअप चा ट्रेंड चालू राहिला असेल.)
मुख्य म्हणजे हिरो नुसता उभा राहून बघून सौंदर्य रिपोर्ट करत असतो क्रिकेट कमेंटरी सारखे.थोडे जवळ जाऊन बोलावे,डोळ्यात प्रेम दाखवावे, मागे फिरावे ते नाही.बातमी वार्ताहरा सारखा स्थिर उभा राहून 'आता आपल्याला मागे हे हॉस्पिटल दिसते आहे.तुम्ही बघू शकता की त्यातून लोक स्वतः लंगडत चालत बाहेर येत आहेत.स्ट्रेचर नाहीत.शेजारी कुत्रे भुंकते आहे..' वगैरे वगैरे.

मुख्य म्हणजे हिरो नुसता उभा राहून बघून सौंदर्य रिपोर्ट करत असतो क्रिकेट कमेंटरी सारखे.थोडे जवळ जाऊन बोलावे,डोळ्यात प्रेम दाखवावे, मागे फिरावे ते नाही.बातमी वार्ताहरा सारखा स्थिर उभा राहून 'आता आपल्याला मागे हे हॉस्पिटल दिसते आहे.तुम्ही बघू शकता की त्यातून लोक स्वतः लंगडत चालत बाहेर येत आहेत.स्ट्रेचर नाहीत.शेजारी कुत्रे भुंकते आहे..' वगैरे वगैरे.

>>>>> अनु अगं ...... Rofl

मुख्य म्हणजे हिरो नुसता उभा राहून बघून सौंदर्य रिपोर्ट करत असतो क्रिकेट कमेंटरी सारखे.थोडे जवळ जाऊन बोलावे,डोळ्यात प्रेम दाखवावे, मागे फिरावे ते नाही>>

हाहा.... Happy Happy

ह्या चित्रपटात त्याची भूमिका थेट प्रियकराची नाही, त्याच्या कल्पनेत त्याच्या बायकोने असे दिसावे/वागावे असे त्याला वाटत असते. पण मेकपची नवी तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे त्याच्या कल्पनेतील मेकप तिला फासून तो सुरक्षित अंतरावरून तिला बघत असावा. आपली कल्पना अगदीच हाताबाहेर जातेय असे वाटले तर झपकन यु टर्न मारून चुलीपाशी येऊन मसाले कुटत बसलेल्या बायकोला बघत बसावे ....

नवरंगची कथा अगदी छोटी पण गोड आहे. बायकोवर प्रेम करणारा कवी, सामान्य लोकांपेक्षा थोड्या वेगळ्या अपेक्षा असतात पण त्या बायकोला नीट सांगता येत नाहीत आणि तिलाही कळत नाहीत. म्हणून तो स्वप्नरंजनात बायकोबरोबर रमतो.

ओह म्हणजे याला हाय फाय बायको हवीय आणि ही एकदमच साधी आहे.
पण स्वप्नात तरी जरा मोकळं वागून अश्या मेकअप, चंदेरी ब्लाऊज, गालावर ब्लशर,हेअर स्टाइल केलेल्या नाचत बागडत गिरक्या घेत उद्या मारत स्वयंपाक करणाऱ्या बायकोचा हात हातात घ्यावा की नाही ☺️☺️स्वतःच्या स्वप्नात आपण सर्वात कॉन्फिडन्स वाले आणि यो असतोय.

Biggrin हँ, असला हिरो म्हणजेच खरं स्वप्न! नायतर जळ्ळं हे अमोल पालेकर छाप हिरो लोक स्वप्नात हेमामालिनी जरी 'जानेमन जानेमन' करत आली तरी तिची पार विद्या सिन्हा करून टाकतात.

किस्मत नामक एका बकवास सिनेमात "कजरा मुहब्बतवाला अखियोंमे ऐसा डाला" ही कव्वाली आहे. मला हे गाणे आवडायचे. पण पडद्यावर अत्यंत भयंकर आहे. विश्वजित स्त्रीच्या वेषात आणि बबिता पुरुषाच्या वेषात. बापरे! विसरू म्हटले तरी विसरता येत नाही.
ओ पी नय्यर कसा तयार झाला ह्या सिचुएशन्ला देवास ठाऊक!

