आदरणिय श्री मोदीजींचे कालचे भाषण

Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 22:44

भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.

जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न

या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.

बाकीचे मुद्दे म्हणजे आत्मनिर्भर हे कशाच्या संदर्भात आहे आणि नेमके काय करायचे हे ही समजले नाही. पण आधी कोरोनाचे मुद्दे स्पष्ट झाले तर आभारी राहीन.

धन्यवाद
आपलाच

समोरच्या बाल्कनीतला बंब

Group content visibility: 
Use group defaults

निर्मला सीतारामन यांनी सुक्ष्म-लघु- मध्यम उद्योगांसाठी आतमनिर्भर भारत अभियान असं नाव असलेल्या कोव्हिड रिलीफ पॅकेज म्हणून ३ लाख करोड रुपयांची क्रेडिट गॅरंटी जाहीर केली. म्हणजे या उद्योगांनी कर्ज काढावं ते बुडलं तर सरकार भरेल. (२० लाख कोटीतले ३ लाख कोटी आश्वासने देऊन भरले की नाही?

पण दुसरीकडे या उद्योगांसाठीचे मंत्री नितीन गडकरी म्हणतात की वेगवे गळ्या सरकारी संस्थाच या उद्योगांचं ५ लाख कोटी इतकं देणं लागतात.
गडकरी सीतारामन बाईंना ट्रोल करताहेत का?

लॉकडाऊनच्या आधी रामविलास पास्वान यांनी ज्या योजना जाहीर केल्या होत्या त्याचा आणि कोरोनाचा संबंध नाही. त्याच योजना आता पॅकेज मधे आल्या आहेत. अशा किती जुन्या योजना पॅकेज म्हणून पुन्हा पुन्हा दिल्या आहेत हे पहायला लागेल. नाहीतर बिहारला पॅकेज दिलं पण ते कधीही मिळालं नाही असं व्हायचं.

Lol
शेतकरी सन्मान योजना जी २०१९ च्या निवडणुकांच्या आधी (रागाने ७२००० वाली स्कीम सांगताच आलेली) मागील तारखेने सुरू केलेली. ती पण
आत्मनिर्भर झाली.

मोदींच्या सगळ्या योजना म्हणत असतील, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर मध्ये काय फरक आहे, ते कोणी सांगेल का?

भाजप सरकार च कस आहे, काम कमी आणि जाहिरात जास्त.
प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायची काय गरज आहे?

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर मध्ये काय फरक आहे, ते कोणी सांगेल का?
नवीन Submitted by भरत. on 15 May, 2020 - 09:16
--

तुमची केस सांगण्या पलिकडे गेली आहे. कारण मोदी सरकारच्या कोणत्याही योजनेत, तुम्हाला नेहमी गौडबंगालच दिसते. तेव्हा तुम्ही रागा उर्फ राष्ट्रीय विदुषकलाच फाॅलो करा. तोच काय तो तुमचे समाधान करु शकतो.

मनमोहनसिंग सरकारच्या कारकिर्दीत भाजपने कधी कौतुक केलेलं ते समजेल का ?

मला एक कळत नाही, मोदीच्या निर्णयावर शंका उपस्थित केली की ती व्यक्ती लगेच काँग्रेस समर्थक होती का?
बाकी खरे चा कोरोना वरचा लेख अजून मायबोली वर असता तर लोकानी त्याला डॉक्टर म्हणणं सोडून दिलं असतं.

Lol

शेतकरी सन्मान योजना जी २०१९ च्या निवडणुकांच्या आधी (रागाने ७२००० वाली स्कीम सांगताच आलेली) मागील तारखेने सुरू केलेली. ती पण
आत्मनिर्भर झाली.
--
'आत्मनिर्भर झाली' तर याचा ही तुम्हाला त्रास होऊ लागला ? साप कोणाच्याही काठिने मेला तर काय फरक पडतो ? साप मेल्याशी मतलब ! शेतकरी, गरिब जनतेचे भले एखाद्या योजनेने होत असेल तर ती योजना राबवायला काय हरकत आहे ?

काहींच्या मेंदूचा विकास होणं अशक्य आहे.
नवीन Submitted by भरत. on 15 May, 2020 - 14:10
--
सहमत !
इथे मोदी सरकार विरोधात सातत्याने जे प्रतिसाद येत आहेत ते पाहून तुमचे म्हणणे कोणालाही पटेल.

सहमत !
इथे मोदी सरकार विरोधात सातत्याने जे प्रतिसाद येत आहेत ते पाहून तुमचे म्हणणे कोणालाही पटेल.
Submitted by समीर.. on 15 May, 2020 - 14:16
<<

सातत्याने ??

घाऊक बाजार भरलाय इथे मोदी विरोधाचा.
मोदींनी पॅकेज जाहिर केला तरी यांना त्रास, नाहि केला तरी यांना त्रास. त्या माणसाने करावे तरी काय ?

Package च्या नावाखाली packaging = बनवाबनवी करू नये.
वर एवढे मुद्दे लिहिलेत. ते खोटे आहेत हे दाखवून द्या.

निर्मला सीतारामन यांनी सुक्ष्म-लघु- मध्यम उद्योगांसाठी आतमनिर्भर भारत अभियान असं नाव असलेल्या कोव्हिड रिलीफ पॅकेज म्हणून ३ लाख करोड रुपयांची क्रेडिट गॅरंटी जाहीर केली. म्हणजे या उद्योगांनी कर्ज काढावं ते बुडलं तर सरकार भरेल.
<<

मग यात प्रॉब्लेम काय आहे ?
दरवर्षी शेतकरी कर्जमाफी होतेच ना ? भले ते कर्ज महागड्या गाड्या घ्यायला वापरले असले तरी !
--
उद्योजकांमुळे निदान, अनेक लोकांचे घर तरी चालते. या वर्षोनुवर्षे कर्जबुडव्यांचा काय उपयोग आहे ?