विश्वजित स्त्रीच्या वेषात आणि बबिता पुरुषाच्या वेषात. बापरे! विसरू म्हटले तरी विसरता येत नाही.>>>>>

काय भयंकर आढळले हो तुम्हाला यात?? विश्वजित बबितापेक्षा गोड दिसतो/लाजतो/ठुमके मारतो/आणि बरेच काही... बबिता फिकी पडते की त्याच्यासमोर. त्यानंतर वि. ने कायम स्त्रीभूमिका केल्या असत्या तरी चालले असते. मी तसेही त्याला दैवाने मिळालेल्या सुंदर गाण्यांमुळे सहन करत होते. रफीच्या जागी आशाच्या आवाजात गायला असता इतकेच. Happy Happy

मी लहानपणी जेव्हा हा चित्रपट पाहिलाय किंवा छायागीत, चित्रहारमध्ये गाणी पाहिलीत तेव्हा त्या नाचाचे खूप कौतुक वाटायचे. होळीला न चुकता "जारे हट नटखट" लागायचं आणि ते आवडायचं.
>>
++ मस्त आहे ते गाण अजुनही मला आवडतं. आताच्या पिढीला कदाचित नाही आवडणार.

त्याच काळातील अन्य सिनेमे पाहिले आणि त्यातील नट्यांचा अभिनय पाहिला तर इतका वाईट, बटबटीत, खोटा अभिनय दिसणार नाही. भयावह वेषभूषा दिसणार नाही. >>>>>
हे मात्र मान्य आहे. संध्याताई थोड्या जास्तच भाउक होउन आणि अति मेकप करुन भुमिका सादर करत.

श्वजित स्त्रीच्या वेषात आणि बबिता पुरुषाच्या वेषात. बापरे! विसरू म्हटले तरी विसरता येत नाही.>>>
दोघेही चांगले नाचलेत. मला हे पण गाणं आवडतं पहायला आणि ऐकायला ही. बबिता करिष्माची आई थोडासा
नॉटी आणि पुरुषी पणा मला त्या दोघींत नेहेमी जाणवला.बबिताच किस्मत मधल 'आओ हुजुर तुमको' पण सही आहे (कालसापेक्ष)
विश्वजितही सुंदर नाचलाय की.

>>काय भयंकर आढळले हो तुम्हाला यात?? विश्वजित बबितापेक्षा गोड दिसतो/लाजतो/ठुमके मारतो/आणि बरेच काही
नाही आवडले आजिबात. निव्वळ गाणे ऐकून असल्या प्रकारचे असेल असे वाटले नव्हते.
बहुधा बाकीचा किस्मत सिनेमा पाहिल्यामुळे (जो अत्यंत फालतू होता) आधीच मत कलुषित झाले असेल. असो.

( हाफ टिकट मधले साधारण तसेच गाणे मला आवडते पण हे नाही.)

जाऊ द्या, तनू वेड्स मनू मधलं कजरा मुहब्बतवाला बघा आणि मूळ विसरून जा... (रिमिक्स नाही, मूळ गाणेच आहे. पण दारू प्यायलेली कंगना, स्वरा, माधवन, दिपक डोब्रियाल आहेत. Happy )

संध्याबद्दल चर्चा वाचुन हसू आले. मजेशीर चर्चा होती.
का माहिती नाही पण मला ती व तिचे नाच दोन्ही आवडायचे. काहीतरी असं वेगळं होतं तिच्या नाचात व दिसण्यात की जे मला आवडायचं. मातोश्रींनी पुर्वी पाहिले होते संध्याला कोणत्यातरी शुटिंगमधे. अक्षरशः साम्राज्ञी सारखी दिसत होती म्हणे.

ऐ मालिक तेरे बंदे हम किती जग प्रसिद्ध वर्ल्ड बेस्त साँग आहे. पन त्यात एक शांतारामीय टच आहे. जसे कि सर्व खोलीत बसून प्रार्थना करतात वारे येते व खिडकीचे दार एका खिडकीतच ठेवलेल्या तांब्याला आपटून टिंग टिन टिंग असा नाद येतो. जो गाण्याच्या साउंड इफेक्ट मध्ये घेतला आहे.
आता वारे किती रँडम येते व दर वेळी तसाच कसा येइल हे मला लहान पणा पासून पडलेले कोडे आहे. बघा ते गाणे. इट जस्ट कीप्स मी अवेक अ‍ॅट नाइट.

Pages