Package च्या नावाखाली packaging = बनवाबनवी करू नये.
वर एवढे मुद्दे लिहिलेत. ते खोटे आहेत हे दाखवून द्या.
नवीन Submitted by भरत. on 15 May, 2020 - 14:44
<<

बनवाबनवी काय आहे यात ?
अजून पोर जन्माला येऊन, रांगायला देखील लागले नाही, आणि तुम्ही पोराचे अवगुण सांगायला सुरुवात केलीत.

बाळ, त्यांचा अर्थ सरकारला आत्ता त्यांच्यासाठी दमडीचाही खर्च नाही.
त्यापेक्षा नितीन गडकरी म्हणताहेत ते थकवलेले पाच लाख करोड देऊन टाकावेत. म्हणजे तीन लाख करोड च्या कर्जाची गरजच नाही
आपल्याला कसा करोना relief म्हणून टॅक्स रिफंड दिला, तसंच.

मोदी आल्यानंतर मी थोडासा आशावादी होतो. कारण
भांडवलाचे विकेंद्रीकरण होईल हा आशावाद होता. त्याला पक्कं व्यवहारी कारण होतं. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात हा व्यापारी माणसाचा प्रदेश. हा मनुष्य देशभरात आहे. राजस्थानी, मारवाडी देखील छोटे छोटे उद्योजक म्हणून जगभरात आहे. यांच्या विकासाच्या योजना येतील. बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अनावश्यक उत्पादनांना चाप बसेल, रामदेवबाबा स्वदेशीला चालना देतील अशी स्वप्ने पाहिली.

पण प्रत्यक्षात रामदेवबाबाने स्वदेशीच्या नावाखाली स्वविकास केला. मल्टीनॅशनल्सच्या बडे ऑनलाईन उद्योग आले. अंबानी, अदानी सर्व क्षेत्रात घुसले. आता तर रिटेल मधे सगळे घुसल्याने हेच गुजराती, राजस्थानी बनिये उद्ध्वस्त झाले आहेत. तरीही ते मोदींचे गुणगाण करतात.

वाट बघीन पण पीएमटीनेच जाईनच्या चालीवर
उद्ध्वस्त होईन पण मोदीलाच मत देईन

ही अपेक्षा सगळ्यांकडूनच कशी काय ठेवावी बरं ? थोडे लोक तरी शहाणे असणारच ना ?

मुळात ते पोर नाहीच.
जुन्या बाहुल्यांचे हातपाय डोकीपोट तोडून एकत्र करून शिवलेत.

रिटेलचा बिझनेस २०१४ ला ३% हा बड्या कंपन्यांच्या हातात होता. तो आज २०% पर्यंत गेला.
याचाच अर्थ १७% वाणी उद्ध्वस्त झाले. इतरांना फटका बसत आहे. किराणा मालाची दुकानं बंद होताना दिसताहेत. हे दृश्य कधीही देशाने पाहीलेलं नाही.
इतक्या मोठ्या संख्येने स्वयंरोजगार उद्ध्वस्त होऊन मूठभरांच्या हाती गेला तर बाकीचे सर्व नोकर होणार आहेत. ही एक वेगळी गुलामीच आहे.

हे फार फार भारी आहे.
We don’t want to burden you” the finance minister responds to journalists asking for numbers & details about the breakup of the 20 lakh crore rescue package the PM has announced.

आता तर रिटेल मधे सगळे घुसल्याने हेच गुजराती, राजस्थानी बनिये उद्ध्वस्त झाले आहेत. तरीही ते मोदींचे गुणगाण करतात... त्याचे मुळ त्यांच्या धार्मिकतेत आहे. अनेक ठिकाणी ,अगदी पुण्या मुंबै मधे देखील हिंदी भाषिक भागवत कथा चालतात. त्याला हे राजस्थानी मोथ्या प्रमाणात येत असतात. तिथे भाजपाचे लोक येउन देणग्या देउअन जातात. प्रवचनकार महाराज मोदींचे गुणगाण करतात. भक्ती मार्गात कमी पैशात कसे आनंदात जगायचे ह्याचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे हे लोक मोदींचे गुणगान करत असतील तरी त्यात वावगे नाही. इस्कॉन मधे असे अनेक लोक गुज्जु माडु भेटतात. त्यामुळे आश्चर्य नाही वाटले.
युपी मधल्या अनेक प्रवचन्कार महाराजाम्चे सिनेमातल्या नटांना लाजवतील असे फॅन क्लब आहेत. हे असे आणखी बरेच दिवस चालु राहील असा माझा अंदाज आहे.

मराठी लोक ह्या बाबतीत थोडे प्रॅक्टीकल वाटले, म्हणजे टॅक्स बुडवायचे सर्व उपाय त्यांना माहीत असतात, पण काँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवुन मत मोदींना देतात. Happy

<< आधी केलेल्या वायद्याचे पैसे देता येत नसतील तर नवीन घोषणा केलेली रक्कम कुठून येणार? >>

----- निव्वळ घोषणाच करायची असेल तर रक्कम येण्याची चिंता कशाला ? पुढे वाटाण्याच्या अक्षता वाटायच्या.

आकड्यांची मोड मोड करण्यात तरबेज असणारे आणि त्यांच्या दिमतीला २१००० हजारांची भली मोठी आयटी फौज आहेच... रिपोर्ट कार्ड ला प्रसिद्धी देण्यासाठी अहोरात्र काम करतील Happy .

Pages